प्रश्नवेध यूपीएससी : भूगोल (स्वरुप आणि प्रश्न)
General Geography- यामध्ये प्राकृतिक व मानवी भूगोलाच्या मूलभूत संकल्पनांचा अभ्यास करावा लागतो.
(संग्रहित छायाचित्र)
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूगोल विषयाचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी या विषयाच्या अभ्यासक्रमातील घटक लक्षात घ्यावेत. हे घटक पुढीलप्रमाणे आहेत.
१) General Geography- यामध्ये प्राकृतिक व मानवी भूगोलाच्या मूलभूत संकल्पनांचा अभ्यास करावा लागतो.
२) Regional Geography- यामध्ये General Geography मधील मूलभूत संकल्पनांचे प्रामुख्याने भारताबाबत उपयोजन (application) अभ्यासावे लागते.
वरील दोन्ही घटकातील उपघटकांची सविस्तर यादी विद्यार्थ्यांनी करावी. या घटकाच्या अभ्यासाची पुस्तके निश्चित करावीत.
या दोन्ही घटकांपकी भारताच्या भूगोलावर चालू घडामोडीच्या अनुषंगाने येणारे प्रश्न सर्वाधिक (७०-८०%) असतात. सामान्य भूगोल (General Geography) यावर येणारे प्रश्न पूर्णत: संकल्पनात्मक असून त्यांची संख्या सर्वात कमी (२०-३०%) असते. त्यामुळे आपल्या लेखामध्ये आपण चालू घडामोडींच्या अनुषंगाने येणारया प्रश्नांचा थोडक्यात आढावा घेऊवनंतर परंपरागत संकल्पनात्मक प्रश्नांचा आढावा घेऊ.
- Defining blue revolution, Explain the problems and strategies for Pisciculture development in India?
१)संकल्पनात्मक भाग म्हणजे Blue Revolution आणि Pisciculture म्हणजे काय?
२)चालू घडामोडीच्या दृष्टीने Blue Revolution या भारत सरकारच्या योजनेचे सदस्य अपेक्षित आहे. थोडक्यात आयोगाचे प्रश्न देशाच्या समस्यांशी निगडीत असतात. याप्रकारच्या प्रश्नांचे उत्तर कोणत्याही एका पुस्तकामध्ये किंवा गाईडमध्ये सापडणार नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांनी दोन पातळ्यांवर अभ्यास करणे, आवश्यक आहे.
(अ)संबंधित विषयाच्या मूलभूत संकल्पनांचा सखोल अभ्यास करणे.
(ब)संबंधित विषयाचा चालू घडामोडींचा दर्जेदार वर्तमानपत्र व मासिकांमधून अभ्यास करणे.
या दोन्ही घटकांचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्यातील परस्परसंबंध अभ्यासणे, या दोन्ही घटकांना जोडून प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या गोष्टीचे आकलन करून अभ्यासाची दिशा ठरविणे आवश्यक आहे.
आजच्या लेखामध्ये आपण अभ्यासाची दिशा व टप्पे याबद्दल माहिती घेणार आहोत. त्यानंतर सामान्य अध्ययन १ मधील भूगोल विषयाच्या प्रश्नांच्या स्वरूपाची चर्चा करणार आहोत. त्याकरीता आपण आयोगाच्या जुन्या प्रश्न पत्रिकांमध्ये आलेले प्रश्न उदाहरणादाखल घेऊन तो प्रश्न विचारण्याचे कारण? उत्तरामध्ये काय अपेक्षित आहे? उत्तराचे घटक काय असावेत? याबाबत आजच्यावपुढील काही लेखांमध्ये चर्चा करणार आहोत.
वर नमूद केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी दोन पातळ्यांवर अभ्यास करावा, सर्वप्रथम विषयाच्या मूलभूत संकल्पना समजण्यासाठी ठउएफळ च्या सहावी ते बारावी पर्यंतच्या पुस्तकांचा अभ्यास करावा. त्याबरोबरीने खास भूगोलासाठी The Hindu, Indian Express ही वर्तमानपत्रे, योजना, कुरूक्षेत्र ही मासिके व India Year Book या शासकीय प्रकाशनाच्या Year Book चे वाचन करावे. स्थितीतील घटक काय आहेत. भारतीय अर्थव्यवस्था व समाज या दोन्हीला Pisciculture ची आवश्यकता का आहे? त्यापुढील समस्या व त्यावरील उपाय काय आहेत. या दोन्ही पलूंचा (संकल्पनात्मक व चालू घडामोडीच्या अंगाने) विचार करून त्यांची सांगड घालून उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. यानुसार आता आपण उत्तराचे घटक व त्या घटकांचा क्रम काय असेल ते पाहू या.
दर्जेदार उत्तराचे ३ प्रमुख भाग असतात – Introduction, Crux & Conclusion.
उत्तराचा Introduction मध्ये Blue revolution U Pisciculture चा अर्थ एक- दोन वाक्यात विशद करा त्यानंतर त्याचे अर्थव्यवस्थेसाठीचे महत्त्व नमूद करून समस्यांचा उल्लेख थोडक्यात – म्हणजे तांत्रिक, आíथक समस्या स्वरूपात करावा.
उत्तराचा गाभा (Crux) यामध्ये Pisciculture शी संबंधीत सर्व समस्यांचा थोडक्यात आढावा घ्यावा. समस्या स्पष्ट करताना त्यावरील उपायांची चर्चा करावी. उदा.
(१) या प्रक्रियेबद्दल लोकांमध्ये माहितीचा अभाव आहे.
(२) या प्रक्रियेतील तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण करण्यासाठी फ & ऊ चा अपुरेपणा
(३) य प्रक्रियेकरिता आवश्यक असणारे मोठे भांडवलवत्याचा अपुरेपणा.
(४) या प्रक्रियेमधून उत्पादित घटकांच्या साठवणूक, प्रक्रिया यासाठीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव.
(५) जलाशयांचे प्रदूषण, या समस्यांवरील उपाय स्पष्ट करताना जर काही सरकारी योजनांचा समावेश करता आला तर ते उपयुक्त ठरते.
उत्तराच्या Conclustion मध्ये Pisciculture च्या भविष्याबाबत आशादायक चित्र मांडताना भविष्यातील अन्न व इतर पूरक गरजा पूर्ण करण्यातील त्याचे महत्व अधोरेखीत करावे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांपकी नागरी सेवा परीक्षा (Civil Services Exam) ही परीक्षा सर्वात कठीण व आव्हानात्मक आहे. या परीक्षेमध्ये उमेदवाराच्या बुद्धिमत्तेचा, त्याच्या निर्णयक्षमतेचा, त्याच्या कल्पनाशक्तीचा कस लागतो. भारतातील सर्व परीक्षांपकी ही सर्वात कठीण परीक्षा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या अभ्यासास सुरुवात करण्याआधी परीक्षेचा अभ्यासक्रम व जुन्या प्रश्न पत्रिकांचा आढावा घेऊन आयोगाची रणनीती ओळखण्याचा प्रयत्न करावा, आयोगाद्वारे विचारले जाणारे प्रश्न विशिष्ट घटकांवरच व विशिष्ट स्वरूपाचे का असतात, याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करावा. आयोग ज्या उमेदवारांची निवड करत आहे. ते भावी प्रशासकीय अधिकारी आहेत, त्यामुळे त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना राष्ट्राच्या अर्थव्यवस्था, समाज, प्रशासन, पर्यावरण या घटकांशी संबंधित समस्यांची जाणीव आहे का? त्या समस्यांचे मूळ कारण काय आहे? त्या समस्यांवर उपाय काय आहेत? याचा अभ्यास करणे, अपेक्षित आहे.
First Published on June 29, 2019 12:03 am
Web Title: geography nature and question abn 97
No comments:
Post a Comment