करिअर मंत्र
मी २०१४ मध्ये दहावी उत्तीर्ण झालो आहे.
मी २०१४ मध्ये दहावी उत्तीर्ण झालो आहे. मला ६५ टक्के मिळाले होते. सध्या कला शाखेतून इंग्रजी माध्यमात बारावी करत आहे. नोकरीही सुरू आहे. मला पुढे शिकण्याची खूप इच्छा आहे. मी काय करावे? – सईद सद्दाम
आपण नोकरी करता करता शिकत आहात याबद्दल प्रथम अभिनंदन. आपल्या नोकरीचे स्वरूप न लिहिल्याने माझी अडचण झाली आहे. आपल्या पदवीचा त्यात हातभार किती, यावर मला काहीच सांगता येत नाही. मात्र, निव्वळ पदवी हाती आली म्हणून नोकरी सोडू नये. कदाचित पदवीनंतर पत्रकारितेतली पदविका, विधिशिक्षण असा विचार आपण करू शकाल असे मोघमात सुचवत आहे.
मी सध्या वाईन टेक्नॉलॉजीमध्ये एस.वाय.बी.एस्सी.ला आहे. बी.एस्सी.नंतर एमएस्सी करून एमबीए करावे का? कॅटची तयारी कशी करावी? परदेशात नोकरीच्या संधी कशा आहेत? मला वाइन मेकर व्हायचे आहे. – मिथिलेश महात्मे, नाशिक
तुला वाईनमेकर बनवायचे असेल तर एमबीएचा उपयोग नाही. मास्टर्स करून जीआरई देऊन परदेशातील शिक्षणक्रम पूर्ण केला तरच परदेशी नोकरीची संधी राहील. अन्यथा भारतातील वायनरीमध्ये अनुभव घेत प्रगती करावी लागेल. एम.बी.ए. केल्यास मार्केटिंगच्या कामात थोडासा उपयोग नक्की होईल.
First Published on May 2, 2019 1:32 am
Web Title: loksatta career mantra 34
No comments:
Post a Comment