प्रश्नवेध एमपीएससी : अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा सराव प्रश्न
अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा सराव प्रश्न
(संग्रहित छायाचित्र)
प्रश्न १ – मिशन शक्तीबाबत पुढील विधानांची सत्यता तपासा.
अ. ही भारताची उपग्रहनाशक क्षेपणास्त्र चाचणी आहे.
ब. दि. २७ मार्च २०१९ रोजी ही चाचणी घेण्यात आली.
१) विधान ‘अ’ सत्य असून विधान ‘ब’ असत्य आहे.
२) विधान ‘ब’ सत्य असून विधान ‘अ’ असत्य आहे.
३) दोन्ही विधाने सत्य आहेत.
४) दोन्ही विधाने असत्य आहेत.
प्रश्न २ – पुढीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?
१) परम विशिष्ट सेवा पदक – जनरल बिपीन रावत
२) कीर्ती चक्र – मेजर तुषार गौबा
३) नौसेना पदक – व्हाइस अडमिरल सुनील आनंद
४) वरीलपैकी नाही
प्रश्न ३ – सन २०१८ मध्ये
पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने सहा इमारतींना राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या इमारतीचा समावेश करण्यात आला आहे?
१) छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई
२) उच्च न्यायालय, नागपूर
३) शालिनी पॅलेस, कोल्हापूर
४) थिबा पॅलेस, रत्नागिरी
प्रश्न ४ – भारतरत्न नानाजी देशमुख यांच्याबाबत पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे?
१) महाराष्ट्राच्या कोडोली गावात
(हिंगोली जिल्हा) ११ ऑक्टोबर १९१६ रोजी जन्म
२) मूळ नाव चंडीकादास अमृतराव देशमुख
३) देशातील पहिले ग्रामीण विद्यापीठ – चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालयाची स्थापना
४) वरीलपैकी नाही
प्रश्न ५ – केंद्र शासनाने ‘ऑपरेशन ग्रीन्स’ कोणत्या उद्देशाने सुरू केले आहे?
१) टोमॅटो, कांदा व बटाटा यांचा पुरवठा व उपलब्धता सुरळीत ठेवणे.
२) पालेभाज्यांच्या उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी हमीभाव देणे.
४) जैविक पद्धतीने शेती करण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पुरस्कार सुरू करणे.
४) वरील सर्व
प्रश्न ६ –
अ. भारतरत्न पुरस्कार मरणोत्तर देण्याची तरतूद नाही.
ब. एका वर्षांत जास्तीत जास्त तीन व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करता येते.
वरील विधानाची सत्यता तपासा.
१) ‘अ’ आणि ‘ब’ दोन्ही सत्य आहेत.
२) फक्त विधान ‘ब’ सत्य.
३) दोन्ही विधाने असत्य आहेत.
४) फक्त विधान ‘अ’ सत्य
प्रश्न ७ – पुढीलपैकी कोणत्या घटनेस सन २०१९ मध्ये १०० वष्रे पूर्ण झाली?
अ. दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा स्थापना
ब. जालियनवाला बाग हत्याकांड
क. आझाद हिंद सेनेची स्थापना
पर्याय:
१) क २) ब,
३) अ ४) वरील सर्व
प्रश्न ८ – पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
अ. सन २०१९ ते २०२८ हे कौटुंबिक शेतीचे दशक म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
ब. संयुक्त राष्ट्र संघटनेने सन २०१९ हे वर्ष स्थानिक भाषांसाठी आंतरराष्ट्रीय वर्ष, मूलद्रव्यांच्या आवर्तसारणीचे आंतरराष्ट्रीय वर्ष आणि समभावासाठीचे आंतरराष्ट्रीय वर्ष या स्वरूपात साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे.
१) ‘अ’ ‘आणि ‘ब’ दोन्ही सत्य आहेत.
२) फक्त विधान ब सत्य.
३) दोन्ही विधाने असत्य आहेत.
४) फक्त विधान अ सत्य
प्रश्न ९ – भारतीय नौसेनेसाठी आण्विक, जैविक आणि रासायनिक अस्त्रांविरोधात लढा देण्यासाठीचे प्रशिक्षण केंद्र कोठे स्थापन करण्यात आले आहे?
१) आयएनएस शिवाजी, लोणावळा
२) आयएनएस हंसा, दाबोलीम
३) आयएनएस जारवा, पोर्ट ब्लेअर
४) आयएनएस किलगा,
विशाखापट्टणम
उत्तरे व स्पष्टीकरणे
प्र. क्र.१) योग्य पर्याय क्र. (3) भारताने उपग्रहनाशक क्षेपणास्त्राची (anti sattellite MIssile A-Sat) चाचणी केली असून अशी क्षमता असलेला भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतरचा चौथा देश बनला आहे.
प्र. क्र.२) योग्य पर्याय क्र.(४)
प्र. क्र.३) योग्य पर्याय क्र. (२) उच्च न्यायालय, नागपूर या इमारतीला दगडातील काव्य असे म्हटले जाते. याबरोबर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेल्या इमारती पुढीलप्रमाणे :
राजस्थान- निमराना बावडी, रानीपूर – झरियाल मंदिर समूह, ओडिशा, विष्णू मंदिर, उत्तराखंड, आगा खान व हाथी खाना हवेली, उत्तर प्रदेश
प्र. क्र.४) योग्य पर्याय क्र.(४)
प्र. क्र.५) योग्य पर्याय क्र.(१)
प्र. क्र.६) योग्य पर्याय क्र.(२) सन १९५५पासून भारतरत्न पुरस्कार मरणोत्तर देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
प्र. क्र.७) योग्य पर्याय क्र.(२) (जालियनवाला बाग हत्याकांड १० एप्रिल १८१९ रोजी घडले. याचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी आपला ‘सर’ हा किताब ब्रिटिश संसदेला परत केला. हत्याकांडाचा आदेश देणाऱ्या डायरच्या कृत्याचे समर्थन करणाऱ्या जनरल ओडवायरचा वध उधम सिंग यांनी लंडन येथे केला. ब्रिटनच्या संसदेने सन २०१९मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाबाबत दिलगिरी व्यक्त केली.)
प्र. क्र.८) योग्य पर्याय क्र.(१)
प्र. क्र.९) योग्य पर्याय क्र.(१)
First Published on June 22, 2019 12:02 am
Web Title: engineering service pre examination mpsc abn 97
No comments:
Post a Comment