प्रश्नवेध यूपीएससी : अर्थशास्त्र
आजच्या लेखात आपण अर्थशास्त्र या महत्त्वाच्या घटकावरील प्रश्न विचारात घेऊ या. यूपीएससी पूर्व परीक्षेतील हासुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे.
(संग्रहित छायाचित्र)
मागील लेखात आपण प्राचीन व मध्ययुगीन भारतावरील प्रश्न पाहिले. आजच्या लेखात आपण अर्थशास्त्र या महत्त्वाच्या घटकावरील प्रश्न विचारात घेऊ या. यूपीएससी पूर्व परीक्षेतील हासुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे.
प्र. १) रिझव्र्ह बँकेच्या ‘प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अॅक्शन’ (पीसीए) च्या चौकटीसंदर्भात खालीलपकी कोणती विधाने योग्य आहेत?
१) पीसीए तेव्हा लागू केला जातो, जेव्हा जोखीम मर्यादेचा भंग होतो, जी मालमत्तेचा दर्जा, नफा आणि पुरेसे भांडवल या घटकांच्या ठरावीक पातळीशी निगडित असते.
२) ‘पीसीए’चे निकष नियामकाला ‘पीसीए’ अंतर्गत बँकांवर शाखा विस्ताराचा अटकाव आणि लाभांश थांबवणे अशा प्रकारचे र्निबध घालण्याची मुभा देतात.
३) ‘पीसीए’ कुठल्याही परिस्थितीत बँकेवर एखादी संस्था अथवा क्षेत्राला कर्ज देण्याच्या मर्यादेला निर्बंध घालू शकत नाही.
पर्याय : अ) फक्त १ व २ ब) फक्त २ व ३ क) फक्त १ व ३ ड) फक्त२
उत्तर : अ) फक्त १ व २
स्पष्टीकरण : ‘पीसीए’चे निकष नियामकाला ‘पीसीए’अंतर्गत बँकांवर शाखा विस्ताराचा अटकाव आणि लाभांश थांबवणे अशा प्रकारचे र्निबध घालण्याची मुभा देतात. तसेच ‘पीसीए’ कुठल्याही परिस्थितीत बँकेवर एखादी संस्था अथवा क्षेत्राला कर्ज देण्याच्या मर्यादेवर निर्बंध घालू शकते. बँकांबाबत लागू करण्यात येऊ शकणाऱ्या इतर सुधारणात्मक उपायांमध्ये विशेष लेखापरीक्षण, कार्य पुनर्रचना आणि सुधारणाविषयक योजनांची अंमलबजावणी आदींचा समावेश होतो. बँकेच्या प्रवर्तकांना नवे व्यवस्थापन गठीत करण्यासंदर्भातही निर्देश देता येऊ शकतात. रिझव्र्ह बँक ‘पीसीए’ अंतर्गत बँकेच्या नियामक मंडळाचे सुकाणूही आपल्या हाती घेऊ शकते.
* प्र. २) ग्राहक मूल्य निर्देशांकासंदर्भात (सीपीआय) खालील विधानांचा विचार करा.
१) २०१५मध्ये आधारभूत वर्ष २०१० ऐवजी २०१५ ग्राह्य़ धरण्यात आले.
२) आता ग्राहक खर्च सर्वेक्षणाच्या ‘मॉडिफाईड मिक्स्ड रेफरन्स पीरियड’ (एमएमआरपी)च्या आधारे वस्तू व त्यांचे मूल्य ठरवले जाते.
पुढीलपकी योग्य पर्याय निवडा.
१) फक्त १ ब) फक्त २ क) १ व २ दोन्हीही ड) १ व २ दोन्हीही नाही.
उत्तर : ब) फक्त २
स्पष्टीकरण : २०१५मध्ये आधारभूत वर्ष २०१० ऐवजी २०१५ नव्हे तर २०११ हे ग्राह्य़ धरण्यात येऊ लागले. आता ग्राहक खर्च सर्वेक्षणाच्या ‘मॉडिफाईड मिक्स्ड रेफरन्स पीरियड’ (एमएमआरपी)च्या आधारे वस्तू व त्यांचे मूल्य ठरवले जाते. २०१५पूर्वी ग्राहक मूल्य निर्देशांकाचा तक्ता ग्राहक खर्च सर्वेक्षणाच्या ‘युनिफॉर्म रेफरन्स पीरियड’ (यूआरपी)वर आधारित होता.
* प्र. ३) पंतप्रधान संपदा योजनेसंदर्भात खालीलपकी कुठली विधाने योग्य आहेत?
१) भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनातील कृषी क्षेत्राचा वाटा वाढविणे, हे तिचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
२) तिच्यात कृषीक्षेत्रातील रोजगार वाढविण्याची क्षमता आहे.
३) ही योजना केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागाकडून राबविली जाणार आहे.
पर्याय : अ) फक्त १ ब) फक्त २
क) फक्त १ व २ ड) फक्त २ व ३
उत्तर : ब) फक्त २
स्पष्टीकरण : पंतप्रधान किसान संपदा योजना (कृषी-समुद्री प्रक्रिया व कृषी प्रक्रिया क्लस्टर विकास योजना) ही केंद्रपुरस्कृत योजना आहे. कृषी प्रक्रिया उद्योग मंत्रालय ही योजना राबवते. ही योजना केवळ देशातील कृषी प्रक्रिया उद्योगाच्या वाढीसाठीच नव्हे, तर शेतकऱ्यांनासुद्धा चांगला परतावा देऊ शकते. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने व रोजगार वाढीसाठी ती परिणामकारक ठरू शकते.
* प्र. ४) खालीलपकी कोणती
संस्था ‘नॅशनल फायनान्शिअल स्विच’ (एनएफएस) वर नियंत्रण ठेवते?
अ) नॅशनल सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ब) इंडियन बँक्स असोसिएशन
क) नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया ड) रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया
उत्तर : क) नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया
स्पष्टीकरण : ‘नॅशनल फायनान्शिअल स्विच’ (एनएफएस) हे एटीएम यंत्रांचे सर्वात मोठे जाळे आहे. ‘नॅशनल पेमेंट्स कार्पोरेशन ऑफ इंडिया’ (एनपीसीआय) च्या निगराणीखाली ते काम करते. रिझव्र्ह बँक व ‘इंडियन बँक्स असोसिएशन’ (आयबीए) यांचा ‘नॅशनल पेमेंट्स कार्पोरेशन ऑफ इंडिया’ (एनपीसीआय) हा संयुक्त उपक्रम आहे, जी भारतातील किरकोळ व्यवहारांवर निगराणी ठेवते. ‘द प्रोव्हिजन्स ऑफ द पेमेंट अॅण्ड सेटलमेन्ट सिस्टीम्स अॅक्ट, २००७’ अन्वये तिची स्थापना करण्यात आली आहे.
* प्र. ५) ‘नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट फंड’ (एनआयआयएफ) संदर्भात खालील विधानांचा विचार करा.
१) ‘नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट फंड’ (एनआयआयएफ) हा भारतातील पहिला ‘सार्वभौम वेल्थ फंड’ आहे, ज्याची स्थापना भारत सरकारने २०१८ मध्ये केली.
२) व्यावसायिकृष्टय़ा सकस ठरू शकणाऱ्या ग्रीनफील्ड प्रकल्पांत पायाभूत गुंतवणूक करून अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी त्याची स्थापना करण्यात आली.
पुढीलपकी योग्य पर्याय निवडा
अ) फक्त 1 ब) फक्त २
क) १ व २ दोन्हीही
ड) १ व २ दोन्हीही नाही
उत्तर : ड) १ व २ दोन्हीही नाही
स्पष्टीकरण : ‘नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट फंड’ (एनआयआयएफ) ची स्थापना २०१८ मध्ये नव्हे तर २०१५ मध्ये झाली. श्रेणी २ मधील पर्यायी गुंतवणूक फंड म्हणून त्याची ‘सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड’ मध्ये नोंदणी करण्यात आली आहे. व्यावसायिकदृष्टय़ा सकस ठरू शकणाऱ्या ग्रीनफील्ड प्रकल्पांतच नव्हे, तर ब्राऊनफील्ड प्रकल्पांतदेखील पायाभूत गुंतवणूक करून अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी त्याची स्थापना करण्यात आली.
First Published on May 10, 2019 11:57 pm
Web Title: article on economics
No comments:
Post a Comment