एमपीएससी मंत्र : वनसेवा पूर्व परीक्षा
सामान्य अध्ययन
(संग्रहित छायाचित्र)
वनसेवा पूर्व परीक्षेच्या भाषाविषयक घटकांच्या तयारीबाबत मागील लेखामध्ये चर्चा करण्यात आली. पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये सामान्य अध्ययन या घटकामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी आणि सामान्य बुद्धिमत्ता चाचणी हे दोन उपघटक समाविष्ट आहेत. यातील चालू घडामोडी घटकाचे विश्लेषण आणि त्या आधारे तयारीबाबतची चर्चा या लेखामध्ये करण्यात येत आहे.
* प्रश्न – अरुणाचल प्रदेशामध्ये घडलेल्या घटनांच्या संदर्भात पुढील विधानांचा विचार करा.
विधान (A) राज्यपालांनी केलेली राष्ट्रपती राजवटीची शिफारस न्यायालयीन चिकित्सेच्या कक्षेत येत नाही.
विधान (R) राज्यघटनेच्या कलम ३६१नुसार राज्यपालांनी त्यांच्या कार्यकक्षेत राहून केलेल्या कृतीस कायदेशीर कारवाईपासून संरक्षण देण्यात आले आहे.
१) (R) हा (A) चा योग्य खुलासा आहे.
२) (A) हा (R) चा योग्य खुलासा आहे.
३) (A) अयोग्य असून (R) योग्य आहे.
४) (R) अयोग्य असून (A) योग्य आहे.
* प्रश्न –
a सर्व समावेशक विकास निर्देशांक अहवाल २०१८ नुसार भारताचा ६२ वा क्रमांक आहे.
b हा अहवाल जागतिक बँकेने बनवला आहे.
c वृद्धी आणि विकास, सर्वसमावेशकता आणि आंतरपिढीतील समता हे या निर्देशांकाचे तीन मापदंड आहेत.
वरीलपकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
१) a, b आणि c
२) a आणि c
३) फक्त a
४) b आणि c
* प्रश्न – इंटरपोलबाबत खालीलपकी कोणते विधान / विधाने बरोबर आहे/त?
अ. १९१९मध्ये स्थापन झालेली इंटरपोल ही सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय संघटना आहे.
ब. नोव्हेंबर २०१६मध्ये मेंग होन्गवाई यांची इंटरपोलच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
क. इंटरपोलचे मुख्यालय न्यूयॉर्क (अमेरिका) येथे आहे.
१) अ आणि ब २) फक्त ब
३) अ आणि क ४) वरीलपकी सर्व
* प्रश्न –
अ. फिंगर प्रिन्टंकरिता जागतिक स्तरावरील प्रगत तंत्रज्ञान अॅम्बिस महाराष्ट्रात प्रथमच राबविण्यात येत आहे.
ब. या तंत्रज्ञानाचा वापर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.
वरीलपकी कोणती विधाने बरोबर आहेत?
१) अ बरोबर
२) ब बरोबर
३) दोन्ही चूक
४) दोन्ही बरोबर
* प्रश्न – २०१८-१९च्या अर्थसंकल्पानुसार २०२२पर्यंत एकलव्य आदर्श निवासी शाळा स्थापन करण्यात येणार आहे. याबाबत खालील विधाने विचारात घ्या.
अ. केवळ अनुसूचित जमातींसाठी स्थापन करण्यात येणार आहेत.
ब. ५० टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या अनुसूचित जमातींची असलेल्या प्रत्येक गटामध्ये स्थापन करण्यात येणार आहेत.
क. किमान २०,००० आदिवासी असतील अशा गटांमध्ये स्थापन करण्यात येणार आहेत.
१) अ आणि ब बरोबर
२) अ आणि क बरोबर
३) अ, ब, क बरोबर
४) केवळ अ बरोबर
वरील प्रातिनिधिक प्रश्नांवरून पुढील बाबी समजून घेणे आवश्यक आहे.
2 शासकीय योजना, आंतरराष्ट्रीय संस्था / संघटना, चालू घडामोडींबाबतची घटनात्मक/ कायदेशीर बाजू / तरतूद, संरक्षणविषयक पारंपरिक व चालू घडामोडी, आयोग / समित्या, पायाभूत सुविधांचे प्रकल्प यांबाबत किमान एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे.
2 याशिवाय चच्रेत असलेले पुरस्कार, क्रीडा स्पर्धामधील विजेते, व्यक्तिमत्त्वे, नियुक्त्या, पुस्तके, भारताचे द्विपक्षीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय संघटनांमधील भूमिका, महत्त्वाचे निर्देशांक व अहवाल, शासकीय धोरणे व निर्णय, नव्याने स्थापन होणाऱ्या राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय संस्था, केंदीय अर्थसंकल्पातील तरतुदी यांवरही प्रश्न विचारण्याचे प्रमाण जास्त आहे.
2 याव्यतिरिक्त काही संकीर्ण प्रकारच्या पण चच्रेमध्ये असलेल्या मुद्दय़ांवरही प्रश्न विचारलेले आहेत. उदाहरणार्थ शबरीमला मंदिर.
2 चालू घडामोडींवरील प्रश्न हे सर्वसाधारणपणे मागील आठ महिन्यांपर्यंतच्या घडामोडींवर प्रश्न विचारलेले दिसून येतात.
2 हे प्रश्न सरळसोट एका शब्दात / एका पर्यायात उत्तर शोधण्याच्या प्रकारचे नसून बहुविधानी आहेत.
2 एखाद्या घडामोडीबाबत पारंपरिक, कायदेशीर पलू, इतर महत्त्वाची आनुषंगिक माहिती, संबंधित ठळक मुद्दे अशा विस्तृत मुद्दय़ांचा प्रश्नामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्रश्नातील मुद्दय़ांच्या अनुषंगाने संबंधित जास्तीत जास्त माहिती करून घेणे आणि ती बारकाईने लक्षात ठेवणे हे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक आहे.
वरील विश्लेषणाच्या आधारे तयारी कशा प्रकारे करता येईल त्याबाबत पुढील लेखामध्ये चर्चा करण्यात येईल.
First Published on May 3, 2019 12:39 am
Web Title: forest service pre examination
No comments:
Post a Comment