एमपीएससी मंत्र : अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा तांत्रिक अभ्यासक्रम प्रश्न विश्लेषण
अभियांत्रिकी अभिवृत्तीमध्ये सद्धांतिक आणि समीकरणे किंवा गणिते अशा दोन प्रकारचे प्रश्न दिसून येतात.
अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये भाषा विषय, सामान्य अध्ययन आणि अभियांत्रिकी तांत्रिक मुद्दे यांचा समावेश आहे. यातील तांत्रिक अभिवृत्ती घटकासाठी १०० पैकी ६० गुण ठेवण्यात आले आहेत. अभ्यासक्रम पाहिल्यास त्यामध्ये उपयोजित यंत्रशास्त्र, अभियांत्रिकी यंत्रशास्त्र, स्थापत्य अभियांत्रिकी, यांत्रिकी अभियांत्रिकी व विद्युत अभियांत्रिकी या उपघटकांचा समावेश आहे. सन २०१७ व २०१८मध्ये या घटकांवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण या लेखामध्ये करण्यात येत आहे.
Que – A cubic polynomial with real coefficients
- can possibly have no extrema and non zero crossings
- may have up to three extrema and upto 2 zero crossings
- cannot have more than 2 extrema and more than 3 zero crossings
- will always have an equal number of extrema and zero crossings
- Velocity of A is 72 kmph and velocity of B is 36 kmph.
- Velocity of A is 80 kmph and velocity of B is 40 kmph.
- Velocity of A is 36 kmph and velocity of B is 18 kmph.
- Velocity of A is 29 kmph and velocity of B is 58 kmph.
- Sum of maximum and minimum energy
- Ratio of maximum and minimum energy
- Ratio of minimum and maximum energy
- Difference between maximum and minimum energy
- Reinforced cement concrete
- Pre stressed cement concrete
- Fiber Reinforced cement concrete
- Prefabricated cement concrete
- The power factor is unity
- The load is balanced
- The phase angle is between 60 degree and 90 degree
- The load is purely inductive
- Magnitude
- Direction
- Line of action
- Magnitude, direction and line of action
* सर्वसाधारणपणे उपयोजित आणि अभियांत्रिकी यंत्रशास्त्र या घटकांवर प्रत्येकी १४ ते १६ प्रश्न विचारण्यात आले आहेत. आणि अभियांत्रिकीच्या स्थापत्य, यांत्रिकी व विद्युत या शाखांच्या मूलभूत अभ्यासक्रमावर प्रत्येकी १० प्रश्न विचारलेले आहेत. हा पॅटर्न सन २०१७ व २०१८ या दोन्ही वर्षी अवलंबण्यात आलेला दिसतो. त्यामुळे तयारी करताना त्या त्या घटकाला त्याच्या गुणांच्या प्रमाणात महत्त्व देणे शक्य आहे.
* अभियांत्रिकी अभिवृत्तीमध्ये सद्धांतिक आणि समीकरणे किंवा गणिते अशा दोन प्रकारचे प्रश्न दिसून येतात. यांची विभागणी करून पाहिल्यास काही मुद्दे समजून घेणे आवश्यक ठरते.
* उपयोजित यंत्रशास्त्र या उपघटकामध्ये गणिते विचारण्यावरच भर असतो. किंबहुना समीकरणांच्या आधारेच या घटकाच्या तयारीचे मूल्यमापन शक्य असते. त्यामुळे या उपघटकावर एखादाच प्रश्न सद्धांतिक असतो तर बाकीचे १४ ते १५ प्रश्न ही गणितेच असतात.
* उरलेल्या चार उपघटकांचा विचार करता प्रश्नांचा भर हा सद्धांतिक व उपयोजित मुद्दय़ांवर असलेला दिसतो. सन २०१८ मध्ये या उपघटकांवरील ४५ पैकी ३२ प्रश्न आणि सन २०१७ मध्ये ३५ प्रश्न हे सद्धांतिक व उपयोजित मुद्दय़ांवर आधारित होते. तर या दोन्ही वर्षी अभियांत्रिकीच्या चार उपघटकांवरील गणिते / समीकरणांची संख्या होती अनुक्रमे १२ आणि १०.
या विश्लेषणाच्या आधारे अभियांत्रिकी अभिवृत्ती या उपघटकाच्या तयारीबाबत पुढील लेखामध्ये चर्चा करण्यात येईल.
First Published on May 29, 2019 2:53 am
Web Title: mpsc preliminary exam mpsc exam preparation tips useful tips for mpsc exam
No comments:
Post a Comment