Thursday, July 4, 2019

एमपीएससी मंत्र : महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा सामान्य अध्ययन या लेखामध्ये आज आपण सामान्य अध्ययन या विषयावर विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण करू या.

एमपीएससी मंत्र : महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा सामान्य अध्ययन

या लेखामध्ये आज आपण सामान्य अध्ययन या विषयावर विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण करू या.

फारुक नाईकवाडे
मागील लेखामध्ये आपण मराठी आणि इंग्रजी विषयावरील विचारलेल्या प्रश्नांविषयी चर्चा केली. या लेखामध्ये आज आपण सामान्य अध्ययन या विषयावर विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण करू या. सामान्य अध्ययन या घटकामध्ये दिलेला अभ्यासक्रम आणि मागील वर्षांमध्ये विचारलेले प्रश्न आपण पुढे पाहू या.
(१)    भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास (१८५७ ते १९९०)
(२)    भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा भूगोल
(३)    भारतीय अर्थव्यवस्था
१.     भारतीय आयात-निर्यात
२.     राष्ट्रीय विकासात सरकारी, सहकारी,ग्रामीण बँकांची भूमिका
३.     शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण
४.     पंचवार्षिक योजना
५.     किमती वाढण्याची कारणे व उपाय
(४) भारतीय राज्यव्यवस्था
(५) जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी – राजकीय, औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, भौगोलिक, खगोलशास्त्रीय, सांस्कृतिक, वैज्ञानिक, इत्यादी .
(६) पर्यावरण – मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण विशेषत: वनसंधारण, विविध प्रकारची प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य / राष्ट्र जागतिक पातळीवरील संघटना / संस्था. इत्यादी विषयांच्या अभ्यासक्रमाचा समावेश होतो. २०१७ व २०१८ च्या पूर्वपरीक्षेमध्ये खाली दिलेल्या पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत. योग्य उत्तराचा पर्याय ठळक केला आहे.
१) आदिवासींकडून शेती करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या —— या पद्धतीमुळे नैसर्गिक जंगले व मृदा यांचा ऱ्हास होत आहे.
(१) पायऱ्या पायऱ्यांची शेती
(२) तोडा व जाळा
(३) वनशेती
(४) उदरनिर्वाहाची शेती
२) साधन संपत्तीच्या संवर्धन संकल्पनेत खालीलपैकी कोणत्या एकाचा समावेश होत नाही?
(१) काळजीपूर्वक वापर
(२) प्रमाणशीर वापर
(३) वापर  न करणे
(४) वाया जाण्यापासून त्यांना वाचविणे
३) खालील विधाने विचारात घ्या :
अ. भारतीय व्यापार वृद्धी संघटनेची स्थापना जानेवारी १९९२ मध्ये झाली.
ब. राज्य व्यापार महामंडळाची स्थापना प्रामुख्याने आंतर-राज्य व्यापारसाठी झाली.
क. भारतीय माल अविष्ठी संस्था ही अविष्ठित उद्योगाच्या कच्च्या मालावर संशोधन करते.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने चुकीचे/ची आहे/आहेत?
(१) फक्त अ आणि ब   (२) फक्त ब
(३) फक्त क   (४) फक्त अ आणि क
४) खालील विधाने विचारात घ्या :
अ. घाऊक किंमत निर्देशांकामध्ये अर्थव्यवस्थेतील विस्तृत भाववाढीचे मापन केले झाले.
ब. ग्राहक किंमत निर्देशांकामध्ये लोकांच्या प्रत्यक्ष उपभोग्य वस्तू व सेवांच्या किरकोळ किमतीच्या सरासरीचे मापन केले जाते.
क. देशांतर्गत स्थूल उत्पादन भाववाढ कि जी किंमतवाढ आणि व्यक्तिगत उत्पन्नातील वृद्धी यातील फरक होय.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत?
(१) फक्त अ आणि ब                 (२)फक्त क
(३) फक्त अ
(४) फक्त ब आणि क
५) खालील विधाने लक्षात घ्या :
अ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर भारत रत्न पुरस्कार देण्यात आला.
ब) महात्मा गांधी यांना भारत रत्न पुरस्कार देण्यात आला होता.
क) पं. मदन मोहन मालवीय यांना २०१६मध्ये भारत रत्न पुरस्कार देण्यात आला.
ड) सचिन तेंडुलकर यांना २०१४मध्ये भारत रत्न पुरस्कार देण्यात आला.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने चूक आहेत?
(१) फक्त अ
(२) फक्त ड
(३) फक्त ब आणि क                    (४) फक्त अ आणि ड
६) किनारा नियमन क्षेत्र अधिसूचना ही किनारी प्रदेशाच्या पर्यावरण संरक्षणासाठी काढलेली आहे.
अंदमान आणि निकोबार द्वीप समूहासाठी कोणती किनारा नियमन क्षेत्र अधिसूचना लागू आहे?
(१) किनारा नियमन क्षेत्र अधिसूचना-क
(२) किनारा नियमन क्षेत्र अधिसूचना-कक
(३) किनारा नियमन क्षेत्र अधिसूचना-ककक
(४) किनारा नियमन क्षेत्र
अधिसूचना-कश्
७) सन २०११च्या जणगणनेनुसार,- – – – –  आणि – – या जिल्ह्य़ांची १५ टक्केपेक्षा कमी लोकसंख्या शहरांमध्ये राहत आहे.
(१) गडचिरोली आणि सिंधुदुर्ग
(२) गडचिरोली आणि गोंदिया
(३) गोंदिया आणि सिंधुदुर्ग
(४) गोंदिया आणि वाशिम
८) भारतात वार्ताहरांचे हल्ल्यापासून संरक्षण करणारा कायदा मंजूर करणारे खालीलपैकी कोणते राज्य पहिले ठरले आहे ?
(१) गोवा                   (२) हरियाणा
(३) महाराष्ट्र              (४) मध्य प्रदेश
९) मानव संसाधन विभागाचे केंद्रीय मंत्री श्री प्रकाश जावडेकर यांनी रुसा (फवरअ) साठीचे पोर्टल आणि मोबाईल अ‍ॅप सुरू केले. तेव्हा रुसा (फवरअ) म्हणजे काय ?
(१) राजकीय उच्च शिक्षण अभियान
(२) राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान
(३) राष्ट्रीय उच्चतर शिक्षण आंदोलन
(४) रिजनल उच्च शिक्षा अभियान
१०) खालील विधाने विचारात घ्या :
अ. ऑक्टोबर १९४५ मध्ये जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना झाली.
ब. मार्च १९५०मध्ये नियोजन आयोगाची स्थापना झाली.
क. ऑगस्ट १९५२ मध्ये राष्ट्रीय विकास मंडळाची स्थापना झाली.
वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?
(१) अ आणि ब
(२) ब आणि क
(३) अ आणि क
(४) वरील सर्व
भाषा विषय व सामान्य अध्ययन यांची तुलना केल्यास सामान्य अध्ययन या विषयाची काठिण्य पातळी जास्त असल्याचे दिसून येते. बहुतेक अभ्यासक्रम महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षेतील विषयाप्रमाणे अभ्यासक्रम असल्याचे दिसून येते. म्हणून जे विद्यार्थी अभियांत्रिकीसोबतच दुय्यम सेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करीत आहेत त्यांना यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागणार नाही. परंतु, नवीन विद्यार्थ्यांनी जास्त घाबरून न जाता सामान्य विज्ञान विषयाच्या प्रश्नांच्या तयारीसाठी केवळ २०१७ व २०१८ च्या प्रश्नपत्रिका विसंबून न राहता, दुय्यम सेवा मुख्य परीक्षेच्या पेपर २ मधील प्रश्न सोडवून तयारी करावी. तर विषय परिपूर्ण  होईल व या विभागातून जास्तीत जास्त गुण मिळविता येतील.
First Published on May 22, 2019 4:25 am
Web Title: mpsc exam paper with answer mpsc exam 2019

No comments:

Post a Comment