|| डॉ. श्रीराम गीत
- मी यंदा एसवायबीए होईन. सध्या यूपीएससीची तयारी करत आहे. आवश्यक
पुस्तके वाचली. आता संदर्भ ग्रंथ वाचत आहे. मुख्य परीक्षेचा निबंध कसा
लिहावा व त्यासाठीचे स्रोत कोणते व पुस्तके कोणती वाचावीत? याविषयी माझ्या
मनात खूप न्यूनगंड आहे. कृपया मार्गदर्शन करावे. – प्रताप राशिनकर, लोणी
यूपीएससीचा निबंध कसा लिहावा यावर मे महिन्यातच करिअर वृत्तान्तमध्ये
अतिशय विस्ताराने माहिती आली होती. ती वाचली नाहीस काय? जूनमधील सदरातही
या विषयावर माहिती येत आहे. ती नक्की वाच. त्यातून तुला जे हवे ते नक्की
सापडेल. परंतु खरे सांगायचे तर बीएसाठी किमान ७५ टक्के मार्क मिळवण्यावर
लक्ष केंद्रित करावेस. त्यादरम्यान रोज एक अग्रलेख वाचणे एवढे सध्या पुरे.
त्यातूनच तुझा न्यूनगंड कमी होत जाईल. अग्रलेखातील साधकबाधक चर्चा नीट कळू
लागली तर एखादा विषय निवडून तुला लिहिणे नक्की जमू शकेल. दिनांक ४ जूनचा
करिअर वृत्तान्त खास तुझ्या प्रश्नासाठीच आहे. स्पर्धा परीक्षा म्हणजे खूप
खूप अभ्यास असा एक समज रूढ होत आहे. नेमका, शिस्तशीर व योग्यवेळी करण्याचा
अभ्यास असे त्याचे स्वरूप असते. ती योग्य वेळ तुझ्या बाबतीत यायला अजून दोन
वर्षे आहेत हे लक्षात घ्यावेस.
- मी २०१७ मध्ये बी.कॉम झालो. पुढचे शिक्षण घेण्याची इच्छा आहे.
एम.कॉम.ऐवजी एम. ए. करावे वाटते. कोणत्या विषयात करू? त्याचा एमपीएसीला
उपयोग होईल का ? – दीपक गुरव, मुंबई.
दीपक, मित्रा २०१७ ते २०१९ काय करत आहेस? काही काम केले आहेस काय?
नसल्यास कृपया ते शोध. वाटल्यास उमेदवारी करून काम शिकावेस. त्या दरम्यान
स्पर्धा परीक्षा म्हणजे काय ते समजावून घ्यावेस. निव्वळ एमए करून त्यात यश
मिळते हा गैरसमज मनातून काढून टाकावास. प्रथम काम, त्यासोबत करिअर
वृत्तान्तचे वाचन व गरज वाटल्यास एमए असा रस्ता योग्य राहील.
First Published on June 12, 2019 2:01 am
Web Title: loksatta career mantra 36
No comments:
Post a Comment