Thursday, July 4, 2019

यूपीएससी प्रश्नवेध : भूगोलावरील प्रश्न आजच्या लेखात आपण भूगोलाशी संबंधित प्रश्न पाहू या.

यूपीएससी प्रश्नवेध : भूगोलावरील प्रश्न

आजच्या लेखात आपण भूगोलाशी संबंधित प्रश्न पाहू या.

(संग्रहित छायाचित्र)

लीना भंगाळे
आजच्या लेखात आपण भूगोलाशी संबंधित प्रश्न पाहू या.
* खालीलपैकी कुठल्या परिस्थितीत प्रवाळी चांगल्या प्रकारे तग धरून राहतात?
१)   पाण्याचे तापमान २० अंश सेल्सिअसपेक्षा खाली जाता कामा नये.
२)   शीतप्रवाह असलेल्या प्रदेशात त्यांची वाढ चांगली होते.
३)   पाण्याची खोली १८० फुटांपेक्षा जास्त असता कामा नये.
४)   स्थिर पाण्यात ते चांगल्या पद्धतीने तग धरतात.
खालील पर्यायांतून योग्य पर्याय
निवडा.
१) फक्त १ व ३  ब) फक्त १ व २  क) फक्त २ व ३  ड) फक्त २ व ४
उत्तर : अ) फक्त १ व ३
स्पष्टीकरण : विधान १ व ३ योग्य आहे. दुसरे विधान चुकीचे आहे. कारण, शीतप्रवाह पृष्ठभागावरील उबदार पाणी थंड करतात. उबदार प्रवाह असलेल्या भागात प्रवाळांची चांगली वाढ होते. चौथे विधानही चुकीचे आहे. कारण, मातीयुक्त किनारे व प्रवाहांचे चिखलयुक्त मुख यापासून दूर वाहत्या समुद्री पाण्यात प्रवाळी चांगल्या पद्धतीने तग धरून राहतात.
*     समुद्री प्रवाहांच्या हालचालींची दिशा खालीलपैकी कुठल्या घटकांवर अवलंबून असते?
१) ग्रहीय वारे
२) तापमानातील फरक
३) समुद्री पाण्याची क्षारता
४) पृथ्वीचे परिवलन
५) भूभाग
पुढील पर्यायांतून योग्य पर्याय निवडा.
पर्याय :
अ) फक्त १, ३ व ४
ब) फक्त १, २ व ३
क) फक्त ३, ४ व ५             ड) वरीलपैकी सर्व
उत्तर : ड) वरीलपैकी सर्व
स्पष्टीकरण : ठरावीक आकृतिबंधांमध्ये मोठय़ा प्रमाणात प्रवाहित होणारे सागरजल म्हणजे समुद्री प्रवाह. या समुद्री प्रवाहांच्या हालचालींची दिशा वरीलपकी सर्वच घटकांवर अवलंबून असते.
*  ढाली ज्वालामुखींच्या बाबतीत पुढील विधानांचा विचार करा.
१)   पृथ्वीवरील सर्व ज्वालामुखींमध्ये हे ज्वालामुखी सर्वाधिक विस्फोटक असतात.
२)   हवाई ज्वालामुखी हे ढाली ज्वालामुखींचे उदाहरण आहे.
पुढील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.
पर्याय : अ) फक्त १  ब) फक्त २
क) १ व २ दोन्ही  ड) १ व २ दोन्ही नाही
उत्तर : ब) फक्त २
स्पष्टीकरण : पृथ्वीवरील सर्वात मोठे ज्वालामुखी म्हणजे ढाली ज्वालामुखी होय. हवाई ज्वालामुखी हे त्याचे सर्वात प्रसिद्ध उदाहरण होय. त्याची निर्मिती प्रामुख्याने बेसॉल्टपासून होते. हा विस्फोटानंतर अतिशय द्रवरूपात वाहणाऱ्या लाव्हाचा एक प्रकार आहे. या कारणामुळे त्याची चढण जास्त नसते. त्याच्या छिद्रांमध्ये जर पाणी गेले, तर ते विस्फोटक बनतात. अन्यथा, कमी तीव्रतेच्या विस्फोटांसाठी ते ओळखले जातात.
* रासायनिक अपक्षय प्रक्रियेची पुढीलपकी कोणती उदाहरणे
आहेत?
१) अपपर्णन
२) सजलीभवन
३) ऑक्सिडीकरण
४) गोठवण
पुढील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.
पर्याय :
अ) फक्त २ व ३
ब) फक्त १ व ३
क) फक्त ३ व ४  ड) फक्त २ व ४
उत्तर : अ) फक्त २ व ३
स्पष्टीकरण : हवामानातील विविध घटकांमुळे खडकांचे होणारे कायिक विघटन व रासायनिक अपघटन म्हणजे अपक्षय. रासायनिक अपक्षय प्रक्रियेत विरघळणे, कार्बनीभवन, सजलीभवन, ऑक्सिडीकरण आणि क्षपण यांचा समावेश होतो. अपपर्णन आणि गोठवण ही भौतिक अपक्षय प्रक्रियेची उदाहरणे आहेत.
*  पृथ्वीच्या परावर्तकतेबाबत खालील विधानांचा विचार करा.
१)   पृष्ठभागाची परावर्तकता ० ते १ या पट्टीत मोजली जाते. ज्यात ० अचूक परावर्तकता असणाऱ्या धवल पृष्ठभागाचे प्रतिनिधित्व करतो, तर १ अजिबात परावर्तकता नसलेल्या कृष्ण पृष्ठभागाचे प्रतिनिधित्व करतो.
२) वाळवंटी वाळूची परावर्तकता हिरव्या गवतापेक्षा अधिक असते.
पुढील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.
पर्याय :
अ) फक्त १
ब) फक्त २
क) १ व २ दोन्ही
ड) १ व २ दोन्ही नाही
उत्तर : ब) फक्त २
स्पष्टीकरण : पहिले विधान चुकीचे आहे. पृष्ठभागाची परावर्तकता ० ते १ या पट्टीत मोजली जाते. ज्यात ० अजिबात परावर्तकता नसलेल्या कृष्ण पृष्ठभागाचे प्रतिनिधित्व करतो, तर १ अचूक परावर्तकता असणाऱ्या धवल पृष्ठभागाचे प्रतिनिधित्व करतो. दुसरे विधान योग्य आहे. ताजा बर्फ आणि वाळवंटी वाळू यांची परावर्तकता हिरव्या गवतापेक्षा अधिक असते.
First Published on May 18, 2019 12:17 am
Web Title: article on geography questions

No comments:

Post a Comment