प्रश्नवेध एमपीएससी : अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा
चालू घडामोडी सराव प्रश्न
रोहिणी शहा |
June 8, 2019 12:19 am
(संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेच्या मराठी व इंग्रजी भाषेच्या सरावासाठी मागील लेखांमध्ये प्रश्न देण्यात आले. सामान्य अध्ययन विषयामधील चालू घडामोडींच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरतील असे प्रश्न या लेखामध्ये सरावासाठी देण्यात येत आहेत.
प्रश्न १- पुढीलपैकी कोणत्या राज्याने ऑनलाइन खाद्यपदार्थ विक्री करताना अन्नसुरक्षा व नियमन प्राधिकरणाकडून प्राप्त रेटिंग दर्शविणे बंधनकारक केले आहे?
१) पंजाब २) महाराष्ट्र
३) कर्नाटक ४) आंध्र प्रदेश
प्रश्न २ – सन २०१९ च्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयासाठी वायुप्रदूषण या संकल्पनेवर स्वानंद किरकिरे यांनी कोणते गाणे रचले आहे?
१) हवाहवाई २) हवा आने दे
३) ये हवा ये फिजा ४) ठंडी हवाएं
प्रश्न ३ – इस्रोचा व्यापारी विभाग पुढीलपैकी कोणता आहे?
१) ऑन्ट्रीक्स २) न्यूस्पेस इंडिया लिमिटेड
३) १ आणि २ दोन्ही ४) केवळ १
प्रश्न ४ – मे २०१९ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेकडून कोणते देश मलेरियामुक्त घोषित करण्यात आले आहेत?
१) भारत व बांग्लादेश
२) अफगाणिस्तान व इराण
३) इजिप्त व घाना
४) अल्जेरीया व अर्जेटिना
प्रश्न ५ – जागतिक आरोग्य संघटनेच्या बाह्य़ लेखा परीक्षकपदावर कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
१) विनोद राय २) राजीव महर्षी
३) सी. रंगराजन ४) शक्तिकांत दास
प्रश्न ६ – FAME हे काय आहे?
१) परकीय चलन विनिमय दरांचे व्यवस्थापन करणारी स्वायत्त यंत्रणा
२) चित्रपट क्षेत्रातील वयोवृद्ध कलाकारांसाठी निवृत्ती वेतन योजना
३) हायब्रीड व ईलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादन व वापरास चालना देण्यासाठीची योजना
४) वरीलपैकी एकही नाही.
प्रश्न ७ – हिरकणी महाराष्ट्राचीह्ण योजना कशाशी संबंधित आहे?
१) महिलांच्या स्वयंसहायता गटांमधील उद्योजकतेस प्रोत्साहन देणे.
२) महिलांच्या स्वयंसहायता गटांना व्याजदर अनुदान उपलब्ध करून देणे.
३) महिलांच्या स्वयंसहायता गटांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणे.
४) ग्रामीण महिलांमधील उद्योजकता वाढविण्यासाठीची प्रोत्साहन योजना.
प्रश्न ८ – cVIGIL हे काय आहे?
१) तटरक्षक दलाचा आपत्ती व्यवस्थापन आणि संरक्षणविषयक सराव.
२) सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी घ्यावयाच्या दक्षतेबाबतच्या सूचना.
३) निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठीचे अॅप.
४) भारतीय नौसेनेसाठीचा टेहळणी उपग्रह.
उत्तरे व स्पष्टीकरणे
प्रश्न १. योग्य पर्याय क्र. (१)
प्रश्न २. योग्य पर्याय क्र. (२) केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या वतीने सन २०१९ मध्ये साजरा करण्यात आलेल्या जागतिक पर्यावरण दिनासाठी स्वानंद किरकिरे यांनी ‘हवा आने दे’ या गाण्याची रचना केली असून हे गाणे सुनिधी चौहान, शंकर महादेवन, शांतनू मुखर्जी आणि कपिल शर्मा यांनी गायले आहे.
प्रश्न ३. योग्य पर्याय क्र. (३) इस्रोच्या उत्पादनांच्या व्यापारी तत्त्वावरील वापरासाठी सन १९९८ मध्ये ऑन्ट्रीक्स हा विभाग स्थापन करण्यात आला. तर न्यूस्पेस इंडिया लिमिटेड हा विभाग इस्रोच्या संशोधनांचा व्यापारी तत्त्वावर वापर करता यावा यासाठी स्थापन करण्यात आला आहे.
प्रश्न ४. योग्य पर्याय क्र. (४)
प्रश्न ५. योग्य पर्याय क्र. (२) राजीव महर्षी हे देशाचे नियंत्रक व महालेखक असून त्यांची युनोच्या अन्न व कृषी संघटनेच्या बाह्य़ लेखापरीक्षक पदावरही नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या संयुक्त राष्ट्र बाह्य़ लेखापरीक्षक मंडळाचे उपाध्यक्ष आहेत.
प्रश्न ६. योग्य पर्याय क्र. (३) हायब्रीड व इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादन व वापरास चालना देण्यासाठी FAME योजना सुरू करण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धन आणि खनिज तेलावरील अवलंबित्व कमी करणे हा दुहेरी हेतू या योजनेमागे आहे. सन २०३० पर्यंत देशातील ३० टक्के वाहने हायब्रीड अथवा इलेक्ट्रिक स्वरूपात आणणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या माध्यमातून सन २०३० पर्यंत वाहतुकीसाठीच्या ऊर्जा मागणीमध्ये ६७ टक्के आणि कार्बन उत्सर्जनामध्ये ३७ टक्के घट होऊ शकेल असा अंदाज भारतीय उद्योग संघाकडून (उकक) मांडण्यात आला आहे.
प्रश्न ७. योग्य पर्याय क्र. (१) ‘हिरकणी महाराष्ट्राची’ ही योजना महिलांच्या स्वयंसहायता गटांमधील उद्योजकतेस प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या १०० टक्के वित्त पोषणासहित सुरू करण्यात आली आहे.
प्रश्न ८. योग्य पर्याय क्र. (३)
First Published on June 8, 2019 12:19 am
Web Title: engineering service pre examination 2
No comments:
Post a Comment