‘कांगारूं’च्या देशात ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी
जवळपास एकवीस हजार पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण व संशोधन पूर्ण करत आहेत.
विद्यापीठाची ओळख: ऑस्ट्रेलियाची राजधानी असलेल्या कॅनबेरा शहरामधील ‘द ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी’ (एएनयू) हे त्या देशातील पहिल्या क्रमांकाचे तर जागतिक स्तरावरील एक अग्रणी संशोधन विद्यापीठ आहे. २०१९ सालच्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार एएनयू हे जगातले चोवीसव्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना १९४६ साली ऑस्ट्रेलियन पार्लमेंटने केली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये पार्लमेंटकडून स्थापित झालेले हे एकमेव विद्यापीठ आहे. एएनयू हे शासकीय संशोधन विद्यापीठ आहे. ‘फर्स्ट टू लर्न द नेचर ऑफ थिंग्ज’ हे या विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे. विद्यापीठामध्ये उपलब्ध असलेल्या सर्व विषयांपकी पंधरा विषय हे विषय व विद्यापीठांच्या क्रमवारीनुसार जगातील ‘पहिल्या पंचवीस’ क्रमांकामध्ये आहेत. विद्यापीठाचे संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवले गेलेले आहे. त्यामुळेच विद्यापीठाच्या एकूण संशोधनापकी ९५% संशोधन हे संशोधनातील जागतिक मानकांपेक्षाही उत्कृष्ट दर्जाचे आहे. कॅनबेरा शहरामधील अॅक्टन या परिसरात एएनयूचा मुख्य कॅम्पस आहे. विद्यापीठाशी संलग्न एकूण सात कॉलेजेस आणि अनेक राष्ट्रीय शैक्षणिक व संशोधन केंद्रे आहेत. विद्यापीठामध्ये सध्या जवळपास चार हजार तज्ज्ञ प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून जवळपास एकवीस हजार पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण व संशोधन पूर्ण करत आहेत.
अभ्यासक्रम- एएनयू विद्यापीठातील सर्व अभ्यासक्रम पदवी, पदव्युत्तर आणि प्रोफेशनल डेव्हलपमेंट कोस्रेस असे विभागले आहेत. एएनयूमधील पूर्ण वेळ पदवी अभ्यासक्रम हे चार वर्षांचे संशोधन अभ्यासक्रम, पदव्युत्तर अभ्यासक्रम हे दोन वर्षांचे तर प्रोफेशनल डेव्हलपमेंट कोस्रेस वेगवेगळ्या कालावधीचे आहेत. प्रशासकीय सोयींसाठी तयार केलेल्या ‘एएनयू कॉलेज ऑफ आर्ट्स अॅण्ड सोशल सायन्सेस, एएनयू कॉलेज ऑफ एशिया अॅण्ड द पॅसिफिक, एएनयू कॉलेज ऑफ बिझनेस अॅण्ड इकॉनॉमिक्स, एएनयू कॉलेज ऑफ इंजिनीअिरग अॅण्ड कॉम्प्युटर सायन्सेस, एएनयू कॉलेज ऑफ हेल्थ अॅण्ड मेडिसिन, एएनयू कॉलेज ऑफ लॉ, एएनयू कॉलेज ऑफ सायन्स’ या सात कॉलेजच्या माध्यमातून एएनयूचे कामकाज चालते. ही कॉलेजेस विद्यापीठाचे प्रमुख शैक्षणिक व संशोधन विभाग म्हणून कार्यरत आहेत. कॉलेज ऑफ आर्ट्स अॅण्ड सोशल सायन्सेस अंतर्गत हिस्टरी, फिलोसॉफी, सोशिओलॉजी, इंग्लिश, ड्रामा, म्युझिक, थिएटर, डान्स यांसारख्या विषयांपासून ते मिडल ईस्टर्न स्टडीज, लॅटिन अमेरिकन स्टडीज सारख्या विषयांमधील अध्ययन-संशोधन चालते. कॉलेज ऑफ एशिया अॅण्ड द पॅसिफिक या विभागांतर्गत आशियाई आणि पॅसिफिक क्षेत्रातील भाषांचा अभ्यास केला जातो. या विषयातील संशोधन करणारे हे जगातील सर्वात मोठे केंद्र आहे. बिझनेस अॅण्ड इकॉनॉमिक्स विभागांतर्गत इकॉनॉमिक्स, फायनान्स, अॅक्चुरिअल स्टडीज यांसारख्या विषयांतील अध्ययन-संशोधन चालते. व्यावसायिकदृष्टय़ा हा विभाग इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटस ऑस्ट्रेलिया, सीपीए ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियन कॉम्प्युटर सोसायटी या ऑस्ट्रेलियातील महत्त्वाच्या संस्थांशी संलग्न आहे. एएनयूच्या कॉलेज ऑफ इंजिनीअिरग अॅण्ड कॉम्प्युटर सायन्सेसकडून अभियांत्रिकीच्या सर्व प्रमुख शाखांमधील विषय अभ्यासले जातात. त्याबरोबरच कॉम्प्युटर व्हिजन अॅण्ड रोबोटिक्स, डेटा इंटेन्सिव्ह कॉम्प्युटिंग, इन्फोम्रेशन अॅण्ड ह्य़ुमन सेंटर्ड कॉम्प्युटिंग यांसारख्या थोडक्या वेगळ्या विषयांतही संशोधन येथे चालते. कॉलेज ऑफ हेल्थ अॅण्ड मेडिसिन या विभागाच्या माध्यमातून या शाखेतील नेहमीच्या विषयांशिवाय सायकॉलॉजी अॅण्ड पॉप्युलेशन हेल्थसारख्या अनोख्या विषयांत संशोधन चालते. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी कएछळर आणि रअळ किंवा अउळ या परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी कएछळर आणि फए किंवा यांसारख्या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे अपेक्षित आहे.
सुविधा- सर्व परदेशी विद्यापीठांप्रमाणे एएनयूकडूनही आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना विविध स्वरूपांतील आर्थिक मदत, निवास व भोजन, आंतरराष्ट्रीय हेल्थ इन्शुरन्स, विद्यार्थी क्लब्स, क्रीडा आणि करिअर मार्गदर्शन यांसारख्या सुविधाही देण्यात आल्या आहेत. संशोधनाला चालना देण्यासाठी विद्यापीठातील विविध विभागांकडून कार्यशाळा व समर स्कूल्स आयोजित करण्यात येतात. विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहावे यासाठी विद्यापीठाने दर्जेदार स्रोत उपलब्ध करून दिलेले आहेत. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक यांच्याकडून नियमित अगदी मोफत सेवा घेता येते. २०१९ सालच्या ‘गुड युनिव्हर्सिटी गाइड’ने या विद्यापीठाला विद्यार्थ्यांच्या मागण्यांची पूर्तता, विद्यार्थी टिकून राहण्याचे प्रमाण, विद्यार्थी-अध्यापक गुणोत्तर आणि प्राध्यापक-संशोधकांची पात्रता या सर्व गोष्टींसाठी ‘फाइव्ह स्टार’ दिलेले आहेत. बहुतांश विद्यार्थी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये राहतात. २०१८ मध्ये विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये साधारणत: एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येपकी वीस टक्के म्हणजे जवळपास पाच हजार विद्यार्थी राहात होते. विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना तिथेच स्थायिक व्हायचे असेल तर आवश्यक ती सर्व मदत केली जाते. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे शिक्षणानंतर येथे कायमस्वरूपी राहण्याचे प्रमाण वाढत आहे. २०१७-१८च्या जगातील महत्त्वाच्या शहरांच्या ‘राहणीमानाच्या दर्जा’च्या अहवालानुसार कॅनबेरा हे जगातील सर्वोत्तम राहणीमान वा जीवनमान देणारे शहर आहे.
वैशिष्टय़- एएनयूचे कित्येक माजी विद्यार्थी ऑस्ट्रेलियामधील प्रसिद्ध आणि ख्यातनाम चेहरे आहेत. जवळपास सर्व क्षेत्रांत अग्रेसर असलेल्या या विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट जाळे एएनयूने रचलेले आहे. विद्यार्थ्यांना रोजगार संधी देण्यासाठी एएनयूकडून याचा कुशलतेने वापर केला जातो. देशाचे पंतप्रधान, नोबेल विजेते, ऱ्होडस पुरस्कार विजेते यांसह विविध क्षेत्रांमध्ये भरारी घेणारे या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत.
संकेतस्थळ https://www.anu.edu.au/
itsprathamesh@gmail.com
First Published on June 11, 2019 12:22 am
Web Title: the australian national university
No comments:
Post a Comment