Monday, July 8, 2019

प्रश्नवेध एमपीएससी : महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा सराव प्रश्न महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २८ जुलै रोजी सुरू होत आहे.

प्रश्नवेध एमपीएससी : महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा सराव प्रश्न

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २८ जुलै रोजी सुरू होत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

रोहिणी शहा
महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २८ जुलै रोजी सुरू होत आहे. या परीक्षेच्या सरावासाठी सराव प्रश्न या आणि पुढील लेखांमध्ये देण्यात येत आहेत.
*      प्रश्न १. समानता एक्स्प्रेसबाबत पुढील विधानांची सत्यता तपासा.
अ.   १४ फेब्रुवारी २०१९ रोजी उद्घाटन
ब.   गौतमबुद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित स्थळांना जोडणार.
१)   विधान अ सत्य असून विधान ब असत्य आहे.
२)   विधान ब सत्य असून विधान अ असत्य आहे.
३)   दोन्ही विधाने सत्य आहेत.
४)   दोन्ही विधाने असत्य आहेत.
*      प्रश्न २. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेबाबत पुढीलपकी कोणते विधान चुकीचे आहे?
१)   दुसऱ्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची संघटना म्हणून स्थापना करण्यात आली.
२)   भारत संघटनेचा संस्थापक सदस्य आहे.
३)   सन १९६९चा शांततेचा नोबल पुरस्कार संघटनेस प्रदान करण्यात आला.
४)   एकूण १८७ देश संघटनेचे सदस्य आहेत.
*      प्रश्न ३. गगनयान प्रकल्पाबाबत कोणते विधान असत्य आहे?
अ.   सन २०२२मध्ये मानवी अंतराळ घडवून आणणे हा उद्देश.
ब.   रशिया आणि फ्रान्स या देशांशी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी करार
१)   विधान अ सत्य असून विधान ब असत्य आहे.
२)   विधान ब सत्य असून विधान अ असत्य आहे.
३)   दोन्ही विधाने असत्य आहेत.
४) दोन्ही विधाने सत्य आहेत.
*     प्रश्न ४. पुढीलपकी कोणत्या देशांच्या गटाने  (single use plastic) बंदी घातली आहे?
१) ओपेक
२) जी ४
३) युरोपियन युनियन
४) सार्क
*      प्रश्न ५. पीएम किसान योजनेबाबत पुढीलपकी कोणते विधान चुकीचे
आहे?
१)   १ जानेवारी २०१९ पासून देशामध्ये लागू करण्यात आली.
२)   २ हेक्टरपेक्षा कमी जमीन धारणा असणाऱ्या शेतकरी कुटुंबांना वार्षकि रु. ६,००० इतके अनुदान देण्यात येईल.
३)   १००% केंद्र पुरस्कृत योजना.
४)   रु. २०००च्या तीन हफ्त्यांमध्ये प्रत्यक्ष लाभ देण्यात येईल.
*     प्रश्न ६. अनुप सत्पथी समितीने महाराष्ट्रासाठी —— प्रतिदिन इतके किमान वेतन असावे अशी शिफारस केली आहे?
१) रु. ३८०
२) रु. ४१४
३) रु. ४४७
४) रु. ५०३
*     प्रश्न ७. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेबाबत अयोग्य विधान कोणते?
१)   दरमहा १५,००० रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या असंघटित क्षेत्रातील श्रमिकांसाठी निवृत्ती वेतनाची योजना.
२)   वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांना दरमहा ६,००० रुपये निवृत्तीवेतन.
३)   लाभार्थ्यांच्या वयाच्या ४०व्या वर्षांपर्यंत लाभार्थी व शासन यांचेकडून ५०:५० प्रमाणात अंशदान जमा केले जाईल.
४) वरीलपैकी नाही.
*      प्रश्न ८. कलामसॅट V2 बाबत  पुढील विधानांची सत्यता तपासा.
अ)   हा जगातील सर्वात लहान व सर्वात कमी वजनाचा उपग्रह आहे.
ब)   चेन्नईच्या स्पेस किडझ इंडिया या खासगी संस्थेतील विद्यार्थ्यांनी हा उपग्रह विकसित  केला आहे.
१)   दोन्ही विधाने असत्य आहेत.
२)   दोन्ही विधाने सत्य आहेत.
३)   विधान अ सत्य असून विधान ब असत्य आहे.
४)   विधान ब सत्य असून विधान अ असत्य आहे.
*     प्रश्न ९. एमीसॅट उपग्रहाबाबत पुढीलपकी कोणते विधान असत्य आहे?
१)   शत्रूच्या रडार यंत्राणांची माहिती संरक्षण यंत्रणांना पुरविण्यास सक्षम.
२)   शत्रूच्या रडार यंत्रणांची दिशाभूल करण्यात सक्षम.
३)   इसरो व डीआरडीओ यांनी एकत्रितपणे विकसित केलेला उपग्रह.
४)   मिशन शक्तीच्या माध्यमातून
प्रक्षेपण.
उत्तरे व स्पष्टीकरणे
प्र.क्र.१ – योग्य पर्याय क्र. (३)
प्र.क्र.२ – योग्य पर्याय क्र. (१)
पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर व्हर्सायच्या तहातील तरतुदीनुसार आंतरराष्ट्रीय कामगार संघटना
सन १९१९ मध्ये स्थापन करण्यात आली. संघटनेचे मुख्यालय जिनेव्हा येथे आहे. यामध्ये सरकार, नियोक्ते व कामगार
यांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.
प्र.क्र.३ – योग्य पर्याय क्र. (४)
(गगनयान प्रकल्प यशस्वी झाल्यावर मानवास अंतराळात पाठविणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतर चौथा देश ठरेल.)
प्र.क्र.४ – योग्य पर्याय क्र. (३)
(स्ट्रॉ, इअर बड्स, प्लॅस्टिकचे चमचे इत्यादी कटलरी अशा एकदाच वापरात येणाऱ्या वस्तूंवर युरोपियन युनियनने मार्च २०१९ मध्ये बंदी घातली आहे.)
प्र.क्र.५ – योग्य पर्याय क्र. (१)
पीएम किसान योजना १ डिसेंबर २०१८ पासून देशामध्ये लागू करण्यात आली.
प्र.क्र.६ – योग्य पर्याय क्र.(२)
(सत्पथी समितीने किमान वेतननिश्चितीबाबत शिफारस करताना राज्यांना पाच विभागांत विभागले आणि त्यांच्यासाठी अनुक्रमे रु. ३४२, रु. ३८०, रु. ४१४, रु. ४४७ व रु. ३८६ प्रतिदिन किमान वेतन असावे अशी शिफारस केली आहे. महाराष्ट्राचा समावेश तिसऱ्या गटामध्ये असून प्रतिदिन रु. ४१४ प्रमाणे दरमहा रु. १०,७६४ इतक्या किमान वेतनाची शिफारस करण्यात आली आहे.)
प्र. क्र. ७- योग्य पर्याय क्र. (४)
प्र. क्र. ८ – योग्य पर्याय क्र. (२)
प्र. क्र. ९ – योग्य पर्याय क्र. (४)
मिशन शक्तीच्या माध्यमातून उपग्रहनाशक उपग्रहाचे (A-SAT) प्रक्षेपण करण्यात आले. एमी सॅटचे प्रक्षेपण १ एप्रिल २०१९ रोजी पीएसएलव्ही ४५च्या माध्यमातून करण्यात आले. याबरोबर AMSAT सह इतर २८ उपग्रहांचे प्रक्षेपणही करण्यात आले.
First Published on July 6, 2019 12:02 am
Web Title: practice of maharashtra secondary service practice mpsc abn 97

No comments:

Post a Comment