यूपीएससीची तयारी : आर्थिक आणि सामाजिक विकास
गतवर्षीय प्रश्न आणि त्यांचे स्वरूप
(संग्रहित छायाचित्र)
मागील लेखामध्ये आपण या घटकाचे स्वरूप कसे आहे याची माहिती घेतलेली आहे. आजच्या लेखात आपण या घटकातील शाश्वत विकास, गरिबी, समावेशन, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी नमूद मुद्दय़ांवरील गतवर्षीय पूर्वपरीक्षांमध्ये (२०११-१८) विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांचा आढावा घेऊ या.
गतवर्षीय प्रश्न आणि त्यांचे स्वरूप
* २०११मध्ये ‘‘सरकारच्या सर्वसमावेशक वाढीच्या उद्देशाला खालीलपकी कोण साहाय्यकारी ठरू शकते?’’ असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. खालील तीन विधाने देण्यात आलेली होती आणि यातील योग्य विधान/विधाने कोणती हे ओळखून पर्याय निवडायचा होता.
१. स्वयं साहाय्यता बचत गटाचा प्रसार.
२. सूक्ष्म, छोटय़ा आणि मध्यम उपक्रमांचा प्रसार.
३. शिक्षणहक्क कायद्याची अंमलबजावणी.
स्पष्टीकरण – हा प्रश्न थेट सर्वसमावेशक वाढीशी संबंधित आहे. या प्रश्नाचे स्वरूप जरी वस्तुनिष्ठ वाटत असले तरी सर्वसमावेशक वाढ या धोरणाची योग्य माहिती असल्याखेरीज याचे अचूक उत्तर देणे कठीण जाते. उपरोक्त सर्व विधाने ही स्वतंत्र स्वरूपाची वाटतात त्यामुळे सर्वसमावेशक वाढ ही संकल्पना नेमकी काय आहे? याचे प्रकार अथवा वैशिष्टय़े कोणती आहेत? यामध्ये सरकारच्या कोणत्या ध्येयधोरणांचा अंतर्भाव होतो याची मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे. याचे उत्तर वरील सर्व विधाने योग्य आहेत असे आहे.
* २०१२मध्ये kkOxford Poverty and Human Development Initiative यांनी UNDP च्या मदतीने विकसित केलेल्या मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स (Multi Dimensional Poverty Index) यामध्ये खालील पकी कोणत्या बाबींचा अंतर्भाव आहे?’’ असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. यासाठी तीन विधाने देण्यात आलेली होती. यातील योग्य विधान/ विधाने कोणती याची निवड करून पर्याय निवडायचा होता.
१. घरपोच शिक्षण, आरोग्य, मालमत्ता आणि सेवा यापासून वंचित.
२. राष्ट्रीय स्तरावरील क्रयशक्ती साम्य.
३. राष्ट्रीय स्तरावरील तुटीच्या अर्थसंकल्पाचे प्रमाण आणि स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) वाढीचा दर.
स्पष्टीकरण – या प्रश्नाचे आकलन करताना या निर्देशांकाचे घटक कोणते आहेत तसेच यासाठी कोणते निकष ठरविण्यात आलेले आहेत याचबरोबर या निर्देशकांचा मानवी विकास निर्देशांकसोबत काही संबंध आहे, इत्यादी महत्त्वाच्या पलूंचा विचार करणे महत्त्वाचे आहे. या प्रश्नाचे स्वरूप वस्तुनिष्ठ प्रकारात मोडणारे आहे त्यामुळे याच्याशी संबंधित माहिती असल्याखेरीज याचे अचूक उत्तर देता येणार नाही. या प्रश्नाचे उत्तर विधान पहिले आहे.
* २०१३मध्ये ‘‘जनसांख्यिकीय लाभांशाचे संपूर्ण फायदे प्राप्त करण्यासाठी भारताने काय करणे क्रमप्राप्त आहे?’’ असा प्रश्न विचारण्यात आलेला होता व यासाठी खालील चार पर्याय देण्यात आलेले होते.
१. कौशल्य विकास प्रसार,
२. अधिक प्रमाणात सामाजिक सुरक्षा योजना सुरू करणे,
३. बालमृत्यू दरामध्ये घट करणे आणि
४. उच्च शिक्षणाचे खासगीकरण करणे.
स्पष्टीकरण – सद्य:स्थितीत भारत हा जगातील सर्वाधिक तरुण व्यक्तींचा आणि क्रयशक्ती असणारा देश आहे आणि याचा उपयोग देशाच्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त कसा करता येऊ शकतो, या अनुषंगाने याचे आकलन करणे गरजेचे आहे. हे उपलब्ध मनुष्यबळ जर कुशल आणि शिक्षित असेल तर याचा अर्थव्यवस्थेला खूप मोठा फायदा होऊ शकतो. म्हणून कौशल्य विकास कार्यक्रमाचा प्रसार हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे.
ल्ल Bio Carbon Fund Initiative for Sustainable Forest Landscape हा फंड कोण व्यवस्थापित करते, आणि Rio+20 Conference काय आहे? असे दोन प्रश्न विचारण्यात आलेले होते.
* २०१६मध्ये SWA या भारत सरकारच्या उपक्रमावर प्रश्न विचारण्यात आलेला होता व या उपक्रमाचे उद्दिष्ट काय आहे हे दिलेल्या पर्यायांतून निवडायचे होते. तसेच
* २०१७मध्ये National Nutrition Mission चे उद्दिष्टे काय आहेत, असा प्रश्न विचारण्यात आलेला होता.
* २०१८मध्ये मानवी भांडवल (Human Capital) यावर प्रश्न विचारण्यात आलेला होता.
या घटकावर बहुपर्यायी (MCQ) पद्धतीचे प्रश्न अधिक विचारले जातात. या घटकावर विचारण्यात आलेले प्रश्न हे या घटकाचे वस्तुनिष्ठ स्वरूप ग्राह्य धरून विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे या घटकाचे योग्य आकलन करून संबंधित मुद्दय़ाविषयी वस्तुनिष्ठ माहितीचे संकलन करून अभ्यास करणे अधिक उपयुक्तठरणारे आहे.
या घटकाची तयारी करण्यासाठी लागणारे संदर्भसाहित्य
या घटकाची परीक्षाभिमुख तयारी करण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीचे इयत्ता ११ वीचे Indian Economic Development आणि इयत्ता १२वीचे Macro Economics ही पुस्तके वाचावीत. ज्यामुळे या घटकाची मूलभूत माहिती आपणाला समजते तसेच या घटकाचा सखोल अभ्यास करण्यासाठी बाजारामध्ये अनेक संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत. यातील उमा कपिला लिखित Indian Economy: Economic Development and Policy, दत्त आणि सुंदरम लिखित Indian Economy हे संदर्भ ग्रंथ या घटकाचा सखोल अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरतात. तसेच त्या त्या घटकाशी संबंधित चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी ‘योजना’ मासिक आणि ‘द हिंदू’ व ‘इंडियन एक्स्प्रेस’ ही इंग्रजी वर्तमानपत्रे वाचावीत.
या पुढील लेखामध्ये आपण आर्थिक विकास या घटकाअंतर्गत येणारे कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्रे, औद्योगिक क्षेत्र, पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास, भारतीय वित्तीय प्रणाली, भारताचा परकीय व्यापार इत्यादीवर गतवर्षीय पूर्वपरीक्षांमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आणि या मुद्दय़ाची परीक्षाभिमुख तयारी कशी करावी याची एकत्रित चर्चा करणार आहोत.
First Published on April 25, 2019 1:18 am
Web Title: article on economic and social development
No comments:
Post a Comment