Wednesday, July 3, 2019

विद्यापीठ विश्व : अभ्यासाची परंपरा पेनच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये अमेरिकेतील अनेक बुद्धिवंतांचा व राजकारण्यांचा समावेश आहे.

विद्यापीठ विश्व : अभ्यासाची परंपरा

पेनच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये अमेरिकेतील अनेक बुद्धिवंतांचा व राजकारण्यांचा समावेश आहे.

पेनसिल्व्हेनिया विद्यापीठ
प्रथमेश आडविलकर itsprathamesh@gmail.com
विद्यापीठाची ओळख – फिलाडेल्फिया शहरामध्ये वसलेले पेनसिल्व्हेनिया विद्यापीठ हे अमेरिकेतील एक महत्त्वाचे विद्यापीठ आहे. या विद्यापीठास पेन किंवा यू पेन या टोपणनावांनीसुद्धा ओळखले जाते. जागतिक दर्जाचे पेन विद्यापीठ आयव्ही लीग विद्यापीठांपैकी एक आहे. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार जागतिक क्रमवारीत या विद्यापीठाचा एकोणिसावा क्रमांक आहे. या विद्यापीठाची स्थापना इसवी सन १७४० साली महान संशोधक बेन्जामिन फ्रँकलिन यांनी केली. पेन विद्यापीठ हे अमेरिकेतील चौथ्या क्रमांकाचे जुने विद्यापीठ आहे. पेन विद्यापीठ हे खासगी संशोधन विद्यापीठ आहे. Laws without morals are useless.  हे या विद्यापीठाचे ब्रीदवाक्य आहे. पेन विद्यापीठ जवळपास एक हजार एकरपेक्षाही जास्त क्षेत्रफळ असलेल्या कॅम्पसमध्ये पसरलेले आहे. सध्या पेनमध्ये जवळपास पाच हजार प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून जवळपास २२ हजार पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी येथे त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहेत.
अभ्यासक्रम – पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचे असून पदव्युत्तर अभ्यासक्रम वेगवेगळ्या कालावधीचे आहेत. विद्यापीठामध्ये एकूण चार पदवी स्तरावर तर पदव्युत्तर स्तरावरील बारा प्रमुख विभाग (स्कूल्स) कार्यरत आहेत. यामध्ये जगप्रसिद्ध व्हार्टन बिझनेस स्कूलचाही समावेश आहे. स्कूल ऑफ इंजिनीअिरग अ‍ॅण्ड अप्लाइड सायन्सेस, स्कूल ऑफ डिझाईन, लॉ स्कूल, स्कूल ऑफ डेंटल मेडिसिन, पेरेलमॅन स्कूल ऑफ मेडिसिन, व्हार्टन स्कूल, ग्रॅज्युएट स्कूल ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्सेस, स्कूल ऑफ वेटरनरी मेडिसिन, स्कूल ऑफ एज्युकेशन, स्कूल ऑफ नìसग, अ‍ॅननबर्ग स्कूल ऑफ कम्युनिकेशन आणि स्कूल ऑफ सोशल पॉलिसी अ‍ॅण्ड प्रॅक्टिस या बारा स्कूल्सचा समावेश आहे. विद्यापीठातील आर्ट्स अ‍ॅण्ड ुमॅनिटीज, ुमॅनिटीज अ‍ॅण्ड नॅचरल सायन्सेस, सोशल सायन्सेस, बिझनेस आणि इंजिनीअिरग या चार पदवी स्कूल्सच्या अंतर्गत जवळपास शंभर पदवी अभ्यासक्रम व विभाग चालतात, तर वर उल्लेख केलेल्या बारा पदव्युत्तर विभागांच्या माध्यमातून सर्व पदव्युत्तर व संशोधन अभ्यासक्रम चालवले जातात. या सर्व विभागांमधून विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डी. वा संशोधन पातळीवरील शेकडो अभ्यासक्रमांचे सर्टििफकेट, ऑनलाइन व ऑफलाइन पर्याय विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत. विद्यापीठामार्फत चालणाऱ्या या सर्व अभ्यासक्रमांना त्या-त्या क्षेत्रातील विविध संस्थांची मान्यता मिळालेली आहे. विद्यापीठातील ऑफलाइन अभ्यासक्रम हे फॉल आणि स्प्रिंग या दोन सत्रांमध्ये चालतात, तर ऑनलाइन अभ्यासक्रम वर्षभर उपलब्ध असतात. विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी त्या-त्या पदवी वा पदव्युत्तर स्तरासाठी आवश्यक असलेली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी गरजेचे आहे.
सुविधा –  पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क, शैक्षणिक कर्ज, निवास व भोजन आदी सुविधा पात्रतेच्या निकषांनुसार दिलेल्या आहेत. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच, विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेनुसार विद्यापीठाच्या आवारात विवाहित व अविवाहित विद्यार्थ्यांना निवासाची सुविधा बहाल करण्यात येते. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासाठी असलेली अर्जप्रक्रिया व इतर बाबींबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. पेन एक महत्त्वाची आयव्ही लीग संस्था असल्याने पदवीच्या चार वर्षांच्या कालावधीदरम्यान सर्व पदवीधर विद्यार्थ्यांना त्यांच्या निवासाच्या सोयीची हमी विद्यापीठाकडून दिली जाते.
वैशिष्टय़े – पेनच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये अमेरिकेतील अनेक बुद्धिवंतांचा व राजकारण्यांचा समावेश आहे. यामध्ये  नोबेल विजेत्यांपासून ते अनेक देशांचे पंतप्रधान व राष्ट्राध्यक्ष इ.  व्यक्तीदेखील आहेत. अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, गुंतवणूकतज्ज्ञ वॉरेन बफे, एलन मस्क यासारखे नामवंत या विद्यापीठामध्ये कधीकाळी शिक्षण घेत होते. २०१८ पर्यंतच्या सांख्यिकीनुसार, आतापर्यंतचे एकूण ३५ नोबेल पारितोषिक विजेते, २७ ऱ्होड्स पुरस्कार विजेते, १५ मार्शल शिष्यवृत्तीधारक, १६९ गुगनहेम फेलोज, सोळा पुलित्झर पुरस्कार विजेते आणि शेकडो कंपन्यांचे नामवंत सीईओ हे या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत.
संकेतस्थळ  https://www.upenn.edu/
First Published on May 7, 2019 4:49 am
Web Title: details about university of pennsylvania

No comments:

Post a Comment