Monday, July 8, 2019

एमपीएससी मंत्र : इतिहास विषयाची तयारी राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर एकमधील इतिहास घटक हा आधुनिक भारताचा इतिहास आहे

(संग्रहित छायाचित्र)

फारुक नाईकवाडे
राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर एकमधील इतिहास घटक हा आधुनिक भारताचा इतिहास आहे. या घटकाची तयारी कशा प्रकारे करावी, याबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.
*      रेल्वे, टपाल, उद्योगधंदे इ. बाबींचा विकासाचे टप्पे, प्रत्येक टप्प्याची पार्श्वभूमी, संबंधित राज्यकत्रे या मुद्दय़ांच्या आधारे अभ्यास करणे आवश्यक आहे.
*      भारतीय उद्योगपती व भारतीय उद्योगांची सुरुवात याबाबत बारकाईने माहिती करून घ्यावी.
*      आधुनिक शिक्षणाचा अभ्यास करताना याबाबतीत नेमलेल्या समित्या व त्यांच्या शिफारसी यांचा आढावा महत्त्वाचा ठरेल. शिक्षणासाठी विविध समाजसुधारकांचे शिक्षणविषयक कार्य समजून घ्यावे.
*      वृत्तपत्रे, भाषा, त्यांचे संस्थापक, त्यांचे ब्रीदवाक्य असल्यास ते, सर्वात पहिले, सर्वात जुने वृत्तपत्र, नियतकालिक अशा पद्धतीने मुद्रित माध्यमांचा अभ्यास करावा. यामध्ये काही संघटनांची मुखपत्रेसुद्धा महत्त्वाची आहेत.
*      सामाजिक-सांस्कृतिक बदल व भारत आणि महाराष्ट्रातील समाजसुधारकांचे कार्य या बाबी एकत्रितपणे अभ्यासायच्या आहेत. समाजसुधारक, त्यांच्या संस्था, वृत्तपत्र, साहित्य,  महत्त्वाच्या घटना (कालानुक्रमे), काय्रे, असल्यास लोकापवाद, इतर माहिती या मुद्दय़ांच्या आधारे सारणी पद्धतीत मांडणी करून अभ्यासाची टिपणे काढता येतील.
*     यामधील संस्थांच्या स्तंभात संस्थेची स्थापना, कार्यपद्धती, महत्त्वाचे योगदान, ब्रीद, असल्यास मुखपत्र व संबंधित महत्त्वाची व्यक्तिमत्त्वे यांचा समावेश असावा. विशेषत: अभ्यासक्रमात नमूद संस्था, समाजसुधारक, स्वातंत्र्यलढय़ावर प्रत्यक्ष परिणाम करणाऱ्या दलित व मुस्लीम सुधारणा चळवळींचा अभ्यास पार्श्वभूमी, कारणे, स्वरूप, परिणाम, प्रतिक्रिया व व्यक्तिमत्त्वे या मुद्दय़ांच्या आधारे करावा.
*      ब्रिटिशांची आर्थिक नीती, जमीन सुधारणा, जंगल कायदे इ. चा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम व संबंधित भारतीय नेत्यांची प्रतिक्रिया या गोष्टी समजून घ्याव्यात.
*      शेतकरी व आदिवासींचे बंड, १८५७ चा उठाव अशा संघर्षांचा अभ्यास पुढील मुद्दय़ांच्या आधारे करता येईल. कारणे / पार्श्वभूमी, स्वरूप / विस्तार / वैशिष्टय़े, प्रमुख नेते व त्यांच्या बाबतीत ठळक घडामोडी, यशापयशाची कारणे, परिणाम, उपलब्ध असल्यास इतिहासकारांच्या / समकालीनांच्या प्रतिक्रिया. गांधीयुगातील शेतकरी, आदिवासी, कामगार, संस्थानी जनता इ. च्या चळवळी / बंड यांचाही अभ्यास याच मुद्दय़ांच्या आधाराने करावा.
*      भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या दोन (मवाळ व जहाल) कालखंडांचा अभ्यास पुढील मुद्दय़ांच्या आधारे करावा. स्थापनेची सामाजिक, राजकीय, आर्थिक पार्श्वभूमी व त्याबाबतचे सिद्धांत, दोन्ही कालखंडातील मागण्या (तौलानिक पद्धतीने), दोन्ही कालखंडातील महत्त्वाचे नेते व त्यांचे वैशिष्टय़पूर्ण कार्य, दोन्ही कालखंडातील यशापयश, ब्रिटिशांची प्रतिक्रिया, सुरत विभाजन, होमरूल आंदोलन, लखनौ करार, सांप्रदायिकतेचा उदय
*      गांधीयुगातील विविध चळवळी (असहकार, सविनय कायदेभंग, चलेजाव इ.) अभ्यासताना त्यातील संघर्षांचे स्वरूप व त्यामागील विचारसरणी समजून घेऊन मग महत्त्वाच्या घडामोडींचा अभ्यास करावा. या प्रत्येक आंदोलनानंतर ब्रिटिशांच्या प्रतिक्रिया, भारतीयांना देऊ करण्यात आलेल्या बाबी, समकालीन भारतीय नेत्यांच्या महत्त्वाच्या प्रतिक्रिया व यशापयश या गोष्टी अभ्यासणे आवश्यक आहे. याच काळात वाढलेली संप्रदायिकता, त्याची कारणे, स्वरूप, परिणाम आणि इतर राजकीय पक्षांची वाटचाल अभ्यासणे आवश्यक आहे. काँग्रेसची महत्त्वाची अधिवेशने, ठराव, साल, ठिकाण व अध्यक्ष अशा मुद्दय़ांच्या आधारे टेबलमध्ये अभ्यासता येतील.
*      अभ्यासक्रमात वेगळा उल्लेख नसला तरी बिटिशांच्या कायद्यांचा व स्वातंत्र्याच्या योजनांचा कालानुक्रमे अभ्यास पार्श्वभूमी, तरतुदी, परिणाम, भारतीयांच्या प्रतिक्रिया, संबंधित व्हाईसरॉय, भारतमंत्री या मुद्दय़ांच्या आधारे करावा.
*      स्वातंत्र्योत्तर इतिहासात फाळणीचे स्वरूप, परिणाम व उपाय आणि संस्थानांचे विलीनीकरण विशेषत: जुनागढ, हैदराबाद व काश्मीरबाबतीत परिपूर्णपणे अभ्यासायला हवे.
*      भारताचे परराष्ट्र धोरण, आण्विक धोरण या बाबी नेहरू व इंदिरा गांधींच्या कालखंडापर्यंत बारकाईने अभ्यासणे आवश्यक आहे. विचारात घ्यायचे मुद्दे पुढीलप्रमाणे -आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमी, राष्ट्रीय गरज, कारणे, स्वरूप, तत्त्वे, कालपरत्वे त्यामध्ये झालेले बदल व त्यांची कारणे, अंमलबजावणी करताना घडलेल्या ठळक आंतरराष्ट्रीय घडामोडी, परिणाम व आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया, मूल्यमापन-भाषावार प्रांतरचनेची मागणी, त्यासाठीचे आयोग व शिफारसी विशेषत: संयुक्त महाराष्ट्रात समाविष्ट करायच्या प्रदेशाबाबतीतील शिफारसी हा भाग काळजीपूर्वक अभ्यासावा. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा अभ्यास महत्त्वाचे नेते, विविध विचारप्रवाह, राजकीय पक्ष व त्यांच्या भूमिका, महत्त्वाच्या घडामोडी अशा मुद्दय़ांच्या आधारे करावा.
*      पहिल्या सहा पंचवार्षकि योजनांचा अभ्यास नक्षलवाद, माओवाद, विकासाचा असमतोल इ. बाबी समजून घेण्यासाठी उपयोगी ठरतो.
*      सांस्कृतिक वारशामध्ये दृश्य कलांचा अभ्यास प्राचीन ते आधुनिक अशा क्रमाने करणे सोपे होईल. प्राचीन कला आढळणारी स्थाने, त्यांचा काळ व स्वरूप (आकृत्या, रंग, तंत्रज्ञान इ.) आश्रयदाते राज्यकत्रे अशा मुद्दय़ांच्या आधारे टेबलमध्ये करावा. मध्ययुगीन दृश्यकलांचाही अशाच प्रकारे अभ्यास करावा. मात्र येथे समकालीन इतर स्थापत्य व चित्रकलांचा आढावा घेणे श्रेयस्कर.
*      वाङ्मय प्रकारातील ज्यांचा उल्लेख अभ्यासक्रमात आहे त्यांची वैशिष्टय़े, महत्त्वाचे साहित्यकार, त्यांच्या प्रसिद्ध रचना, त्यांचे महत्त्व अशा प्रकारे अभ्यास आवश्यक आहे.
*      प्रायोगिक कलांपकी लोककलांचे स्वरूप, त्यांचे सांस्कृतिक-धार्मिक पलू व त्यांचे विशिष्ट प्रदेश व असल्यास संबंधित महत्त्वाचे कलाकार, त्यांच्या संवर्धनाचे प्रयत्न असे मुद्दे अभ्यासावेत. इतर प्रायोगिक कलांमधील विकासाचे प्रमुख टप्पे, प्रसिद्ध/पुरस्कारप्राप्त कलाकार इ. बाबी महत्त्वाच्या आहेत.
First Published on July 5, 2019 12:06 am
Web Title: history preparation mpsc abn 97

No comments:

Post a Comment