Friday, October 23, 2015

आरटीआय’ म्हणजे सरकारला प्रश्न विचारण्याचाही अधिकार – मोदी केंद्रीय माहिती आयोगाच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मोदी यांनी बीजभाषण केले.

आरटीआय’ म्हणजे सरकारला प्रश्न विचारण्याचाही अधिकार – मोदी

केंद्रीय माहिती आयोगाच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मोदी यांनी बीजभाषण केले.

नवी दिल्ली | October 16, 2015 13:53 pm

प्रशासकीय व्यवस्थेमध्ये सकारात्मक बदल घडविणे हेच माहिती अधिकार कायद्याचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे नरेंद्र मोदींनी सांगितले.

माहितीचा अधिकार हा केवळ माहिती जाणून घेण्याचा अधिकार नसून, तो सरकारला प्रश्न विचारण्याचाही अधिकार आहे. यामुळेच लोकांचा लोकशाही व्यवस्थेवरचा विश्वास आणखी दृढ होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नवी दिल्लीमध्ये केले.
केंद्रीय माहिती आयोगाच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मोदी यांनी बीजभाषण केले. यावेळी त्यांनी लोकशाही व्यवस्थेच्या दृष्टिने माहिती अधिकार कायद्याचे महत्त्व पुन्हा एकदा विशद केले.
ते म्हणाले, केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तीन ‘टीं’चा कायम विचार केला पाहिजे. टाईमलीनेस, ट्रान्सपरन्सी आणि ट्रबल फ्री अॅप्रोच. माहिती अधिकार कायद्यांतर्गत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना या तीन गोष्टींचा विचार केल्यास प्रशासनातील चुका टाळता येतील. माहिती अधिकार कायद्यांतर्गत विचारलेली माहिती ही संबंधितांना वेळेत उपलब्ध करून दिली पाहिजे. त्यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता असली पाहिजे. आणि प्रश्न विचारणाऱ्यांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागले नाही पाहिजे. माहितीचा अधिकार केवळ माहिती मिळवण्याचे साधन नसून, ते प्रश्न विचारण्याचेही साधन आहे. त्यामुळे लोकांचा लोकशाही व्यवस्थेवरचा विश्वास वाढणार आहे.
प्रशासकीय व्यवस्थेमध्ये सकारात्मक बदल घडविणे हेच माहिती अधिकार कायद्याचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगून ते म्हणाले, माहिती अधिकाराचे विषय ऑनलाईन झाल्यावर त्यातील पारदर्शकताही वाढेल आणि लोकांचा त्यावरील विश्वासही वाढेल. सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार लोकांना मिळालाच पाहिजे.
First Published on October 16, 2015 1:53 pm
Web Title: rti replies should be timely transparent and trouble free pm modi

BLOG : अॅस्‍ट्रोसॅट अंतराळातील पहिल्‍या परीक्षेत उत्‍तीर्ण खगोलशास्त्र हा पूर्णत: कुतूहल आणि नावीन्याने भरलेला विषय.

BLOG : अॅस्‍ट्रोसॅट अंतराळातील पहिल्‍या परीक्षेत उत्‍तीर्ण

खगोलशास्त्र हा पूर्णत: कुतूहल आणि नावीन्याने भरलेला विषय. BLOG : अॅस्‍ट्रोसॅट अंतराळातील पहिल्‍या परीक्षेत उत्‍तीर्ण खगोलशास्त्र हा पूर्णत: कुतूहल आणि नावीन्याने भरलेला विषय.

नीरज पंडित | October 14, 2015 10:57 am

आपल्यापासून जे लांब असते त्याची आपल्याला खूप उत्सुकता असते. तेथे घडणाऱ्या घडमोडींची माहिती आपल्याला व्हावी असे माणसाला वाटत असते. यातूनच विज्ञान आणि संशोधनाच्या शाखा विकसित होत गेल्या. खगोलशास्त्र हा तर पूर्णत: कुतूहल आणि नावीन्याने भरलेला विषय आहे. यातूनच माणूस चंद्र, मंगळ या ग्रहांपर्यंत पोहचू शकला. पण तरीही असे अनेक प्रश्न आहेत जे आजही अनुत्तरीत आहेत. या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी जगातील विविध देश अंतराळ मोहिमांची आखणी करतात. यातूनच भारताच्या ‘अ‍ॅस्ट्रोसॅट’चा जन्म झाला हा उपग्रह सप्‍टेंबर अखेरीस अंतराळात झेपावला आणि त्‍याने तेथील पहिली परीक्षाही उत्‍तीर्ण केली.
सोमवारी भारताची अवकाशातील पहिल्‍या अंतराळ वेधशाळेतून एक छायाचित्र आले आणि खगोल वैज्ञानिकांमध्‍ये जल्‍लोष सुरू झाला. अर्थात या छायाचित्रातून फारकाही नवी माहिती मिळाले असे नाही तर हे अॅस्ट्रोसॅट या भारताच्‍या अवकाश वेधशाळेत बसविण्‍यात आलेली निरीक्षण प्रणाली योग्‍य असल्‍याचे यामुळे सिद्ध झाले. यामुळे अॅस्‍ट्रोसॅट पहिल्‍या परीक्षेत उत्‍तीर्ण झाल्‍याची चर्चा खगोल वैज्ञानिकांमध्‍ये रंगू लागली आहे.
crabnebula1
अॅस्‍ट्रोसॅटने सोमवारी पृथ्‍वीवर धाडलेले छायाचित्र हे ‘क्रॅबनेबुला’चे होते. वृषभ राषीच्‍या चिन्‍हाच्‍या शिंगाच्‍या वरच्‍या बाजूस क्रॅब नावाचा चार इंचांचा तेजोमेघ आहे. हा सर्वप्रथम 1054मध्‍ये चीनमध्‍ये पाहिला गेला होता. याचा प्रकाश इतका मोठा होता की तो अगदी साध्‍या डोळ्यानेही दिसत असे. रात्री सर्वात तेजस्‍वी दिसणारा हा क्रॅब आहे. प्रत्‍यक्षात एखादा तारा जेव्‍हा अखेरच्‍या टप्‍प्‍याचा प्रवास करत असतो त्‍यावेळेस तो अधिक प्रज्‍वलित होतो. पण त्यावेळेस लोकांना तो ता-याचा जन्‍म आहे असे वाटले. अशाप्रकारच्‍या नोंदी आढळतात. कालांतराने या क्रॅबचा प्रकाश कमी कमी होत गेला. पण तरीही हा क्रॅब प्रकाशमान मानला जातो. अगदी साध्‍या दुर्बिणीतूनही जर आकाशात पाहिले तरी हा क्रॅब सहज दिसतो. यामुळेच अवकाशातील ता-यांचा वेध घेणारे खगोलप्रेमी आणि अभ्‍यासक वेध घेणारे कोणतेही नवीन उपकरण आणले की त्‍यातून सर्वप्रथम हा क्रॅब पाहतात. हा क्रॅब योग्‍य प्रकारे दिसला की आपले उपकरण योग्‍य आहे असे मानले जाते. असे काही अवकाशातील प्रमाणं आहेत जे नवीन उपकरणाची योग्‍यता तपासण्‍यासाठी पाहिली जातात. यातील या क्रॅबचा टप्‍पा भारतीय अवकाश वेधशाळा अॅस्‍ट्रोसॅटने पूर्ण केला आहे. हे एकप्रकारे अॅस्‍ट्रोसॅटच्‍या चमूचे पहिले यश म्‍हणता येईल.
अॅस्‍ट्रोसॅटचा यानंतरचा टप्‍पा म्‍हणजे हंस तारकासमूहातील क्ष-किरणांचा अभ्‍यास करण्‍याचा असेल. त्‍या ठिकाणी कृष्‍ण विविर आहे असे निरीक्षण जगभरातील बहुतांश खगोल अभ्‍यासकांनी नोंदविले आहे. अॅस्‍ट्रोसॅटने त्‍याचा वेध घेतल्‍यावर ते अधिक स्‍पष्‍ट होणार असून त्‍यातील काही दुरुस्‍त्‍याही मिळण्‍याची शक्‍यता खगोल अभ्‍यासक अभय देशपांडे यांनी व्‍यक्‍त केली आहे. अंतराळातील पहिल्‍या यशानंतर आता हा उपग्रह नेमके कोणते काम करतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.
अॅस्‍ट्रोसॅट विषयी
अ‍ॅस्ट्रोसॅट हा भारताचा पहिला खगोलशास्त्रसाठी समर्पित उपग्रह आहे. या उपग्रहामुळे आपल्याला खगोलीय घटना व खगोलीय वस्तूंची सखोल माहिती मिळू शकणार आहे. या उपग्रहाचे ठळक वैशिष्टय़ म्हणजे एकाच उपग्रहाद्वारे, एकाच वेळी विद्युतचुंबकीय तरंगलहरींच्या एका रुंद पट्टय़ांचे निरीक्षण करणे सहज, सोपे होणार आहे. दृश्य, अतिनील, मृदू आणि कठीण क्ष-किरण अशा विविध तरंगलहरींमध्ये आपण ब्रह्मांडातील वस्तूंचा वेध घेऊ शकतो. आतापर्यंत जगभरातून सोडण्यात आलेल्या अनेक दुर्बिणी पृथ्वीभोवती फिरत आहेत. पण त्या सर्वाची निरीक्षणक्षमता काही ठराविक तरंगलहरींपुरती मर्यादित आहे. या सर्वाच्या पुढे जाऊन भारताने ‘अ‍ॅस्ट्रोसॅट’ विकसित केला. म्हणूनच भारताची ही मोहीम नासापेक्षा एक पाऊल पुढे आहे, असे म्हटले जाते. ‘अ‍ॅस्ट्रोसॅट’ची संकल्पना १९९६ मध्ये पहिल्यांदा मांडण्यात आली व २००० मध्ये त्याचा सखोल अहवाल ‘इस्रो’कडे सादर केला गेला. हा अहवाल स्वीकारून २००२ मध्ये इस्रोने, प्राथमिक निधी उपलब्ध करून दिला. तत्कालीन केंद्र सरकारने २००४ मध्ये या मोहिमेला अधिकृत मान्यता देऊन पुढील निधी प्रदान केला. यानंतर पंधरा वर्षांच्या कालावधीनंतर, भारतीय शास्त्रज्ञांच्या अतोनात मेहनतीने हा उपग्रह तयार झाला. त्यात भारतातल्या आघाडीच्या वैज्ञानिक संस्थांनी मोलाचे योगदान दिले. यामध्ये टाटा मूलभूत संशोधन संथा (टीआयएफआर) मुंबई, इंटर युनिवर्सटिी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोनॉमी अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स (आयुका) पुणे, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स (आयआयए) बंगळुरू, रामन रिसर्च संस्था (आरआरआय) बंगळुरू आणि इस्रो या संस्थांचा समावेश आहे
@lsnirajpandit
First Published on October 14, 2015 10:45 am
Web Title: astrosat captures its first image of crab nebula

Thursday, October 22, 2015

असा वाचवा डेटा ‘‘महिन्याला एक जीबी डेटा पुरत नाही म्हणून पुढच्या महिन्यात डेटा पॅक वाढविला.

असा वाचवा डेटा

‘‘महिन्याला एक जीबी डेटा पुरत नाही म्हणून पुढच्या महिन्यात डेटा पॅक वाढविला.

नीरज पंडित | October 13, 2015 06:12 am

‘‘महिन्याला एक जीबी डेटा पुरत नाही म्हणून पुढच्या महिन्यात डेटा पॅक वाढविला. आता तो दीड जीबीचा डेटाही पुरेनासा झाला. नेमका डेटा जातो कुठे? वापर थोडा वाढला, पण इतकाही नाही, की ज्यामुळे एवढा डेटा खर्च होईल.’’ अशी चर्चा दर महिन्याला बिल आल्यावर किंवा डेटा पॅक संपल्यावर होताना दिसते; पण जर मोबाइलमध्ये इंटरनेट वापरताना आपण जर काही काळजी घेतली, तर खरोखरच डेटा कमी खर्च होईल आणि आपले पैसेही वाचतील. आपल्या मोबाइलचा डेटा अनेकदा आपल्या नकळत खर्च होत असतो. यामुळे आपण कमीत कमी इंटरनेट वापरले तरी इंटरनेट पॅक लवकर संपतो आणि आयत्या वेळी गोंधळ उडतो. डेटा वाचवायचा म्हणजे नेमके काय करायचे हे पाहूयात.
रिस्ट्रिक्ट बॅकग्राऊंड डेटा
डेटा वाचविण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे अॅप्सचा बॅकग्राऊंड डेटा बंद करणे. यामुळे अनेकदा आपण काहीही काम करत नसताना इंटरनेट खर्च होत राहते. यामुळे अनेकदा आपले एमबी संपतात आणि आपल्याला प्रत्यक्षात ते समजतही नाहीत. बॅकग्राऊंड डेटामध्ये ई-मेल सिंकिंग, फीड्स अपडेटिंग, वेदर विडगेट्स अशा गोष्टींचा समावेश होतो. हे बंद करणे अगदी सोपे आहे. ते बंद करण्यासाठी सेटिंग्जमध्ये जा. तेथे डेटा युसेजचा पर्याय निवडा. यानंतर तुम्हाला खाली कोणते अॅप किती डेटा वापरतो याची माहिती येईल. तेथे प्रत्येक अॅपमध्ये जाऊन ते सुरू केल्यावर तेथे खालच्या बाजूस ‘रिस्ट्रिक्ट बॅकग्राऊंड डेटा’ असा पर्याय येतो, तो निवडावा. यामुळे अॅप बंद असताना खर्च होणारा डेटा खर्च होणार नाही. याचबरोबर तुम्ही गुगल सव्र्हिसेसच्या सेटिंग्जमध्ये जाऊन तुम्हाला ज्या सेवांचे सिंकिंग नको असेल त्या सेवांचे सिंक बंद करू शकता. यामुळेही तुमचा डेटा कमीत कमी खर्च होण्यास मदत होऊ शकेल.
ऑटो अपडेटिंग अॅप्स
तुमच्या फोनचा सर्वाधिक डेटा खर्च होण्याचा आणखी एक स्रोत म्हणजे गुगल प्लेमध्ये होणारे अॅप अपडेशन. जर तुम्ही प्ले स्टोअरमध्ये ‘सेट टू ऑटो अपडेट्स अॅप्स’ असा पर्याय निवडला असेल, तर तुमच्या मोबाइलमधील अॅप्सचे अपडेटेड व्हर्जन बाजारात दाखल झाले, की तातडीने तुमचे अॅप अपडेट होते आणि तुमचा डेटा खर्च होतो. जर हा डेटा खर्च वाचवायचा असेल, तर प्ले स्टोअरमध्ये जाऊन ऑटो अपडेट अॅप्सऐवजी ‘डू नॉट ऑटो अपडेट अॅप्स’ किंवा ‘ओन्ली ओव्हर वाय-फाय’ हा पर्याय निवडावा. म्हणजे अॅप आपोआप अपडेट होणार नाही. जर तुम्हाला काही ठरावीक अॅप्सबाबतीत ही सुविधा पाहिजे असेल, तर तुम्ही प्रत्येक अॅपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन हा पर्याय बंद करू शकता.
क्रोमवर नियंत्रण
अँड्रॉइड फोन वापरणाऱ्या बहुतांश वापरकर्त्यांकडे क्रोम हे इंटरनेट ब्राऊझर देण्यात आलेले असते. या ब्राऊझरचा वापर आपण अगदी बिनदिक्कतपणे करत असतो; पण प्रत्यक्षात हा ब्राऊझर खूप इंटरनेट खर्च करत असतो. जर या एकटय़ा ब्राऊझरवर आपण नियंत्रण मिळवले, तर आपला ३० ते ३५ टक्के डेटा वाचू शकतो. यासाठी तुम्ही मोबाइलमध्ये क्रोम ब्राऊझर सुरू करा. त्यात वरच्या बाजूस उभे तीन टिंबे दिसतील. त्यात सेटिंग्जमध्ये गेल्यावर डेटा सेव्हर म्हणून एक पर्याय येतो. हा पर्याय आपण सुरू केल्यावर क्रोम गुगल सव्र्हरचा वापर करून आपण ज्या वेबपानांना भेट देणार ती पाने आपण भेट देण्यापूर्वी कॉम्प्रेस करतात. याचबरोबर मानवेअर्सचा प्रभाव असलेली पाने उघडण्यापासून आपल्याला रोखतात. यामुळे बरेचदा संकेतस्थळ सुरू होताना आपल्या ठिकाणाचा विचार करून सुरू होतात. हा पर्याय सुरू केल्यानंतर ब्राऊझरमध्ये दिसणारे काही फोटो कमी दर्जाचे दिसू शकतील. कंपन्यांची अंतर्गत संकेतस्थळे या पर्यायाचा वापर केल्यानंतर ओपन होणार नाहीत. जर तुम्ही आयपॅड आणि आयफोन किंवा विंडोज फोनवरही क्रोम ब्राऊझर वापरत असाल तर त्यावरही हा पर्याय उपलब्ध आहे. यानंतर तुम्ही क्रोम ब्राऊझरच्या सेटिंग्जमध्ये गेल्यावर तुम्हाला तुम्ही किती डेटा सेव्ह केला आहे त्याची माहिती मिळू शकते. अगदीच क्रोम वापरण्याचा आग्रह नसेल, तर तुम्ही कमी डेटा खर्च करणारे ओपेरा मिनीसारखे ब्राऊझरही वापरू शकता.
फेसबुक अॅप
सर्वाधिक डेटा खर्च करणारे आणि लवकर बॅटरी संपवणारे अॅप म्हणून फेसबुक अॅपची ओळख आहे. अँड्रॉइड वापरकर्त्यांना तर या अॅपची चांगलीच भीती आहे. या अॅपमुळे तुमच्या फोनचा डेटाच नव्हे, तर रॅमही सतत खर्च होत असते. यामुळे तुम्ही याला पर्याय असणाऱ्या अॅपचा वापर करा. फेसबुकनेच फेसबुक लाइट नावाचे अॅप बाजारात आणले आहे. हे अॅप जर तुम्ही डाऊनलोड केले, तर फेसबुक अॅपवर खर्च होणाऱ्या डेटाच्या एकूण एमबीच्या तुलनेत निम्मे एमबीच खर्च होतील. याशिवाय काही त्रयस्थ अॅप्सही बाजारात आहेत. जे तुम्हाला कमी डेटा खर्च करून फेसबुक वापरण्यासाठी मदत करू शकतात. यामध्ये टिनफोइल अॅपचा समावेश आहे. या अॅपच्या माध्यमातून आपण फेसबुकच्या संकेतस्थळावर पोहोचतो आणि आपण फेसबुक ब्राऊजिंग करू शकतो.
इतर काही सूचना
* व्हॉट्स अॅपमध्ये येणारे फोटो आणि व्हिडीओ आपोआप डाऊनलोड होत असतात. यामुळे तुमचा डेटा प्रमाणापेक्षा जास्त खर्च होतो. यामुळे व्हॉट्सअॅपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन तुम्ही सर्वप्रथम मीडिया ऑटो डाऊनलोड बंद करा, जेणेकरून तुमचा डेटा खर्च होणार नाही. जो फोटो किंवा व्हिडीओ तुम्हाला आवश्यक वाटेल तोच डाऊनलोड केल्यास खूप डेटा वाचू शकतो.
* गाणी किंवा व्हिडीओ युटय़ूबसारख्या अॅप्सवरून पाहणे किंवा ऐकणे कमी केले तरीही डेटा वाचू शकतो. अनेकदा हे व्हिडीओ पाहण्यासाठी खूप डेटा खर्च होतो.
* अॅपमध्ये येणाऱ्या जाहिरातींमुळेही आपला डेटा खर्च होत असतो. यामुळे एकदा का तुम्ही अॅप सुरू केले की फोनचा मोबाइल डेटा बंद करा आणि ते अॅप वापरा, जेणेकरून जाहिराती येणार नाहीत आणि तुमचा डेटा खर्च होण्याचे प्रमाण कमी होईल. याशिवाय तुम्ही अॅड ब्लॉकर अॅप्स डाऊनलोड करून अॅपमध्ये येणाऱ्या जाहिरातींच्या जाचापासून वाचू शकाल आणि डेटाही वाचवू शकाल.
नीरज पंडित 
First Published on October 13, 2015 6:06 am
Web Title: simple tips to save data
टॅग: Data,Save Data,Tech-it

Tech नॉलेज : सीडीएमए व जीएसएम एकाच मोबाइलमध्ये हवे आमच्या राजापूर तालुक्यात सीडीएमए नेटवर्क चांगले आहे. माझा सीडीएमएचा क्रमांक मला बदलवायचा नाही.

Tech नॉलेज : सीडीएमए व जीएसएम एकाच मोबाइलमध्ये हवे

आमच्या राजापूर तालुक्यात सीडीएमए नेटवर्क चांगले आहे. माझा सीडीएमएचा क्रमांक मला बदलवायचा नाही.

तंत्रस्वामी | October 13, 2015 06:13 am

प्रश्न – आमच्या राजापूर तालुक्यात सीडीएमए नेटवर्क चांगले आहे. माझा सीडीएमएचा क्रमांक मला बदलवायचा नाही. तसेच मला एक जीएसएम कार्डही वापरावयाचे आहे. तर एकाच मोबाइलमध्ये सीडीएमए आणि जीएसएम असे दोन्ही कार्ड वापरता येतील असा कोणता मोबाइल आहे. एचटीसी डिझायर ८२० कसा आहे. त्याला कोणता पर्याय असू शकतो. – गजानन पळसुलेदेसाई
उत्तर – सीडीएमए आणि जीएसएम या दोन्ही प्रकारचे नेटवर्क एकाच फोनमध्ये वापरायचे असेल तर तुम्हाला यासाठी विविध पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. यापैकी तुम्ही म्हणत असलेला एचटीसी डिझायर ८२० याचबरोबर एचटीसी डिझायर ८२६ आणि डिझायर एक्ससी हे तिन्ही एचटीसीचे असे डय़ुएल सिम फोन आहेत ज्यामध्ये आपल्याला फोरजी जोडणी मिळते याचबरोबर आपण एकाच फोनमध्ये जीएसएम आणि सीडीएमए असे कार्ड वापरू शकतो. ८२०च्या तुलनेत ८२६ अधिक अद्ययावत ठरतो. यामध्ये कॅमेरा आणि साठवणूक क्षमता जास्त देण्यात आली आहे. तर एक्ससी हा फोन मध्यम प्रतीचा आहे. यामध्ये आपल्याला अधिक कमी आणि खूप जास्त सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. पण नियमित कामकाज होऊ शकेल असा हा फोन आहे. या शिवाय एचटीसीच्या वन मालिकेतील ८०२ डी हाही फोन जीएसएम आणि सीडीएमएमची सुविधा वापरण्याची मुभा देतो. या फोनचे हार्डवेअर चांगले असले तरी तो इतर बाबतीत खूप जुना ठरतो. तुम्हाला एचटीसी व्यतिरिक्तचे पर्याय हवे असतील तर तुम्हाला एमटीएसचा ब्लेझ ५.०, हेअरचा ई ६१९, स्वाइपचा सॉनिक, झेडटीईचा ब्लेज यासारखे पर्याय उपलब्ध आहेत. सॅमसंगसारख्या मातब्बर ब्रँड्समध्ये काही पर्याय उपलब्ध आहेत. मात्र त्यातील अनेक गोष्टी या कालबाह्य ठरल्या आहेत. यामुळे जर तुम्हाला ब्रँड हवा असेल तर तुम्ही एचटीसीच्या पर्यायांपैकी एक पर्याय निवडू शकता.
First Published on October 13, 2015 6:01 am
Web Title: cdma and gsm mobile must in one

दिखावे पे मत जाओ’ तंत्रज्ञानाच्या वाढत्या उपलब्धतेमुळे ऑनलाइन शॉपिंगला सध्या चांगले दिवस आले आहेत.

दिखावे पे मत जाओ’

तंत्रज्ञानाच्या वाढत्या उपलब्धतेमुळे ऑनलाइन शॉपिंगला सध्या चांगले दिवस आले आहेत.

October 6, 2015 07:53 am

तंत्रज्ञानाच्या वाढत्या उपलब्धतेमुळे ऑनलाइन शॉपिंगला सध्या चांगले दिवस आले आहेत. घरबसल्या हजारो वस्तूंच्या भाऊगर्दीतून आपल्याला हवी तशी वस्तू निवडून ती सवलतीच्या दरात आणि घरपोच मिळवता येत असल्याने ऑनलाइन शॉपिंग करण्याकडे ग्राहकांचाही ओढा वाढत चालला आहे. त्यामुळे लहान मुलांच्या खेळण्यांपासून घरातील फर्निचपर्यंतच्या असंख्य गोष्टी सध्या ई-कॉमर्स संकेतस्थळांवरून विक्रीस उपलब्ध होत आहे. हा संपूर्ण व्यवहार तांत्रिकदृष्टय़ा सुरक्षित आणि पारदर्शी असला तरी त्यातून चोरवाटा काढून आपला कार्यभाग साधणाऱ्या अनेक कंपन्या, विक्रेते आता वाढत चालले आहेत. पर्यायाने ऑनलाइन शॉपिंगचे धोकेही वाढत चालले आहेत. सध्या दिवस सणासुदीचे आहेत. त्यामुळे ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर ई-कॉमर्स संकेतस्थळांवरून वस्तू खरेदी करताना काय काळजी घ्यावी, त्यामध्ये धोके कसे उद्भवू शकतात, याची माहिती देणारा हा लेख..
ऑनलाइन शॉपिंगची सुरुवात अनेकदा आपल्या ई-मेलच्या इनबॉक्समध्ये आलेल्या मेलपासून किंवा आपण नेहमी पाहात असलेल्या संकेतस्थळावरील जाहिरातीपासून होते. या जाहिरातींमधील वस्तूंवर जाहीर केलेली सवलत ग्राहकांना आकर्षित करते व ते संबंधित वस्तूच्या खरेदीसाठी ई-कॉमर्स संकेतस्थळावर येऊन पोहोचतात. येथून खरं तर ग्राहकाची परीक्षा सुरू होते. ई-कॉमर्स संकेतस्थळांवर ग्राहकांना भुरळ पाडून फसवणूक केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी ऑनलाइन शॉपिंग करताना खालील गोष्टी वरवर न पाहता बारकाईने तपासून पाहा.
खोटय़ा प्रतिक्रिया :
एका ग्राहकाने दिलेली सकारात्मक प्रतिक्रिया दुसऱ्या ग्राहकाला आकर्षित करते, हे विपणनाचे महत्त्वाचे सूत्र असते. त्यामुळे ई-कॉमर्स संकेतस्थळांवरील प्रत्येक वस्तूच्या विक्री पानावर ती खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या प्रतिक्रिया असतात. या प्रतिक्रियांतून सदर वस्तूच्या प्रत्यक्ष वापराचा अनुभव अन्य ग्राहकांकडून मिळण्याची अपेक्षा असते. त्यावरून ती वस्तू आपल्यासाठी चांगली आहे का, याचाही निर्णय घेता येतो. मात्र, अनेक कंपन्या किंवा त्या संकेतस्थळांवरून आपल्या वस्तू खपवू पाहणारे विक्रेते (डीलर्स) खोटय़ा प्रतिक्रिया नोंदवून ग्राहकांची दिशाभूल करत असल्याचे अलीकडे निदर्शनास आले आहे.  अशा प्रकारच्या खोटय़ा प्रतिक्रिया देण्यासाठी संबंधितांना आकर्षक रकमा दिल्या जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या प्रतिक्रियांवर पूर्णपणे विसंबून आपला निर्णय घेऊ नका. अतिशय सकारात्मक किंवा लांबलचक प्रतिक्रियांपासून सावध राहा. कारण कोणताही ग्राहक खरेदी केलेल्या वस्तूबाबत पूर्णपणे समाधानी असू शकत नाही. प्रत्येक गोष्टीत काही दुर्गुण शोधण्याचा मानवी गुणधर्मच असतो. तसेच एखाद्या वस्तूबाबत भरभरून लिहिण्याएवढा वेळ कोणी उगाच का दवडेल, याचेही भान आपल्याला असले पाहिजे. संबंधित वस्तूबाबत किंवा ती विकणाऱ्या विक्रेत्याची फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केल्यास अधिक उत्तम.
वस्तूची खरी किंमत काय? :
बऱ्याचदा आपल्या इनबॉक्समध्ये ‘अमूक एक वस्तू ९० टक्के सवलतीत’ किंवा ‘अमुक वस्तूवर तमुक वस्तू मोफत’ अशा जाहिराती करणारे ई-मेल येतात. त्या जाहिराती भुरळ पाडणाऱ्या असतात. साहजिकच ग्राहक त्यावर क्लिक करून ई-कॉमर्स संकेतस्थळावर पोहोचतो व खरेदीची प्रक्रियाही सुरू करतो. मात्र, हे सर्व करत असताना जी आकर्षक ऑफर आपल्याला दिसते, त्याच किमतीत वस्तू मिळत आहे का, याचा विचार केला जात नाही. बऱ्याचदा कंपन्या वस्तूंवर आकर्षक सवलती देऊ करतात. मात्र, त्यांचे ‘शिपिंग चार्जेस’ अव्वाच्या सव्वा आकारले जातात. हे शिपिंग चार्जेस खरेदीच्या शेवटच्या टप्प्यात दर्शवले जातात. तोपर्यंत आपण बरेच पुढे गेलेलो असतो व व्यवहार यशस्वी करण्याच्या घाईपोटी भराभर क्लिक करत जातो. संपूर्ण व्यवहार झाल्यानंतर ती वस्तू आपल्याला नेहमीच्याच दराने मिळाल्याची जाणीव होते. अशी फसगत बऱ्याच ई-कॉमर्स संकेतस्थळांवरून केली जाते. हे टाळायचे असल्यास प्रत्येक वस्तूची खरी किंमत जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कोणीही पदरमोड करून वस्तुविक्री करणार नाही, याची जाणीव ठेवा. आकर्षक सवलती किंवा अन्य ऑफर्सना भुलून जाण्यापेक्षा प्रत्यक्षात त्याची किंमत किती असेल, हे समजून घ्या. शेवटच्या टप्प्यात ‘शिपिंग चार्जेस’ अवास्तव वाटत असल्यास लागलीच व्यवहार रद्द करा. तो पर्याय तुम्हाला उपलब्ध असतोच.
चुकीच्या किंवा खराब वस्तूची पाठवणी :
मोबाइल चार्जरच्या जागी दगड, मोबाइलच्या ऐवजी साबण अशा प्रकारची ‘डिलिव्हरी’ मिळाल्याच्या अनेक घटना अलीकडे प्रसारमाध्यमांतून वाचायला मिळतात. असे का होते, याचा शोध घेणे आवश्यक आहे. ई-कॉमर्स संकेतस्थळे चालवणारी कंपनी प्रतिष्ठित असली, तरी त्या माध्यमातून आपल्या वस्तूंची विक्री करणारे विक्रेते बनावट किंवा फसवणूक करणारे असू शकतात. त्यांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे. बऱ्याचदा एखाद्या वस्तूची छायाचित्रे वा वैशिष्टय़े संकेतस्थळावर जशी दिसतात, त्यापेक्षा प्रत्यक्षात पाठवण्यात आलेल्या वस्तूचा दर्जा खालचा असू शकतो. हे टाळण्यासाठी सर्वप्रथम आपण ज्यांच्याकडून ती वस्तू खरेदी करणार आहोत, त्या विक्रेत्याची पाश्र्वभूमी तपासून घेतली पाहिजे. अॅमेझॉन, स्नॅपडील किंवा फ्लिपकार्ट अशा कंपन्या ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध करून देतात. मात्र, ते तपासतानाही सजग असले पाहिजे.
वस्तूची ऑर्डर केल्यानंतर आपल्याला मिळणाऱ्या ‘ट्रॅकिंग क्रमांका’चा योग्य वापर करून वस्तू कुठपर्यंत आहे, हे तपासून घेतले पाहिजे. तसेच मिळालेली वस्तू चुकीची असल्यास त्याची तक्रार संबंधित ई-कॉमर्स संकेतस्थळाकडे तातडीने केली पाहिजे. मात्र, हे सर्व करण्यापूर्वी वस्तू खरेदी करण्याच्या प्रक्रियेत संबंधित ई-कॉमर्स संकेतस्थळही सहभागी आहे ना, याची खातरजमा करून घेतली पाहिजे. थर्ड पार्टी अथवा  त्रयस्थ विक्रेत्यांकडून वस्तू खरेदी केल्यास कंपन्या त्याची जबाबदारी झटकू शकतात. त्यामुळे खरेदी करताना संबंधित ई-कॉमर्स संकेतस्थळाची विश्वासार्हताही तपासून पाहिली पाहिजे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वस्तू खरेदी करण्यासाठी शक्यतो क्रेडिट कार्डचा वापर करा. कारण जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डाद्वारे एखादी वस्तू खरेदी करता, तेव्हा कायद्यानुसार, विक्रेता आणि क्रेडिट कार्ड कंपनी या दोघांवर योग्य वस्तूची पाठवणी करण्याची जबाबदारी येते. दुसरे म्हणजे, वस्तू अयोग्य असल्यास तुम्ही क्रेडिट कार्ड कंपनीला कळवून त्यांच्याकडून विक्रेत्यांना होणारे/झालेले ‘पेमेंट’ रोखू शकता. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रेडिट कार्डच्या वापरामुळे तुमच्या आर्थिक सुरक्षिततेला अधिक धोका बसत नाही. उलट तुमच्या डेबिट कार्डाची माहिती मिळवून एखादी व्यक्ती त्यातील सर्व रक्कम लंपास करण्याचाही प्रयत्न करू शकते.
सुरक्षित ऑनलाइन शॉपिंगसाठी..
* सार्वजनिक ठिकाणावरील संगणकावरून ऑनलाइन शॉपिंग करू नका. घरातून किंवा आपल्या व्यक्तिगत वापरातील संगणक वा मोबाइलचा वापर करा.
* तुमच्या संगणकामध्ये चांगला ‘अँटी मालवेअर प्रोग्रॅम’ इन्स्टॉल करा. जेणे करून तुमच्या व्यक्तिगत माहितीची चोरी करण्याचा प्रयत्न रोखला जाईल.
* विश्वासार्ह विक्रेत्यांसोबतच व्यवहार करा.
* ऑर्डर करताना ती प्रक्रिया ‘एन्क्रिप्टेड’ असल्याची खातरजमा करून घ्या.
* ऑर्डर पूर्ण झाल्यानंतर बिलाची प्रिंटआऊट काढा.
* ई-कॉमर्स संकेतस्थळांसाठी कठीण व गुंतागुंतीचा पासवर्ड नोंदवा.
– आसिफ बागवान
asif.bagwan@expressindia.com
First Published on October 6, 2015 7:53 am
Web Title: online shopping risks

डिजिटल इंडिया म्हणजे काय? देशातील प्रशासनात लोकांचा सहभाग वाढवणे, ते अधिक पारदर्शी बनवणे, शासनाकडून लोकांना मिळणारा प्रतिसाद वाढवणे

डिजिटल इंडिया म्हणजे काय?

डिजिटल इंडिया म्हणजे काय? देशातील प्रशासनात लोकांचा सहभाग वाढवणे, ते अधिक पारदर्शी बनवणे, शासनाकडून लोकांना मिळणारा प्रतिसाद वाढवणे

October 6, 2015 07:52 am

देशातील प्रशासनात लोकांचा सहभाग वाढवणे, ते अधिक पारदर्शी बनवणे, शासनाकडून लोकांना मिळणारा प्रतिसाद वाढवणे व ते अधिक लोकाभिमुख करणे अशा उद्देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने १ जुलै रोजी देशात ‘डिजिटल इंडिया’ अभियानाची सुरुवात केली. दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडिअममधून त्याचे उद्घाटन झाले.
रिलायन्स इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी, टाटा समूहाचे अध्यक्ष सायरस मिस्त्री, विप्रोचे अध्यक्ष अझिम प्रेमजी यांच्यासह अन्य अनेक उद्योगपतींनीही डिजिटल क्रांतीचे फायदे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याविषयी आपली मते मांडली.
अभियानाबाबत जनजागृती करण्यासाठी देशाच्या ३६ राज्यांत आणि ६०० जिल्ह्य़ांत विविध कार्यक्रम घेण्यात आले. याबाबत मोदी यांनी केलेल्या भाषणाचे सर्व आयटी कंपन्यांमध्ये प्रक्षेपण करण्यात आले. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सर्व महाविद्यालये व उच्चशिक्षण संस्थांना ‘डिजिटल इंडिया सप्ताह’ साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
डिजिटल इंडिया मोहीम काय आहे?
* या अभियानामार्फत सरकारचा देशाला एक माहिती तंत्रज्ञानावर आधारित सशक्त अर्थसत्ता बनवण्याचा प्रयास आहे.
* यामध्ये डिजिटल लॉकर, ई-एज्युकेशन, ई-हेल्द, ई-साईन आणि नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल यांसारख्या १ लाख कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या योजना आहेत.
* ११ राज्यांत भारतनेट आणि नेक्स्ट जनरेशन नेटवर्क योजना राबवणार.
* नागरिकांना सरकारी सुविधांचा आणि योजनांचा लाभ घेता यावा यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर.
* माहिती तंत्रज्ञान व संवाद खाते यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार.
डिजिटल इंडियासाठी खास अॅप्सचा वापर..
* डिजिटल इंडिया पोर्टल.
* मायगोव्ह मोबाइल अॅप.. डिस्कस, डू आणि डिसेमिनेट या तत्त्वांवर आधारित नागरी सुविधा मोबाइल अॅपच्या माध्यमातून पुरवणे.
* स्वच्छ भारत मिशन अॅप.. स्वच्छ भारत अभियानाच्या यशस्वी पूर्तीसाठी लोकांनी व शासनाने या अॅपचा वापर करणे अपेक्षित आहे.
* आधार क्रमांक मोबाइल अपडेट अॅप.
डिजिटल इंडियाची उद्दिष्टे..
* प्रत्येक नागरिकासाठी डिजिटल सोयी-सुविधा.
* मागणीप्रमाणे प्रशासन आणि सुविधांचा पुरवठा.
* नागरिकांचे डिजिटल सबलीकरण.
डिजिटल इंडियाचे आधारस्तंभ..
* ब्रॉडबॅण्ड महामार्ग.
* दूरध्वनींची सार्वत्रिक उपलब्धता.
* नागरी इंटरनेट उपलब्धता कार्यक्रम.
* ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून प्रशासनाचा चेहरामोहरा बदलणे.
* ई-क्रांती – सेवांचा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पुरवठा.
* सर्वासाठी माहिती हे तत्त्व.
* इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनात देशाला संपूर्ण स्वावलंबी बनवणे. शून्य टक्के इलेक्ट्रॉनिक आयात.
* माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अधिकाधिक रोजगारनिर्मिती.
डिजिटल इंडियाचा २०१९ पर्यंत प्रस्तावित परिणाम..
* सर्वाना दूरध्वनी सुविधा, २.५ लाख गावांमध्ये ब्रॉडबॅण्ड सुविधा.
* २०२० पर्यंत शून्य टक्के इलेक्ट्रॉनिक आयात.
* ४,००,००० सार्वजनिक इंटरनेट केंद्रे.
* २.५ लाख शाळांमध्ये वाय-फाय सुविधा, नागरिकांसाठी वाय-फाय हॉटस्पॉट्स.
* माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार व इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात नोकऱ्या मिळवण्यासाठी १.७ कोटी मनुष्यबळाचे प्रशिक्षण.
* या क्षेत्रात १.७ कोटी थेट, तर ८.५ कोटी अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती.
* आरोग्य, शिक्षण, बँकिंग या क्षेत्रांत देशाला माहिती तंत्रज्ञानाच्या वापराबाबत आघाडी प्राप्त करून देणे.
डिजिटल लॉकर योजनेचे फायदे..
* या योजनेंतर्गत नागरिकांना त्यांची पॅनकार्ड, पासपोर्ट, गुणपत्रिका, प्रमाणपत्रे आदी डिजिटल कागदपत्रे सुरक्षितरीत्या साठवण्यास मदत होईल.
* त्यामुळे कागदाचा वापर कमी होऊन महत्त्वाचे दस्तावेज डिजिटल स्वरूपात उपलब्ध होतील आणि नागरिकांची सोय होईल. विविध सरकारी खात्यांना त्यांचा सामायिक वापर करणे शक्य होईल.
* नागरिकांचा वेळ, जागा आणि कष्टांची बचत.
* या योजनेचा फायदा घेण्यासाठी नागरिकांना आधार कार्ड आणि त्याला संलग्न असलेल्या मोबाइल फोन नंबरची आवश्यकता.
नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क काय आहे?
* या कार्यक्रमांतर्गत ३ वर्षांत २५० ग्रामपंचायतींना ७ लाख किलोमीटरच्या ऑप्टिकल फायबर नेटवर्कने जोडणे.
* नागरी वापरासाठी वाय-फाय केंद्रे व सर्व गावांसाठी इंटरनेट जोडणी.
* केंद्रीय संवाद आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांच्या मते महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, हरयाणा, छत्तीसगड आदी दहा राज्ये नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क कार्यक्रम सुरू करण्यास सज्ज आहेत.
– प्रतिनिधी
First Published on October 6, 2015 7:52 am
Web Title: what is digital india
टॅग: Digital India Meaning,Digital-india डिजिटल इंडिया म्हणजे काय? देशातील प्रशासनात लोकांचा सहभाग वाढवणे, ते अधिक पारदर्शी बनवणे, शासनाकडून लोकांना मिळणारा प्रतिसाद वाढवणे October 6, 2015 07:52 am 6 [डिजिटल इंडिया म्हणजे काय?] देशातील प्रशासनात लोकांचा सहभाग वाढवणे, ते अधिक पारदर्शी बनवणे, शासनाकडून लोकांना मिळणारा प्रतिसाद वाढवणे व ते अधिक लोकाभिमुख करणे अशा उद्देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने १ जुलै रोजी देशात ‘डिजिटल इंडिया’ अभियानाची सुरुवात केली. दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडिअममधून त्याचे उद्घाटन झाले. रिलायन्स इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी, टाटा समूहाचे अध्यक्ष सायरस मिस्त्री, विप्रोचे अध्यक्ष अझिम प्रेमजी यांच्यासह अन्य अनेक उद्योगपतींनीही डिजिटल क्रांतीचे फायदे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याविषयी आपली मते मांडली. अभियानाबाबत जनजागृती करण्यासाठी देशाच्या ३६ राज्यांत आणि ६०० जिल्ह्य़ांत विविध कार्यक्रम घेण्यात आले. याबाबत मोदी यांनी केलेल्या भाषणाचे सर्व आयटी कंपन्यांमध्ये प्रक्षेपण करण्यात आले. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सर्व महाविद्यालये व उच्चशिक्षण संस्थांना ‘डिजिटल इंडिया सप्ताह’ साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. डिजिटल इंडिया मोहीम काय आहे? * या अभियानामार्फत सरकारचा देशाला एक माहिती तंत्रज्ञानावर आधारित सशक्त अर्थसत्ता बनवण्याचा प्रयास आहे. * यामध्ये डिजिटल लॉकर, ई-एज्युकेशन, ई-हेल्द, ई-साईन आणि नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल यांसारख्या १ लाख कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या योजना आहेत. * ११ राज्यांत भारतनेट आणि नेक्स्ट जनरेशन नेटवर्क योजना राबवणार. * नागरिकांना सरकारी सुविधांचा आणि योजनांचा लाभ घेता यावा यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर. * माहिती तंत्रज्ञान व संवाद खाते यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार. डिजिटल इंडियासाठी खास अॅप्सचा वापर.. * डिजिटल इंडिया पोर्टल. * मायगोव्ह मोबाइल अॅप.. डिस्कस, डू आणि डिसेमिनेट या तत्त्वांवर आधारित नागरी सुविधा मोबाइल अॅपच्या माध्यमातून पुरवणे. * स्वच्छ भारत मिशन अॅप.. स्वच्छ भारत अभियानाच्या यशस्वी पूर्तीसाठी लोकांनी व शासनाने या अॅपचा वापर करणे अपेक्षित आहे. * आधार क्रमांक मोबाइल अपडेट अॅप. डिजिटल इंडियाची उद्दिष्टे.. * प्रत्येक नागरिकासाठी डिजिटल सोयी-सुविधा. * मागणीप्रमाणे प्रशासन आणि सुविधांचा पुरवठा. * नागरिकांचे डिजिटल सबलीकरण. डिजिटल इंडियाचे आधारस्तंभ.. * ब्रॉडबॅण्ड महामार्ग. * दूरध्वनींची सार्वत्रिक उपलब्धता. * नागरी इंटरनेट उपलब्धता कार्यक्रम. * ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून प्रशासनाचा चेहरामोहरा बदलणे. * ई-क्रांती – सेवांचा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पुरवठा. * सर्वासाठी माहिती हे तत्त्व. * इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनात देशाला संपूर्ण स्वावलंबी बनवणे. शून्य टक्के इलेक्ट्रॉनिक आयात. * माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अधिकाधिक रोजगारनिर्मिती. डिजिटल इंडियाचा २०१९ पर्यंत प्रस्तावित परिणाम.. * सर्वाना दूरध्वनी सुविधा, २.५ लाख गावांमध्ये ब्रॉडबॅण्ड सुविधा. * २०२० पर्यंत शून्य टक्के इलेक्ट्रॉनिक आयात. * ४,००,००० सार्वजनिक इंटरनेट केंद्रे. * २.५ लाख शाळांमध्ये वाय-फाय सुविधा, नागरिकांसाठी वाय-फाय हॉटस्पॉट्स. * माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार व इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात नोकऱ्या मिळवण्यासाठी १.७ कोटी मनुष्यबळाचे प्रशिक्षण. * या क्षेत्रात १.७ कोटी थेट, तर ८.५ कोटी अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती. * आरोग्य, शिक्षण, बँकिंग या क्षेत्रांत देशाला माहिती तंत्रज्ञानाच्या वापराबाबत आघाडी प्राप्त करून देणे. डिजिटल लॉकर योजनेचे फायदे.. * या योजनेंतर्गत नागरिकांना त्यांची पॅनकार्ड, पासपोर्ट, गुणपत्रिका, प्रमाणपत्रे आदी डिजिटल कागदपत्रे सुरक्षितरीत्या साठवण्यास मदत होईल. * त्यामुळे कागदाचा वापर कमी होऊन महत्त्वाचे दस्तावेज डिजिटल स्वरूपात उपलब्ध होतील आणि नागरिकांची सोय होईल. विविध सरकारी खात्यांना त्यांचा सामायिक वापर करणे शक्य होईल. * नागरिकांचा वेळ, जागा आणि कष्टांची बचत. * या योजनेचा फायदा घेण्यासाठी नागरिकांना आधार कार्ड आणि त्याला संलग्न असलेल्या मोबाइल फोन नंबरची आवश्यकता. नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क काय आहे? * या कार्यक्रमांतर्गत ३ वर्षांत २५० ग्रामपंचायतींना ७ लाख किलोमीटरच्या ऑप्टिकल फायबर नेटवर्कने जोडणे. * नागरी वापरासाठी वाय-फाय केंद्रे व सर्व गावांसाठी इंटरनेट जोडणी. * केंद्रीय संवाद आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांच्या मते महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, हरयाणा, छत्तीसगड आदी दहा राज्ये नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क कार्यक्रम सुरू करण्यास सज्ज आहेत. – प्रतिनिधी First Published on October 6, 2015 7:52 am Web Title: what is digital india टॅग: Digital India Meaning,Digital-india

दहाव्या खिडकीतील नवे ऑफिस विंडोजने दहावी आवृत्ती काढली आणि त्या अनुषंगाने आता अत्याधुनिक सॉफ्टवेअर्सही बाजारात येण्यास सुरुवात झाली

दहाव्या खिडकीतील नवे ऑफिस

विंडोजने दहावी आवृत्ती काढली आणि त्या अनुषंगाने आता अत्याधुनिक सॉफ्टवेअर्सही बाजारात येण्यास सुरुवात झाली

September 29, 2015 06:33 am
विंडोजने दहावी आवृत्ती काढली आणि त्या अनुषंगाने आता अत्याधुनिक सॉफ्टवेअर्सही बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. याची सुरुवात मायक्रोसॉफ्टनेच केली असून त्यांनी नुकतेच ऑफिस २०१६ बाजारात आणले आहे.
पाहू या काय आहे ऑफिस २०१६ मध्ये.
डेस्कटॉपचा वापर आणि त्याची मागणी जगभरात तब्बल ४० टक्क्यांनी कमी झाल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. याचा विचार करीत कंपन्याही आता छोटय़ा उपकरणांवर वापरता येईल अशा अ‍ॅप्सची निर्मिती करू लागल्या. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ऑफिस २०१६ म्हणता येईल. मायक्रोसॉफ्ट ऑफिसला खुल्या बाजारात अनेक पर्याय उभे ठाकले तरी या सॉफ्टवेअरच्या वापरकर्त्यांमध्ये तसा फरक पडलेला नाही. यामुळे पूर्वी एवढीच लोकप्रियता या सॉफ्टवेअरला आजही मिळते आहे. एका सर्वेक्षणानुसार तब्बल एक अब्जाहून अधिक लोक मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा वापर करतात. २०१५च्या पहिल्या तीन महिन्यांत आयफोन, आयपॅड आणि अ‍ॅण्ड्रॉइड टॅबलेटमध्ये तब्बल १५ कोटी लोकांनी ऑफिस डाऊनलोड केले. हे म्हणजे वापरकर्ते संगणकावरून छोटय़ा उपकरणांकडे वळत असल्याचे उत्तम उदाहरण आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून मायक्रोसॉफ्टने कंपन्यांच्या ‘मोबाइल फस्ट’ या धोरणाची चूणक दाखवून दिली.
ऑफिस २०१६
मायक्रोसॉफ्टने बाजारात आणलेल्या ऑफिस २०१६ या अ‍ॅपच्या माध्यमातून ‘मोबाइल फस्ट’, क्लाऊड फस्ट या तंत्रावर आधारित आहे. यामुळे हे अ‍ॅप समूह कामासाठी उपयुक्त ठरले असून वापरकर्त्यांला कुठूनही कोणत्याही वेळी काम करणे शक्य होते. विंडोज १० या मायक्रोसॉफ्टच्या ऑपरेटिंग प्रणालीच्या आवृत्तीमध्ये अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकते. हे अ‍ॅप तुमच्यासाठी काम करणार असून ते आत्तापर्यंतचे सर्वात सुरक्षित ऑफिस अ‍ॅप असेल असा दावा कंपनीने केला आहे. या अ‍ॅपमध्ये ‘एसवे’ नावाची एक अतिरिक्त सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये आपल्याला शेअर करता येतील अशा अनेक चर्चात्मक कथा विकसित करता येणार आहेत.
समूह कामकाज
ऑफिस २०१६ हे अ‍ॅप मोबाइल आणि क्लाऊड तंत्रज्ञानाशी जोडलेले असल्यामुळे त्यामध्ये समूह काम करणे सोपे होते. यात तशा सुविधाही दिल्या आहेत.
सह मालकी – एखादी फाइल आपण तयार केली आणि त्यामध्ये आपल्या सहकाऱ्याला किंवा इतर कुणालाही माहिती द्यावयाची आहे अशा वेळी आपण एकाच फाइलला सहमालकी देऊन हे काम करू शकतो. ही सुविधा रिअल टाइम तंत्रज्ञानावर आधारित असल्यामुळे एखादी व्यक्ती ती फाइल दुरुस्त करीत असेल तेव्हाच दुसरी व्यक्ती ती पाहू शकते. ही सुविधा वर्ड, पॉवरपॉइंट, वन नोटला देण्यात आली आहे.
स्काइपचा सहभाग – या अ‍ॅपमध्ये स्काइपची मदत घेण्यात आली आहे. ग्राहक प्रतिनिधीला एखाद्या ग्राहकापर्यंत पोहोचायचे असेल तर ऑफिस ऑनलाइनचा वापर करून त्यामध्ये देण्यात आलेल्या इन्स्टंट मेसेंजिंग, स्क्रीन शेअर, टॉक किंवा व्हिडीओ चॅटच्या माध्यमातूनही डॉक्युमेंट्स शेअर करता येऊ शकतात.
* यामध्ये देण्यात आलेल्या क्विक सर्चमुळे आऊटलूक २०१६ मधील इनबॉक्स अत्याधुनिक झाला आहे. यामध्ये आधुनिक आणि क्लाऊड आधारित अ‍ॅटचमेंट करण्याची सुविधाही देण्यात आली आहे.
* आऊटलूक २०१६ क्लायंट अ‍ॅपमध्ये ऑफिस ३६५ ग्रुप्स देण्यात आले आहे.
* यामध्ये ऑफिस ३६५ प्लॅनरमध्ये तुम्ही तुमची कामे नोंदवून ठेवू शकता.
कोठेही अ‍ॅप
* ऑफिसचे अ‍ॅप बाजारात दाखल झाल्यामुळे आता आपले कार्यालय आपण सोबत घेऊन फिरू शकतो. हे अ‍ॅप विंडोज, अ‍ॅण्ड्रॉइड आणि आयओएस या सर्वाधिक वापरांच्या मोबाइल ऑपरेटिंगप्रणालीवर उपलब्ध आहेत. तसेच हे अ‍ॅप आपण एकाच वेळी विविध उपकरणांवर इन्स्टॉल करून त्याचा वापर करू शकणार आहोत.
* विंडोज १० वर ऑफिस मोबाइल अ‍ॅप अधिक चांगल्या पद्धतीने काम करीत असून या अ‍ॅपमुळे आपण मोबाइलचे रूपांतर संगणकात करू शकतो.
कोट
सध्या आपण माहितीच्या महाजालात जगतोय. यामध्ये विविध उपकरणांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळे मायक्रोसॉफ्टने त्यांच्या उत्पादनांची पुनर्निर्मिती करून ‘मोबाइल फस्ट’ आणि ‘क्लाऊड फस्ट’ या धोरणाचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. ऑफिस २०१६ हे याचे उत्तम उदाहरण असून या अ‍ॅपच्या माध्यमातून आम्ही वापरकर्त्यांला त्याची माहिती सोप्या मार्गाने उपलब्ध करून देऊन त्याचे काम सोपे केले.
करण बजवा, व्यवस्थापकीय संचालक, मायक्रोसॉफ्ट इंडिया
वैशिष्टय़े
ऑफिस २०१६ आपल्याला आपले काम अधिक जलद आणि चांगल्या प्रकारे करता येते. यामध्ये देण्यात आलेल्या अंतर्गत बुद्धिमत्ता सुविधेमुळे आपली अनेक कामे अधिक सोपी होणार आहेत. पाहू या काय सुविधा देण्यात आल्या आहेत.
* टेल मी – यामध्ये देण्यात आलेल्या या सुविधेमध्ये आपल्याला काम करताना कोणत्याही प्रकारची अडचण आली तर ती दूर होऊ शकते. आपण आपली अडचण काय आहे यावर जर क्लिक केले तर आपल्या डॉक्युमेंटच्या उजव्या बाजूला त्यावरचे उत्तर आपल्याला मिळते.
* एक्सेल २०१६ – यामध्ये आता अत्याधुनिक तक्ता प्रकार आणि पॉवर बीआयसाठी अंतर्गत सुविधा देण्यात आली आहे. याचा फायदा आपल्याला कोणतीही माहिती टाइप करताना होतो. तसेच माहितीच्या संकलनासाठीही होतो.
* आपण नुकतेच वापरलेल्या फाइल्सची नावे आणि त्याची लिंक आपल्याला यामध्ये उपलब्ध करून देण्यात येते. ही सुविधा आपण अ‍ॅप कोणत्याही उपकरणावर वापरत असलो तरी उपलब्ध होणार आहे. म्हणजे आपण एखादी फाइल टॅबवर सुरू केली आणि थोडय़ा वेळाने आपण डेस्कटॉपच्या अ‍ॅपवर जेव्ही ती फाइल पाहू तेव्हा ती आपल्याला नुकत्याच वापरलेल्या फाइल्सच्या यादीत दिसते. हे अ‍ॅप आपण ऑफलाइन किंवा ऑनलाइन वापरत असलो तरी ते आपण जोडलेल्या उपकरणांशी सिंक होत असते.
* ऑफिसमधील वर्ड, पॉवर पॉइंट, एक्सेल आणि आऊटलूकसारख्या सुविधांमधील माहिती आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाची असते. ही माहिती काही कारणांमुळे डिलिट झाली किंवा बाहेरच्या व्यक्तीला शेअर करण्याचा प्रयत्न झाला तर आपले किंवा कंपन्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. पण आता हे सोपे हाणार आहे. कारण ऑफिसच्या या नव्या आवृत्तीमध्ये माहितीला संरक्षण पुरविण्यात आले आहे. आयटी प्रशासकाला याचे हक्क देण्यात आले असून कार्यालयातून माहिती शेअर करण्याच्या धोरणांचा वापर करून तो यावर नियमन आणू शकतो.
– नीरज पंडित
niraj.pandit@expressindia.com
First Published on September 29, 2015 6:33 am
Web Title: microsoft office 2016

ऑफिस’चे ऑनलाइन प्रशिक्षण विण्डोज आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिस आज आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाल्या आहेत.

ऑफिस’चे ऑनलाइन प्रशिक्षण

विण्डोज आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिस आज आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाल्या आहेत.

October 6, 2015 07:51 am

विण्डोज आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिस आज आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाल्या आहेत. पूर्वी आपल्याला केवळ वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट, आऊटलुक आणि अॅक्सेस हीच ऑफिस अॅप्लिकेशन माहीत होती. परंतु आता जसजशी नवी वर्जन्स येत आहेत तशी ही अॅप्लिकेशन नव्या वैशिष्टय़ांनी समृद्ध होत आहेत. तसेच मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये वन नोट, वन ड्राइव्ह, पब्लिशरसारखी नवी अॅप्लिकेशन्सदेखील आलेली आहेत.
या साइटवर ऑफिसच्या या सर्व अॅप्लिकेशन्सचे ऑनलाइन ट्रेिनग उपलब्ध आहे. वर्ड, एक्सेल, पॉवरपॉइंट, आऊटलुक आणि अॅक्सेस यांची २००७, २०१० आणि २०१३ या वर्जन्सची टय़ुटोरियल्स उपलब्ध आहेत. २०१० आणि २०१३ या वर्जन्सची व्हिडीओ टय़ुटोरियल्स उपलब्ध आहेत. प्रत्येक व्हिडीओ अंदाजे दोन ते पाच मिनिटांचा आहे.
एक्सेलमधे वर्कबुक तयार करणे, रो आणि कॉलम्स समाविष्ट करणे, काढून टाकणे या प्राथमिक गोष्टींबरोबरच बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकाराची सूत्रे वापरून उत्तर कसे काढायचे, दोन तारखांमधील दिवस काढणे इत्यादी शिकवणारी टय़ुटोरियल्स आहेत. त्याचबरोबर एक्सेलमधला डेटा शेअर पॉइंटवर एक्स्पोर्ट वापरून तो इतरांना कसा शेअर करायचा या विषयांवरील पाठ येथे बघता येतील. या आणि इतर अॅप्लिकेशन्सचा उपयोग कसा करायचा हे येथे समजून घेता येईल.
ही सर्व अॅप्लिकेशन्स विण्डोज या ऑपरेटिंग सिस्टीमव्यतिरिक्त मॅक ऑपरेटिंग सिस्टीम, अॅण्ड्रॉइड, आय-पॅड आणि विण्डोज फोनवरदेखील कशी वापरायची याचे टय़ुटोरियल व गाइड येथे मिळेल. या अॅप्लिकेशन्समधे असंख्य फीचर्स आहेत. परंतु प्रत्येक फीचर टय़ुटोरियलच्या माध्यमातून समजावून सांगणे कठीणच आहे. ती समजून घेण्यासाठी स्वत: वापरून बघणे हाच एक सोपा उपाय असू शकतो. परंतु ऑफिस ट्रेिनग सेंटरमध्ये उपलब्ध असलेल्या या टय़ुटोरियल्समुळे ही अॅप्लिकेशन्स किती आणि कशी उपयोगी ठरू शकतात हे जाणून घेण्यास नक्कीच मदत होईल.
ऑफिस ३६५ ही २०११ पासून लोकांना उपलब्ध करून दिलेली सेवा आहे. ही सेवा तुम्हाला तुमच्या वापरानुसार मासिक किंवा वार्षकि भाडे देऊन वापरता येते. यामधून तुम्हाला वैयक्तिकरीत्या किंवा बिझनेससाठी ऑफिस पॅकेजमधील हव्या त्या सेवा इंटरनेटवर उपलब्ध होऊ शकतात. म्हणजेच ही सॉफ्टवेअर्स तुम्ही कॉम्प्युटरवर लोड न करता थेट इंटरनेटवरून वापरायची असतात. तुमचा तयार झालेला डेटासुद्धा इंटरनेटवर साठवला जातो. तो कोणत्याही ठिकाणाहून अॅक्सेस करून वापरता येतो. हे छोटय़ा कंपन्यांच्या दृष्टीने उपयोगाचे असते, कारण त्यांना कॉम्प्युटर्स व त्यातील सॉफ्टवेअर्स विकत घ्यावी लागत नाहीत. ऑफिस ३६५ कसे वापरावे याची माहिती व ट्रेिनग या साइटवर मिळेल.
जगात सर्वात जास्त वापरले जाणारे हे सॉफ्टवेअर प्रत्यक्ष मायक्रोसॉफ्टच्या निर्मात्यांकडून विनामूल्य शिकणे तुम्हाला आता सहज शक्य आहे.
– मनाली रानडे
manaliranade84@gmail.com

First Published on October 6, 2015 7:51 am
Web Title: microsoft office online classes

रामपूरचे ‘रझा ग्रंथालय’ रामपूर संस्थानाचा पहिला नवाब फैजुलखान याची कारकीर्द २० वर्षांची झाली.

रामपूरचे ‘रझा ग्रंथालय’

रामपूर संस्थानाचा पहिला नवाब फैजुलखान याची कारकीर्द २० वर्षांची झाली.

सुनीत पोतनीस | October 23, 2015 01:58 am

रामपूर संस्थानाचा पहिला नवाब फैजुलखान याची कारकीर्द २० वर्षांची झाली. विद्वान, पंडितांचा आश्रयदाता फैजुलखान स्वत: अरेबिक, पíशयन, टर्की आणि उर्दू भाषांचा जाणकार होता. या भाषांमधील दुर्मीळ हस्तलिखितांचा संग्रह करण्याचा त्याचा छंद होता. त्याच्या पुढच्या नवाबांनीही हा छंद जोपासला. नवाब मोहम्मद सईद खान (१८४०-१८५५) याने या सर्व हस्तलिखितांची नीट जोपासना करण्यासाठी त्या त्या भाषांचे विद्वान नेमून ‘रामपूर रझा किताबखाना’ या ग्रंथालयाची स्थापना केली. नवाब अहमद अलीखान आणि नवाब युसूफ अलीखान हे तर स्वत: उत्तम उर्दू कवी, चित्रकार आणि संगीतकार होते. ते प्रख्यात कवी मिर्जा गमलिबम् याच्या मार्गदर्शनाखाली काव्य तयार करीत. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरानंतर ठिकठिकाणच्या कवी, लेखक, संगीतकारांनी रामपूरमध्ये आश्रय घेतला. नवाब युसूफ अलीखानच्या काळात तर संस्कृत, िहदी, दाक्षिणात्य भाषा यांची हस्तलिखिते आणि पुस्तकांचाही संग्रह वाढला. नवाब काल्ब अलीखानाने तज्ज्ञ चित्रकार, संगीतकारांना नेमून त्यांच्या देखरेखीखाली दुर्मीळ चित्रे, शिल्पे, संगीताची वाद्य्ो यांचाही संग्रह करून निराळे दालन सुरू केले. हजची यात्रा करून सातव्या शतकातील कुराणाची हस्तलिखित प्रत त्याने रझा ग्रंथालयात ठेवली. १९०४ साली नवाब हमीद अलीखान याने ‘हमीद मंजील’ ही भव्य इमारत बांधून तेथे हे ग्रंथालय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली सुरू केले. १९७५ साली भारत सरकारने प्रो. नुरूल हसन यांच्या देखरेखीखाली सांस्कृतिक विभागाकडे रझा ग्रंथालयाचे व्यवस्थापन सोपविले. सध्या या ग्रंथालयात २४ हजार हस्तलिखिते, ३० हजारांहून अधिक पुरातन दुर्मीळ ग्रंथ आणि ऐतिहासिक दस्तावेज आणि अगणित कलावस्तू जतन केलेल्या आहेत. रझा ग्रंथालय हे जगातील दुर्मीळ साहित्याचा संग्रह असलेल्या ग्रंथालयांमध्ये गणले जाते.
 सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

आधुनिक भारताचा इतिहास मागील लेखामध्ये आधुनिक भारताच्या १७५७ ते १८८५ या कालखंडाच्या मुख्य धाग्याचा आढावा आपण घेतला.

आधुनिक भारताचा इतिहास

मागील लेखामध्ये आधुनिक भारताच्या १७५७ ते १८८५ या कालखंडाच्या मुख्य धाग्याचा आढावा आपण घेतला.

पंकज व्हट्टे | October 18, 2015 13:11 pm

मागील लेखामध्ये आधुनिक भारताच्या १७५७ ते १८८५ या कालखंडाच्या मुख्य धाग्याचा आढावा आपण घेतला. ब्रिटिश वसाहतवादी सत्तेचा भारतीय उपखंडातील उदय व विस्तार, वसाहतवादास मिळालेली प्रतिक्रिया (१८५७ चा उठाव) व भारतीय राष्ट्रवादाचा उदय यांचा त्यात अंतर्भाव होता. आजच्या लेखात आपण भारतीय राष्ट्रीय चळवळ या मुख्य व इतर अनेक धाग्यांचा आढावा घेऊ.
भारतीय राष्ट्रीय चळवळ एका उत्क्रांतीची अभिव्यक्ती दर्शवते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (१८८५) च्या स्थापनेनंतर खऱ्या अर्थाने या चळवळीला सुरुवात होते. या चळवळीची तीन टप्प्यांमध्ये विभागणी केली जाते- मवाळ राजकारणाचा काळ (१८८५-१९०५); जहाल राजकारण्यांचा काळ (१९०५-१९२०); गांधी युग (१९२०-१९४७).
१८५७ चा उठाव दडपला गेल्यानंतर भारतीय समाज निपचित पडला होता. या निद्रिस्त समाजाला जागे करण्याचे काम दादाभाई नौरोजी, गोपाळ कृष्ण गोखले, व्योमेशचंद्र बॅनर्जी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दिनशॉ वाच्छा, न्यायमूर्ती रानडे यांच्यासारख्या भारतीयांनी केले. त्यांनी राष्ट्रीय संघटनेच्या राजकारणाला निश्चित दिशा दिली. या संपूर्ण नेतृत्वाचा विश्वास उदारमतवाद, सांविधानिक मार्ग व क्रांतीपेक्षा उत्क्रांतीतून बदल या तत्त्वांवर होता. म्हणूनच मवाळांनी राजकीय सुधारणांसाठी अर्ज, विनंत्यांचा मार्ग अवलंबला. आíथक निस्सारणाचा सिद्धांत मवाळांचे सर्वात मोठे योगदान ठरते. मवाळांनी भारताच्या वसाहतवादी आíथक शोषणावर प्रकाश टाकून जी जनजागृती घडवून आणली ती राष्ट्रीय चळवळीच्या पुढील टप्प्याची आवश्यक पाश्र्वभूमी ठरते. तद्वतच, या सिद्धांताच्या माध्यमातून मवाळांनी भारताच्या आíथक राष्ट्रवादाचा भक्कम पाया घातला यात शंका नाही.
२०१४ च्या मुख्य परीक्षेमधील ब्रिटिश आíथक धोरणाच्या विविध अंगांच्या विश्लेषणाची अपेक्षा ठेवणारा प्रश्न याच आíथक शोषणाच्या व आíथक राष्ट्रवादाच्या आकलनाची अपेक्षा ठेवतो. या प्रश्नामध्ये ब्रिटिश कालखंडामधील समग्र आíथक धोरण, त्या धोरणाची उत्क्रांती यांचे विश्लेषण केंद्रस्थानी आहे.
लॉर्ड कर्झनने १९०५ साली केलेल्या बंगालच्या फाळणीतून मवाळ राजकारणाच्या मर्यादा तर स्पष्ट केल्याच, पण त्याही पुढे जाऊन ब्रिटिश सत्ता भारताच्या हितासाठी असल्याच्या मवाळांच्या मूलभूत विश्वासाला तडा गेला. म्हणूनच बंगालच्या फाळणीनंतर राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व जहालांच्या हाती येते. अर्थात, १९१५ पर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या संघटनेवर मवाळांचेच वर्चस्व होते. जहालांनी काँग्रेसबाहेर राहून राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व केले. राष्ट्रीय चळवळीच्या या दुसऱ्या टप्प्याचा उद्देश ‘स्वराज’ हा होता व चळवळीच्या पद्धती स्वयंभू होत्या. मवाळांच्या पद्धती ब्रिटिश शासनाच्या प्रतिसादावर अवलंबून होत्या. जहालांनी परकीय मालावर बहिष्कार, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व असहकार या चतु:सूत्रीवर आधारित चळवळींचा मार्ग अवलंबून शासनावर दबाव निर्माण केला. लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपीन चंद्र पाल, अरिबदो घोष यांनी या टप्प्यातील चळवळीचे नेतृत्व केले.
लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर एका युगाचा अस्त होतो. तद्वतच, एका दुसऱ्या युगाची सुरुवात महात्मा गांधींच्या राष्ट्रीय चळवळीतील सहभागाने होते. गांधीयुगामध्ये ‘अिहसक पद्धतीने केलेल्या असहकारातून स्वराज्य’ हा राष्ट्रीय चळवळीचा उद्देश होता. सत्याग्रह, अन्यायाचा उघड व सक्रिय प्रतिकार, अिहसक असहकार, भारतीय समाजाचा सर्वागीण विकास यांतून गांधींनी राष्ट्रीय चळवळीला वेगळी दिशा दिली व तिला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त करून दिले.
भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या तीन टप्प्यांमधील घटनांचा सखोल अभ्यास आवश्यक ठरतो. मवाळांनी घडवून आणलेल्या राजकीय सुधारणा, वंगभंग चळवळ, होमरूल चळवळ, असहकार चळवळ, स्वराज पार्टी, नेहरू रिपोर्ट, सविनय कायदेभंगाची चळवळ, ‘चलेजाव’ चळवळ, गोलमेज परिषद यांसारख्या घटकांचा यात अंतर्भाव होतो. याव्यतिरिक्त भारतीय राष्ट्रीय चळवळीतील क्रांतिकारकांचे योगदान महत्त्वाचे ठरते. पहिल्या टप्प्यांमध्ये भूमिगत संघटनांच्या माध्यमातून देशाच्या विविध भागांत युरोपियन अधिकाऱ्यांच्या हत्या, बँका, रेल्वे यांची लूट यातून क्रांतिकारकांनी ब्रिटिश सरकारला हादरवण्याचा प्रयत्न केला. या टप्प्यामध्ये क्रांतिकारी चळवळीमध्ये राष्ट्रीय स्तरावरील समन्वयाचा अभाव दिसून येतो. दुसऱ्या टप्प्यामध्ये ऌरफअ च्या माध्यमातून हा समन्वय साधण्याचा प्रयत्न क्रांतिकारकांनी केला. परंतु भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांची फाशी व महत्त्वाच्या क्रांतिकारकांची धरपकड यामुळे ही चळवळ थंडावते. क्रांतिकारी चळवळीचा तिसरा टप्पा आहे तो सुभाषचंद्र बोस व आझाद िहद फौजेचा. जर्मनी, जपानची मदत घेऊन ब्रिटिश भारतावर बाहेरून आक्रमण करायचे व भारताला स्वतंत्र करायचे अशी योजना होती. सुभाषचंद्रांचे अपघाती निधन, जपानची दुसऱ्या जागतिक महायुद्धातील पीछेहाट यातून ही योजना फसली. मातृभूमीसाठी सर्वस्वाचा त्याग करून हौतात्म्य पत्करणाऱ्या क्रांतिकारकांचे राष्ट्रीय चळवळीला मोठे योगदान होते, यात शंका नाही.
१९४० ते १९४७ या काळातील ऑगस्ट प्रस्ताव, क्रिप्स योजना, ‘चले जाव’ चळवळ, नौसेनेचा उठाव, शिमला परिषद, त्रिमंत्री योजना, घटना समितीसाठीच्या निवडणुका, माऊंटबॅटन योजना यांचा अभ्यास आवश्यक आहे. २०१४ च्या मुख्य परीक्षेतील नौसेनेच्या उठावावरील प्रश्न वैशिष्टय़पूर्ण ठरतो.- “In what ways did the naval mutiny prove to be the last nail in the coffin of British Colonial aspirations in India”?
आधुनिक इतिहासाच्या या मुख्य धाग्याव्यतिरिक्त शेतकऱ्यांचे उठाव/चळवळी, कामगारांच्या चळवळी, सामाजिक-धार्मिक सुधारणा, अस्पृश्यताविरोधी चळवळी, जमातीय संघटना, कंपनीचा भारतीय संस्थानिकांविरुद्धचा राजकीय संघर्ष व त्यांचे बदलते संबंध, शिक्षण व प्रसारमाध्यमांच्या विकासाचा इतिहास या धाग्यांचा सखोल अभ्यास महत्त्वाचा ठरतो. भारतातील ब्रिटिश सत्ता नेहमीच ब्रिटिश संसदेच्या कायद्यांनुसार राबवली गेली. रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट (१७७३),  पिट्स इंडिया अ‍ॅक्ट (१७८४), चार्टर अ‍ॅक्ट्स (१८१३, १८३३, १८५३), गव्हर्नमेन्ट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट्स (१८५८, १९१९, १९३५), इंडियन कौन्सिल अ‍ॅक्ट्स (१८६१, १८९२, १९०९) या कायद्यांद्वारे भारतातील शासनव्यवस्था उत्क्रांत झाली. या उत्क्रांतीचे ताíकक आकलन केल्यास पाठांतर करण्याची गरज भासत नाही. या कायद्यांचा सखोल अभ्यास अत्यंत आवश्यक आहे.
आधुनिक भारताच्या इतिहासावरील या दोन लेखांमध्ये या इतिहासाची एक ताíकक रूपरेखा समजावून घेण्याचा प्रयत्न आपण केला. याचा संदर्भ घेऊन तपशिलाचा संदर्भग्रंथांतून केलेला अभ्यास सोयीचा ठरेल. संदर्भग्रंथांच्या सखोल अभ्यासानंतर पुन्हा रूपरेखा वाचल्यास तिचा अधिक अर्थबोध होईल.