Sunday, February 5, 2017

पुढची पायरी : वार्षिक मूल्यमापनाची तयारी कार्यकौशल्य, कार्यतत्परता, परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आणि विश्वासार्हता.

पुढची पायरी : वार्षिक मूल्यमापनाची तयारी

कार्यकौशल्य, कार्यतत्परता, परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आणि विश्वासार्हता.

डॉ. जयंत पानसे | February 4, 2017 12:31 AM


फेब्रुवारी महिना लागला की सगळ्या कार्यालयांमध्ये वार्षिक मूल्यमापन नावाच्या एका अपरिहार्य सोहळ्याचे वेध लागतात. वर्षभराच्या वैयक्तिक व सांघिक कामगिरीनंतर कुणाला किती पगारवाढ मिळणार, कोण बढती घेणार, कुणाची बदली होणार तर कुणाचा पत्ता कट होणार, अशी ‘कुणकुण’ लागायला सुरुवात होते. दबक्या आवाजातल्या गप्पा आणि चर्चानी सर्वात जास्त घाबरून जातात ते नवे कर्मचारी. कारण बाकीचे जरी चर्चा करत असले तरी त्यांना थोडाफार अनुभव असतो. पण ज्यांची ही पहिलीच नोकरी असते त्यांच्यासाठी मात्र हा पहिलाच धडा असतो. या वार्षिक मूल्यमापनाला कसे सामोरे जायचे व आपला फायदा कसा करून घ्यायचा याची युक्ती सांगायचा प्रयत्न करतो. पण त्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची अगोदरच तयारी करायला हवी.
कुठल्याही कंपनीमध्ये पहिल्या वर्षांतील तुमच्या कामगिरीचे मूल्यमापन मुख्यत: चार घटकांवर केले जाते. कार्यकौशल्य, कार्यतत्परता, परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आणि विश्वासार्हता.
प्रत्येक कंपनीच्या प्रथेप्रमाणे मूल्यमापनाची पद्धत वेगवेगळी असू शकते; परंतु सामान्यत: तुमचे वरिष्ठ, त्यांचे वरिष्ठ आणि मनुष्यबळ विकास विभागाचा एक अधिकारी असा एक संच तुमचे मूल्यमापन करतो. बहुतेक कंपन्यांमध्ये या चार घटकांचा समावेश
केलेली मूल्यमापनाची एक प्रश्नावली तयार असते. बऱ्याच वेळेला ती प्रश्नावली तुम्हालाही दाखवली जाते.
आता या घटकांचा साकल्याने विचार करू –
कार्यकौशल्य :
ज्या शिक्षणकौशल्यामुळे तुम्हाला या पदावर घेतले आहे त्याचा तुम्ही तुमच्यावर सोपवलेल्या कामामध्ये किती प्रभावीपणे वापर करता याचे परीक्षण.
कार्यतत्परता :
यामध्ये तुमच्यावर सोपवलेल्या कामांमध्ये तुम्ही दाखवलेली कार्यक्षमता, प्रभावी गुणवत्ता, वेळेत अचूक काम करण्याची जाण इत्यादींचा समावेश होतो.
परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता :
काम करताना दरवेळीच अनुकूल परिस्थिती असेलच असे नाही. पण कुठल्याही सबबी न सांगता, आपल्या मर्यादांचे भान ठेवून, वेळ पडल्यास परिस्थितीला योग्य अशा व्यक्तीची मदत घेऊन काम यशस्वीरीत्या पूर्णत्वाला नेण्याची क्षमता.

विश्वासार्हता :
कुठल्याही कंपनीत भविष्यात बढतीची शिडी चढायची असेल तर अगदी कनिष्ठ कर्मचाऱ्यापासून ते सर्वात वरिष्ठ सहकाऱ्यांमध्ये तुमच्याबद्दल विश्वासार्हता निर्माण व्हायला हवी. त्यासाठी अत्यंत आवश्यक आहे ते म्हणजे अनाठायी अहंभावाचा त्याग. हा माणूस दुसऱ्याचे व कंपनीचे फक्त भलेच करेल असा विश्वास तुमच्या प्रत्येक सहकाऱ्याच्या मनात निर्माण व्हायला हवा.
आता मूल्यमापनाची तयारी कशी करायची ते बघू
प्राथमिक माहिती :
तुमच्या पदाच्या जबाबदाऱ्या, उद्दिष्टे काय आहेत व त्या तुम्ही किती प्रभावीपणे पार पाडल्या आहेत, तसेच तुमची शक्तिस्थळे व कमकुवत बाजूंचे पृथ:करण याचे लिखित विवरण तयार करा.
स्वत:च्या मूल्यमापनाची लिखित नोंद :
वर दिलेल्या चार घटकांना अनुसरून तुम्ही आता स्वत:चेच मूल्यमापन प्रामाणिकपणे करा. आत्तापर्यंतच्या काळात तुम्ही मिळवलेले यश, झालेल्या चुका, तुम्ही केलेल्या अवघड परिस्थितीवर मात आणि मिळवलेली सहकाऱ्यांची विश्वासार्हता, या सगळ्यांचा त्यात समावेश हवा.
भविष्यातील तुमची भूमिका :
वार्षिक मूल्यमापन करण्यामागे कंपनीला कर्मचाऱ्यांकडून अधिक चांगले काम कसे करून मिळेल व अधिक फायदा कसा होईल हाच एकमेव उद्देश असतो. कुणालाही नवनवीन कौशल्ये आत्मसात करणारा, कार्यक्षम, स्वत:ला विकसित करणारा कर्मचारी हवा असतो. तेव्हा पुढील वर्षांत तुम्ही स्वयंविकास व प्रगती करण्याचे कसे योजले आहे त्याचा पक्का आराखडा तयार करा. याचा तुम्हाला या कंपनीत व पुढील आयुष्यातील  व्यावसायिक कारकीर्दीसाठीही फार उपयोग होणार आहे.
मूल्यमापनाच्या दिवशी :
  • इतरांच्या चांगल्या किंवा वाईट मूल्यमापनाच्या कथा ऐकून मनावर कुठलाही ताण येऊ देऊ नका. मन प्रसन्न ठेवा.
  • स्वच्छ इस्त्री केलेले कार्यालयीन कपडे, पादत्राणे घाला. आवश्यक असेल तरच टाय लावा.
  • वर लिहिल्याप्रमाणे तयार केलेल्या सर्व नोंदींची कागदपत्रे योग्य क्रमाने लावून त्यावर नजर टाका.
  • मूल्यमापनाच्या प्रत्यक्ष मुलाखातीवेळी प्रथम सर्वाना नम्रपणे दिवसाच्या वेळेप्रमाणे शुभेच्छा द्या. परवानगी मागूनच खुर्चीत बसा.
  • प्रश्न नीट समजून घेऊन नंतर उत्तरे द्या. उद्धटपणा टाळून आणि ठामपणे व्यक्त करा.
  • अशा रीतीने प्रयत्न केल्यास पहिल्या वर्षीच्या मूल्यमापनाची तुमची मुलाखत यशस्वीच होणार आहे. पगारवाढ तर मिळेलच, पण एक उत्तम व विश्वासार्ह सहकारी म्हणूनही तुमचे नाव होईल. तुम्हाला मूल्यमापनाच्या मुलाखतीसाठी हार्दिक शुभेच्छा!
First Published on February 4, 2017 12:31 am
Web Title: annual evaluation of preparations
0
SHARES
Share to Google+Google+

राज्य मराठी विकास संस्था ‘मराठीचा विकास : महाराष्ट्राचा विकास' हे संस्थेचे बोधवाक्य आहे.

राज्य मराठी विकास संस्था

‘मराठीचा विकास : महाराष्ट्राचा विकास' हे संस्थेचे बोधवाक्य आहे.

लोकसत्ता टीम | February 4, 2017 12:30 AM


मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने राज्य मराठी विकास संस्थेची स्थापना केली.
‘मराठीचा विकास : महाराष्ट्राचा विकास’ हे संस्थेचे बोधवाक्य आहे. त्यावरून संस्थेच्या व्यापक कार्यकक्षेची कल्पना येऊ  शकेल.
संस्थेच्या स्थापनेमागील दोन मुख्य उद्दिष्टे आहेत.
Ads by ZINC

  • विविध क्षेत्रात मराठीचा होणारा वापर अधिकाधिक गुणवत्तापूर्ण होत जावा यासाठी प्रयत्नशील राहावे
  • मराठी भाषेच्या अभिवृद्धीची प्रक्रिया नियोजनपूर्वक गतिमान करावी
संस्थेची माहिती
  • संस्था सरकारशी संलग्न परंतु बऱ्याच अंशी स्वायत्त आहे
  • या संस्थेचे काम विद्वत्सुलभ म्हणजे ‘अकॅडेमिक’ पद्धतीने चालते
  • संस्थेचे ग्रंथालय आहे. लोककलांचे नमुने, ध्वनिफिती व दृश्य स्वरूपात जतन करण्याची आणि अभ्यासकांना ते उपलब्ध करून देण्याची सोय आहे,
  • त्याचप्रमाणे संस्थेत ध्वनिमुद्रिते, भाषावैज्ञानिक संशोधनार्थ प्रयोगशाळा, ध्वनिमुद्रणशाळा, ध्वनिशाळा, मुद्रणजुळणीघर इत्यादी सोयी आहेत.
First Published on February 4, 2017 12:30 am
Web Title: state marathi development agencies

बायोटेक्नॉलॉजीमध्ये संशोधन करण्यासाठी.. उमदेवारांचे वय १० फेब्रुवारी २०१७ रोजी २८ वर्षांहून अधिक नसावे.

बायोटेक्नॉलॉजीमध्ये संशोधन करण्यासाठी..

उमदेवारांचे वय १० फेब्रुवारी २०१७ रोजी २८ वर्षांहून अधिक नसावे.

केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत कार्यरत असणाऱ्या डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीतर्फे बायोटेक्नॉलॉजी वा संबंधित क्षेत्रात संशोधनपर पीएच.डी. करण्यासाठी ज्युनिअर रिसर्च फेलोशिप इन बायोटेक्नॉलॉजी म्हणजेच बायोटेक्नॉलॉजी एलिजिबिलिटी टेस्ट २०१७ या निवड परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
  • फेलोशिपची संख्या व तपशील- निवड परीक्षेद्वारा गुणवत्ता यादीनुसार पहिल्या २७५ संशोधक उमेदवारांची फेलोशिपसाठी निवड करण्यात येईल. याशिवाय वरील निवड परीक्षेद्वारा पुढील १०० उमेदवारांची त्यांच्या गुणांकानुसार प्रतीक्षायादी तयार करण्यात येईल.
  • आवश्यक शैक्षणिक पात्रता – अर्जदारांनी बायोटेक्नॉलॉजीसह बीई./ बीटेक अथवा एमएससी, एमटेक, एमव्हीएससी, बायोटेक्नॉलॉजी कृषी पशुविज्ञान, वैद्यकशास्त्र, मरिन, औद्योगिक पर्यावरण, औषधी निर्माण, अन्नप्रक्रिया, बायो रिसोर्सेस बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिकल इंजिनीअिरग, बायो-सायन्सेस, बायो- इन्फरमॅटिक्स, मॉलिक्युलर अ‍ॅण्ड हय़ुमन जिनॅस्टिक्स वा न्युरोसायन्स यांसारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी कमीत कमी ६०% गुणांसह (राखीव गटातील उमेदवारांसाठी ५५%) उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.
  • वयोमर्यादा- उमदेवारांचे वय १० फेब्रुवारी २०१७ रोजी २८ वर्षांहून अधिक नसावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी सरकारी नियमांनुसार शिथिलक्षम आहे.
  • निवड पद्धती- अर्जदारांपैकी पात्रताधारकांची बायोटेक्नॉलॉजी एलिजिबिलिटी टेस्ट, बीईटी- २०१७ ही निवड परीक्षा घेण्यात येईल. निवड परीक्षा संगणकीय पद्धतीने १९ मार्च २०१७ रोजी घेण्यात येईल.
निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमदेवारांना देशांतर्गत विविध शैक्षणिक वा संशोधन संस्थांमध्ये बायोटेक्नॉलॉजी वा संबंधित विषयात संशोधनपर पीएच.डी. करण्यासाठी नेमण्यात येईल. या संशोधकांची नेमणूक दोन वर्षांसाठी करण्यात येईल व त्यादरम्यान त्यांना संबंधित विषयांतर्गत पीएच.डी. करता येईल.
  • अर्जासह भरावयाचे शुल्क- अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून उमेदवारांनी १००० रु. ऑनलाइन संगणकीय पद्धतीने भरणे आवश्यक आहे.
  • अर्जाचा नमुना व तपशील – अर्जाचा नमुना व तपशिलासाठी डिपार्टमेंट ऑफ बायो टेक्नॉलॉजीच्या http://www.bcil.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख – विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तपशिलासह असणारे अर्ज वरील संकेतस्थळावर १० फेब्रुवारीपर्यंत पाठवावेत.
सैन्यातील प्रवेशाची पूर्वतयारी
महाराष्ट्रातील युवकांना संरक्षण दलात अधिकारी म्हणून दाखल होण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देतानाच त्यांची एनडीए म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण अकादमी, खडकवासला येथील राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश पात्रता परीक्षेची पूर्वतयारी करवून घेण्याच्या दृष्टीने स्थापना करण्यात आलेल्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद येथे खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक पात्रता- अर्जदार महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असावेत व ते मार्च/एप्रिल २०१७ मध्ये होणाऱ्या प्रस्तावित शालान्त परीक्षेला बसणारे असायला हवेत.
विशेष सूचना-
वरील मार्गदर्शक अभ्यासक्रम केवळ मुलांसाठी असल्याने विद्यार्थ्यांनीच अर्ज करणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा-
अर्जदार विद्यार्थ्यांची जन्मतारीख २ सप्टेंबर २००० ते ३१ डिसेंबर २००२ च्या दरम्यान असायला हवी.
आवश्यक शारीरिक पात्रता- अर्जदार विद्यार्थ्यांची किमान शारीरिक पात्रता उंची १५७ सेंटिमीटर्स, वजन ४३ किलो व छाती न फुगवता ७४ सेंटिमीटर्स व फुगवून ७९ सेंटिमीटर्स असावी व त्यांना दृष्टिदोष नसावा.

निवड पद्धती-
अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांची लेखी निवड परीक्षा सैनिक सेवा पूर्वशिक्षण संस्था, औरंगाबादतर्फे घेण्यात येईल. इंग्रजी माध्यमातील ही निवड परीक्षा राज्य स्तरावर मुंबई, नागपूर, पुणे, कोल्हापूर, व औरंगाबाद या परीक्षा केंद्रांवर एप्रिल २०१७ मध्ये घेण्यात येईल. परीक्षेची नेमकी तारीख संबंधित उमेदवारांना वेगळी कळविण्यात येईल.
लेखी निवड परीक्षा शालान्त परीक्षेच्या राज्य व केंद्रीय शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित व एकूण १५० गुणांची असेल. यामध्ये प्रत्येकी ७५ गुणांच्या गणित व सामान्य क्षमताज्ञान या विषयांचा समावेश असेल.
निवड परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या गुणांकाच्या आधारे त्यांना सैनिकी सेवा पूर्वशिक्षण संस्था, औरंगाबादद्वारे मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्यानुसार त्यांना या मार्गदर्शनपर अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यात येईल.
अर्जासह भरावयाचे शुल्क : अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून उमेदवारांनी ४८५ रु. राज्यातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या कुठल्याही शाखेत चलनद्वारा भरावेत अथवा ४५० रु.चा डायरेक्टर, एसपीआय- औरंगाबाद यांच्या नावे असलेला व औरंगाबाद येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट प्रवेश अर्जासह पाठवावा.
अधिक माहिती व तपशील- या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबादच्या दूरध्वनी क्र. ०२४०- २३८१३७० वर संपर्क साधावा अथवा संस्थेच्या www.spiaurangabad.com  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख :
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील, कागदपत्र आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज संचालक, सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद या पत्त्यावर १० फेब्रुवारी २०१७ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.
राज्यातील शालान्त परीक्षा देणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना १२ वीनंतर खडकवासलाच्या राष्ट्रीय प्रबोधिनीच्या माध्यमातून सैन्यदलात दाखल होऊन आपले करिअर करायचे असेल अशांनी या मार्गदर्शनपर संधीचा अवश्य लाभ घ्यावा.
First Published on February 4, 2017 12:25 am
Web Title: biotechnology research

नोकरीची संधी नौसेना आणि वायुसेनासाठी फिजिक्स/गणित विषयांसह बारावी उत्तीर्ण.

नोकरीची संधी

नौसेना आणि वायुसेनासाठी फिजिक्स/गणित विषयांसह बारावी उत्तीर्ण.

सुहास पाटील | February 4, 2017 12:24 AM


बारावी उत्तीर्ण (व शिकणाऱ्या) विद्यार्थ्यांना आर्मीमध्ये लेफ्टनंट, नेव्हीमध्ये सब-लेफ्टनंट आणि वायुसेनेत फ्लाइंग ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी.
केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) ‘नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमी आणि नेव्हल अ‍ॅकॅडमी परीक्षा (१) २०१७’ दि. २३ एप्रिल २०१७ रोजी होणार आहे.
एकूण रिक्त पदे – ३९०(एनडीए – ३३५ ÷ आर्मी – २०८, नेव्ही – ५५ आणि वायुसेना – ७५).
पात्रता – आर्मीसाठी बारावी उत्तीर्ण. नौसेना आणि वायुसेनासाठी फिजिक्स/गणित विषयांसह बारावी उत्तीर्ण. (बारावीचे विद्यार्थी एनडीए परीक्षेस पात्र आहेत.) वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म २ जुल १९९८ ते १ जुल २००१ दरम्यानचा असावा. परीक्षा शुल्क – रु. १००/- (अजा/अजसाठी फी माफ).
उंची – वायुसेनेसाठी १६२.५ सें.मी. (आर्मी/नौसेनेसाठी १५७ सें.मी.).
ट्रेिनगदरम्यान स्टायपेंड रु. २१,०००/- दरमहा. ऑनलाइन अर्ज ४स्र्२ूल्ल’्रल्ली.ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळावर दि. १० फेब्रुवारी २०१७ सायं.६ वाजेपर्यंत करावेत.
भारतीय नौकानयन महामंडळ मर्यादित
(भारत सरकारचा उपक्रम) आपल्या जहाजांच्या ताफ्यांकरिता ५० विद्युत अधिकारी व प्रशिक्षणार्थी विद्युत अधिकारी नियुक्तीसाठी अर्ज मागवीत आहे.
ऑनलाइन परीक्षा दिनांक ४ मार्च २०१७ रोजी होईल. ऑनलाइन अर्ज upsconline.nic.in/ या संकेतस्थळावर दि. २० फेब्रुवारी २०१७ पर्यंत करावेत.

भारतीय वायुसेनेत मेटेओरॉलॉजी ब्रँचमधील जानेवारी २०१८ पासून सुरू होणाऱ्या कोर्ससाठी प्रवेश. (ग्राउंड ड्य़ुटी (नॉन-टेक्निकल) मेटेऑरॉलॉजी कमिशन्ड ऑफिसर).
पात्रता – विज्ञानातील कोणत्याही शाखेतील/गणित/संख्याशास्त्र,
इ. पदव्युत्तर पदवी किमान ५०% गुणांसह आणि पदवीला गणित/फिजिक्स विषयांत किमान ५५% गुण असावेत. वयोमर्यादा दि. १ जानेवारी २०१८ रोजी २० ते २६ वष्रे.
उंची – पुरुष – १५७.५ सें.मी., महिला १५२ सें.मी. प्रशिक्षण कालावधी – ५२ आठवडे.
वेतन – रु. ६८,५५०/- दरमहा. ऑनलाइन अर्ज http://www.careerairforce.nic.in या संकेतस्थळावर दि. १७ फेब्रुवारी २०१७ पर्यंत करावेत.
छत्तीसगड हायकोर्ट, बिलासपूरमध्ये स्टेनोग्राफर (इंग्लिश) (३९ पदे) आणि असिस्टंट ग्रेड ३ (७६ पदे) इ. पदांची भरती.
पात्रता –

(१) स्टेनोग्राफर (इंग्लिश) कोणत्याही शाखेची पदवी  शासनमान्यता प्राप्त शॉर्टहँड ८० श.प्र.मि. आणि टंकलेखन ३० श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्ण.
(२) असिस्टंट ग्रेड ३ – कोणत्याही शाखेची पदवी १ वर्ष कालावधीचा कॉम्प्युटर कोर्स उत्तीर्ण.
वयोमर्यादा – २१ ते ३० वष्रे
(छत्तीसगडच्या रहिवासी उमेदवारांना ४० वष्रेपर्यंत). विहित नमुन्यातील लीगल पेपरवर टाइप केलेले
अर्ज ‘रजिस्ट्रार जनरल, हायकोर्ट ऑफ छत्तीसगड, बोड्री, बिलासपूर (सी.जी.)’या पत्त्यावर रजिस्टर्ड पोस्ट/स्पीड पोस्ट/ कुरिअरद्वारे दि. ३० जानेवारी २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत. अर्जाचा नमुना एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. १४ जानेवारी २०१७ च्या अंकात उपलब्ध आहे. अधिक माहिती http://www.cghighcourt.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्च (JNCASR), बंगलोरमध्ये प्रोजेक्ट ओरिएंटेड केमिस्ट्री एज्युकेशन’ (POCE) आणि प्रोजेक्ट ओरिएंटेड बायोलॉजी एज्युकेशन’  (POBE) – २०१७
पात्रता –
(१) POCE साठी – पीसीएम विषयांसह बी.एससी. प्रथम वर्षांचे विद्यार्थी (एकूण ११ फेलोशिप) आणि
(२) POBE साठी कोणत्याही विषयातील बी.एससी.चे प्रथम वर्षांचे विद्यार्थी. बी.एससी.च्या तिन्ही वर्षांच्या समर व्हेकेशनमध्ये
(६ ते ८ आठवडे) हे कार्यक्रम घेतले जातील. दरमहा फेलोशिप म्हणून रु. ६,०००/- दिले जातील. POCE आणि POBE कार्यक्रमांत अप्रतिम कामगिरी करणारे उमेदवार Ph.D. साठी पात्र ठरतील. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे, विज्ञान अभ्यासाची गोडी लावणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या हेतूने हे कार्यक्रम राबविले जातात. तीन वर्षांच्या (सुट्टी कालावधीमधील) यशस्वी पूर्ततेनंतर उमेदवारांना सेंटरमार्फत डिप्लोमा इन केमिस्ट्री/बायोलॉजी दिला जाईल.
संकेतस्थळ http://www.jncasr.ac.in/fe फोन नं. ०८०-२२०८२७७६ ऑनलाइन अर्ज डाउनलोड करण्यासाठी अंतिम दि. २२ फेब्रुवारी २०१७ असून पूर्ण भरलेले अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक आहे २८ फेब्रुवारी २०१७.
निवडलेल्या उमेदवारांची यादी एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात वरील संकेतस्थळावर जाहीर होणार.
सातारा सहकारी बँक लि., मुंबईमध्ये ट्रेनी क्लार्कपदांची भरती.
पात्रता – पदवी (कोणत्याही शाखेतील) वयोमर्यादा – दि. ३१ डिसेंबर २०१६ रोजी २० ते २८ वष्रे. (मागासवर्गीय ३३ वष्रे) परीक्षा शुल्क – रु. ७००/- (मागासवर्गीय रु. ३५०/-). विहित नमुन्यातील अर्ज http://www.satarabank.net या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येतील.)
दि. ८ फेब्रुवारी २०१७ पर्यंत बँकेच्या नायगाव, मुंबई येथील कार्यालयात पोहोचतील असे पाठवावेत.

वेगळय़ा वाटा : सायबर गुन्हेगारीचे शोधतंत्र रक्ताचे डाग, हस्ताक्षर, वस्तूवरील गुन्हेगाराचे ठसे हे तपासाचे तंत्र आता लोकांना माहीत आहे.

वेगळय़ा वाटा : सायबर गुन्हेगारीचे शोधतंत्र

रक्ताचे डाग, हस्ताक्षर, वस्तूवरील गुन्हेगाराचे ठसे हे तपासाचे तंत्र आता लोकांना माहीत आहे.

प्रा. योगेश हांडगे | February 3, 2017 12:34 AM



अनेक प्रकारचे गुन्हे, दहशतवादी हल्ले यांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला आहे.  मधल्या काळात जगाला हादरवणाऱ्या पॅरीस हल्ल्यामध्येसुद्धा या तंत्रज्ञानाचा मोठय़ा प्रमाणात वापर झाला होता. त्याविषयी अनेक ठिकाणी लिहिलेही गेले.   दहशतवाद्यांनी या हल्ल्यात ऑनलाइन चॅटिंग, गेमिंग, सोशल मीडिया आणि जीपीएसचा वापर केला होता. या नव्या तंत्रज्ञानाचा त्यांनी अत्यंत हुशारीने या हल्ल्यासाठी फायदा करून घेतला. संगणकाचा वापर करून केली जाणारी ही गुन्हेगारी अतिशय धोकादायक आहे. अगदी दक्षिण कोरियासारखे लहान देशही सायबर तंत्रज्ञानात आपल्यापेक्षा फार पुढे आहेत. यापुढे जर जगात महायुद्ध झाले तर ते सायबर युद्ध असेल, असे म्हटले जात आहे.  इंटरनेटवरच्या या सायबर गुन्हेगारांना शोधून काढण्यासाठी कम्प्युटर फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेटर अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. हे एक चांगले करिअरही आहे.
रक्ताचे डाग, हस्ताक्षर, वस्तूवरील गुन्हेगाराचे ठसे हे तपासाचे तंत्र आता लोकांना माहीत आहे. सायबर जगतातले गुन्हे जसे नवीन आहेत तसाच या जगातील तपासही नवीन आहे. सायबर फॉरेन्सिक ही नवीन शाखा आता विकसित होत आहे. सायबर तपासामध्ये दोन पातळ्या महत्त्वाच्या आहेत.
१) पुरावा गोळा करणे – सायबर गुन्ह्य़ांमधील पुरावा हा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड (शब्द, आवाज आणि चलचित्र) अशा स्वरूपाचा असतो. गुन्हा घडला त्या ठिकाणी हा पुरावा; संगणक, मोबाइल फोन, सीडी अशा स्वरूपात सापडतो. हा पुरावा काळजीपूर्वक गोळा करावा लागतो, जेणेकरून त्यातील सत्यता नष्ट होणार नाही.
२) पुराव्याचे पृथक्करण करणे – मिळालेल्या उपकरणांमधून आपल्याला हवी असणारी फाइल शोधणे हे काम सोपे नाही. एका यंत्रामध्ये हजारो फायली असतात. त्यातून चोरी झालेली फाइल मिळविणे हे कापसाच्या ढिगाऱ्यातून सुई शोधण्यासारखे आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या उपकरणांतून माहिती कशी शोधायची याची वेगवेगळी सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. ती वापरण्याचे कौशल्यदेखील आपल्यामध्ये पाहिजे.
अभ्यासक्रम
पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका, प्रगत पदविका, प्रमाणपत्र
शैक्षणिक अर्हता-
संगणकशास्त्र विषयासह बी.एससी. किंवा बी.कॉम. किंवा एलएलबी, बीसीए, बीई- कॉम्युटर सायन्स किंवा इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी, त्याचबरोबर फॉरेन्सिक सायन्स विषयीचे अभ्यासक्रम गुजरात विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, बुंदेलखंड विद्यापीठ, मदुराई कामराज विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि या विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांमधून चालविले जातात.
या अभ्यासक्रमामध्ये तुम्ही सायबर फॉरेन्सिक हा विषय स्पेशल म्हणून घेऊ  शकता.
तसेच सीडॅकतर्फे सायबर फॉरेन्सिकवर विशेष अभ्यासक्रम आहे. त्याचबरोबर अनेक खासगी संस्थांनी मागणी लक्षात घेऊन असे अभ्यासक्रम तयार केले आहेत.
करिअरच्या संधी

  • माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयात सल्लागार
  • सॉफ्टवेअर डेव्हलपर संस्थांमध्ये सल्लागार
  • पोलिस विभाग, बँका, आयटी फर्ममध्ये सायबर कन्सल्टंट
  • पोलिसांच्या सायबर सेलमध्ये कम्प्युटर फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेटर म्हणून तसेच खासगी गुप्तहेर म्हणून स्वत:चा व्यवसाय सुरू करता येतो. सायबर फॉरेन्सिकमध्ये काम करणाऱ्या सरकारी फॉरेन्सिक लॅब्स आहेत.
  • महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर इथे त्याची केंद्रे आहेत. त्याचबरोबर काही खासगी प्रयोगशाळासुद्धा आता सुरू झाल्या आहेत. सायबर फॉरेन्सिकचा अभ्यास केलेल्या मुलांना या प्रयोगशाळांमध्ये संधी मिळू शकते.
या विषयातील शिक्षण देणाऱ्या संस्था 
  • कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, कल्लप्पारा, केरळ (cek.ac.in)
अभ्यासक्रम-  एम.टेक. इन कॉम्प्युटर सायन्सेस वुइथ स्पेशलायझेशन इन फॉरेन्सिक सायन्स अँड इन्फॉर्मेशन सिक्युरिटी
शैक्षणिक अर्हता-  बीई/बीटेक-  कॉम्प्युटर सायन्स/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन
सायबर क्राइम इन्व्हेस्टिगेटर.
  • सेंटर ऑफ एक्सलन्स इन डिजिटल फॉरेन्सिक ,चेन्नई (http://www.coedf.org/)
अभ्यासक्रम- एमएससी इन सायबर फॉरेन्सिक अँड इन्फोर्मेशन सिक्युरिटी
शैक्षणिक अर्हता- संगणकशास्त्र विषयासह बी.एससी.
  • स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी अँड अप्लाइड सायन्सेस,कोट्टायम ( http://www.stasmgu.org/ )
अभ्यासक्रम – बी.एससी इन सायबर फॉरेन्सिक
शैक्षणिक अर्हता- गणित, संगणकशास्त्र, भौतिक आणि रसायनशास्त्र या विषयांसह विज्ञान शाखेतील बारावी उत्तीर्ण
  • फॉरेन्सिक सायन्स एज्युकेशन ऑनलाइन (ifs.edu.in)
इन्स्टिटयमूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स, गुजरात फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी
अभ्यासक्रम- सायबर क्राइम इन्व्हेस्टिगेटर, कॉम्प्युटर फॉरेन्सिक एक्स्पर्ट, सेलफोन फॉरेन्सिक प्रोफेशनल, सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट (www.gfsu.edu.in)
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिजिटल अँड सायबर फॉरेन्सिक अँड रिलेटेड लॉ.

एमपीएससी मंत्र : सीसॅटची रणनीती २०१३पासून अर्थात राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये जेव्हापासून उरअळचा समावेश झाला आहे

एमपीएससी मंत्र : सीसॅटची रणनीती

२०१३पासून अर्थात राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये जेव्हापासून उरअळचा समावेश झाला आहे

वसुंधरा भोपळे | February 3, 2017 12:33 AM


विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर दोन अर्थात  उरअळ च्या परीक्षेच्या दृष्टीने असणारे महत्त्व पाहिले. आज आपण या पेपरमधील आकलन क्षमता या विभागाची तयारी कशी करावी, त्यासाठी कोणती अभ्यासतंत्रे वापरावीत आणि याचा सराव कसा करावा याबद्दल माहिती घेऊयात.
२०१३पासून अर्थात राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये जेव्हापासून  उरअळचा समावेश झाला आहे तेव्हापासून आकलन क्षमता या घटकावर दरवर्षी ८० प्रश्नांपकी ५० प्रश्नांचा समावेश होतो. या प्रश्नांना पुढील तीन विभागांत विभागता येईल.
मुख्य आकलन क्षमता –
या विभागातील दिलेले उतारे आणि त्यावरील प्रश्न इंग्रजी व मराठी दोन्ही भाषांमध्ये असतात. विद्यार्थी ज्या भाषेमध्ये पारंगत असेल त्या भाषेमधून या विभागातील प्रश्न सोडवू शकतो. या विभागावर साधारणपणे ३५ प्रश्न विचारले जातात. यामधील उताऱ्यांची विभागणी दोन भागांत करता येईल.
  • संकल्पनात्मक, वैचारिक, विश्लेषणात्मक उतारे
  • वस्तुनिष्ठ माहितीपर उतारे, यापकी पहिल्या प्रकारातील उताऱ्यांचा सारांश समजला तरच प्रश्नांची उत्तरे देणे सोपे जाते. तर दुसऱ्या प्रकारातील उतारे हे निव्वळ माहितीवर आधारित असल्यामुळे या उताऱ्यांतील वस्तुनिष्ठ मथळा अधोरेखित करून आणि माहितीचे नेमकेपण समजून घेऊन प्रश्न सोडविणे अधिक सयुक्तिक ठरते.
मराठी आकलन क्षमता –
या विभागातील उताऱ्यांमधून उमेदवाराचे मराठी भाषेचे ज्ञान तपासले जाते. त्यामुळे या उताऱ्यांचे इंग्रजी भाषांतर दिले जात नाही. या विभागातील प्रश्नांची काठिण्यपातळी थोडी कमी असल्यामुळे विद्यार्थी या विभागातील उतारे कमी वेळात अचूक सोडवू शकतात. यामध्ये साधारणपणे पाच ते सात प्रश्नांचा समावेश असतो.

इंग्रजी आकलन क्षमता –
या विभागातील उताऱ्यांमधून उमेदवाराचे इंग्रजी भाषेचे ज्ञान तपासले जात असल्यामुळे या उताऱ्यांचे मराठी भाषांतर दिले जात नाही. या विभागातील प्रश्नांची काठिण्यपातळीही कमी असल्यामुळे हे प्रश्नही विद्यार्थी कमी वेळात सोडवू शकतात. या विभागात साधारणपणे पाच ते तेरा प्रश्नांचा समावेश होतो.
गेल्या चार वर्षांत झालेल्या आयोगाच्या पेपर्सचा कल आणि ते  सोडविताना विद्यार्थ्यांना सामना करावा लागणाऱ्या आव्हानांचा विचार करता पुढील बाबी लक्षात आल्या आहेत.
  • बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना उताऱ्याचे आकलनच होत नाही.
  • शब्दसंख्या अधिक असणारे उतारे सोडविताना अधिक वेळ द्यावा लागतो. मग वेळेचे नियोजन कोलमडते.
  • उतारे सोडविताना सहा ते सात मिनिटे एकाच उताऱ्यांवर विद्यार्थी लक्ष केंद्रित करू शकत नाहीत.
  • काही उताऱ्यांची भाषा न समजल्यामुळे त्यावरील प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत.
वरील सर्व समस्यांवर मात करून परीक्षेमध्ये यश मिळवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी अधिकाधिक उतारे आणि त्यावरील प्रश्न सोडविण्याच्या सरावाबरोबरच स्वत:चा वाचनाचा वेग आणि आकलन वाढविण्यावरदेखील तितकाच भर देणे आवश्यक आहे. यासाठी नियतकालिकांमधील लेख वाचून, त्यावर विचार करून स्वत:शी आत्मसंवाद साधण्याचा दररोज प्रयत्न करावा. प्रश्नपत्रिका सोडविताना स्वत:च्या भाषिक आणि आकलन क्षमतेनुसार उताऱ्यांचे तीन गट पाडून सोपे उतारे सुरवातीला सोडवावेत. त्यानंतर गणित, बुद्धिमत्तेचे प्रश्न घेऊन दुसरा गट व त्यानंतर उर्वरित गणित, बुद्धिमत्तेचे प्रश्न व नंतर तिसरा गट आणि त्यानंतर निर्णयक्षमतेचे प्रश्न सोडविले तर या रणनीतीचाही गुणात्मक परिणाम दिसून येऊ शकतो.
एकूणच या विभागाची तयारी करण्यासाठी दररोज किमान दोन ते तीन लेखांचे वाचन, त्यावर विचारमंथन आणि स्वसंवादाबरोबर उतारे आणि त्यावरील प्रश्न सोडविण्याचा सराव करणे अनिवार्य आहे. यासाठी ‘लोकसत्ता’मधील अग्रलेख, संपादकीय पानावरील लेख, इंडियन एक्स्प्रेसमधील ‘Editorials’, ‘English Reading comprehension’आणि मराठी आकलन क्षमता या पुस्तकांचा योग्य वापर केल्यास परीक्षेमध्ये याचा नक्कीच फायदा होऊ शकेल. पुढील लेखात आपण गणित, बुद्धिमत्ता व तर्क अनुमान या घटकांच्या तयारीबद्दल जाणून घेऊयात.
First Published on February 3, 2017 12:33 am
Web Title: csat strategy

आपत्ती व्यवस्थापन आणि लोकसहभाग विभागस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येते.

आपत्ती व्यवस्थापन आणि लोकसहभाग

विभागस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येते.

लोकसत्ता टीम | February 3, 2017 12:32 AM


भूकंप, महापूर, दुष्काळ इत्यादी आपत्ती काळात तसेच आपत्तीनंतर विशेषत: अल्पवयीन बालके, वृद्ध, महिला तसेच अपंग यांना कमीत कमी त्रास होईल याची खातरजमा करण्यासाठी स्थानिक पातळीवर आपत्ती व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. त्यासाठी तितकाच उत्स्फूर्तपणे लोकसहभाग मिळणे आवश्यक ठरते. विभागस्तरावरून करण्यात येत असलेल्या उपाययोजना-.

विभागस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येते. याचप्रमाणे जिल्हा व तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या नियंत्रण कक्षाची सेवा २४ तास उपलब्ध असते.
  • पूरपरिस्थितीमुळे साथ रोगांना नियंत्रित ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणा, विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरण कंपनी, दूरध्वनी सेवा सुस्थितीत ठेवण्यासाठी दूरसंचार विभाग, रस्त्याने वाहतुकीचा संपर्क असावा यासाठीही सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य परिवहन महामंडळ, पाटबंधारे विभाग व इतर संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
  • आपत्कालीन परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणेसोबतच शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी, एनसीसी, होमगार्डस्, पोलीस प्रशासन, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आदींचा प्रामुख्याने सहभाग असतो. तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये ग्रामस्थांनीदेखील हिरिरीने पुढाकार घेऊन सुरक्षा व्यवस्थेला सहकार्य करण्याची गरज आहे.

Wednesday, February 1, 2017

सदरलेखन आणि मी स्वास्थ्य असेल तर ‘दिसामाजि काहीतरी ते लिहावे’ हा समर्थाचा उपदेश कृतीत उतरवण्यात अडचण नसते.

सदरलेखन आणि मी

स्वास्थ्य असेल तर ‘दिसामाजि काहीतरी ते लिहावे’ हा समर्थाचा उपदेश कृतीत उतरवण्यात अडचण नसते.

ज्येष्ठ पत्रकार व विचारक कै. डॉ. अरुण टिकेकर यांचा ‘कालचक्र’ हा नवा लेखसंग्रह रोहन प्रकाशनतर्फे  प्रकाशित होत आहे. डॉ. टिकेकरांच्या निधनाला नुकतंच वर्ष झालं. निधनापूर्वी केवळ चार दिवस आधी या पुस्तकाला त्यांनी प्रस्तावना लिहिली होती. त्यातील अंश..
स्वास्थ्य असेल तर ‘दिसामाजि काहीतरी ते लिहावे’ हा समर्थाचा उपदेश कृतीत उतरवण्यात अडचण नसते. पण ‘कधीतरी’, ‘काहीतरी’ लिहिलेलं प्रसिद्ध करण्यापूर्वी परत वाचणं, त्यावर लेखन-संस्कार करणं, हे अपेक्षित असतं. तसं करण्याची संधी नसेल तर? म्हणजे असं की, लिहिलेलं लगेच प्रकाशित होण्यासाठी छापखान्यात पाठवायचं असेल तर? एखाद्या वृत्तपत्रासाठी दररोज सदर लिहिण्याची जोखीम उचलायला अनुभवी साहित्यिकसुद्धा फारसे उत्सुक नसतात. दररोज विषय शोधणं आणि त्यावर ठरावीक शब्दांत लिहिणं ही आगळीवेगळीच शिस्त आहे. दररोज लिहिलेला मजकूर प्रसिद्ध करणं, लेखनसंस्कार करण्याची संधी नसणे म्हणजे लेखनकामाच्या दर्जाशी तडजोड करणं, असाच साहित्यिकांचा ग्रह असतो. वृत्तपत्रात दररोज एखादा कॉलम मजकूर लिहावयाचा म्हटला तरी दिवसभरात अन्य काही करता येत नाही. असं सदरलेखन ही जणू काळाशी स्पर्धाच! अधिकाधिक वृत्तपत्रांचं आणि ग्रंथांचं सतत वाचन, घडलेल्या ताज्या घटनांविषयी माहिती मिळवणं, कोणता विषय निवडता येईल, हाताळता येईल यासंबंधीचं मनन, भेटीगाठींतून विषयशोध यांत गुंतावं लागतं. शिवाय त्या भाष्यातून एखादा मननीय दृष्टिकोण दिला जावा, निदान वाचणाऱ्याचं मनोरंजन व्हावं, हे अपेक्षित असतं. सदरांचे उद्दिष्ट नवीन माहिती देणं आहे, की मनोरंजन करणे आहे यावर अभ्यास किती, हे ठरू शकेल. प्रश्न असा विचारला जाऊ शकेल की, मग दररोज सदर लिहिण्याचा अट्टहास का? मुळात सदरलेखन हा प्रकारच सर्वार्थाने वाचकांकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेला बसण्याचा आहे. मग ती परीक्षा साप्ताहिक असो, पाक्षिक वा मासिक असो. सदर लिहिणं हे एक प्रकारे आव्हान असतं. सदराची यशस्वीता ही लेखकाला नशेसारखी चढते आणि तो अधिक चांगलं लिहिण्याचा प्रयत्न करतो. असं असता दररोज परीक्षेला बसायचं, हेही आव्हानच आहे.
खरंच आहे. संपादक असं दररोज परीक्षेला बसत असतो. तो दररोज संपादकीय लिहितो. त्यावर वाचक भाष्य करतात. त्याला पास-नापास ठरवतात. पहिला वर्ग देतात. दुसरा वा कधी तिसराही देतात. संपादकीय (पूर्वी त्याला ‘अग्रलेख’ म्हणत.) हे लिहिणाऱ्याच्या नावाने प्रसिद्ध होण्याची प्रथा अजून तरी रूढ झालेली नाही. शिवाय हल्ली एकच एक व्यक्ती सर्व अग्रलेख लिहीत नाही, हे वाचकांना ज्ञात आहे. संपादकाच्या शैलीवरून, त्याच्या खास म्हणता येतील अशा शब्दप्रयोगांवरून किंवा वाक्यरचनेवरून संपादकाचं लेखन ओळखण्याचा प्रयत्न सुज्ञ वाचकांकडून होत असतो. दररोज एकाचाच लेख त्याच्या सहीनिशी प्रसिद्ध होण्याने त्याची आणि वाचकांची नाळ जुळते आणि यशस्वी लेखकाचे लेख वाचकांना भावतात. त्या लेखांचा वाचकांच्या मनावर प्रभाव पडतो. विषयांचं वैविध्य वाचकांचं कधी मनोरंजन करते, कधी सकाळी-सकाळी त्याला प्रसन्न करते, तर क्वचित कधी उदासही करते. सदर-लेखकाचा मूड वाचकांचा दिवसभराचा मूड बनवतो. कमीत कमी सहा महिने तरी दैनंदिन सदराचा प्रयोग चालतो. सहा महिन्यांत लेखकाची दमछाक होते, त्याचा ज्ञान-संचिताचा घडा रिता होतो. वाचकही कंटाळतात त्याच्या लेखनाला आणि शैलीला. मग ते नव्या शैलीत लिहिलेलं  दुसरं काही शोधू लागतात..
सदराविषयीच्या माझ्या अनुभवाला दुसरी एक किनार होती. माझ्या स्वत:च्या सदर-लेखनाव्यतिरिक्त दशकाहून अधिक काळच्या ‘लोकसत्ता’च्या संपादकीय कार्यकाळात एकूण २२२ (प्रतिवर्षी २२ याप्रमाणे) सदरं प्रसिद्ध केली. या साप्ताहिक किंवा क्वचित पाक्षिक सदरांची आखणी करताना काही गोष्टी विचारात घ्याव्या लागल्या. वृत्तपत्रांचे वाचक विविध गटांतील असतात- लोकल गाडीने किंवा थोडा लांब पल्ल्याचा प्रवास करणारे, गृहिणी, शिक्षक, युवकवर्ग, ज्येष्ठ नागरिक, तसंच दुपारची वामकुक्षी करताना वाचणाऱ्यांपासून ते त्या लेखनाचं अभ्यासपूर्ण मनन करणाऱ्यांपर्यंत. वाचकांच्या या विविध गटांना रुचेल, पचेल अशा रीतीने सदरांची आखणी करायची तर त्यात हलकेफुलके, दैनंदिन जीवनातले अनुभव यांपासून माहितीपर, वैचारिक, प्रबोधनपर असे वेगवेगळ्या स्तरावरचं लेखन आणायचं होतं. संवादपर बोलीभाषेबरोबर सहज-सोपं आणि विचारप्रवृत्त करणारं आणि म्हणून थोडं अवघड भाषेतील लेखनही अंतर्भूत करायचं होतं. हे अवघड शिवधनुष्य वाटलं तरी नव्या-जुन्या लेखकांच्या सहकार्याने ते वाचकांच्या पसंतीस उतरलं. त्यांची कात्रणं काढून जपून ठेवली गेली. या लेखनाची पुस्तकं प्रकाशित होऊन त्यांची विक्रीही बऱ्यापैकी झाली. एकंदरीत सदरलेखनाला बऱ्यापैकी प्रतिष्ठा प्राप्त झाली.
सदरांबाबतीतला एक अनुभव गमतीचा आहे. ज्या लेखकांना ते वर्षभर सहज लिहू शकतील एवढे विचार आपल्याकडे आहेत असं वाटायचं, त्यांतले काही महिनाभरात गळपटायचे. आणि ज्यांना सुरुवातीला अजिबात आत्मविश्वास नसायचा, त्यातले काही जण वर्षभर सदर खुलवू शकायचे. अधिक लिहिण्याइतपत त्यांची वैचारिक तयारी असायची. सप्टेंबर महिन्यातच संबंधितांची एक मीटिंग घेऊन पुढच्या वर्षी वेगवेगळ्या अभिरुचीच्या वाचकांना कोणते विषय वाचायला आवडतील, यावर चर्चा व्हायची आणि विषय ठरायचे. पुढचे तीन महिने योग्य लेखकांचा शोध घेतला जायचा. कोणतंही नवं सदर सुरू व्हायच्या अगोदर, तसंच सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या महिनाभर मी त्या लेखकाशी त्याच्या सदराबद्दल चर्चा करत असे. माझं मत काय झालं, वाचकांचा प्रतिसाद काय आहे, त्याबद्दल बोलत असे. महिनाभरानंतर मात्र मी मधे पडत नसे. सदराची वाचकप्रियता महिनाभर चढणीवर असते. नंतर ते जणू पठारावर येतं. लेखकाला व नंतर वाचकांनाही स्थिरावल्यासारखं वाटतं. विषय संपल्याची भावना होईपर्यंत- म्हणजे सदर उताराला लागेपर्यंत साधारणत: ५२ आठवडे झालेले असतात असा माझा अनुभव आहे. वर्षभराचाच लेखकाशी वायदा असायचा. त्यामुळे कोणत्याही सदरलेखकाशी ना माझा वाद झाला, ना संबंध बिघडले. सदर उठावदार, वाचकप्रिय होत नसेल तर मात्र त्या लेखकाला साह्य़ करावं लागे.
विषय निश्चित करताना केवळ एक दिशादर्शक आराखडा ठरवला जायचा. उद्दिष्टं निश्चित करावी लागायची. तपशील लेखकाने ठरवायचा. लेखन जर या उद्दिष्टांना आणि दिशेला धरून झालं तर सदर चांगलं वठे. स्तंभलेखनाबाबत विषय आणि चौकट आखून घेतल्यावर लेखनाची दिशा आणि टप्पे ठरवले म्हणजे हे लेखन प्रमाणबद्ध, आटोपशीर आणि वाचकपसंत होऊ शकायचं. हे सारं लेखन सुरू करण्याआधी निदान मनात तरी असावं लागायचं. संशोधन प्रकल्पाप्रमाणेच या लेखनाची उद्दिष्टं निश्चित असतील तरच ते लेखन कसदार व्हायचं.
माहितीपर लेखनाबाबत कधी नवोदित लेखकांना माहितीचे स्रोत सांगावे लागत. संदर्भ शोधून तपशील घेण्याचं काम त्यांनाच करावं लागे. त्यासाठी तासन् तास ग्रंथालयात बसावं लागायचं. वेगवेगळ्या माहितीसाठी वेगवेगळ्या ग्रंथालयांत जाऊन संदर्भग्रंथ शोधावे लागायचे. क्वचित लेखी माहिती पूर्णपणे उपलब्ध नसे. अशावेळी काही संबंधित व्यक्तींना भेटून कणाकणाने माहिती मिळवावी लागे. तिच्या सत्यासत्यतेची शहानिशा करावी लागे.
सदरांची शीर्षकं जेवढी आकर्षक, औत्सुक्य चाळवणारी असतील तेवढे अधिक लोक ती वाचायला प्रवृत्त होतात. या शीर्षकांचा खूप विचार करावा लागायचा. त्यांच्यावरील पुस्तकं त्याच शीर्षकाने प्रसिद्ध व्हायची तेव्हा हा विचार बरोबर असल्याचं जाणवायचं.

‘लोकसत्ता’त आल्यावर मी ‘तारतम्य’ हे सदर सुरू केलं. ‘तारतम्य’मध्ये सभोवताली घडणाऱ्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घडामोडींवर भाष्य असे. त्यात प्रश्न अधिक असत. पूर्वीच्या संपादकांप्रमाणे चबुतऱ्यावर उभं राहून संदेश देण्यापेक्षा मित्रत्वाच्या नात्याने प्रश्न उपस्थित करून समाजघटकांना विचार करायला लावणं, ही त्यामागची माझी भूमिका होती. ‘तारतम्य’ हे सदराचं शीर्षकसुद्धा साठ पर्यायी नावांमधून निवडलं होतं. ‘हे सदर जड आहे, दोनदा वाचल्याशिवाय कळत नाही,’ अशा प्रतिक्रिया मला येत असत. पण त्याचबरोबरीने या सदराबद्दल पुल, सुनीताबाई, गंगाधर गाडगीळ अशा अनेकांनी शाबासकीही दिली होती. सुनीताबाई आणि पुल यांनी दूरध्वनी करून ‘‘‘तारतम्य’साठी आम्ही रविवारी ‘लोकसत्ता’ घ्यायला लागलो,’’ असं म्हणत  ‘‘मला जे शब्दांत पकडावंसं वाटते, पण पकडता येत नाही, ते तुम्ही अचूक पकडता..’’ या शब्दांत शाबासकी दिली होती. तर डॉ. रा. भा. पाटणकर म्हणाले होते की, ‘गंभीर निबंध’ हा प्रकार मधल्या काळात मराठीत दुर्मीळ झाला होता, तो या सदरामुळे परत आला. मराठी वृत्तपत्रांच्या वाचकांची अनावश्यक शब्दांचा फाफटपसारा नसलेलं आणि ज्याला इंग्रजीमध्ये ‘३ी१२ी’ म्हणतात, तसं वाचण्याची सवय गेली आहे. त्यांना डोक्याला ताप देणारं काही नको असतं.
पण मी वाचकांच्या ज्या वर्गाला आवाहन करू इच्छित होतो, तो वर्ग ‘स्र््रल्ल्रल्ल ें‘ी१२’चा. त्या अल्पसंख्याक वाचकांसाठी मी लिहीत होतो. त्यामुळे नव्या-जुन्या संकल्पनांवर आधारित स्पष्टीकरण करायचं तर वाचकाच्या डोक्याला थोडा ताप होणारच. नाही तरी नव्या संकल्पना तयार होणं मराठीत थांबल्यात जमा आहे. पाश्चात्त्य संकल्पना मराठीत सांगायच्या तर त्या वर्णनात्मक पद्धतीनेच सांगाव्या लागतात. समाजघटकांनी विचार करायला लावणारं वाचलं तरच समाजबदल होण्याची शक्यता आहे, हा माझा आवडता सिद्धान्त आहे. ‘तारतम्य’ हे सदर मुळातच वाचकांच्या मर्यादित, विशिष्ट वर्गापुरतं होतं. त्यामुळे त्या सदराचा कोणी उपहासात्मक उल्लेख केला तरी तो मला बोचत अथवा खुपत नसे. ‘तान्प्रति नैष यत्न:’ अशी मनाची समजूत करून मी घेत असे. जेथून दाद मिळणं अपेक्षित होतं, तेथून ती मिळत असता तक्रार कशासाठी करायची?
‘तारतम्य’ सदर स्थिरावल्यानंतर मी ‘जन-मन’ हे सदर शनिवारच्या पुरवणीत सुरू केलं. हे सदर लिहिणं सोपं नव्हतं. जनमन घडतं कसं, प्रत्येक पिढीचे मापदंड आणि मानदंड वेगवेगळे कसे होत जातात, याचा मागोवा घेणारं, सांस्कृतिक इतिहासाच्या अंगाने जाणारं असं हे सचित्र सदर होतं. हे लेखन वाचनीय व्हावं, म्हणून त्याच्या शीर्षकात जुन्या गीतांचा, कवितांचा वापर केला होता.. जुनी चित्रं मिळवली होती. समाजसंस्कृतीतील बदलांचा वेध घेणारं हे सदर होतं. त्यामागे या दिशेने २०-२५ र्वष सातत्याने केलेलं वाचन आणि जमवलेली पुस्तकं याचं संचित होते. एकटाच संकलन करू पाहणारा मी; पण हे दस्तावेजीकरणाचं काम एकटय़ाने करण्याजोगं नव्हतं. अकाली निधन पावलेले माझे सन्मित्र अरुण आठल्ये यांना माझा विषय अतिशय आवडला होता. हे साहित्य जमवताना आठल्ये धावून आले. त्यांची मला खूप मदत झाली. माझ्या संपादकपदाचा सुरुवातीचा काळ हा ‘लोकसत्ता’च्या विस्ताराचा आणि राजकीय घटनांच्या धामधुमीचा होता. त्यामुळे आठल्यांची मदत ही ‘देव दीनाघरी धावला’सारखी मोलाची होती.
त्यानंतर ‘स्थल-काल’ हे सदर लिहिलं. यात भूतपूर्व मुंबई इलाख्याच्या स्थानीय इतिहासाची सचित्र झलक होती. त्यात अठराव्या-एकोणिसाव्या शतकांतील वास्तू आणि निवासस्थानं, पर्यटक अँग्लो इंडियन लेखिकांच्या नजरेतून मुंबई, मोठी स्वप्नं  पाहणारे मुंबईकर, मुंबई-पुणे प्रवास इत्यादी घटनांचा तसंच पुणे, उंब्रज, वाई, माथेरान, सातारे ( सातारा), पंढरपूर, रत्नागिरी, अलिबाग वगैरे स्थानांचा तसेच प्रदेशांचा रंजक इतिहास उभा करण्याचा मी प्रयत्न केला..
‘लोकसत्ता’चा संपादक म्हणून रोजचा धबडगा पुष्कळ होता. अग्रलेख लिहिणं, ‘तारतम्य’तून भाष्य करणं चालू होतंच. त्यात हे जुन्या काळात डोकावून इतिहासलेखन करणं- हा सर्व खटाटोप मला खूप थकवणारा होता. पहाटे चार-चार वाजेपर्यंत जागून या सदरांचं बरंचसं लेखन झालं आहे. सदरातील कित्येक लेख अगदी आयत्या वेळी डेडलाइनच्या आदल्या दिवशी लिहून झाले. काही संदर्भ आयत्या वेळी बघावे किंवा तपासावे लागत. पण एकंदर संदर्भाची जमवाजमव झाली होती, ती मात्र मी गेली २०-२५ र्वष सातत्याने केलेलं वाचन आणि जमवलेली पुस्तकं यांतून. वाचकांना द्यायचं तर काहीतरी नवीनच द्यायचं, हा ध्यास होता. मित्रमंडळींत मी फारसा वेळ दवडला नाही. माझा म्हणता येईल असा ग्रुप नाही. अभ्यास हा एकटय़ानेच करावा लागतो, एकटय़ानेच करायचा असतो..
‘कालचक्र’ या दैनिक सदरामध्ये एकंदर दोनशेच्या आसपास लेख प्रसिद्ध झाले. ते सर्व संग्रहित करायचे तर ग्रंथ फारच मोठा झाला असता. त्यामुळे लेखांची संख्या कमी करण्याचे प्रयत्न केले. त्या प्रयत्नांत काही बरे लेखही वगळावे लागले. त्यात नवी जबाबदारी आली, ती म्हणजे लेख कालबाह्य़ होऊ नयेत म्हणून तत्कालीन संदर्भ वगळण्याची. ‘कालमीमांसा’, ‘कालान्तर’ आणि ‘कालचक्र’ ही ‘जन-मन’, ‘स्थल-काल’, ‘इति-आदि’ यानंतरची माझी ही दुसरी ग्रंथ-त्रयी!
First Published on January 29, 2017 2:04 am
Web Title: aroon tikekar book kalachakra

यूपीएससीची तयारी : मुलाखतीचा समारोप आकलन व विचारातील स्पष्टता ही मुलाखतीसाठी आवश्यक मूलभूत गुणवैशिष्टय़े आहेत हे लक्षात घ्यावे.

यूपीएससीची तयारी : मुलाखतीचा समारोप

आकलन व विचारातील स्पष्टता ही मुलाखतीसाठी आवश्यक मूलभूत गुणवैशिष्टय़े आहेत हे लक्षात घ्यावे.

तुकाराम जाधव | January 31, 2017 4:44 AM


विद्यार्थी मित्र-मत्रिणींनो, मुलाखतीविषयक मागील चार लेखांत मुलाखतीची संकल्पना, त्यातील घटक, तिची आशयात्मक आणि अभिव्यक्तीच्या (संवाद) अंगाने करायची तयारी या प्रमुख बाबींची चर्चा केली. आज मुलाखतविषयक समारोपाच्या लेखात ‘व्यक्तिमत्त्व चाचणी’ या दृष्टीने पाहता या टप्प्यासाठी कोणत्या प्रमुख गुणवैशिष्टय़े व क्षमतांची आवश्यकता भासते याचा विचार करणार आहोत.
मुलाखत म्हणजेच व्यक्तिमत्त्व चाचणीत आपले व्यक्तिगत जीवन, समाज आणि प्रशासन या घटकांविषयीचे उमेदवाराचे आकलन निर्णायक ठरते. अर्थात या घटकांविषयीची जाण व भान अत्यंत स्पष्ट असले पाहिजे. आकलन व विचारातील स्पष्टता ही मुलाखतीसाठी आवश्यक मूलभूत गुणवैशिष्टय़े आहेत हे लक्षात घ्यावे.
मुलाखतीत विचारलेल्या कोणत्याही बाबींसंदर्भातील स्वत:चे आकलन उमेदवाराने आत्मविश्वासपूर्वक मांडणे हा एका अर्थी मुलाखतप्रक्रियेचा गाभा आहे. किंबहुना मुलाखत कक्षात प्रवेश केल्यापासून ते मुलाखतीचा समारोप करून कक्षातून बाहेर पडेपर्यंतच्या संपूर्ण देवाणघेवाणीत आत्मविश्वासाने प्रतिसाद देणे निर्णायक ठरते. मुलाखतीसाठी आवश्यक घटकांची व्यवस्थित तयारी आणि पुरेशा मॉक इंटरवूद्वारा संवादाची सवय या आधारे आत्मविश्वासाची हमी देता येईल.
निर्णयक्षमता ही मुलाखतीसाठी आवश्यक आणखी एक महत्त्वाची क्षमता होय. विचारलेल्या प्रश्नासंबंधी उमेदवाराचे आकलन काय व कसे आहे आणि संबंधित मुद्दय़ाचा सारासार विचार करून प्राप्त परिस्थितीत निर्णय घेता येतो का, याची चाचपणी विविध प्रश्नांद्वारे केली जाते. समाज वास्तवाचे वाचन जेवढे सूक्ष्म तेवढे निर्णयक्षमता प्रगल्भ होण्याची शक्यता जास्त हे लक्षात घेऊन त्या दृष्टीने प्रयत्न हाती घ्यावेत. मुलाखत मंडळ काही वेळा थेट परिस्थितीजन्य प्रश्न विचारून उमेदवाराची निर्णयक्षमता तपासण्याचा प्रयत्न करते. अशा स्थितीत दिलेल्या परिस्थितीचा योग्य विचार करून समर्पक निर्णय घेण्याची क्षमता सादर करणे जरुरीचे ठरते.
निर्णयक्षमतेबरोबरच व्यापक समग्र दृष्टी, तटस्थता; नि:पक्षपातीपणा, संवेदनशीलता व समन्यायी दृष्टी आणि उपायात्मक व दूरदृष्टी या क्षमतांचीही खातरजमा केली जाते. एखाद्या महत्त्वाच्या प्रश्न वा मुद्दय़ासंबंधी मत वा भूमिका मांडताना त्याचा व्यापक व समग्रपणे विचार केलेला असावा. संबंधित मुद्दय़ाची पाश्र्वभूमी, सद्य:स्थिती, कारणमीमांसा, त्याविषयी विविध मतप्रवाह, परिणाम, आत्तापर्यंतचे उपाय आणि संभाव्य उपाय अशा व्यापक दृष्टीने पाहावे. कोणताही प्रश्न सुटा सुटा करून न पाहता त्याचे इतर क्षेत्राशी असणारे संबंध बारकाईने अभ्यासावेत.

समाजातील भिन्न स्तर व घटकांचा विचार करताना भावी प्रशासक म्हणून उमेदवाराकडून जसे एका बाजूला व्यक्तिनिष्ठतेऐवजी वस्तुनिष्ठता आणि नि:पक्षपातीपणाची अपेक्षा असते तसेच दुर्बल, वंचित घटकांसंबंधी संवेदनशीलताही अपेक्षित असते. राजकीय पक्ष, त्यांच्या विचारधारा, विशिष्ट कृती कार्यक्रमास असणारे त्यांचे अग्रक्रम याविषयी उमेदवारांकडून तटस्थतेची अपेक्षा बाळगली जाते. सत्तेत कोणत्याही विचाराचा राजकीय पक्ष असला तरी आपली जबाबदारी तटस्थपणे पार पाडण्याचे कठीण काम प्रशासकांकडून अपेक्षित असते. प्रशासक कोणत्याही राजकीय पक्षाशी नव्हे तर संविधानाशी बांधील असतात हा विचार समोर ठेवून आपली भूमिका विकसित करणे महत्त्वाचे ठरते.
उमेदवाराकडून समाजातील महत्त्वाच्या समकालीन समस्यांचे जसे आकलन अपेक्षित असते तसेच त्याची उकल करण्यासाठी उपयुक्त संभाव्य उपाय सुचविण्याची उपायात्मक क्षमताही अभिप्रेत असते. कोणताही प्रश्न वा समस्येचा उपायात्मक विचार करताना प्रथमत: महत्त्वाची ठरते ती बाब म्हणजे विचाराधीन समस्येचे आकलन. हे आकलन जितके वस्तुनिष्ठ, व्यापक व चिकित्सक असेल तेवढे त्यावरील उपायांची दिशा स्पष्ट होण्याची शक्यता अधिक. तसेच संबंधित समस्येवर आजपर्यंत करण्यात आलेल्या शासकीय, बिगर शासकीय पातळीवरील प्रयत्न-उपायांचे यथायोग्य मूल्यमापन मार्गदर्शक ठरते. अर्थात सुचविण्यात येणारे संभाव्य उपाय अति आदर्शवादी, काल्पनिक असणार नाहीत याची काळजी घ्यावी. उपाय शक्यतेच्या कोटीतील आणि व्यवहार्य असावेत याची खबरदारी घ्यावी. एखादा मूलग्राही उपाय  सुचवावा असे वाटले तरी तो संबंधित प्रश्न-समस्येच्या वास्तविक आकलनाशी असंबंधित असा नसावा. नावीन्यपूर्ण विचार आणि प्रयोगशीलता स्वागतार्ह ठरू शकते, परंतु ती समाजवास्तवाच्या योग्य आकलनावर अधिष्ठित असावी.
एकंदर विचार करता मुलाखतीसाठी आवश्यक घटकासंबंधी सुरुवातीपासूनच अभ्यास सुरू करणे, त्याविषयी सारासार विचार करणे, त्यातून उपयुक्त टिपणे काढणे, विविध स्रोतांद्वारे आपले आकलन वाढवणे, अभिरूप मुलाखतीद्वारा संवादकौशल्याचा विकास करणे या प्रमुख बाबींची नियोजनबद्ध आखणी केल्यास मुलाखतीसाठी उपयुक्त क्षमता व गुणवैशिष्टय़ांचा विकास साधता येईल, हे नक्की!
तुकाराम जाधव
First Published on January 31, 2017 4:44 am
Web Title: upsc preparations 9

वेगळय़ा वाटा : एथिकल हॅकिगचा मार्ग एथिकल हॅकिंग हा सायबर सुरक्षेतीलच एक भाग आहे. म्हणजेच नैतिकता राखून केलेली घुसखोरी. ही

वेगळय़ा वाटा : एथिकल हॅकिगचा मार्ग

एथिकल हॅकिंग हा सायबर सुरक्षेतीलच एक भाग आहे. म्हणजेच नैतिकता राखून केलेली घुसखोरी. ही

प्रा. योगेश हांडगे | February 1, 2017 4:48 AM


एथिकल हॅकिंग हा सायबर सुरक्षेतीलच एक भाग आहे. म्हणजेच नैतिकता राखून केलेली घुसखोरी. ही घुसखोरी एखाद्या यंत्रणेची सुरक्षाव्यवस्था कितपत भक्कम आहे, हे तपासून पाहण्यासाठी केली जाते. एखाद्या कंपनीने एखादी नवी प्रणाली विकसित केली असेल तर एथिकल हॅकर ती आधी तपासून पाहतो म्हणजे तो विविध मार्गानी ती प्रणाली भेदण्याचा प्रयत्न करतो. तो जर यशस्वी झाला तर ती प्रणाली सुरक्षित नाही आणि तो अयशस्वी ठरला तर ती प्रणाली सुरक्षित आहे. यामुळे सायबर सुरक्षेची चाचणी यामुळे आपल्याला घेता येते.
हॅकर्स अर्थात घुसखोर काही संगणक आणि इंटरनेटवर नवीन नाहीत.  इतरांच्या संगणकावरून काय काय चालतं, ते कोणत्या संकेतस्थळांवर जातात, काय पाहतात, काय वाचतात, कसे व्यवहार करतात अशा अनेक घटकांवर हे हॅकर्स लक्ष ठेवून असतात. अनेकजण यातून चुकीचा मार्ग निवडतात आणि गुन्हेगारीच्या मार्गाला जातात. एथिकल हॅकर्स मात्र आपल्या कौशल्याचा उपयोग चांगल्या ठिकाणी करून देत असतात. सायबर सुरक्षेच्या दृष्टीने अशा तज्ज्ञ मंडळींची आपल्याला मोठी गरज आहे.
एथिकल हॅकरची गरज
’  संगणक किंवा इंटरनेटवर साठवलेली माहिती, कागदपत्रे सुरक्षितरीत्या साठवण्यासाठी एथिकल हॅकरची गरज लागते.
’  कुणी संगणक आणि माहितीजालावर कायद्याचे उल्लंघन करत असेल, चुकीच्या ठिकाणी घुसखोरी करत असेल तर त्यातील संभाव्य धोके ओळखून खबरदारीचे उपाय एथिकल हॅकर योजतो.
’  एका अर्थी हा संगणकाचा रखवालदारच असतो. कुणीही कितीही क्लृप्त्या लढवल्या तरी संगणक आणि त्यातील यंत्रणेचा बचाव भामटय़ांपासून करणे, हे एथिकल हॅकरचे काम आहे.
अभ्यासक्रम
’  कोर्स इन सर्टिफाइड एथिकल हॅकिंग
’  डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी
’   पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सायबर लॉ.
’ मास्टर ऑफ सायन्स इन सायबर लॉ अ‍ॅण्ड इन्फॉर्मेशन सिक्युरिटी
अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या संस्था

’  इंडियन स्कूल ऑफ एथिकल हॅकिंग
( https://www.isoeh.com//)
’  नॅशनल लॉ इन्स्टिटय़ूट युनिव्हर्सिटी, भोपाळ (www.nliu.ac.in)
’  इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, देवघाट, अलाहाबाद ( www.iiita.ac.in)
’  राजीव गांधी प्रौद्योगिकी विश्वविद्यालय,
केरवा डॅम रोड, भोपाळ  (https://www.rgpv.ac.in)
’  नॅशनल अकादमी ऑफ लीगल स्टडीज अ‍ॅण्ड रिसर्च युनिव्हर्सिटी ऑफ लॉ हैदराबाद
(https://www.nalsar.ac.in/)
’  गुजरात फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी (http://www.gfsu.edu.in/)
प्रा. योगेश हांडगे
First Published on February 1, 2017 4:48 am
Web Title: certified ethical hacker

नोकरीची संधी महाराष्ट्र मेट्रोरेल कॉर्पोरेशन अंतर्गत पुणे व नागपूर येथे सीनिअर ऑफिस असिस्टंट (एचआर) च्या ४

नोकरीची संधी

महाराष्ट्र मेट्रोरेल कॉर्पोरेशन अंतर्गत पुणे व नागपूर येथे सीनिअर ऑफिस असिस्टंट (एचआर) च्या ४

सुहास पाटील,  द.वा. आंबुलकर | February 1, 2017 4:55 AM


’  सेना दल आरोग्य सेवेअंतर्गत पदव्युत्तर अभ्यासक्रमाद्वारे पुणे व इतरत्र संधी-
अधिक माहिती व तपशिलासाठी
सेना दलाच्या एएफएमएसच्या http://www.afmcdg1d.gov.in/
या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०१७.
महाराष्ट्र मेट्रोरेल कॉर्पोरेशन अंतर्गत पुणे व नागपूर येथे सीनिअर ऑफिस असिस्टंट (एचआर) च्या ४ जागा– अधिक माहिती व तपशिलासाठी महाराष्ट्र मेट्रोच्या www.metrorailnagpur.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज जॉइंट जनरल मॅनेजर (एचआर), महाराष्ट्र मेट्रोरेल कॉर्पोरेशन लि. मेट्रो हाउस, २८/२, सी. के. नायडू मार्ग, आनंदनगर, सिव्हिल लाइन्स, नागपूर ४४०००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०१७.
*  ललित कला अकादमीमध्ये सुपरवायझर्सच्या ७ जागा-
अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ७ ते १३ जानेवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली ललित कला अकादमीची जाहिरात पाहावी अथवा अकादमीच्या www.lalitkala.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०१७.
*  माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मुंबई येथे प्रशिक्षणार्थी इंजिनीअर्सच्या जागा-
अर्जदारांनी मेकॅनिकल वा इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमधील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केली असावी व त्यांनी जीएटीई- २०१७ ही पात्रता परीक्षा दिलेली असावी. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २४ ते ३० सप्टेंबर २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली माझगाव डॉक शिपबिल्डर्सची जाहिरात पाहावी अथवा www.mazdock.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०१७.
*  नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कं. लिमिटेडला मुंबई येथे कंपनी सचिवाची आवश्यकता-
अधिक माहिती व तपशिलासाठी नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टीच्या   http://www.ncgtc.in/
या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनी लि. एमएसएमई डेव्हल्पमेंट सेंटर, दुसरा मजला, सी- ११, जी- ब्लॉक, वांद्रे (पूर्व), मुंबई- ४०००५१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०१७.
*  हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. बंगलोर येथे मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल) च्या ७५ जागा-
अर्जदारांनी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स वा सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्याशिवाय जीएटीई- २०१७ ही पात्रता परीक्षा दिलेली असावी. अधिक माहिती व तपशिलासाठी हिंदुस्थान एरोनॉटिक्सच्या www.hal-india.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी २०१७.
*   भारतीय नौकानयन महामंडळ मर्यादित (भारत सरकारचा उपक्रम) मरिन ट्रेिनग इन्स्टिटय़ूट, पवई, मुंबई येथे ‘ग्रॅज्युएट मरिन इंजिनीयर’ ४० उमेदवारांच्या मार्च २०१७ बॅचकरिता ८ महिन्यांचे शोअर बेस्ड ट्रेिनग.
त्यानंतर ६+४ महिन्यांचे बोर्ड ट्रेिनग दिले जाईल.
पात्रता – मेकॅनिकल इंजिनीअिरगमधील पदवी ऑनलाइन अर्ज http://www.shipindia.com / या संकेतस्थळावर ूंcareers/fleetpersonnel ’ या विभागात  दि. ६ फेब्रुवारी २०१७ पर्यंत करावेत.
*  इंडियन आर्मीमध्ये एनसीसी विशेष भरती योजना
एनसीसी – पुरुष – ५० पदे. एनसीसी – महिला – ४ पदे. पात्रता – किमान ५०% गुणांसह पदवी (कोणत्याही शाखेतील). पदवीच्या अंतिम वर्षांतील उमेदवार पात्र  एनसीसीमध्ये बी ग्रेड सर्टििफकेट  २ वर्षांचे ट्रेिनग. वयोमर्यादा – १९ ते २५ वष्रे. (उमेदवाराचा जन्म २ जुल १९९२ ते
१ जुल १९९८ दरम्यानचा असावा.)
उंची – पुरुष – १५७.५ सें.मी.,
महिला – १५२ सें.मी.
शारीरिक क्षमता – (१) २.४ कि.मी. १५ मिनिटांत धावणे, (२) २५ सीटअप्स, (ग्ग्ग्) १३ पुशअप्स, (ग्न्) ६ चिनअप्स, (न्) ३-४ मीटर दोरावर चढणे. निवड पद्धती – पात्रता परीक्षेतील गुणांनुसार एसएसबी मुलाखतीसाठी उमेदवार निवडले जातील. उमेदवारांनी एसएसबी सिलेक्शन सेंटर यापकी एक निवडावे. अलाहाबाद, भोपाळ, बंगलोर,
कापुरथाला (पंजाब).
ट्रेिनग – स्टायपेंड रु. २१,०००/- दरमहा. ऑफिसर्स ट्रेिनग अ‍ॅकॅडमी, चेन्नई येथे ४९ आठवडय़ांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर लेफ्टनंट पदावर नियुक्ती १० वर्षांसाठी. ६ महिन्यांचा प्रोबेशन कालावधी.
ऑनलाइन अर्ज www.joinindianarmy.nic.in
या संकेत स्थळावर दि. १५ फेब्रुवारी २०१७ (सकाळी १०.00) पर्यंत करावेत.
वेतन – रु. ८०,०००/- सीटीसी. आर्मी ग्रुप इन्शुरन्स रु. ७५लाख.
संपर्कासाठी दूरध्वनी –
०११-२६१७३२१५ (वेळ दु. २ ते ५)