Wednesday, July 3, 2019

एमपीएससी मंत्र : गट ‘क’ संयुक्त पूर्वपरीक्षा सामान्य विज्ञान प्रश्न विश्लेषण

एमपीएससी मंत्र : गट ‘क’ संयुक्त पूर्वपरीक्षा

सामान्य विज्ञान प्रश्न विश्लेषण

सामान्य विज्ञान प्रश्न विश्लेषण
रोहिणी शहा
शालेय जीवनात सामान्य विज्ञान हा बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी नावडता व त्यामुळे अवघड जाणारा विषय असतो. मात्र स्पर्धा परीक्षांमध्ये विषय आवडता / नावडता कसाही असला तरी त्याची तयारी ठरावीक दृष्टिकोनाने आणि अभ्यासक्रमाच्या चौकटीमध्येच करायची असते. आवडत्या विषयासाठी जास्त आणि नावडत्या विषयासाठी कमी वेळ देणे असे शाळकरी प्राधान्य इथे चालत नाही. त्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून तयारी करणे आवश्यक आहे. व्यावसायिक तयारीसाठी आवश्यक आहे, मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण. सामान्य विज्ञानाच्या गट ‘क’ सेवा पूर्वपरीक्षेच्या २०१८च्या प्रश्नांचे विश्लेषण या लेखामध्ये करण्यात येत आहे.
प्रश्न – जर दोन रोध एकसर जोडणीने जोडले तर त्यांचा परिणामी रोध ४५ ओहम होतो आणि तेच रोध जर समांतर जोडणीने जोडले तर त्यांचा परिणामी रोध १० ओहम होतो तर त्या रोधांच्या किमती किती?
१) १० ओहम आणि ४५ ओहम
२) १० ओहम आणि ३० ओहम
३) १५ ओहम आणि ३० ओहम
४) १० ओहम आणि ४५ ओहम
प्रश्न – पांढऱ्या रंगाचे प्रकाशकिरण प्रिझममधून गेले असता, त्याच्यात समाविष्ट असणाऱ्या रंगांच्या किरणांमध्ये किंवा तरंगलांबीमध्ये वेगवेगळे होतात. या दृक् चमत्काराला ——– म्हणतात.
१) प्रकाशाचे परावर्तन
२) प्रकाशाचे अपवर्तन
३) प्रकाशाचे अपस्करण
४) प्रकाशाचे विवर्तन
प्रश्न – प्रदीर्घ आवर्तसारणीत ———– या दोन मूलद्रव्यांमध्ये विकर्ण संबंध आढळतो.
१) B आणि Si
२) Li  आणि Mg
३) Be आणि Al’
४) वरीलपैकी सर्व
प्रश्न – खालीलपैकी कोणत्या संघात इंद्रिय पातळीचे संघटन आढळते?
१) पोरीफेरा
३) आदिजीव (प्रोटोझोआ)
३) चपटे कृमी ( प्लॉटीहेल्मिंथस)
४) सिलेंटेराटा
प्रश्न – मॉलिस, इन्कस आणि स्टॉप्स यांना असेसुद्धा म्हणतात.
१) इयर ऑस्सिकल
२) ऑडिटरी वेसिकल्स
३) बोनी इयर
४) ऑडिटरी बोन्स
प्रश्न – बंची टॉप हा रोग मुख्यत: कोणत्या पिकांमध्ये आढळतो?
१) पपई २) लिंबू
३) ऊस ४) केळी
प्रश्न – यू. आय. पी. भारतामध्ये १९८५ सालापासून आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने राबविण्यास सुरुवात केली आहे. खालीलपैकी कोणत्या पर्यायाचे संक्षिप्त रूप आहे?
१) युनिव्हर्सल इम्म्युनायझेशन प्रोग्राम
२) युनिक आयडेंटिफिकेशन प्रोग्राम
३) युनायटेड इंडियन पॉलिसी
४) वरीलपैकी कोणताही पर्याय नाही
प्रश्न – अन्नावर १२ ड ही प्रक्रिया  —
१) उष्णतेची प्रक्रिया जी १२ जीवाणू मारते.
३) प्रक्रिया करून अन्न साठविण्याच्या बारा पद्धती
३) क्लॉस्ट्रिडियम बॉटय़ुलिनमच्या अंतर्गोलाच्या संख्येत १०१२ पटीने कपात होते.
४) कोणतीही प्रक्रिया जी अधिक तापमानाला जिवंत राहणाऱ्या जंतूंचा नाश करते.
प्रश्न – रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत फायब्रिनोजेनचे रूपांतर फायब्रिनमध्ये होते.
१) हा रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमधील शेवटचा टप्पा आहे व यात अनेक घटकांचा समावेश आहे.
२) फायब्रिनोजेन फुटलेल्या रक्तबिंबिकेतून बाहेर टाकले जाते.
३) याचा संबंध उच्च रक्तदाबाशी असल्याने रोहिणीच्या भित्तींना इजा पोहोचू शकते.
४) हिमोफीलीया हा आजार असलेल्या व्यक्तींमध्ये हा त्रास होऊ शकतो.
वरील प्रातिनिधिक प्रश्नांवरून विज्ञानाच्या तयारीबाबत पुढील बाबी समजून घ्याव्या लागतील.
* सर्वाधिक प्रश्न जीवशास्त्र आणि आरोग्यशास्त्र असे एकत्रितपणे विचारण्यात आले आहेत.
* आरोग्य, रोग व त्यांचे उपचार, वनस्पतींचे वर्गीकरण व त्या त्या वर्गाची वैशिष्टय़े यांवर भर जास्त आहे.
* मानवी शरीररचनाशास्त्र, शेतीशी संबंधित वनस्पतीशास्त्र यावरही प्रश्न विचारलेले आहेत.
* भौतिकशास्त्रातील प्रकाश, गुरुत्व व विद्युत घटकांवरील समीकरणे विचारण्यात आली आहेत. या गणितांची काठीण्य पातळी ही दहावीच्या स्तरावरची आहे. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात परीक्षेच्या तयारीसाठी सोडवायच्या गणितांचा सराव तयारीसाठी पुरेसा आहे. या घटकावर संकल्पनात्मक प्रश्नही विचारण्यात आला आहे.
* रसायनशास्त्रावर सर्वात कमी प्रश्न विचारले असून यामध्ये रेणूची रचना व आवर्तसारणी या घटकावर प्रश्न विचारले आहेत.
सन २०१८ मध्ये विचारलेल्या प्रश्नांचे स्वरूप व घटकनिहाय संख्या आणि प्रश्नांची दिशा या वर्षी बदलूही शकतो. त्यामुळे तयारी करताना तिन्ही उपघटकांमधील संकल्पना व्यवस्थित समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर भौतिक व रसायनशास्त्र या दोन्हींमधील समीकरणे व गणिते सोडविण्याचा
सराव आवश्यक आहे. तर जीवशास्त्रामध्ये सजीवांचे वर्गीकरण, उदाहरणे, वैशिष्टय़े यांचा टेबलमध्ये नोट्स काढून अभ्यास व्यवहार्य आहे. मानवी आरोग्यशास्त्र हा घटक नेहमीच अपेक्षित व महत्त्वाच्या घटकांमध्ये समाविष्ट असणार आहे. त्यामुळे आधी समजून घेणे व मग टेबलमध्ये नोट्स काढणे अशा प्रकारे याची तयारी करणे आवश्यक आहे.
First Published on April 17, 2019 3:53 am
Web Title: mpsc exam 2019 mpsc exam preparation tips in marathi 2

No comments:

Post a Comment