Thursday, July 4, 2019

प्रश्नवेध यूपीएससी : पर्यावरणविषयक प्रश्न आजच्या लेखात आपण पर्यावरण या विषयावरील प्रश्नांचा अभ्यास करू या.

प्रश्नवेध यूपीएससी : पर्यावरणविषयक प्रश्न

आजच्या लेखात आपण पर्यावरण या विषयावरील प्रश्नांचा अभ्यास करू या. 

लीना भंगाळे
नमस्कार विद्यार्थी मित्रहो,
प्रश्नवेधच्या मागील लेखात आपण अर्थशास्त्र या विषयासंबंधी चर्चा केली व त्यावरील प्रश्न पाहिले. आजच्या लेखात आपण पर्यावरण या विषयावरील प्रश्नांचा अभ्यास करू या.
*     प्र. १) राष्ट्रीय हरित लवादा (एनजीटी) संदर्भात पुढील विधानांचा विचार करा.
१)     पर्यावरण संरक्षण कायदा (१९८६) नुसार ‘एनजीटी’ची स्थापना झाली आहे.
२)     दिवाणी संहितेने अध्याहृत केलेल्या प्रक्रियेने कामकाज करण्यास लवाद बांधील नाही.
पुढीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहेत ?
१) फक्त १  ब) फक्त २  क) १ व २ दोन्हीही  ड) १ व २ दोन्हीही नाही.
उत्तर : ब) फक्त २
स्पष्टीकरण : राष्ट्रीय हरित लवादाची स्थापना राष्ट्रीय हरित लवाद कायदा (२०१०) नुसार झाली आहे. पर्यावरण संरक्षण, वने व इतर नैसर्गिक साधनांच्या जतनासंदर्भातील प्रकरणांचा प्रभावी पद्धतीने व तात्काळ निपटारा व्हावा, या हेतूने त्याची स्थापना करण्यात आली. १९०८च्या दिवाणी संहितेने अध्याहृत केलेल्या प्रक्रियेने कामकाज करण्यास लवाद बांधील नाही. परंतु, नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांनुसार त्याने काम करणे अपेक्षित आहे.
*    प्र. २) ग्लोबल एन्व्हायरन्मेंटल फॅसिलिटी’ (जीईएफ) पुढीलपैकी कुठल्या परिषदांसाठी अर्थपुरवठा करण्याचे काम करते?
१)     कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सटिी (सीबीडी)
२)     युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज (युएनएफसीसीसी)
३)     स्टॉकहोम कन्व्हेन्शन ऑन पर्सस्टिंट ऑर्गनिक पोल्युटंट्स (पीओपी)
४)     युएन कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डिसर्टििफकेशन (यूएनसीसीडी)
५)     मिनामाटा कन्व्हेन्शन ऑन मक्र्युरी
पर्याय :
अ) फक्त १, २ व ४                  ब) फक्त १, ४ व ५
क) फक्त १ व २              ड) वरीलपैकी सर्व
उत्तर : ड) वरीलपैकी सर्व
स्पष्टीकरण : १९९२च्या राष्ट्रीय वसुंधरा परिषदेच्या पूर्वसंध्येला ‘ग्लोबल एन्व्हायरन्मेंटल फॅसिलिटी’ (जीईएफ) ची स्थापना करण्यात आली. पृथ्वीला भेडसावणाऱ्या कळीच्या पर्यावरणीय प्रश्नांवर तोडगा काढण्याच्या हेतूने तिची स्थापना झाली.
तेव्हापासून, जीईएफ’ने अनुदानाच्या स्वरूपात १७.९ बिलियन अमेरिकन डॉलर्सचा निधी पुरवठा केला आहे. तसेच, त्याशिवाय १७० देशांतील ४५०० प्रकल्पांसाठी सहयोगी तत्त्वावर अर्थसहाय्य करण्यासाठी अतिरिक्त ९३.२ बिलियन अमेरिकन डॉलर्सचा निधी गोळा केला आहे. आजमितीस, ‘जीईएफ’ ही १८३ देश, आंतरराष्ट्रीय संस्था, नागरी समाज संघटना आणि खासगी क्षेत्राची आंतरराष्ट्रीय भागीदारी असलेली संस्था असून ती जागतिक पर्यावरणीय संकटांचे निराकरण करण्याचे काम करते.
*    प्र. ३) पुढीलपैकी कोणते संरक्षित क्षेत्र जंगली पाणम्हशींचा नैसर्गिक अधिवास आहे?
१) काली व्याघ्र प्रकल्प
२) बालपक्राम राष्ट्रीय उद्यान
३) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान
४) सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान
५) मानस व्याघ्र प्रकल्प
पर्याय :
अ) फक्त १, ३ व ५
ब) फक्त२, ४ व ५
क) फक्त २, ३ व ५                  ड) फक्त २, ३ व ४
उत्तर : क) फक्त २, ३ व ५
स्पष्टीकरण : भारतात जंगली पाणम्हशींचा अधिवास केवळ काझीरंगा, मानस आणि दिब्रू-साईखोवा राष्ट्रीय उद्याने आणि आसाममध्ये काही विखुरलेल्या परिसरांत आढळतो. तसेच, अरुणाचल प्रदेशातल्या देिरग मेमोरियल अभयारण्यातही त्या आढळतात. आययूसीएनच्या लाल यादीत त्यांचा धोक्यातील प्रजाती म्हणून समावेश करण्यात आला आहे.
*    प्र. ४) ‘मराकेक पार्टनरशिप फॉर ग्लोबल क्लायमेट अ‍ॅक्शन’चे उद्दिष्ट पुढीलपैकी कोणते विधान सुस्पष्टरीत्या अधोरेखित करते?
अ) विकसित राष्ट्रांना वातावरण बदलासंदर्भातील आपली ऐतिहासिक जबाबदारी स्वीकारावयास लावणे.
ब)     वातावरण अनुकूलतेसंदर्भातील कार्यक्रमांमध्ये अधिक सहभाग घेण्यास विकसनशील राष्ट्रांना भाग पाडणे.
क) विविध सरकारे, उद्योग आणि गुंतवणूकदारांमध्ये सहकार्यास उत्तेजन देऊन वातावरण बदलावर उपाय शोधणाऱ्या पॅरिस कराराच्या अंमलबजावणीस हातभार लावणे.
ड) वरीलपैकी नाही
उत्तर : क) विविध सरकारे, उद्योग आणि गुंतवणूकदारांमध्ये सहकार्यास उत्तेजन देऊन वातावरण बदलावर उपाय शोधणाऱ्या पॅरिस कराराच्या अंमलबजावणीस हातभार लावणे.
स्पष्टीकरण : ‘मराकेक पार्टनरशिप फॉर ग्लोबल क्लायमेट अ‍ॅक्शन’ विविध सरकारे, उद्योग आणि गुंतवणूकदारांमध्ये सहकार्यास उत्तेजन देऊन वातावरण बदलावर उपाय शोधणाऱ्या पॅरिस कराराच्या अंमलबजावणीस हातभार लावते. पॅरिस कराराने निर्धारित केलेली दीर्घ पल्ल्याची उद्दिष्टे व २०३० च्या शाश्वत विकासाच्या रूपरेषेअंतर्गत आखलेल्या ध्येयांच्या चौकटीत या कृतीकार्यक्रमाची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे.
*    प्र. ५) ‘प्रोजेक्ट एलिफंट’बाबत खालीलपैकी कुठली विधाने चुकीची आहेत?
१) मुक्त जंगली हत्तींच्या सुरक्षिततेकरिता केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राज्यांना मदत करण्यासाठी १९७३मध्ये ‘प्रोजेक्ट  एलिफंट’ सुरू करण्यात आला.
२) याचा भर केवळ जंगली हत्तींच्या संरक्षणावरच असून माणसाळलेल्या हत्तींना यात स्थान नाही.
३) २०१८मध्ये मिझोराम मधील सिंगफण हत्ती प्रकल्पाला भारताचा तिसावा
हत्ती प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले.
पर्याय :
अ) फक्त १ व २
ब) फक्त २ व ३
क) फक्त १ व ३
ड) वरीलपैकी सर्व
उत्तर : ड) वरीलपैकी सर्व
स्पष्टीकरण : १९९२ मध्ये ‘प्रोजेक्ट एलिफंट’ सुरू करण्यात आला. त्यानुसार केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राज्यांना मुक्त जंगली हत्तींच्या संरक्षणासाठी व या हत्तींच्या निश्चित करण्यात आलेल्या विविध प्रजातींचे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात अस्तित्व दीर्घकाळ टिकून रहावे, यासाठी मदतीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, त्याचा जंगली आणि माणसाळलेल्या अशा दोन्हीही हत्तींच्या संरक्षणावर भर आहे. २०१८मध्ये नागालँडमधील सिंगफण हत्ती प्रकल्पाला भारताचा तिसावा हत्ती प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले. ईशान्येतील राज्यांमधील हा एक महत्त्वाचा हत्ती प्रकल्प आहे. कारण, मोठा जंगलपट्टा हत्तींच्या मोठय़ा कळपांचा अधिवास असणाऱ्या आसामच्या अभयपूर प्रकल्पानजीकचे स्थान यामुळे सिंगफणचे महत्त्व अधोरेखित होते.
First Published on May 14, 2019 3:33 am
Web Title: ias question paper question paper for upsc exam practice

No comments:

Post a Comment