Monday, July 8, 2019

करिअर मंत्र मला नेट/सेटच्या तयारी व अभ्यासाबद्दल माहिती द्यावी. - नागेश ऐवले

करिअर मंत्र

मला नेट/सेटच्या तयारी व अभ्यासाबद्दल माहिती द्यावी. - नागेश ऐवले

|| डॉ. श्रीराम गीत
  • मला नेट/सेटच्या तयारी व अभ्यासाबद्दल माहिती द्यावी. – नागेश ऐवले
आपण आपल्या पदवीविषयी काहीच माहिती दिलेली नाहीत. त्यामुळे सविस्तर उत्तर देऊ शकत नाही. एका वाक्यात सांगायचे तर पदव्युत्तरसाठीचा सखोल अभ्यासक्रम या परीक्षांसाठी पायाभूत धरला जातो.
  • माझ्या मुलाने बी.कॉम. करून एका संस्थेतून गेम डिझायनिंगचा कोर्स केला. आता तो एका गेमिंग कंपनीत इंटर्नशिप करत आहे. यानंतर त्याने काय करावे? भारतात वा परदेशात काय संधी आहेत? – संजय बावधनकर
गेमिंग, अ‍ॅनिमेशन, व्हीएफएक्स यामध्ये केवळ कोर्स करण्याला महत्त्व नसून अनुभवाला आहे. तो सहसा एक वा दोन प्रोजेक्ट पूर्ण करण्याचा लागतो. किती महिने वा किती वर्षे असा गणला जात नाही. भारतात असो वा परदेशात, या अनुभवानंतर नोकरीतील बदलातून प्रगती होत जाते किंवा अ‍ॅडव्हान्स्ड कोर्ससाठीची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होण्याची शक्यता निर्माण होते.
निव्वळ परदेशी पदवीसाठी तीस-चाळीस लाख रुपयांचा खर्च करून फारसे हाती काही लागत नाही हे या क्षेत्रात खूप वाव आहे असे समजून शिरणाऱ्या अनेकांना चांगले कळलेले आहे.
भारतीय गेमिंग इंडस्ट्री सध्या जेमतेम केजीमध्ये आहे. याला सन्माननीय अपवाद आहेत. तर परदेशी कंपन्यांचे पदव्युत्तर शिक्षण कधीचे संपले आहे. चीन साऱ्यांनाच व्यापून आहे.
हे सर्व लक्षात घेऊन करिअरचे नियोजन करावे. आपले चिरंजीव बी.कॉम. होऊन त्यात गेले असल्याने कमी धोका संभवतो हेही नमूद करत आहे. त्याने किमान तीन वर्षे तरी अनुभव घ्यावा व नंतर निर्णय घ्यावा.
  • मला सशस्त्र पोलीस दलात जायचे आहे. माझे बीए झाले आहे. परीक्षांची तयारी कशी करावी? – दानिश शेख
नोकरीची संधी, ‘करिअर वृत्तान्त’ व ‘लोकसत्ता’मधील विविध करिअरच्या संधींचे सदर याचे वाचन नियमित सुरू करावे. सशस्त्र पोलीस दलासाठी शारीरिक क्षमता हा घटक महत्त्वाचा असतो. आपले वय, वजन, उंची व या क्षमता याची सांगड घालणेही गरजेचे आहे. पोलीस भरतीचे निवेदन ‘रोजगार समाचार’मध्ये वाचायला मिळेल.
First Published on June 5, 2019 1:45 am
Web Title: loksatta career mantra 35

No comments:

Post a Comment