Wednesday, April 3, 2019

मेंदूशी मैत्री : ग्रे मॅटरशी गाठ! मोबाइल फोन नावाची एकविसाव्या शतकातली जादू आपल्या हातात आली आाणि त्याचं व्यसनही लागायला लागलं.

मेंदूशी मैत्री : ग्रे मॅटरशी गाठ!

मोबाइल फोन नावाची एकविसाव्या शतकातली जादू आपल्या हातात आली आाणि त्याचं व्यसनही लागायला लागलं.

श्रुती पानसे
मोबाइल फोन नावाची एकविसाव्या शतकातली जादू आपल्या हातात आली आाणि त्याचं व्यसनही लागायला लागलं. मोबाइलच्या अतिवापरामुळे लोकांना विविध मानसिक आजार होत आहेत, ही बातमी आता बातमी नाही राहिली!
जे लोक अनेक तास मोबाइल फोनवर वेळ घालवतात, त्यांच्यात नैराश्य निर्माण होतं. घरात भांडणं होतात आणि ती घटस्फोटापर्यंत जातात, लहान मूल भूक लागून आईला खायला मागतं पण आई कँडी क्रशच्या नव्या लेव्हल्स गाठण्यात मग्न आहे, एकमेकांना माणसं वेळ देत नाहीत, एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेतात. या सगळ्या आपल्यासाठी ‘भलत्याच’ आणि नव्या गोष्टी आहेत. एक लहानसं यंत्र मानवी मेंदूला किती खेळवतंय!
काम आणि विरंगुळा यातला फरक ज्यांना कळतो आणि त्याचं प्रमाण किती असायला पाहिजे हे ज्यांना कळतं, त्यांना या व्यसनाचा काहीच धोका नाही. पण ज्यांच्या नकळत हे प्रमाण व्यस्त होतं, विरंगुळ्यासाठी किती वेळ द्यायचा याचं भान सुटतं, ते धोक्याच्या पातळीपर्यंत येऊन ठेपतात. व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दारू, सिगरेट अशा व्यसनांमध्ये मोबाइलचं ज्यांना व्यसन लागलं आहे, अशा व्यक्तींची भर पडते आहे. ज्याप्रमाणे अल्कोहोलचा परिणाम मेंदूवर दिसतो. अल्कोहोल मिळालं नाही तर माणसं बेचन होतात. तसंच मोबाइल मिळाला नाही, चाìजग नसेल, पॉवर बँक हाताशी नसेल, तर माणसं अस्वस्थ- बेचन होतात. एखाद्या व्यसनापासून मुक्तता करायचा प्रयत्न केला असता जशी ‘व्रिडॉवल’ची लक्षणं दिसतात. तशीच इथेही दिसून येतात. आपल्या उपयोगी पडणारी सर्वच उपकरणं हवी आहेत, पण त्याची सवय लागायला नकोय. डोळ्यांच्या आरोग्यापासून ते उडालेल्या झोपेपर्यंत हे परिणाम दिसून येतात. मेंदूतला ग्रे मॅटर म्हणजेच विचार करणारा भाग असतो. आपल्या दैनंदिन कामांमध्ये सुसूत्रता आणणं, योग्य पद्धतीने ती पार पाडणं, निर्णय घेणं यामध्ये ग्रे मॅटरचा मोठा सहभाग असतो. कायम व्यसनात अडकलेल्या माणसांच्या मेंदूतील ग्रे मॅटरवर परिणाम झालेला असतो. तोच प्रकार इथे – मोबाइलच्या व्यसनातही संशोधकांना आढळून आला आहे. ग्रे मॅटरचा भाग संकुचित होत असलेला संशोधकांना आढळलं आहे. ही गोष्ट भावनिक बुद्धिमत्तेसाठी योग्य नाही. याचा परिणाम त्या माणसाच्या एकूण भावनिक आरोग्यावर आणि त्यातूनच पुढे शारीरिक आरोग्यावर होऊ शकतो.
contact@shrutipanse.com
या सदराचे नाव व लेखिकेचे नाव, ईमेल यांऐवजी ५ फेब्रुवारीच्या अंकात चुकीची माहिती छापली गेली होती, याबद्दल दिलगीर आहोत.
First Published on February 6, 2019 1:12 am
Web Title: article about gray matter

No comments:

Post a Comment