Wednesday, April 3, 2019

मेंदूशी मैत्री : संगीतमय फेकलेल्या वस्तूला मिळालेली गती हा दोन गतींचा परिणाम असतो.

मेंदूशी मैत्री : संगीतमय

फेकलेल्या वस्तूला मिळालेली गती हा दोन गतींचा परिणाम असतो.

डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com
छान संगीत आपल्या मेंदूत अशा लहरी निर्माण करतं, की ज्यामुळे आपल्याला आनंद होतो. अगदी लहान बाळसुद्धा लक्षपूर्वक संगीत ऐकत असतं. त्यातून ते आनंदच मिळवत असतं. आपण घरात असताना, वर्गात असताना कुठेही संगीताची एखादी सुरावट ऐकू आली की आपलं लगेच लक्ष जातं. आणि ते ऐकण्याचा प्रयत्न आपण नकळतच करतो. कारण हेच की, संगीत आपल्याला मुळापासूनच आवडत असतं.
हे संगीत आपल्या भावना हव्या तशा वळवू शकतं. जसं, एखादं संगीत आपल्याला गुणगुणायला लावतं, तर एखाद्या भीतीदायक सिनेमात वापरलेलं नुसतं संगीतसुद्धा आपल्या मनात भीती निर्माण करतो. एखादं गाणं असं असतं की ज्यामुळे आपण हळवे होतो. ढोल- लेझीमचा आवाज तर आपल्याला एका वेगळ्याच वातावरणात घेऊन जातो. कोणत्याही प्रकारचं चांगलं संगीत, चांगलं गाणं, चांगलं वाद्यवादन ऐकणं हे केव्हाही मेंदूला पोषक असतं.
संगीत आनंद निर्माण करतं, म्हणून तर अभ्यासात संगीताचा वापर जरूर असावा, हे आपण लक्षात घ्यायला हवं. अभ्यासाला बसताना किंवा अभ्यास चालू असतानाही मंद संगीत लावलेलं केव्हाही चांगलंच. मात्र हे संगीत कोणतं असावं यावरून घरात वाद होऊ  शकतात. अशा वेळी वाद्यवादन, अभिजात संगीतातल्या सुरावटी ऐकणं चांगलं. घरात लहान मुलं असतील तर चांगल्या चाली असलेली बालगीतं ऐकलेली चांगलीच.
मात्र आपल्याला याचाही अनुभव असेल की कर्कश गाणी, खूप मोठय़ा आवाजात लावलेली गाणी आपल्या मनात आनंद निर्माण करत नाहीत. तर त्याउलट असं संगीत लवकरात लवकर बंद व्हावं असं आपल्याला वाटतं.
संगीत हे मेंदूच्या पेशींवर सकारात्मक परिणाम करत असतं. ज्या वेळेस आपण स्वत: कोणत्याही वाद्यातून एखादी सुरेल सजावट वाजवत असतो, तेव्हा आपल्या डाव्या आणि उजव्या मेंदूतली जास्तीतजास्त केंद्रं उद्दीपित झालेली असतात. वाद्यवादनामुळे मेंदूला चालना मिळत असते. तो एकप्रकारे मेंदूचा व्यायाम आहे.
एखादं उत्तम गाणं ऐकणं, गाणं म्हणणं, वाद्यवादन ऐकणं, नृत्य करणं या संगीताशी संबंधित गोष्टी मेंदूमध्ये आनंदाचं वातावरण तयार करतात. दिवसातून काही काळ जरी आपण उत्तम संगीताच्या सान्निध्यात राहिलो, तरी मेंदूला त्यामुळे गती मिळते.
First Published on January 30, 2019 12:01 am
Web Title: music and the brain

No comments:

Post a Comment