Monday, December 17, 2018

शब्दबोध मूळ फारसी शब्द 'बर्तरफ्'. ज्याचा अर्थ आहे कामावरून, पदावरून पदच्यूत करणे, काढून टाकणे, बाजूस करणे.

शब्दबोध

मूळ फारसी शब्द 'बर्तरफ्'. ज्याचा अर्थ आहे कामावरून, पदावरून पदच्यूत करणे, काढून टाकणे, बाजूस करणे.


डॉ. अमृता इंदुरकर
बडतर्फ
‘अमक्या-अमक्या कारणाने एखाद्याला बडतर्फ केले’ अशा पद्धतीची वाक्ये आपण वर्तमानपत्रात अनेकदा वाचतो. मूळ फारसी शब्द ‘बर्तरफ्’. ज्याचा अर्थ आहे कामावरून, पदावरून पदच्यूत करणे, काढून टाकणे, बाजूस करणे. ऐतिहासिक लेख संग्रहांमधे ‘मुरादखान याची फौज अगदी बर्तर्फ केली’ असा उल्लेख आहे. शिवाय दिल्ली येथील मराठय़ांची राजकारणे या लेखसंग्रहामधे ‘जन्रेल इष्टवरिस यास हिंदुस्थानचे फौजेचा बहालीबर्तर्फीचा मुख्त्यार केला आहे.’ म्हणजे जन्रेलला कुणाला बहाली द्यायची व कुणाला बर्तर्फी द्यायची त्यासाठी नेमला आहे.
पाखर
एखाद्यावर मायेची पाखर घालणे असा वाक्प्रयोग आपण नेहमीच करतो. पाखर घालणेचा संबंध पक्ष्याच्या पंखांशी जोडून हा वाक्प्रयोग तयार झाला. पाखर हा शब्द मूळ कोणत्या भाषेतून आला याबाबत निश्चिती नाही. संस्कृत, प्राकृत, िहदी यांमधून आला असावा असे भाषा अभ्यासकांचे मत आहे. कारण हिंदीत ‘पांखी’ म्हणजे पक्षी. पक्षी रात्रीच्या वेळी आपल्या पिलांना पंखाखाली घेतात किंवा कोंबडी संरक्षणासाठी म्हणून पिलांना पंखाखाली घेते त्यावरून पंख – पाखरू – पाखर असा संबंध जोडता जोडता पाखर घालणे शब्दप्रयोग रूढ झाला. ‘पाखर’चा दुसरा अर्थ आहे;  हत्तीचे किंवा घोडय़ाचे चिलखत. युद्धामध्ये हत्ती, घोडे यांच्या शरीराला इजा होऊ नये म्हणून संरक्षणार्थ जे लोखंडी चिलखत, झूल घालतात त्याला देखील पाखर म्हणतात. दोन्ही अर्थामधे संरक्षण करणे हा समान अर्थ दिसतो त्यामुळे त्याच अर्थावरून पाखर घालणे हा वाक्प्रयोग मराठीत रूढ झाला हे निश्चित.
amrutaind79@gmail.com
First Published on October 20, 2018 3:17 am
Web Title: article about vocabulary words 6

No comments:

Post a Comment