Tuesday, June 25, 2019

एमपीएससी प्रश्नवेध : भूगोलावरील सराव प्रश्न भूगोलावरील सराव प्रश्न

एमपीएससी प्रश्नवेध : भूगोलावरील सराव प्रश्न

भूगोलावरील सराव प्रश्न

(संग्रहित छायाचित्र)

रोहिणी शहा
१. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळचे ९.०० वाजले आहेत. तर ९४ अंश पूर्व रेखावृत्त असणाऱ्या नागालँडची राजधानी मणिपूरमध्ये स्थानिक वेळ कोणती असेल?
१)९.३८एएम
२) ९.५० एएम
३) ९.४६ एएम
४) ९.२२एएम
२. पुढीलपकी अयोग्य विधान निवडा.
१)    विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना      समुद्राची क्षारता कमी होते.
२)    समुद्राच्या खोलीनुसार त्याची क्षारता वाढत जाते.
३)    उष्ण सागरी प्रवाह असलेल्या ठिकाणी समुद्राची क्षारता अधिक असते.
४)    उत्तर गोलार्धातील समुद्राची क्षारता दक्षिण गोलार्धामधील समुद्राच्या क्षारतेपेक्षा आधिक असते.
३. अचूक पर्याय निवडा.
अ) ‘सर क्रीक’ या सामद्रधुनीवरून भारत व पाकिस्तान या दरम्यान वाद सुरू आहे.
ब) ‘सर क्रीक’ सामुद्रधुनीचे स्थानिक नाव बाणगंगा असे आहे.
क) ‘सर क्रीक’ सामुद्रधुनी पाकिस्तान व भारतातील गुजरात राज्याच्या दरम्यान आहे.
१) केवळ अ
२) अ, ब आणि क
३) केवळ अ आणि ब
४) सर्व चूक.
४. जगातील क्षेत्रफळाच्या क्रमवारीनुसार पुढीलपकी कोणत्या देशाचा क्रमांक भारताच्या आधी लागत नाही?
१) ब्राझील          २) चीन      ३) ऑस्ट्रेलिया ४) कॅनडा
५. बरोबर नसलेला पर्याय निवडा
१)    ग्रामीण-ग्रामीण स्थलांतरामध्ये स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा अधिक आहे.
२)    नागरी-नागरी स्थलांतरामध्ये नियमांची संख्या पुरुषांच्या संख्येपक्षा अधिक आहे.
३)    ग्रामीण-नागरी स्थलांतरामध्ये पुरुषांची संख्या स्त्रियांच्या संख्येपेक्षा अधिक आहे.
४)    ग्रामीण-ग्रामीण स्थलांतरितांपेक्षा नागरी-नागरी स्थलांतरितांची संख्या अधिक आहे.
६. पुढीलपकी अचूक विधानांचा पर्याय निवडा.
अ) राष्ट्रीय महामार्ग शक्यतो लोहमार्गास समांतर असतात.
ब) राष्ट्रीय महामार्ग ४ बी व ४ सी महाराष्ट्रामध्ये सुरू होऊन महाराष्ट्रामध्येच संपतात.
क) राष्ट्रीय महामार्ग ४सी हा महाराष्ट्रातील सर्वात छोटा महामार्ग आहे.
पर्याय –
१) फक्त क     २) फक्त अ
३) फक्त ब      ४) वरीलपकी सर्व
७. पुढीलपकी योग्य विधान निवडा.
अ)    सर्व रेखावृत्ते विषुववृत्ताला काटकोनात छेदतात.
ब) दोन अक्षांशांमधील अंतर सर्वत्र सारखेच असते.
क) ४५ अंश अक्षवृत्तावरील पृथ्वीच्या परिवलनाचा वेग विषुववृत्तावरील परिवलनाच्या वेगाच्या निम्मा असतो.
पर्याय –
१) फक्त ब, क     २) अ, क,
३) अ, ब, क        ४) वरीलपकी नाही.
८. महाराष्ट्रातील पुढीलपकी कोणत्या जिल्हय़ामध्ये अल्लापल्ली वने आढळतात?
अ) गोंदिया          ब) गडचिरोली
क) यवतमाळ     ड) चंद्रपूर    इ) भंडारा
पर्याय –
१) अ, ब, ड         २) केवळ ब
३) ब आणि ड       ४) वरीलपकी सर्व
९. पुढील वैशिष्टय़ांवरून मृदेचा प्रकार ओळखा.
अ) अधिक पर्जन्य व आद्र्रता असलेल्या भागामध्ये या मृदेची निर्मिती होते
ब) तिच्यामध्ये ह्यूमसचे प्रमाण अधिक असते.
क) तिचा सामू आम्लयुक्त असतो.
पर्याय
१) दलदलीची मृदा    २) काळी मृदा
३) क्षारयुक्त मृदा     ४) तांबडी मृदा
उत्तरे व स्पष्टीकरणे
१.  योग्य पर्याय क्र.(३) लगतच्या दोन रेखावृत्तादरम्यान चार मिनिटे इतके अंतर असते. भारतीय प्रमाणवेळ ही ८२.५ पूर्व रेखावृत्त इतकी आहे. म्हणून या दोन रेखावृत्तांतील फरक ९४ – ८२.५ = ११.५ अंश. सलगच्या दोन रेखावृत्तांतील वेळेमध्ये ४ मिनिटांचा फरक असतो, म्हणून ११.५ ७ ४ = ४६ मिनिटे इतका वेळेतील फरक. मणिपूर पूर्वेकडे असल्याने स्थानिक वेळ प्रमाण वेळेच्या ४६ मिनिटे पुढे असेल.
२.  योग्य पर्याय क्र.(१) विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जात असताना समुद्राची क्षारता वाढते, कारण विषुववृत्तावरील पावसाचे प्रमाण जास्त असते.
उष्ण सागरी प्रवाह असलेल्या ठिकाणी सागर जलाचे बाष्पीभवन अधिक वेगाने होते, त्यामुळे त्या ठिकाणची क्षारता अधिक आढळते. समुद्राच्या खोलीनुसार त्याची क्षारता कमी होते. दक्षिण गोलार्धातील समुद्राची क्षारता उत्तर गोलार्धातील समुद्राच्या क्षारतेपेक्षा अधिक असते.
३.   योग्य पर्याय क्र.(२) सर क्रीक ही सामुद्रधुनी कच्छजवळ स्थित आहे. हा भाग दलदलयुक्त असल्यामुळे सीमेची विभागणी झालेली नाही. त्यामुळे हा भाग सध्या भारत व पाकिस्तानदरम्यानचा वादग्रस्त प्रदेश आहे.
४.  योग्य पर्याय क्र.(४)
५.  योग्य पर्याय क्र. (४)
ग्रामीण-ग्रामीण स्थलांतरापेक्षा  नागरी स्थलांतर करणाऱ्यांची संख्या कमी आहे.
६. योग्य पर्याय क्र.(४) राष्ट्रीय महामार्ग ४ इ  – खठढळ ते पळस्पे – २० किलोमीटर. राष्ट्रीय महामार्ग ४उ  – कळंबोली ते राष्ट्रीय महामार्ग ४इ. १६.६८७ किलोमीटर.
७. योग्य पर्याय क्र.(३)
८. योग्य पर्याय क्र.(२)
९. योग्य पर्याय क्र.(१)
First Published on March 2, 2019 1:14 am
Web Title: question of the practice of geography

No comments:

Post a Comment