भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध होणार आहे.
लोकसत्ता टीम | Updated:
October 27, 2017 12:23 AM
योजनेच्या अटी
- विद्यार्थ्यांना दहावी, बारावी, पदवी किंवा पदविका परीक्षेत ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे.
- या प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा ५० टक्के गुण असणार आहे.
- विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न २ लाख ५० हजारपेक्षा जास्त नसावे.
- विद्यार्थी बाहेरगावी शिकणारा असावा, अर्थात स्थानिक नसावा.
- गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.
- विद्यार्थी व्यावसायिक पाठय़क्रमाशी संलग्न निर्वाह भत्ता योजनेचा लाभ घेत असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- विद्यार्थ्यांनी आपले बँक खाते आधारकार्डाशी संलग्न करून घेणे बंधनकारक आहे.
- सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांना ही योजना लागू नाही.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहित नमुना व सविस्तर माहिती https://mahaeschol.maharashtra.gov.in, https://sjsa.maharashtra.gov.in, https://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
First Published on October 27, 2017 12:23 am
No comments:
Post a Comment