एमपीएससी मंत्र : सहायक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन
पदाच्या मुख्य परीक्षेचा अभ्यास नेमका कसा आणि कशातून करायचा याची यथासांग चर्चा आपण केलीच
वसुंधरा भोपळे | Updated:
October 25, 2017 4:20 AM
प्रतिनिधिक छायाचित्र
अभ्यासक्रम व अभ्यास स्रोत
१. राजकीय यंत्रणा (शासनाची रचना, अधिकार व कार्ये) केंद्र सरकार केंद्रीय विधिमंडळ आणि राज्य सरकार व प्रशासन (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ)-
या घटकावर जवळपास २५ प्रश्न विचारले जातात. यामध्ये भारतीय राज्यघटनेबद्दलची निरीक्षणे, केंद्र-राज्य संबंध आणि त्यासंबंधित तरतुदी, निती आयोग आणि त्याचे महत्त्व, कार्य, संरचना राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल ही पदे व या पदांची कार्ये, पात्रता, विशेषाधिकार; लोकसभा, राज्यसभा तसेच विधानसभा, विधान परिषद यांची कार्यपद्धती, लोकलेखा समिती; तिची निर्मिती; कार्य, संविधान दुरुस्तीविषयक तरतुदी आणि त्यांचे विषय, भारताचा महाधिवक्ता; त्याची कार्ये; अधिकार व त्यासंदर्भातील तरतुदी, महाराष्ट्र राज्याची निर्मिती, त्यासंदर्भात संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि तिचे पडसाद, या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर आधारित प्रश्नांचा समावेश असतो.
२. जिल्हा प्रशासन, ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन – या घटकावर साधारणपणे १० प्रश्नांचा समावेश होतो. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्यांची निर्मिती, त्यांच्यासंदर्भातील समित्या; त्यांच्या शिफारशी; सदस्य; स्थापना वर्ष; कायदे या स्तरावर कार्यरत अधिकारी – त्यांचे अधिकार व कर्तव्ये; यासंदर्भातील राज्यघटनेतील तरतुदी या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर आधारित प्रश्नांचा समावेश असतो.
३. न्यायमंडळ – न्यायमंडळाची रचना, एकात्मिक न्यायमंडळ-कार्ये, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाची भूमिका व अधिकार; दुय्यम न्यायालये – लोकपाल, लोकायुक्त आणि लोक न्यायालय, सांविधानिक आदेशाचे रक्षण करणारे न्यायमंडळ, न्यायालयीन सक्रियता, जनहित याचिका.
या घटकावर साधारणपणे १० प्रश्नांचा समावेश असतो. यामध्ये भारतातील न्यायप्रक्रिया, न्यायालयांची न्यायप्रक्रिया, यासंदर्भातील महत्त्वाची कलमे, सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक निर्णय आणि त्यांचा परिणाम, भारतीय राज्यघटनेतील यासंदर्भातील तरतुदी, लोकपाल बिल, लोक न्यायालयसंबंधित महत्त्वाच्या घटकांवरील प्रश्नांचा समावेश होतो.
अभ्यासस्रोत – वरील घटकांसाठी प्रश्नपत्रिकांचे योग्य विश्लेषण आणि ६ वी ते १० वी नागरिकशास्त्राची पुस्तके, ११ वी १२वी राज्यशास्त्राची पुस्तके, तसेच लक्ष्मीकांत यांच्या इंडियन पॉलिटी या ग्रंथातील संबंधित मुद्दे अभ्यासावेत.
विद्यार्थी मित्रांनो सहायक कक्ष अधिकारी
पदाच्या मुख्य परीक्षेचा अभ्यास नेमका कसा आणि कशातून करायचा याची यथासांग चर्चा आपण केलीच आहे. या परीक्षेला सामोरे जाताना शेवटच्या घटकेतील उजळणी नक्की करा. अभ्यासक्रम आणि जुन्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाच्या आधारे ही उजळणी केल्यास पेपर सोडविताना त्याचा नक्कीच फायदा होईल. मुख्य परीक्षेला आता अवघा एक महिनाच बाकी राहिला आहे. या महिन्यातील अभ्यासासाठी पुढील काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊन आपली रणनीती बनवा.
१. परीक्षेला जाताना आदल्या दिवशी वाचायच्या मुद्दय़ांचे संकलन आत्तापासूनच एका फाइलमध्ये करून ठेवा.
२. परीक्षेच्या दिवशी पेपरच्या अगोदर शक्यतो
मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा लागतो.
आपले मन विचलित होऊ द्यायचे नसेल तर आपला आत्मविश्वास वाढविण्यासाठी काही गोष्टी करा. आपली उजळणी झालेले मुद्दे एका छोटय़ा डायरीत लिहून ठेवून ती डायरी सोबत ठेवावी, जेणेकरून त्या मुद्दय़ांमध्ये तुमचे मन लागून इतर कोणतेही विचार मनात डोकावणार नाहीत.
३. बुद्धिमत्ता विषयातील परीक्षाभिमुख घटकांचा दररोज भरपूर सराव करावा व आपल्या सरावातून आपल्याला जमलेल्या क्लृप्त्या वेगळ्या लिहून ठेवा. याची जाता जाता उजळणी केल्यास पेपर सोडविताना लागणारा वेळ काही प्रमाणात वाचविणे शक्य होते.
४. आयोग जुन्या प्रश्नपत्रिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी नेहमीच हितगुज साधत असतो त्यामुळे नेहमीच या प्रश्नपत्रिका वाचून आयोगाचे संदेश समजून घ्यायचा प्रयत्न करा. त्या दृष्टीने आपल्या अभ्यासाची रणनीती ठरवा.
५. शेवटी भरपूर सराव आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा.
परीक्षेसाठी हार्दकि शुभेच्छा.!! पुढील लेखामध्ये आपण विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षेच्या अभ्यासाविषयी माहिती घेऊयात.
First Published on October 25, 2017 4:20 am
Web Title: useful tips for mpsc exam 2017 2
No comments:
Post a Comment