शासकीय विद्यानिकेतने
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात
लोकसत्ता टीम | Updated:
October 28, 2017 1:55 AM
निकष
- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि हुशार व गुणी विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी पुसेगाव जिल्हा सातारा, धुळे, औरंगाबाद, अमरावती आणि केळापूर, जिल्हा यवतमाळ ही पाच शासकीय वसतिगृहात्मक विद्यानिकेतने आहेत. त्यात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या निकषानुसार प्रवेश दिला जातो. त्यासाठी त्यांना पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते व गुणानुक्रमे दरवर्षी इ. पाचवीत ४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
- विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा खर्च उत्पन्नाच्या निकषानुसार शासन करते. विद्यानिकेतनाची कार्यपद्धत्ती आणि व्यवस्थापन यासाठी एक राज्यस्तरीय नियामक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे.
- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणाच्या चांगल्या सुविधा द्याव्यात.
- हुशार व गुणी विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण.
- आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन, त्यांना शैक्षणिक सुविधा देण्यावर भर.
- वसतिगृहात्मक शिक्षणाच्या सोयी विद्यानिकेतनामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
First Published on October 28, 2017 1:55 am
Web Title: government hostels for students
No comments:
Post a Comment