एमपीएससी मंत्र : महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल आणि चालू घडामोडी
अभ्यासक्रमाच्या कोणत्या भागावर किती आणि कशा स्वरूपाचे प्रश्न आले आहेत ते टिपून ठेवले पाहिजे.
वसुंधरा भोपळे | Updated:
October 13, 2017 12:26 AM
विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या लेखांत आपण साहाय्यक कक्ष
अधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि पोलीस उप निरीक्षक या तीनही परीक्षांसाठी
समान असणाऱ्या घटकांपकी मराठी व इंग्रजी या विषयांच्या अभ्यासाची रणनीती
पाहिली. आज आपण चालू घडामोडी, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास
या विषयांच्या अभ्यासाची रणनीती पाहू या.वरील प्रश्नांची जी उत्तरे तुम्हाला मिळतील ती उत्तरे म्हणजेच तुमची Primary To Do List असेल. ती बनविल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे निवडक अभ्यास साहित्य आणि त्या अभ्यास साहित्यामधून निरक्षीर वृत्तीने आपण काय निवडायचे याचे आकलन होय. काय आणि कसे वाचायचे हे एकदा समजले की निवडक स्रोतांमधून अभ्यास आणि त्याची जास्तीत जास्त उजळणी केल्यास परीक्षेचा अभ्यास नक्कीच सुकर होतो. पुढे दिलेला अभ्यासक्रम आणि अभ्यासस्रोतांचा यासाठी निश्चितच उपयोग होईल.
अभ्यासक्रम व अभ्यासस्रोत
१. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील – यासाठी परीक्षेच्या अगोदर किमान वर्षभर घडलेल्या स्थानिक, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडी विचारात घ्याव्यात. यासाठी योजना, लोकराज्य ही मासिके, लोकसत्ता, इंडियन एक्स्प्रेस ही दैनिके वापरावीत. तसेच करंट ग्राफ हे चालू घडामोडी संदर्भातील पुस्तक उपयोगी ठरते.
२. महाराष्ट्राचा भूगोल – यामध्ये महाराष्ट्राचा रचनात्मक (Physical) भूगोल, मुख्य रचनात्मक (Physiographic) विभाग, हवामान (Climate), पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नसíगक संपत्ती – वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल – लोकसंख्या, लोकसंखेचे स्थलांतर व त्याचे Source आणि Destination वरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्टय़ा व त्यांचे प्रश्न या उपघटकांवर प्रामुख्याने प्रश्न विचारले जातात. या घटकांचा अभ्यास करताना महत्त्वाच्या चालू घडामोडी ज्या ठिकाणी घडतात त्या ठिकाणांचा, प्राकृतिक भूगोल नकाशावाचनाच्या साहाय्याने अभ्यासला तर भूगोलाचा परीक्षाभिमुख अभ्यास सुकर बनतो.
अभ्यासस्रोत – चौथी व नववीचे महाराष्ट्र बोर्डाचे पाठय़पुस्तक, मेगास्टेट महाराष्ट्र हे ए.बी. सवदी यांचे पुस्तक
३. महाराष्ट्राचा इतिहास – या विभागात सामाजिक व आíथक जागृती (१८८५-१९४७), महत्त्वाच्या व्यक्तींचे काम स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे व शिक्षणाचा परिणाम / भाग, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी इ. घटकांचा समावेश होतो.
अभ्यासस्रोत – पाचवी, आठवी आणि अकरावीची महाराष्ट्र बोर्डाची पाठय़पुस्तके तसेच आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हे डॉ. अनिल कठारे यांचे पुस्तक.
विद्यार्थी मित्रांनो, पुढील लेखामध्ये आपण साहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि पोलीस उप निरीक्षक या तीनही परीक्षांसाठी समान असणाऱ्या घटकांपकी उर्वरित घटक भारतीय राज्यघटना, माहिती अधिकार अधिनियम, संगणक व माहिती तंत्रज्ञान आणि बुद्धिमापन यांच्या अभ्यासाविषयी माहिती घेऊ या.
अभ्यासाचे नियोजन
अभ्यासाचे नियोजन करताना विद्यार्थ्यांनी जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करावे. प्रथम प्रत्येक प्रश्न वाचून स्वत:ला पुढील प्रश्न विचारावेत.
१. हा प्रश्न का विचारला गेला असावा?
२. या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडून का अपेक्षित आहे?
३. हा प्रश्न अभ्यासक्रमाच्या कोणत्या घटकाशी निगडित आहे?
४. याच घटकावर अजून कोणकोणत्या आयामांतून प्रश्न विचारता येतील?
५. प्रश्नातील घटकाचे उपघटक कोणते असू शकतील?
First Published on October 13, 2017 12:25 am
Web Title: maharashtra history geography and current affairs
No comments:
Post a Comment