Friday, November 17, 2017

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना

राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फबोर्डाकडे नोंदणी केलेले मदरसे या अनुदानासाठी प्राप्त आहेत.

लोकसत्ता टीम | Updated: October 20, 2017 12:58 AM

मदरशांमध्ये शिकत असलेल्या विविध वयोगटांतील विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पारंपरिक धार्मिक शिक्षणाबरोबर विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दू या विषयांचे शिक्षण देणे, तसेच मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या इयत्ता नववी, दहावी, ११वी व १२वी यातील आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे. जेणेकरून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत व रोजगारक्षमतेत वाढ होऊन त्यांचा आर्थिक दर्जा सुधारण्यास मदत होईल यादृष्टीने मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी पायाभूत सुविधा, ग्रंथालयासाठी अनुदान देणे, शिक्षकांच्या मानधनासाठी अनुदान देण्याची डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना शासनाने आणली आहे.
अनुदानासाठीची पात्रता
  • राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फबोर्डाकडे नोंदणी केलेले मदरसे या अनुदानासाठी प्राप्त आहेत.
योजनेतील कामे
  • मदरशाच्या इमारतीचे नूतनीकरण व डागडुजी
  • शुद्ध पेयजलाची व्यवस्था
  • प्रसाधनगृह
  • फर्निचर
  • इन्व्हर्टर
  • प्रयोगशाळा
  • संगणक हार्डवेअर सॉफ्टवेअर
  • अध्ययन साहित्य
  • या योजनेअंतर्गत विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दू हे विषय शिकविण्यासाठी नियुक्त केलेल्या शिक्षकांच्या मानधनासाठी तसेच मदरशात राहून नियमित शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी अनुदान दिले जाते.
अर्ज कोणाकडे व कधी करावा
  • या योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा. शासनामार्फत साधारणपणे जुलै महिन्यात राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांत जाहिरात प्रसिद्ध केली जाते. जाहिरातीत नमूद केलेल्या अंतिम दिनांकापूर्वी शाळांनी त्यांचे प्रस्ताव सादर करावेत.
अधिक माहीतीसाठी

https://www.mahanews.gov.in/Home/HomeDetails.aspx?str=gjE/FKZZnrM=
First Published on October 20, 2017 12:58 am
Web Title: dr zakir hussain madarsa modernisation scheme

No comments:

Post a Comment