Friday, November 17, 2017

करिअरमंत्र या संधीसाठी आधी भारतीय पोलीस सेवा किंवा राज्य पोलीस सेवेत प्रवेश मिळायला हवा.

करिअरमंत्र

या संधीसाठी आधी भारतीय पोलीस सेवा किंवा राज्य पोलीस सेवेत प्रवेश मिळायला हवा.

सुरेश वांदिले | Updated: October 20, 2017 12:54 AM

प्रतिनिधिक छायाचित्र

मी इंजिनीअरिंग केले आहे. मला आता गुप्तचर विभागामध्ये काम करायचे आहे. मला अशी संधी कशी मिळेल?
नंदकुमार कवाले
राज्य व केंद्र सरकारच्या गुप्तचर विभागात काम करण्याची इच्छा तुला आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. या संधीसाठी आधी भारतीय पोलीस सेवा किंवा राज्य पोलीस सेवेत प्रवेश मिळायला हवा. या सेवेत उत्कृष्ट व वैशिष्टय़पूर्ण कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुढे गुप्तचर सेवेत जाण्याची संधी मिळू शकते.
मी राज्यशास्त्राचा अभ्यास करत आहे. एमएच्या प्रथम वर्गात शिकत आहे. मला सेट / नेटपैकी कोणती परीक्षा देता येईल?
दिनेश महाले
पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना नेट / सेट परीक्षा देता येते. त्यामुळे तू पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दोन्ही परीक्षा देऊ शकतोस.
मी बी.कॉमच्या तिसऱ्या वर्षांला आहे. पदवीनंतर मला एमसीए करायचे आहे. पण बाबा म्हणतात एम.कॉम कर. मला मात्र गणित आणि कॉम्प्युटर सायन्स हे विषय खूप आवडतात. मी एमसीए करणे योग्य ठरेल काय?
सायली जाधव
एखाद्या विद्यार्थ्यांला ज्या विषयात उत्तम गती आहे किंवा आवड आहे, तोच विषय विद्यार्थी खूप चांगल्या रीतीने आत्मसात करू शकतो. त्यामुळे तू एमसीए करायला काहीच हरकत नाही. हा अभ्यासक्रम केल्यानंतर तुला करिअरच्या अनेक संधी मिळू शकतात. तथापी हा अभ्यासक्रम चांगल्या संस्थेमधून करायला हवा. कारण त्यायोगे अधिक चांगल्या संधी मिळतील. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएच-सीईटी घेतली जाते.

मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेत आहे. सध्या बीएच्या तिसऱ्या वर्षांला आहे. मला पुढे एमबीए करण्याची संधी आहे का? विदेशात एमबीए करायचे असेल तर काय तयारी करावी
राजन पाटील
कोणत्याही अधिकृत संस्थेमधून पदवी घेतलेल्या उमेदवारास एमबीए करता येते. त्यामुळे तू एमबीए करण्यासाठी पात्र आहेस. परंतु एमबीए करण्यासाठी त्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतील. यंदा तुला एमबीए करायचे असेल तर आता इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, आयआयटी / एनआयटीमधील बिझिनेस स्कूल व इतर खासगी संस्थांमधील एमबीए प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या कॉमन एन्ट्रस टेस्टचे अर्ज भरण्याची तारीख निघून गेली आहे. तथापी पुढील काही परीक्षांचे अर्ज तू अजूनही भरू शकतोस.
(१)कॉमन मॅनेजमेंट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट, अर्ज करण्याची शेवटची तारीख- १७ डिसेंबर २०१७
संपर्क http://www.aicte-cmat.in
(२) झेविअर अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट – अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ डिसेंबर २०१७
संपर्क – http://www.xatonline.in/
(३) मॅनेजमेंट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट – अर्ज करण्याची शेवटची तारीख – १ डिसेंबर २०१७
संपर्क-  www.aima.in
(४)सिम्बॉयसीस नॅशनल अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट – अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ नोव्हेंबर २०१७
संपर्क – www.snaptest.org ,
(५) एमएचसीईटी-एमबीए/एमएमएस- तारखा अद्याप घोषित व्हायच्या आहेत.
परदेशातील एमबीए प्रवेशासाठी तुला जीमॅट – ग्रॅज्युएट मॅनेजमेंट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट द्यावी लागेल. परदेशातील एमबीए शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये प्रवेशासाठी किमान दोन वर्षांचा कार्यानुभवसुद्धा महत्त्वाची बाब ठरते. याविषयी करिअर वृत्तांतमधल्या ‘देशोदेशींच्या शिष्यवृत्ती’ या सदरातूनही अधिक माहिती मिळू शकेल.
तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.
First Published on October 20, 2017 12:54 am
Web Title: career guidance 34

No comments:

Post a Comment