नोकरीची संधी
अर्जदारांनी लाइफ सायन्सेस विषयातील एमएस्सी पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केलेली असावी
द. वा. आंबुलकर | Updated:
October 28, 2017 1:53 AM
अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र, पुणेची जाहिरात पाहावी अथवा केंद्राच्या http://www.nccs.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तपशीलवार अर्ज व कागदपत्रांसह थेट मुलाखतीसाठी संपर्क- संचालक, राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र, एनसीसीएस कॉम्प्लेक्स, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, गणेशखिंड, पुणे ४११००७ येथे १ नोव्हेंबर २०१७ रोजी.
नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ, मुंबई येथे दिव्यांगजन उमेदवारांना संशोधक म्हणून संधी-
अर्जदारांनी लाइफ सायन्सेस विषयातील एमएस्सी पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केलेली असावी अथवा त्यांनी लाइफ सायन्सेसमधील एमएस्सी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण करून त्याच विषयात संशोधनपर पीएचडी केलेली असावी. संगणकाचे ज्ञान आवश्यक. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २३ ते २९ सप्टेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ, मुंबईची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या www.nirrh.res.in अथवा www.icmr.nic.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज डायरेक्टर, नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ जे. एम. स्ट्रीट, परळ, मुंबई- ४०००१२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ६ नोव्हेंबर २०१७.
महाराष्ट्र शासनाच्या शिधावाटप व नागरी पुरवठा संचालनालयात मुंबई शहर व उपनगर जिल्ह्य़ासाठी ग्राहक संघटना प्रतिनिधींच्या १० जागा-
अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली शिधावाटप व नागरी पुरवठा संचालनालयाची जाहिरात पाहावी अथवा संचालनालयाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज नियंत्रक शिधावाटप व संचालक यांचे कार्यालय, रॉयल इन्शुरन्स इमारत, १४, जमशेटजी टाटा मार्ग, चर्चगेट, मुंबई- ४०००२० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २ नोव्हेंबर २०१७.
महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषिविकास प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (पशुसंवर्धन) अंतर्गत सातारा जिल्ह्य़ात पशुधन विस्तारतज्ज्ञ पदाच्या करारतत्त्वावर ४ जागा-
अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषिविकास प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, पुणेची जाहिरात पाहावी अथवा कक्षाच्या http://macp.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. तपशीलवारपणे भरलेले अर्ज नोडल अधिकारी, महाराष्ट्र कृषिविकास प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, प्लॉट नं. ७८ ई/ एफ, भू-विकास बँकेचे प्रशिक्षण केंद्र, मार्केट यार्ड, गुलटेकडी, पुणे- ४११०३७ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३ नोव्हेंबर २०१७.
केंद्र सरकारच्या रजिस्ट्रार जनरल इंडिया अंतर्गत डेप्युटी डायरेक्टर ऑफ सेन्सस ऑपरेशन्सच्या २७ जागा-
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९ ते १५ ऑक्टोबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली रजिस्ट्रार जनरल इंडियाची जाहिरात पाहावी अथवा रजिस्ट्रार जनरलच्या http://www.censusindia.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज अंडर सेक्रेटरी, अॅडमिन, सेक्शन-३, २-ए, मानसिंग रोड, नवी दिल्ली ११००११ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ७ नोव्हेंबर २०१७.
सैन्यदलात धर्म शिक्षक पदाच्या संधी-
अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ७ ते १३ ऑक्टोबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाची जाहिरात पाहावी अथवा सैन्यदलाच्या www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०१७.
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी, चेन्नई अंतर्गत प्रोजेक्ट सायंटिस्टच्या १०६ जागा-
अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या https://www.niot.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ नोव्हेंबर २०१७.
First Published on October 28, 2017 1:53 am
Web Title: job opportunity job alert 2
No comments:
Post a Comment