Thursday, November 23, 2017

यूपीएससीची तयारी : भारतीय अर्थव्यवस्था आणि आर्थिक विकास भारतातील आर्थिक नियोजनांचे सामान्यत: दोन भागांमध्ये वर्गीकरण केले जाते.

यूपीएससीची तयारी : भारतीय अर्थव्यवस्था आणि आर्थिक विकास

भारतातील आर्थिक नियोजनांचे सामान्यत: दोन भागांमध्ये वर्गीकरण केले जाते.

श्रीकांत जाधव | Updated: November 2, 2017 3:54 AM

प्रतिनिधिक छायाचित्र

आजच्या लेखामध्ये आर्थिक विकास या घटकातील भारतीय अर्थव्यवस्था आणि संबंधित मुद्दे व आर्थिक नियोजनाचे प्रकार आपण पाहू. तसेच अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने याची नेमकी काय उपयुक्तता आहे, या मुद्दय़ावरही चर्चा करू. याच्या जोडीला आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या अर्थव्यवस्थेसंबंधी मूलभूत संकल्पनाची माहिती थोडक्यात घेणार आहोत. या घटकावर गतवर्षीय मुख्य परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले होते व परीक्षाभिमुख अभ्यासाच्या दृष्टीने याची तयारी कशी करावी याची महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहोत.
भारत स्वातंत्र झाल्याबरोबर भारत सरकारने विविध आर्थिक समस्या सोडविण्यासाठी आणि आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी नियोजन पद्धतीचा अवलंब केला होता. ज्यामध्ये समाजवादी आणि भांडवलशाही या दोन्ही तत्त्वाचा समावेश केलेला होता; अर्थात भारताने आर्थिक विकास साधण्यासाठी मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला होता. भारतातील आर्थिक नियोजन हे मुख्यत्वे पंचवार्षिक योजनेवर आधारलेल होते. ज्याद्वारे दीर्घकालीन उद्देश साध्य करण्यावर भर देण्यात आलेला आहे. आर्थिक वृद्धी ज्यात स्थूल देशांतर्गत उत्पादन व दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पादन यात वाढ करणे, रोजगार उपलब्धता, समन्याय वितरण, आधुनिकीकरण आणि स्वयंपूर्णता इत्यादी महत्त्वाच्या उद्देशांचा समावेश आहे. याच्या जोडीला सरकारमार्फत काही अल्पकालीन उद्देशाची वेळोवेळी आखणी करण्यात येते जे पंचवार्षिक योजनानिहाय उद्देश साध्य करण्यासाठी असतात; अर्थात दीर्घकालीन उद्देश आणि अल्पकालीन उद्देश हे परस्परपूरक असतात. थोडक्यात, अल्पकालीन उद्देश हे योजनानिहाय आखलेल्या धोरणाचा भाग असतात जे दीर्घकालीन उद्देश किंवा आर्थिक नियोजनांचे आखलेले उद्देश साध्य करण्यासाठी महत्त्वाचे असतात.
भारतातील आर्थिक नियोजनांचे सामान्यत: दोन भागांमध्ये वर्गीकरण केले जाते. १९९१ पूर्वीचे आर्थिक नियोजन व १९९१ नंतरचे आर्थिक नियोजन. भारतातील आर्थिक नियोजन पद्धतीमध्ये १९९१ नंतर काही मूलभूत बदल करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये आर्थिक उदारीकरणाच्या तत्त्वाचा स्वीकार करण्यात आलेला आहे. तो मुक्त अर्थव्यवस्थेच्या धोरणाचा पुरस्कार करणारा आहे. याचाच अर्थ अर्थव्यवस्थेवर सरकारचे नियंत्रण कमी करून आर्थिक विकास अधिक गतीने साध्य करण्यासाठी पोषक वातावरण तयार करणे हा मुख्य उद्देश १९९१ नंतरच्या आर्थिक नियोजन नीतीचा राहिलेला आहे व यात भारत सरकारने नियंत्रित करण्यासाठीच्या नियामकाच्या ऐवजी साहाय्यकाची जबाबदारी घेतलेली आहे.
२०१५च्या मुख्य परीक्षेमध्ये, ‘अलीकडील काळामधील भारतातील आर्थिक वृद्धीच्या स्वरूपाचे वर्णन पुष्कळदा नोकारीविना (Jobless Growth)  होणारी वृद्धी असे केले जाते. याच्याशी तुम्ही सहमत आहात का? तुमच्या उत्तराच्या समर्थनासाठी युक्तिवाद करा?’ असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. या प्रश्नाच्या आकलनासाठी आर्थिक वृद्धी या संकल्पनेची सखोल माहिती असणे गरजेचे आहे. तरच आपणाला या प्रश्नाचे आकलन योग्यरीत्या करता येऊ शकते. याचबरोबर याच्याशी संबंधित सरकारमार्फत वेळोवेळी जाहीर केल्या जाणाऱ्या आकडेवारीचा आधार घेऊन युक्तिवाद करावा लागतो. ज्यामुळे प्रश्नाला अनुसरून योग्य उत्तर लिहिता येऊ शकते.
आता आपण आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी या दोन संकल्पनाचा  थोडक्यात आढावा घेऊ या. आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी या दोन महत्त्वाचा मूलभूत संकल्पना अर्थव्यवस्थेचे आकलन करून घेण्यासाठी महत्त्वाच्या असतात. याचे योग्य आकलन असल्याखेरीज या घटकाचा अभ्यास योग्य पद्धतीने करता येत नाही. दररोज वर्तमानपत्रांमधून याविषयी काहीना काही माहिती मिळत असते, पण या माहितीचा परीक्षेच्या दृष्टीने योग्य उपयोग करून घेण्यासाठी या संकल्पनांचे आकलन असणे गरजेचे आहे. आर्थिक वृद्धी ही संकल्पना  देशांतर्गत स्थूल उत्पादन, स्थूल राष्ट्रीय उत्पादन, देशांतर्गत दरडोई स्थूल उत्पादन, देशांतर्गत दरडोई निव्वळ उत्पादन आणि दरडोई निव्वळ राष्ट्रीय उत्पादन या सारख्या संख्यात्मक पद्धतीने अर्थव्यवस्थेच्या वाढीची स्थिती दर्शवितात.
थोडक्यात याचा अर्थ शाश्वत पद्धतीने स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये होणारी वाढ हा आर्थिक वृद्धी या प्रक्रियेचा महत्त्वाचा पलू मानला जातो. आर्थिक विकास ही संकल्पना आर्थिक आणि सामाजिक प्रगतीची निर्देशक मानली जाते.
आर्थिक विकास ही प्रक्रिया अर्थव्यवस्थेमधील भौतिक व कल्याणकारी विकासामध्ये होणारी सुधारणा स्पष्ट करते. ज्यामध्ये गरिबीचे निर्मूलन, साक्षरतेमध्ये होणारी वाढ, बेरोजगारीचे उच्चाटन आणि आर्थिक विषमता कमी करून आर्थिक समानता यासारख्या गोष्टीमध्ये उत्तरोतर होणाऱ्या प्रगतीचा आलेख दर्शविते. आर्थिक विकास या प्रक्रियेची व्याप्ती आर्थिक वृद्धीपेक्षा मोठी आहे. आर्थिक विकास हा उत्पादनामध्ये होणारी वाढ याच्यासह उत्पादन रचनेमध्ये होणारे बदल व उत्पादनक्षमतेच्या आणि उपलब्ध साधनसंपत्तीच्या योग्य विभाजनाची माहिती देतो व सामाजिक न्यायतत्त्वाची सुनिश्चितता  दर्शवितो.
आर्थिक वृद्धी ही संकल्पना अर्थव्यवस्थेविषयी सामान्यत: संख्यात्मक चित्र दर्शविते. आर्थिक विकास ही संकल्पना अर्थव्यवस्थेविषयी संख्यात्मक व गुणात्मक या दोन्ही बाबींचे चित्र दर्शविते; अर्थात आर्थिक वृद्धीपेक्षा आर्थिक विकास या संकल्पनेचा परीघ मोठा आहे. यामध्ये आर्थिक व सामाजिक प्रगतीचे चित्र दिसून येते. याउलट आर्थिक वृद्धी ही संकल्पना अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग दर्शविते.
या घटकाचा परीक्षेच्या दृष्टीने मूलभूत अभ्यास करण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीचे ११ वी आणि १२ व्या इयत्तेचे Indian Economic Development आणि Macro Economics या पुस्तकाचा वापर करावा. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेवरील मिश्रा आणि पुरी किंवा दत्त आणि सुंदरम यापैकी कोणत्याही एका संदर्भग्रंथाचा या घटकाचा सखोल अभ्यास करण्यासाठी वापर करावा. चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी योजना हे मासिक, भारताचा आर्थिक पाहणी अहवाल आणि
द हिंदू आणि इंडियन एक्स्प्रेस ही वर्तमानपत्रे इत्यादीचा वापर करावा. यापुढील लेखामध्ये या पेपरमध्ये नमूद केलेल्या आर्थिक विकासामधील सर्वसमावेशक वाढ व संबंधित मुद्दे, या घटकाचा आढावा घेणार आहोत. या घटकाची तयारी कशी करावी, तसेच गतवर्षीय मुख्य परीक्षेत या घटकावर कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आलेले होते, याची एकत्रितपणे चर्चा करणार आहोत.
First Published on November 2, 2017 3:54 am
Web Title: upsc exam preparation tips for students

नोकरीची संधी आयसीएमआर - नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ

नोकरीची संधी

आयसीएमआर - नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ

सुहास पाटील | Updated: November 2, 2017 3:51 AM
( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )
*  आयसीएमआर – नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ (इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) (जाहिरात क्र. एनआयआरआरएच/०१/एस/०९/२०१७) सायंटिस्ट – ‘बी’/‘सी’ पदांची भरती.
सायंटिस्ट-बी (नॉन मेडिकल)  लाइफ सायन्सेस – रिप्रोडक्टिव्ह बायोलॉजी (अजा – १, इमाव – १, यूआर – २, व्हीएच/ओएच – १)
सोशल सायन्सेस (इमाव -१)
वयोमर्यादा – ३५ वर्षरयत.
सायंटिस्ट-सी (नॉन-मेडिकल)
रिप्रोडक्टिव्ह बायोलॉजी (यूआर – २)
व्हेटरिनरी सायन्सेस – (यूआर – १).
वयोमर्यादा – ४० वर्षांपर्यंत.
पात्रता – प्रथम वर्गासह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी. व्हेटरीनरी सायन्सेससाठी ४ वर्षांचा अ‍ॅनिमल फॅसिलिटी लॅबमधील अनुभव आवश्यक.
ऑनलाइन अर्ज www.icmr.nic.in किंवा www.nirrh.res.in या संकेतस्थळांवर
दि. ६ नोव्हेंबर, २०१७ पर्यंत करावेत.
ऑनलाइन अर्जाची हार्ड कॉपी पूर्ण भरलेली, सही केलेली ‘दि डायरेक्टर, नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, जे. एम. स्ट्रीट, परेल, मुंबई – ४०००१२’ या पत्त्यावर दि. १६ नोव्हेंबर, २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावी.
*  नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल, दिल्ली आपल्या देशभरातील आस्थापनांवर पुढील पदांची कंत्राटी पद्धतीने भरती.
लॉ रिसर्च असोसिएट – मुंबई – ३ पदे
(एकूण १६पदे).
पात्रता – कायदा विषयातील पदवी
(फ्रेश किंवा अनुभवी) (किमान सरासरी ५०% गुणांसह उत्तीर्ण)/बार काऊंसिलकडे रजिस्ट्रेशन केलेले असावे.
वयोमर्यादा – दि. १ सप्टेंबर, २०१७ रोजी
३० वर्षांपर्यंत.
एकत्रित वेतन – रु. ३०,०००/- दरमहा.
www.nclt.gov.in  या संकेतस्थळावरील जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यातील अर्ज उमेदवारांनी आपल्या रिझ्युमेसोबत आवश्यक त्या कागदपत्रांसह एनसीएलटीच्या दिल्ली कार्यालयात दि. ९ नोव्हेंबर, २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.
स्टेनोग्राफर्स मुंबई बेंच – ८ पदे, (एकूण २१ पदे).
पात्रता – पदवी (कोणत्याही शाखेतील) उत्तीर्ण  इंग्रजी शॉर्टहॅण्ड १०० श.प्र.मि. वेग.
वेतन – रु.४५,०००/- दरमहा.
विहित नमुन्यातील अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दि. २७ नोव्हेंबर, २०१७.
अर्ज पाठविण्याचा पत्ता -अनिल कुमार, अंडर सेक्रेटरी टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल, रु.नं. ६१४, ब्लॉक नं. ३, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, न्यू दिल्ली – ११०००३.
*  स्टाफ सिलेक्शन कमिशन ‘ज्युनियर इंजिनीअर्स (सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल आणि क्वांटिटी सव्‍‌र्हेइंग अ‍ॅण्ड काँट्रक्ट) परीक्षा-२०१७’ दि. ५ जानेवारी ते ८ जानेवारी, २०१८ दरम्यान घेणार. केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये (जसे की सीपीडब्ल्यूडी, पोस्ट, एमईएस्, सेंट्रल वॉटर कमिशन इ.) ‘ज्युनियर इंजिनीअर’ पदांसाठी भरती.
वेतन – लेव्हल – ६
(रु. ३५,४००/- १,१२,४००/-) अंदाजे एकूण रु. ४९,०००/-
पात्रता – सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील डिप्लोमा किंवा डिग्री उत्तीर्ण.
वयोमर्यादा – २७/३०/३२ वर्षेपर्यंत (उच्चतम वयोमर्यादेत सूट इमाव -३  वर्षे, अजा/अज – ५ वर्षेपर्यंत)
परीक्षा केंद्र – मुंबई, नागपूर आणि देशभरातील इतर.
परीक्षा शुल्क – रु. १००/- (अजा/अज/महिला/विकलांग यांना फी माफ).
ऑनलाइन अर्ज www.ssconline.nic.in या संकेतस्थळावर दि. १७ नोव्हेंबर, २०१७ पर्यंत करावेत.
First Published on November 2, 2017 3:51 am
Web Title: job opportunity in india job vacancies in india indian government jobs 10

एमपीएससी मंत्र : महाराष्ट्र कृषि सेवेचा अभ्यास हाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा १७ डिसेंबर २०१७ रोजी होणार आहे.

एमपीएससी मंत्र : महाराष्ट्र कृषि सेवेचा अभ्यास

हाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा १७ डिसेंबर २०१७ रोजी होणार आहे.

महेश कोगे | Updated: November 1, 2017 5:29 AM

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेतली जाणारी महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा १७ डिसेंबर २०१७ रोजी होणार आहे. त्यामुळे आजच्या अंकात आपण महाराष्ट्र कृषि सेवा (मुख्य) परीक्षेची माहिती करून घेऊया. त्यायोगे मुख्य परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आणि अभ्यासाचे नियोजन कसे करता येईल ते पाहु.
प्रश्नपत्रिकांची संख्या – दोन (एक अनिवार्य व एक वैकल्पिक)

*     कृषि विज्ञान हा विषय अनिवार्य असून परिक्षार्थीला कृषि किंवा कृषि अभियांत्रिकी यापैकी एका विषयाची वैकल्पिक विषय म्हणून निवड करता येते.
*     मुख्य परीक्षेच्या दोन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिका (अनिवार्य आणि वैकल्पिक) फक्त इंग्रजी माध्यमातच असतात.
*    मुख्य परीक्षा अभ्यासक्रम –
* अभ्यासक्रमातील प्रमुख घटक येथे देत आहे. संपूर्ण अभ्यासक्रमासाठी आयोगाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
पेपर १ (अनिवार्य)
कृषि विज्ञान (अ‍ॅग्रीकल्चर सायन्स)
*    अ‍ॅग्रॉनॉमी
अ‍ॅग्रॉनॉमीची तत्वे –
* अ‍ॅग्रॉनॉमी – व्याख्या व्याप्ती आणि कृषी शास्त्रज्ञांची भूमिका.
*     पिकांचे वर्गीकरण – भारत आणि महाराष्ट्रातील कृषि हंगाम
*     मशागत (टिलेज) – मशागतीचे जमीन व पिकांच्या वाढीवरील परिणाम.
* बियाणे –
* पेरणी प्रणाली –
* तृण
२) कृषी हवामानशास्त्र – कृषी हवामानशास्त्र व्याख्या, तापमान मापन, सौर किरणे, वातावरणीय दबाव, हायड्रॉलॉजीकल सायकल.
३) जलसिंचन पाणी व्यवस्थापन –
* पाण्याचे स्त्रोत, आद्र्रता, बाष्पीभवन.
* सिंचन
* ड्रेनेज
४) फिल्ड क्रॉप्स –
अ) खरीप पिके       ब) फिल्ड पिके
५) पर्जन्य आधारीत शेती :
महाराष्ट्रातील अ‍ॅग्रॉक्लायमॅटीक झोन.
६) शेती प्रणाली आणि शाश्वत शेती
माती विज्ञान (सॉईल सायन्स) – मातीचे प्राकृतीक आणि रासायनिक गुणधर्म, रचना, प्रकार आणि पिक उत्पादनात मातीचे महत्व.
* कृषि अभियांत्रिकी
’  शेती अवजारे आणि कार्यक्षमता –
अ) शेतीतील कार्यशक्तीचे घटक
ब) मशागत (टीलेज)
क) बियाणे पेरण्याचे तंत्र
ड) पिकांची संरक्षण करणारी उपकरणे
* कृषिप्रक्रिया अभियांत्रिकी
अ) साठवणुकीदरम्यान अन्नधान्यात होणारे बदल
ब) डिटर्मिनेशन ऑफ मॉईश्चर कन्टेन्ट
क) कार्यरत तत्वे
ड) मटेरियल हॅन्डिलग इक्युपमेंट्स
’  माती आणि पाणी संवर्धन, पाणलोट व्यवस्थापन
अ) मृदा व पाण्याच्या संवर्धनासाठी महाराष्ट्रात
वापरल्या जाणाऱ्या पद्धती.
ब) इरोजन
क) पाणलोट व्यवस्थापन तत्वे
* सूक्ष्म सिंचन आणि डेनेज अभियांत्रिकी
* फार्म स्ट्रक्चर
विश्लेषण – गुण विभागणी

२०१६च्या प्रश्नपत्रिकेतील घटकनिहाय गुणांची विभागणी

२०१६ च्या मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आणि अभ्यासक्रमातील गुणांच्या विभागणीवरून असे दिसून येते की, आयोगाने कृषी अभियांत्रिकी व अ‍ॅग्रॉनॉमी या घटकांना २/३ पेक्षा जास्त वेटेज दिले आहे. दोन्ही घटकांवर अनुक्रमे ४० प्रश्न ८० गुणांसाठी विचारले आहेत. त्यामुळे कृषि विज्ञान या विषयाचा अभ्यास करताना अ‍ॅग्रॉनॉमी व कृषी अभियांत्रिकी या घटकांना प्राधान्यक्रम देणे गरजेचे आहे.
अ‍ॅग्रॉनॉमी या घटकात हवामानशास्त्रीय घटकांचे जसे की, उष्णता, जमिनीतील आद्र्रता, हवा यांचा पिकांवरील परिणाम, मशागतीवर परिणाम करणारे घटक, भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD), जागतिक हवामानशास्त्र संस्था (WMO), मशागत पद्धती, पिकांनुसार पाण्याची आवश्यकता, शाश्वत शेती, जलसिंचनाच्या पद्धती व पाणी व्यवस्थापन पद्धती,  सेंद्रीय शेती, सौर किरणे, महाराष्ट्रातील कृषी हंगाम, तृणधान्ये, डाळी, व्यावसायिक पिके या उपघटकांवर प्रश्न विचारले आहेत.
माती विज्ञान आणि कृषी अभियांत्रिकी या घटकांत जमिनीचे रासायनिक गुणधर्म, जमिनीचा कस, सेंद्रीय खते, पोषक द्रव्ये, शेती संसाधने, धान्य साठवणूकीस आवश्यक वातावरण, इक्युपमेंट्स हॅन्डिलग, सुक्ष्मसिंचन, ग्रीन हाऊस तंत्रज्ञान, शेती यांत्रिकी या घटकांवर आयोगाने भर दिला आहे. त्यामुळे अभ्यास करतांना संबंधित उपघटकांवर परिक्षार्थीनी लक्ष द्यावे.
संदर्भ सूची
*   प्रिन्सिपल ऑफ अ‍ॅग्रॉनॉमी – रेड्डी
*   राज्य परीक्षा मंडळाची अ‍ॅग्रीकल्चर आणि
*   टेक्नॉलॉजीची ११ वी व १२वी ची पुस्तके
*   पर्यावरण  – शंकर आयएएस अ‍ॅकॅडमी
*   टॉपर्स नोटस् – सुभाष यादव, सचिन सुर्यवंशी
*   जनरल अ‍ॅग्रीकल्चर – मुनीरजी
*   अ कॉम्पेटिटिव्ह बुक ऑफ अ‍ॅग्री  – नेमराज सुंदा
*    ईगल पब्लिकेशन बुक – नागरे
First Published on November 1, 2017 5:26 am
Web Title: study of maharashtra agricultural services

करिअरमंत्र मी मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली आहे. मला अध्यापन क्षेत्रात करिअर करण्यात रस आहे.

करिअरमंत्र

मी मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली आहे. मला अध्यापन क्षेत्रात करिअर करण्यात रस आहे.

सुरेश वांदिले | Updated: November 1, 2017 5:34 AM

*   मी मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली आहे. मला अध्यापन क्षेत्रात करिअर करण्यात रस आहे. तर आता मी बी.एड. किंवा डी.एड. करू शकतो का?
-शिवाजी फिरंगे
तुला प्राथमिक, माध्यमिक वा उच्च माध्यमिक शाळेचे शिक्षक व्हायचे असल्यास डी.एड./बी.एड. करावे लागेल. मात्र तू एम.टेक केल्यास तुला खासगी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिकवण्याची संधी मिळू शकते. पीएचडी करून ठेवल्यास तुला भविष्यात आयआयटी वा इतर शासकीय अभियांत्रिकी संस्थांमध्ये अशी संधी मिळू शकते. काही खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये बी.ई. झालेल्या उमेदवारांनासुद्धा शिकवण्याची संधी देतात. तू राहत असलेल्या परिसरातील अभियांत्रिकी महाविद्यालयात जाऊन तुझी इच्छा प्रदर्शित कर.
’   मी बी.ए.ची पदवी घेतली आहे. आता यानंतर मला एम.ए आणि एल.एल.बी असे दोन्ही अभ्यासक्रम करता येतील. परंतु एम.ए. केले तर पदव्युत्तर पदवी दोनच वर्षांत मिळेल. एल.एल.बी केल्यानंतर एल.एल.एम. या पदव्युत्तर पदवीसाठी पाच वर्ष लागतील. माझा गोंधळ उडाला आहे. मी नेमके काय करू? एम.ए की एल.एल.बी? 
-अनिकेत महल्ले
अशा प्रकारे गोंधळ उडणे, काही नवे नाही.
तसेच विचित्रही नाही. सर्वप्रथम तुला एखादी पदवी का घ्यायची आहे, याचा विचार कर. एम.ए. करून तुला काय करायचे आहे आणि एल.एल.बी. केल्यानंतर तुला काय करायचे आहे, ते आधी स्पष्ट करून घे. केवळ ज्ञान प्राप्तीसाठीच शिकायचे असल्यास काहीही केलेस तरी तसा कोणताच फरक पडत नाही. एम.ए. करून थेट नोकरी मिळण्याचा सध्याचा काळ नाही. नोकरीसाठी स्पर्धा परीक्षा द्यावीच लागेल. जर तुझा कल वकिली करण्याकडे असेल, तर एलएलबी करणे हा उत्तम पर्याय ठरू शकतो. एलएलबीच्या विषयांचे ज्ञान उत्तम मिळवले असल्यास व संवादकौशल्य चांगले विकसित केले तर सनद मिळाल्याबरोबर स्वतंत्र करिअर सुरू होऊ  शकते. एलएलएम केल्यावर स्पेशलाइज्ड वकील म्हणून संधी मिळू शकते. यातील कामगिरी अशिलांच्या पसंतीस उतरली तर तुला अधिक काम मिळू शकते. ज्याप्रमाणे स्पेशलाइज्ड डॉक्टरकडे गर्दी होते, त्याला जराही उसंत मिळत नाही, तसेच इकडेही घडू शकते.
First Published on November 1, 2017 5:16 am
Web Title: expert career guidance for upsc exam 2017

नोकरीची संधी प्रशिक्षण कालावधी डिझेल मेकॅनिक आणि कारपेंटर यांना २ वर्षे इतरांना १ वर्ष.

नोकरीची संधी

प्रशिक्षण कालावधी डिझेल मेकॅनिक आणि कारपेंटर यांना २ वर्षे इतरांना १ वर्ष.

Updated: November 1, 2017 5:11 AM
पश्चिम रेल्वे, अहमदाबाद (एडीआय) डिव्हिजन, पुढील अप्रेंटिसशिप पदांची भरती.
(१) फिटर (११२ पदे),
(२) मशिनिस्ट (९ पदे),
(३) वेल्डर (२३ पदे),
(४) इलेक्ट्रिशियन (४६ पदे),
(५) डिझेल मेकॅनिक (१६९ पदे),
(६) कारपेंटर (७ पदे),
(७) पेंटर (५ पदे) इ.
प्रशिक्षण कालावधी डिझेल मेकॅनिक आणि कारपेंटर यांना २ वर्षे इतरांना १ वर्ष.
वयोमर्यादा – दि. १३ ऑक्टोबर, २०१७ रोजी १५ ते २४ वर्षे (इमाव – २७ वर्षे, अजा/अज – २९ वर्षे).
अर्जाचे शुल्क – रु. १००/-. इंडियन पोस्टल ऑर्डर/डीडी स्वरूपात.
पात्रता – दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण.
निवड – १०वी आणि आयटीआयच्या गुणांची एकत्रित गुणवत्तेनुसार.
विहित नमुन्यातील अर्ज (जाहिरातीत दिल्यानुसार नवीन नमुन्यानुसार www.wr.indianrailways.gov.in
या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल.) आवश्यक त्या कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रतींसोबत डीआरएम ऑफिस, वेस्टर्न रेल्वे, अहमदाबाद या पत्त्यावर पोस्टाने दि. १२ नोव्हेंबर, २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

*    महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिसिटी ट्रान्स्मिशन कं. लि. (जाहिरात क्र. ३/२०१७) असिस्टंट इंजिनीअरच्या एकूण १०० पदांची भरती.
(१) असिस्टंट इंजिनीअर (ट्रान्स) – ५० पदे. पात्रता – बी.ई. (इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग).

(२) असिस्टंट इंजिनीअर (सिव्हिल) – बी.ई. (सिव्हिल इंजिनीअरिंग).
वयोमर्यादा – दि. १५ नोव्हेंबर, २०१७ रोजी ३५ वर्षे (मागासवर्गीय – ४० वर्षे, विकलांग – ४५ वर्षेपर्यंत)
निवड पद्धती – ऑनलाइन टेस्टमधील कामगिरीवर आधारित अंतिम निवड.
परीक्षा शुल्क – रु. ७००/-
(मागासवर्गीय रु. ३५०/-). ऑनलाइन अर्ज www.mahatransco.in या संकेतस्थळावर दि. १५ नोव्हेंबर, २०१७ पर्यंत करावेत.
ऑनलाइन टेस्ट डिसेंबर २०१७ ते जानेवारी २०१८ दरम्यान होईल.

’   इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स, गृह मंत्रालय, भारत सरकार ‘हेड कॉन्स्टेबल/कम्बॅटंट मिनिस्ट्रियल’च्या एकूण ६२ पदांची भरती.
पुरुष उमेदवार – ४५ पदे, महिला उमेदवार – ८ पदे आणि आयटीबीपीच्या उमेदवारांसाठी ९ पदे.
पात्रता – १२वी उत्तीर्ण टायिपग स्पीड इंग्रजी – ३५ श.प्र.मि. किंवा िहदी – ३० श.प्र.मि.
वयोमर्यादा – दि. १ ऑगस्ट, २०१७ रोजी १८ ते २५ वर्षे. (इमाव – २८ वर्षे, अजा/अज – ३१ वर्षेपर्यंत) (आयटीबीपी उमेदवारांसाठी ४० वर्षेपर्यंत, अजा/अज – ४५ वर्षेपर्यंत).
शारीरिक मापदंड – उंची – पुरुष – किमान १६५ सें.मी. (अज – १६२.५ सें.मी.),
महिला – किमान १५५ सें.मी.(अज – १५० सें.मी.). छाती – पुरुष – ७७-८२ सें.मी.
(अज – ७६-८१ सें.मी.)
निवड पद्धती –
फेज-१ हाइट बार टेस्ट, शारीरिक क्षमता चाचणी, शारीरिक मापदंड मोजणी, बायोमेट्रिक ओळख.
फेज-२
(अ) लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची १०० गुणांसाठी.
तीन तास कालावधी
(अंकगणित, सामान्यज्ञान, इंग्रजी,
कॉम्प्युटर नॉलेज).
(ब) कॉम्प्युटरवर टायिपगची स्किल टेस्ट.
फेज-३ मूळ कागदपत्रे तपासणी.
परीक्षा शुल्क – रु. १००/- (महिला, अजा/अज/माजी सैनिक यांना फी माफ).
www.recruitment.itbpolice.nic.in या संकेतस्थळावर दि. १३ नोव्हेंबर, २०१७ पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत.
First Published on November 1, 2017 5:11 am
Web Title: job opportunity in idia job vacancies in india job vacancies

यूपीएससीची तयारी : अभ्यासक्रमाचे आकलन विकास घडवून आणणे, याचबरोबर सागरी सुरक्षा अबाधित राखणे इत्यादी महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे.

यूपीएससीची तयारी : अभ्यासक्रमाचे आकलन

विकास घडवून आणणे, याचबरोबर सागरी सुरक्षा अबाधित राखणे इत्यादी महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे.

श्रीकांत जाधव | Updated: October 31, 2017 5:10 AM

प्रतिनिधिक छायाचित्र

आजच्या लेखामध्ये आपण सामान्य अध्ययन पेपर ३ मध्ये नमूद केलेल्या अभ्यासक्रमाचा आणि या पेपरचे स्वरूप व्याप्ती यांचा थोडक्यात महत्त्वपूर्ण आढावा घेणार आहोत. यूपीएससीने २०१३मध्ये  मुख्य परीक्षेच्या अभ्यासामध्ये बदल केलेला आहे. प्रस्तुत बदलानुसार या पेपरमध्ये  तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन या घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच प्रत्येक घटकामध्ये अंतर्भूत असणारे मुद्दे याची यादीही देण्यात आलेली आहे.
आर्थिक विकास – या घटकामध्ये भारतीय अर्थव्यवस्था संबंधित मुद्दय़ाचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये अर्थव्यवस्थेशी निगडित आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास, नैसर्गिक साधनसंपत्ती व या संपत्तीच्या वापराचे नियोजन, सर्वसमावेशक वाढ साध्य करण्यासाठी सरकारमार्फत राबविले जाणारे महत्त्वाचे उपक्रम, देशातील बजेट प्रक्रिया (Budgetary process), कृषी आणि कृषी संबंधित संलग्न असणारी क्षेत्रे तसेच कृषी क्षेत्राची उत्पादकता आणि देशांतर्गत स्थूल उत्पादनातील वाटा वाढविण्यासाठी सरकारमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना आणि या क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्या व त्या सोडविण्यासाठी सरकारने आखलेली ध्येयधोरणे. औद्योगिक क्षेत्र, सेवाक्षेत्र यांसारख्या आर्थिक विकासाला आणि आर्थिक वृद्धीला अधिक गती देणाऱ्या क्षेत्रासाठी सरकारमार्फत राबविले जाणारे विविध उपक्रम, योजना, आखण्यात आलेले कायदे, भारतामध्ये परकीय गुंतवणूक वाढविण्यासाठी आखण्यात आलेली रणनीती व याचबरोबर भारताचे परकीय व्यापार धोरण व निर्यातवाढीसाठी आखलेल्या विविध उपाययोजना, दळणवळण क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी सरकारमार्फत केले जाणारे विशेष प्रयत्न, १९९१मध्ये भारताने अवलंबिलेले आर्थिक उदारीकरणाचे धोरण आणि याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, जागतिकीकरणाचे भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम इत्यादी महत्त्वपूर्ण मुद्यांचा अभ्यास या घटकाची तयारी करताना करावा लागतो.
तंत्रज्ञान – हा घटक मुख्यत्वे विज्ञान आणि तंत्रज्ञान या अनुषंगाने आहे. या घटकामध्ये भारत सरकारने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये विकास घडवून आणण्यासाठी कोणत्या प्रकारच्या धोरणाची आखणी केलेली आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञानचा विकास व व्यवहार उपयोगिता, तसेच याचा सर्वसामान्याच्या जीवनावर होणार परिणाम, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये भारतीयांनी केलेली कामगिरी आणि दिलेले योगदान तसेच माहिती तंत्रज्ञान, संगणक, अवकाश संशोधन, नॅनो तंत्रज्ञान, जैव-तंत्रज्ञान आणि बौद्धिक संपदा अधिकार संबंधित मुद्दे इत्यादी बाबींचा समावेश आहे आणि यासंबंधी दररोज काहीना काही महत्त्वाच्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे हा घटक अभ्यासताना उपरोक्त नमूद केलेल्या प्रत्येक बाबीची मूलभूत म्हणजेच संकल्पनासह योग्य समज असावी लागते. थोडक्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान घटक अभ्यासताना विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये लावले जाणारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्थरावरील नवनवीन शोध, या शोधामुळे होणारे फायदे आणि तोटे, संबंधित बौद्धिक संपदा, अधिकार तसेच याचे होणारे परिणाम इत्यादी महत्त्वपूर्ण पलूंवर भर देण्यात येतो.
जैवविविधता, पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन – या घटकामध्ये पर्यावरण संवर्धन, पर्यावरण आणि जैवविविधतेचा होणारा ऱ्हास, या ऱ्हासासाठी जबाबदार असणारे घटक, जैवविविधतेला निर्माण झालेला धोका, पर्यावरणीय प्रदूषण, नदी प्रदूषण, हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण व यामुळे उत्पन्न झालेल्या समस्या, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जैवविविधता आणि पर्यावरण संरक्षणासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजना, भारत सरकारमार्फत जैवविविधता आणि पर्यावरण संरक्षित करण्यासाठी पास करण्यात आलेले विविध कायदे व त्यांची उपयुक्तता याचबरोबर पर्यावरणीय आघाताचे मूल्यमापन इत्यादी मुद्दे अभ्यासावे लागतात. आपत्ती व्यवस्थापन यामध्ये आपत्तीचे प्रकार ज्यामध्ये नैसर्गिक आणि मानवनिर्मित प्रकारांचा अंतर्भाव आहे. आपत्तीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या, तसेच आपत्ती निवारणासाठी सरकारमार्फत आखण्यात आलेली आपत्ती व्यवस्थापन योजना व कायदे इत्यादी मुद्दे अभ्यासावे लागणार आहेत.
सुरक्षा – सद्यस्थितीत भारताला बा आणि अंतर्गत सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्या देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान देत आहेत. सुरक्षा या घटकामध्ये भारताच्या बा आणि अंतर्गत सुरक्षासंबंधी मुद्दय़ांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये डाव्या विचारसरणीचा दहशतवाद अर्थात नक्षलवाद, सीमेपलीकडून होणारी घुसखोरी, दहशतवाद, वाढता प्रादेशिकवाद, पूर्वेकडील राज्यामध्ये होणारी घुसखोरी व वांशिक चळवळी, जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद, आंतरराष्ट्रीय सीमांसंबंधी असणारे वादविवाद, संघटित गुन्हेगारी, अवैध पसा हस्तांतरण, सीमेवर अवैधरीत्या होणारी नशिल्या पदार्थाची तस्करी आणि याचे असणारे संघटित स्वरूप, सततचे होणारे भाषिक वाद, राज्याराज्यांतर्गत असणारे वाद, धार्मिक दंगे, सायबर सुरक्षा संबंधित मूलभूत माहिती, माध्यमे आणि सोशल नेटवìकग साइटस याचा होणारा वापर,
ज्याद्वारे देशातील सामाजिक सलोख्याला निर्माण होणारा धोका, सुरक्षतेला निर्माण होणारे आवाहन इत्यादी बाबी आणि याच्या जोडीला या आव्हानांना सामोरे जाताना भारत सरकारने आखलेली रणनीती ज्यामध्ये सीमा सुरक्षा आणि व्यवस्थापन अधिक सक्षमरीत्या राबविणे, सीमेलगतच्या भागाचा
विकास घडवून आणणे, याचबरोबर सागरी सुरक्षा अबाधित राखणे इत्यादी महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. तसेच देशाची बाह्य आणि अंतर्गत सुरक्षा अबाधित राखण्यासाठी सरकारमार्फत स्थापन करण्यात आलेल्या विविध सरकारी संस्था आणि संघटना व त्यांना नेमून दिलेले कार्य याचबरोबर सरकारमार्फत वेळोवेळी केल्या जाणाऱ्या उपाययोजना व कायदे यांची माहिती असणे आवश्यक आहे.
उपरोक्त चíचलेल्या जवळपास सर्व घटकांमध्ये महत्त्वाच्या संकल्पनांचाही समावेश असतो आणि या संकल्पनांचे योग्य आकलन करणे अपेक्षित आहे ज्यामुळे विषयावर प्रभुत्व निर्माण करणे सोपे होते. आपण यापुढील प्रत्येक लेखामध्ये संबंधित घटकामधील काही महत्त्वाच्या संकल्पनांवरही चर्चा करणार आहोत. उपरोक्त चíचलेले सर्व घटक अभ्यासताना या घटकांसंबंधित घडणाऱ्या महत्त्वाच्या चालू घडामोडींचीही तयारी करावी लागणार आहे. अर्थात प्रत्येक घटकाचे मूलभूत ज्ञान असल्याशिवाय चालू घडामोडीचे योग्य आकलन करता येत नाही.
या पुढील लेखामध्ये या पेपरमध्ये नमूद केलेल्या आर्थिक विकास या घटकाची तयारी करण्यासाठी लागणाऱ्या उपयुक्त संदर्भग्रंथाचा तसेच गतवर्षीय मुख्य परीक्षेत या घटकावर कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आलेले होते, याची एकत्रित चर्चा करणार आहोत.
First Published on October 31, 2017 5:10 am
Web Title: tips to crack upsc civil services

नोकरीची संधी ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लि. (ओएनजीसी)

नोकरीची संधी

ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लि. (ओएनजीसी)

सुहास पाटील | Updated: October 31, 2017 5:07 AM

प्रतिनिधिक छायाचित्र

ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लि. (ओएनजीसी) आपल्या देशभरातील २३ ऑपरेटिंग लोकेशन्स (मुंबई (५६० पदे), उरण (१२० पदे), गोवा (२८ पदे), वडोदरा (२११ पदे), अहमदाबाद (५०६ पदे), हाजिरा (१९७ पदे), मेहसाणा (४३३ पदे) इ.) मध्ये अ‍ॅप्रेंटिसच्या एकूण ५,२५० पदांची भरती.
दहावी पात्रता असणाऱ्या उमेदवारांसाठी
*    केबिन/रूम अटेंडंट (मुंबई – ३० पदे, उरण – २ पदे).
*    डेटा एन्ट्री ऑपरेटर (मुंबई – १० पदे).
*    हाऊसकीपर (मुंबई – १० पदे, उरण – ३ पदे).
(डी) स्टोअरकीपर (मुंबई – १५ पदे)
बारावी पात्रता असणाऱ्या उमेदवारांसाठी
*   अकाऊंटंट (मुंबई – ५९ पदे, उरण – ४ पदे, बारावी कॉमर्स/मॅथ्स विषयांसह).
*    लायब्ररी असिस्टंट (मुंबई – ४ पदे, उरण – १ पदे).
*    सेक्रेटरियल असिस्टंट (मुंबई – ३२७ पदे, उरण – २३ पदे).
बी.कॉम्. पात्रताधारकांसाठी – अकाऊंटंट
बी.एस्सी. (फिजिक्स/केमिस्ट्री) पात्रताधारकांसाठी – लॅबोरेटरी असिस्टंट
(मुंबई – २३ पदे, उरण – १० पदे).
आयटीआय पात्रताधारकांसाठी –
*    केबिन रूम अटेंडंट,
*    कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅिमग असिस्टंट (सीओपीए) (मुंबई – ३२ पदे, उरण – ४ पदे),

*    इलेक्ट्रिशियन (मुंबई – १२ पदे, उरण – २० पदे),
*    इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (मुंबई – २ पदे, उरण – ७ पदे),
*    फिटर (मुंबई – ४ पदे, उरण – २३ पदे),
*    इन्फॉम्रेशन टेक्नॉलॉजी अँड इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स (मुंबई – २८ पदे, उरण – ६ पदे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकसुद्धा पात्र आहेत.),
*    लॅबोरेटरी असिस्टंट (केमिकल प्लँट) (मुंबई – २३ पदे, उरण – १० पदे),
*    मेकॅनिक डिझेल (मुंबई – ४ पदे, उरण – ४ पदे),
*    सेक्रेटरियल असिस्टंट (मुंबई – ३२७ पदे, उरण – २३ पदे),
*    वेल्डर (उरण – ३ पदे),
*    इन्स्ट्रमेंट मेकॅनिक (उरण – ५ पदे),
*     मशिनिस्ट/टर्नर (उरण – ३ पदे).
पात्रता – (१० वी/१२ वी/आयटीआय इ.) परीक्षेत किमान ४५% गुणांची अट. (अजा/अज/विकलांग यांना ४०% गुण आवश्यक)
वयोमर्यादा – सर्व पदांसाठी दि. १ नोव्हेंबर, २०१७ रोजी १८ वर्षे पूर्ण.
निवड पद्धती – पदानुसार पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार.
स्टायपेंड दरमहा – रु. ५,००० ते १०,५००/- ट्रेड आणि लोकेशननुसार. विस्तृत जाहिरात www.ongcindia.com  वर उपलब्ध.
जाहिरातीत दिलेल्या विहीत नमुन्यातील पूर्ण भरलेले अर्ज संबंधित लोकेशनवर दि. ३ नोव्हेंबर, २०१७ पर्यंत स्पीड पोस्ट/रजिस्टर्ड पोस्टाने पोहोचतील असे पाठवावेत. अर्जासोबतच पुढील कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रतीही जोडाव्यात. एसएससी पासिंग सर्टििफकेट आणि मार्क लिस्ट, आयटीआय मार्क लिस्ट,  जातीचा दाखला (अजा/अज/इमावसाठी), अपंगत्वाचा दाखला (असल्यास), आधार कार्ड.
सर्व पदांसाठी १२ महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी पुढील पदे वगळता
अकाऊंटंट – पात्रता १२ वी – १४ महिने,
केबिन रूम अटेंडंट – पात्रता – आयटीआय – ६ महिने,
डेटा एन्ट्री ऑपरेटर – सेक्रेटरियल असिस्टंट -पात्रता – १२ वी – १५ महिने,
आयटी अँड ईएसएम – पात्रता – आयटीआय इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ट्रेड – २४ महिने.
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
ओएनजीसी मुंबईसाठी – ‘१/८, एचआर-ईआर , ओएनजीसी मुंबई, एनबीपी, ग्रीन हाईट्स, प्लॉट सी-६९, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू.), मुंबई – ४०००५१’.
ओएनजीसी उरणसाठी – ‘१/८, एचआर-ईआर, ओएनजीसी उरण प्लँट, द्रोणागिरी भवन, उरण, जि. रायगड – ४००७०२’ अर्जाच्या लिफाफ्यावर उजव्या कोपऱ्यात ‘अ‍ॅप्रेंटिस अ‍ॅप्लिकेशन’ असे लिहावे.
अर्ज करण्यासाठी ई-मेल आयडी, मोबाईल नंबर, आधारकार्ड उमेदवाराकडे असणे आवश्यक. उमेदवार कोणत्याही एका ट्रेडसाठी अर्ज करू शकतात.
First Published on October 31, 2017 5:07 am
Web Title: job vacancies in india indian government jobs job vacancies in india

देशोदेशींच्या शिष्यवृत्ती : नासातर्फे पाठय़वृत्ती दरवर्षीप्रमाणे पीएच.डी. पूर्ण केलेल्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

देशोदेशींच्या शिष्यवृत्ती : नासातर्फे पाठय़वृत्ती

दरवर्षीप्रमाणे पीएच.डी. पूर्ण केलेल्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

प्रथमेश आडविलकर | Updated: October 28, 2017 1:56 AM

खगोलशास्त्र व अंतराळ संशोधनातील जगातल्या अग्रगण्य संशोधन संस्थेकडून म्हणजेच नासाकडून विद्यार्थ्यांसाठी पाठय़वृत्ती कार्यक्रम आखला आहे. पदार्थविज्ञान, खगोलशास्त्र, अंतराळशास्त्र किंवा संबंधित शाखेतील विविध विषयांतील पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ  इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना NASA Hubble Fellowship Program (NHFP) च्या माध्यमातून पाठय़वृत्ती दिली जाते. त्याअंतर्गत दरवर्षीप्रमाणे पीएच.डी. पूर्ण केलेल्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रमांसाठी प्रवेश व त्यासहित पाठय़वृत्तीचे लाभ असे या पाठय़वृत्तीचे स्वरूप आहे. त्यासाठी अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत.
पाठय़वृत्तीविषयी –
नासा या अमेरिकन संस्थेला आपण अंतराळ तंत्रज्ञानातील जागतिक स्तरावर बोलबाला झालेली संस्था म्हणून ओळखतो. येथे संशोधन करायला मिळावे, ही अनेकांची इच्छा असते. अमेरिकेतील अनेक प्रमुख विद्यापीठांच्या सहकार्याने नासा विविध शैक्षणिक व संशोधन उपक्रम राबवण्यामध्ये नेहमी पुढाकार घेत असते. नासा व अमेरिकी विद्यापीठांकडून संयुक्तपणे दरवर्षी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रमांसाठी मोफत प्रवेश व पाठय़वृत्तीचे लाभ दिले जातात. पदार्थविज्ञान, खगोलशास्त्रज्ञ, अंतराळशास्त्रज्ञ किंवा संबंधित शाखेतील विविध विषयांतील पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रमांसाठी NASA Hubble Fellowship Program (NHFP) या नावाने या संस्थांकडून पाठय़वृत्ती कार्यक्रम राबवला जातो. २०१८ साली सुरू होणाऱ्या या पाठय़वृत्ती कार्यक्रमाअंतर्गत पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रमासाठी एकूण २४ अर्जदारांची निवड केली जाणार आहे. पाठय़वृत्ती कार्यक्रम व पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रम या दोन्हींचा कालावधी तीन वर्षांचा आहे. अर्जदाराच्या प्रस्तावित संशोधन विषयांतील पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रम अमेरिकेतील ज्या कोणत्या संशोधन संस्थेत किंवा विद्यापीठामध्ये उपलब्ध असेल तिथे तो अर्जदारास पूर्ण करावयाचा आहे. या पाठय़वृत्ती कार्यक्रमासाठी नासाची आर्थिक मदत अर्जदाराला तीन वर्षांसाठी मिळणार आहे. यासंबंधित अधिक माहिती त्याने दुव्यामध्ये दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन  मिळवावी.
ही पाठय़वृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. अर्जदार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदार्थविज्ञान, खगोलशास्त्र, अंतराळशास्त्र किंवा संबंधित शाखेतील विषयांमध्ये पीएच.डी.धारक असावा. त्याने दि. १ जानेवारी २०१५ पूर्वी पीएच.डी. पदवी मिळवलेली असावी. अर्जदाराची शैक्षणिक पाश्र्वभूमी उत्तम असावी. अर्जदाराचा किमान एक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम लेखक म्हणून प्रकाशित झालेला असावा. अर्जदाराचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. अर्जदाराने आयईएलटीएस किंवा टोफेल या इंग्रजीच्या परीक्षांपैकी कोणत्याही एका परीक्षेमध्ये त्यांना किमान आवश्यक बँडस् किंवा गुण मिळालेले असावेत. अर्जदाराचा सीव्ही अतिशय उत्तम असावा. संशोधनाव्यतिरिक्त त्याच्याकडे कार्यानुभव असेल तर त्याने तो तसा त्याच्या एसओपी व सीव्हीमध्ये नमूद करावा. या पाठय़वृत्तीसाठी त्याने पूर्ण केलेला अर्ज आवश्यक कागदपत्रांसहित जमा करावा.
अर्ज प्रक्रिया –
या पाठय़वृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून यादीमध्ये दिलेल्या कागदपत्रांच्या सॉफ्ट प्रतींसह संस्थेच्या संकेतस्थळावरच जमा करायचा आहे. अर्जासह अर्जदाराने त्याचे एसओपी, सीव्ही, आयईएलटीएस किंवा टोफेल यापैकी एका परीक्षेचे गुण, पीएच.डी. पूर्ण केल्याचे विद्यापीठाचे प्रशस्तीपत्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित केलेले शोधनिबंध, सध्या चालू असलेल्या व यापूर्वी केलेल्या संशोधनाचा एक लघुप्रबंध व त्यावरच आधारित त्याच्या प्रस्तावित संशोधनाचा (research proposal) लघुप्रबंध इत्यादी गोष्टी संस्थेला अपेक्षित असलेल्या स्वरूपात पाठवाव्यात. अर्जदाराच्या प्रस्तावित संशोधनाचा लघुप्रबंध नासाच्या सध्या खगोलशास्त्रातील चालू असलेल्या संशोधनाशी साधम्र्य दाखवणारा असावा. अर्जदाराने त्याच्या संशोधनाशी परिचित असलेल्या तीन तज्ज्ञांकडून शिफारसपत्रे घ्यावीत. अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत जरी दि. २ नोव्हेंबर २०१७ असली तरीही तज्ज्ञांसाठी शिफारसपत्रे पाठवण्याची अंतिम मुदत मात्र दि. ९ नोव्हेंबर २०१७ ही आहे. तज्ज्ञांनी शिफारसपत्र पाठवताना मात्र पीडीएफ स्वरूपात पाठवावयाची आहेत.
निवड प्रक्रिया –
  • अर्जदाराची संशोधनातील गुणवत्ता लक्षात घेऊन त्याच्या अर्जाची तपासणी केली जाईल. तपासणीमधून गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल. समितीचा निर्णय अंतिम राहील. अर्जदारांना त्यांच्या निवडीबाबत कळवले जाईल.
उपयुक्त संकेतस्थळ –
https://nhfp.stsci.edu/
अंतिम मुदत –
  • या पाठय़वृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. २ नोव्हेंबर २०१७ आहे. तर अर्जदाराच्या वतीने तज्ज्ञांना शिफारसपत्रे जमा करावयाची अंतिम मुदत दि. ९ नोव्हेंबर २०१७ ही आहे.
itsprathamesh@gmail.com
First Published on October 28, 2017 1:56 am
Web Title: nasa study nasa hubble fellowship program
0
Shares

शासकीय विद्यानिकेतने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात

शासकीय विद्यानिकेतने

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात

लोकसत्ता टीम | Updated: October 28, 2017 1:55 AM

विद्यार्थाच्या अंगी बौद्धिक व शारीरिक शिस्त बाणावी, त्यांना सहजीवनाची सवय लागावी, त्यांच्या ठिकाणी निर्भयता वाढावी यासाठी या विद्यानिकेतनामध्ये वसतिगृहात्मक शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
निकष
  • ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि हुशार व गुणी विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी पुसेगाव जिल्हा सातारा, धुळे, औरंगाबाद, अमरावती आणि केळापूर, जिल्हा यवतमाळ ही पाच शासकीय वसतिगृहात्मक विद्यानिकेतने आहेत. त्यात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या निकषानुसार प्रवेश दिला जातो. त्यासाठी त्यांना पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते व गुणानुक्रमे दरवर्षी इ. पाचवीत ४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
  • विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा खर्च उत्पन्नाच्या निकषानुसार शासन करते. विद्यानिकेतनाची कार्यपद्धत्ती आणि व्यवस्थापन यासाठी एक राज्यस्तरीय नियामक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे.
योजनेचा उद्देश
  • ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणाच्या चांगल्या सुविधा द्याव्यात.
  • हुशार व गुणी विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण.
  • आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन, त्यांना शैक्षणिक सुविधा देण्यावर भर.
  • वसतिगृहात्मक शिक्षणाच्या सोयी विद्यानिकेतनामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
First Published on October 28, 2017 1:55 am
Web Title: government hostels for students

नोकरीची संधी अर्जदारांनी लाइफ सायन्सेस विषयातील एमएस्सी पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केलेली असावी

नोकरीची संधी

अर्जदारांनी लाइफ सायन्सेस विषयातील एमएस्सी पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केलेली असावी

द. वा. आंबुलकर | Updated: October 28, 2017 1:53 AM

राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र, पुणे येथे संशोधक पदासाठी थेट मुलाखत-
अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र, पुणेची जाहिरात पाहावी अथवा केंद्राच्या http://www.nccs.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तपशीलवार अर्ज व कागदपत्रांसह थेट मुलाखतीसाठी संपर्क- संचालक, राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र, एनसीसीएस कॉम्प्लेक्स, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, गणेशखिंड, पुणे ४११००७ येथे १ नोव्हेंबर २०१७ रोजी.
नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ, मुंबई येथे दिव्यांगजन उमेदवारांना संशोधक म्हणून संधी-
अर्जदारांनी लाइफ सायन्सेस विषयातील एमएस्सी पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केलेली असावी अथवा त्यांनी लाइफ सायन्सेसमधील एमएस्सी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण करून त्याच विषयात संशोधनपर पीएचडी केलेली असावी. संगणकाचे ज्ञान आवश्यक. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २३ ते २९ सप्टेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ, मुंबईची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या www.nirrh.res.in  अथवा www.icmr.nic.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज डायरेक्टर, नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ जे. एम. स्ट्रीट, परळ, मुंबई- ४०००१२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ६ नोव्हेंबर २०१७.

महाराष्ट्र शासनाच्या शिधावाटप व नागरी पुरवठा संचालनालयात मुंबई शहर व उपनगर जिल्ह्य़ासाठी ग्राहक संघटना प्रतिनिधींच्या १० जागा-
अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली शिधावाटप व नागरी पुरवठा संचालनालयाची जाहिरात पाहावी अथवा संचालनालयाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज नियंत्रक शिधावाटप व संचालक यांचे कार्यालय, रॉयल इन्शुरन्स इमारत, १४, जमशेटजी टाटा मार्ग, चर्चगेट, मुंबई- ४०००२० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २ नोव्हेंबर २०१७.
महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषिविकास प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (पशुसंवर्धन) अंतर्गत सातारा जिल्ह्य़ात पशुधन विस्तारतज्ज्ञ पदाच्या करारतत्त्वावर ४ जागा-
अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषिविकास प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, पुणेची जाहिरात पाहावी अथवा कक्षाच्या http://macp.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. तपशीलवारपणे भरलेले अर्ज नोडल अधिकारी, महाराष्ट्र कृषिविकास प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, प्लॉट नं. ७८ ई/ एफ, भू-विकास बँकेचे प्रशिक्षण केंद्र, मार्केट यार्ड, गुलटेकडी, पुणे- ४११०३७ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३ नोव्हेंबर २०१७.
केंद्र सरकारच्या रजिस्ट्रार जनरल इंडिया अंतर्गत डेप्युटी डायरेक्टर ऑफ सेन्सस ऑपरेशन्सच्या २७ जागा-
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९ ते १५ ऑक्टोबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली रजिस्ट्रार जनरल इंडियाची जाहिरात पाहावी अथवा रजिस्ट्रार जनरलच्या  http://www.censusindia.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज अंडर सेक्रेटरी, अ‍ॅडमिन, सेक्शन-३, २-ए, मानसिंग रोड, नवी दिल्ली ११००११ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ७ नोव्हेंबर २०१७.
सैन्यदलात धर्म शिक्षक पदाच्या संधी-
अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ७ ते १३ ऑक्टोबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाची जाहिरात पाहावी अथवा सैन्यदलाच्या www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०१७.
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी, चेन्नई अंतर्गत प्रोजेक्ट सायंटिस्टच्या १०६ जागा-
अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या https://www.niot.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ नोव्हेंबर २०१७.
First Published on October 28, 2017 1:53 am
Web Title: job opportunity job alert 2

करिअरमंत्र हा अभ्यासक्रम पुढील संस्थांमधून करता येईल.

करिअरमंत्र

हा अभ्यासक्रम पुढील संस्थांमधून करता येईल.

सुरेश वांदिले | Updated: October 28, 2017 1:51 AM

बारावीनंतर सोलार इंजिनीअरिंग अभ्यासक्रम कोणत्या संस्थेत चालवण्यात येतो
सारंग लाले
हा अभ्यासक्रम पुढील संस्थांमधून करता येईल.
१)अ‍ॅमिटी विद्यापीठात बी.टेक इन सोलर अँड अल्टरनेट एनर्जी हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.
संपर्क- http://www.amity.edu
२) हिंदुस्थान इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अँण्ड सायन्स या संस्थेने बी.टेक इन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विथ स्पेशलायझेशन इन एनर्जी इंजिनीअरिंग हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. यामध्ये सोलर इंजिनीअरिंगविषयी शिकता येते.
संपर्क-  https://hindustanuniv.ac.in/
३) एसआरएम युनिव्हर्सिटीने एम.टेक इन सोलर इंजिनीअरिंग हा अभ्यासक्रम सुरू केला आहे.
बीटेक झाल्यानंतर तो करता येतो.
संपर्क – http://www.srmuniv.ac.in
मेकॅनिकल इंजिनीअर असलेल्या उमेदवारांना सोलर इंजिनीअरिंगमध्ये करिअर करण्याची संधी मिळू शकते.
तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.
First Published on October 28, 2017 1:51 am
 

एमपीएससी मंत्र : विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा – सामान्य अध्ययन आपले पक्के मुद्दे अधिक पक्के करा ज्यायोगे ऋणात्मक गुणपद्धतीला यशस्वीपणे सामोरे जाऊ शकाल.

एमपीएससी मंत्र : विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा – सामान्य अध्ययन

आपले पक्के मुद्दे अधिक पक्के करा ज्यायोगे ऋणात्मक गुणपद्धतीला यशस्वीपणे सामोरे जाऊ शकाल.

वसुंधरा भोपळे | Updated: October 27, 2017 12:24 AM

विद्यार्थी मित्रांनो यापूर्वीच्या लेखांत सहायक कक्ष अधिकारी पदासाठी असलेल्या वेगळ्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमाची तयारी कशी करावी याची रणनीती पाहिली. आज आपण विक्रीकर निरीक्षक पदासाठी असलेल्या वेगळ्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमाची तयारी कशी करावी हे पाहूयात.
अभ्यासक्रम व अभ्यास स्रोत
१) नियोजन – या घटकावर साधारणपणे ८ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये नियोजनाची प्रक्रिया, प्रकार, भारताच्या पहिल्या ते दहाव्या पंचवार्षकि योजनेचा आढावा, मूल्यांकन, सामाजिक व आर्थिक विकासाचे निर्देशफलक, राज्य आणि स्थानिक पातळीवरील नियोजन, विकेंद्रीकरण, ७३ व ७४ वी घटनादुरुस्ती, भारतीय अर्थव्यवस्था, क्षेत्रीय विकासाचा कल व सेवा क्षेत्राची रूपरेषा, भारतीय अर्थव्यवस्थेच्या समोरील आव्हाने, गरिबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल यासंदर्भातील प्रश्नांचा समावेश होतो.
२) शहरी व ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास – या घटकावर साधारणपणे ८ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये पायाभूत सुविधांची गरज आणि महत्त्व, सामाजिक व आर्थिक पायाभूत सुविधांचा विकास आणि वाढ – जसे ऊर्जा, पाणीपुरवठा व मलनिसारण, गृह, परिवहन (रस्ते, बंदर इत्यादी) दळणवळण (पोस्ट व तार, दूरसंचार) रेडीओ, टी.व्ही. इंटरनेट क्रायसिस, भारतातील इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न व या संबंधीचे

धोरण व त्यावरील पर्याय; खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारी, एफ. डी. आय. आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर विकासाचे खासगीकरण, राज्य व केंद्र सरकारचे इन्फ्रास्ट्रक्चर विकासाचे धोरण, ग्रामीण व शहरी भागातील परिवहन व गृह या विषयीचे प्रश्न व त्यावरील केंद्र व राज्य सरकारचे कार्यक्रम व उपक्रमशिलता यासंदर्भातील प्रश्नांचा समावेश होतो.
३) आर्थिक सुधारणा व कायदे – या घटकावर साधारणपणे ८ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये पाश्र्वभूमी, उदारीकरण, खासगीकरण, जागतिकीकरण संकल्पना व त्याचा अर्थ आणि व्याप्ती, मर्यादा, केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा, WTO, तरतुदी आणि सुधारणा आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील अपेक्षित परिणाम, प्रश्न व समस्या, GST, विक्रीकर VAT, WTO इत्यादीशी संबंधित कायदे/नियम यासंदर्भातील प्रश्नांचा समावेश होतो.
४) आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ – या घटकावर साधारणपणे ८ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये जागतिकीकरणाच्या युगातील सूत्र व कल, वाढ, रचना आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची दिशा, भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापाराचे धोरण, निर्यातीतील वाढ, WTO आणि आंतरराष्ट्रीय व्यापार, विदेशी भांडवलाचा अंत:प्रवाह, रचना व वाढ, FDI व्यापार, बहुआंतरराष्ट्रीय भांडवल पुरविणाऱ्या संस्था, IMF, जागतिक बँक, IDA इंटरनॅशनल क्रेडिट रेटिंग या संदर्भातील प्रश्नांचा समावेश होतो.
५) सार्वजनिक वित्त व्यवस्था – या घटकावर साधारणपणे ८ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये महसुलाचे साधन, टॅक्स, नॉनटॅक्स, भारतातील केंद्र व राज्यातील सार्वजनिक ऋण, केंद्र व राज्याची सार्वजनिक खर्च वाढ, सार्वजनिक खर्च सुधारणा कामावर आधारित अर्थसंकल्प, शून्याधारित अर्थसंकल्प, भारतातील करसुधारणा आढावा, राज्य पातळीवरील  करसुधारणा VAT सार्वजनिक ऋण वाढ, रचना आणि भार, राज्याची कर्जबाजारीपणाची केंद्राला समस्या, राजकोशीय तूट, संकल्पना, तुटीचे नियंत्रण, केंद्र, राज्य व रिझव्‍‌र्ह बँकेचे उपक्रम, भारतातील राजकोशीय सुधारणा, केंद्र व राज्यस्तरावरील आढावा यासंदर्भातील प्रश्नांचा समावेश होतो.
अभ्यास स्रोत – वरील घटकांसाठी भारताची व महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, भारतीय अर्थव्यवस्था हे दत्त व सुंदरम यांचे पुस्तक तसेच स्पर्धापरीक्षा अर्थशास्त्र भाग १ व भाग २ ही डॉ. किरण देसले यांची पुस्तके अभ्यासावीत.
विद्यार्थी मित्रांनो विक्रीकर निरीक्षक पदाच्या मुख्य परीक्षेचा अभ्यास नेमका कसा आणि कशातून करायचा याची यथासांग चर्चा आपण केलीच आहे. या मुख्य परीक्षेला सामोरे जाताना शेवटच्या घटकेतील उजळणी करणे गरजेचे आहे. ही उजळणी अभ्यासक्रम आणि जुन्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाच्या आधारे केल्यास त्याचा पेपर सोडविताना नक्कीच फायदा होईल. मुख्य परीक्षेला अजून जवळपास दोन महिने बाकी आहेत. तर या दोन महिन्यातील अभ्यासासाठी खालील काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊन आपली रणनीती बनवा.
१) अभ्यासाचे योग्य नियोजन करून जास्तीत जास्त सराव चाचण्यांच्या माध्यमातून आपले आत्मपरीक्षण करा.
२) आपले कच्चे दुवे हेरून त्यांचा योग्य तो सराव करा.
३) आपले पक्के मुद्दे अधिक पक्के करा ज्यायोगे ऋणात्मक गुणपद्धतीला यशस्वीपणे सामोरे जाऊ शकाल.
४) अर्थशास्त्रातील विविध मूलभूत संकल्पना समजून घेऊन त्या लक्षात ठेवायचा प्रयत्न करा.
५) शेवटी भरपूर सराव आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा.
परीक्षेसाठी हार्दकि शुभेच्छा..!!
First Published on October 27, 2017 12:24 am
Web Title: sales inspector main examination mpsc exam

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध होणार आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध होणार आहे.

लोकसत्ता टीम | Updated: October 27, 2017 12:23 AM

इयत्ता अकरावी, बारावी आणि त्यानंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या, परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा आधार मिळणार आहे. भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध होणार आहे.
योजनेच्या अटी
  • विद्यार्थ्यांना दहावी, बारावी, पदवी किंवा पदविका परीक्षेत ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे.
  • या प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा ५० टक्के गुण असणार आहे.
  • विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न २ लाख ५० हजारपेक्षा जास्त नसावे.
  • विद्यार्थी बाहेरगावी शिकणारा असावा, अर्थात स्थानिक नसावा.
  • गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.
  • विद्यार्थी व्यावसायिक पाठय़क्रमाशी संलग्न निर्वाह भत्ता योजनेचा लाभ घेत असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • विद्यार्थ्यांनी आपले बँक खाते आधारकार्डाशी संलग्न करून घेणे बंधनकारक आहे.
  • सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांना ही योजना लागू नाही.
लाभार्थी प्रक्रिया
First Published on October 27, 2017 12:23 am
Web Title: babasaheb ambedkar swadhar yojna   

नोकरीची संधी ज्युनियर इंजिनीअर असिस्टंट (प्रोडक्शन) पदासाठी एमएस्सी (केमिस्ट्री) उमेदवारदेखील पात्र आहेत.

नोकरीची संधी

ज्युनियर इंजिनीअर असिस्टंट (प्रोडक्शन) पदासाठी एमएस्सी (केमिस्ट्री) उमेदवारदेखील पात्र आहेत.

सुहास पाटील | Updated: October 27, 2017 12:22 AM
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. (रिफायनरी डिव्हिजन) मथुरा रिफायनरीमध्ये ज्युनियर इंजिनीअरिंग असिस्टंट-४च्या एकूण ४५ पदांची भरती.
(१) प्रोडक्शन (केमिकल) – १५ पदे,
(२) इलेक्ट्रिकल – ७ पदे,
(३) मेकॅनिकल – १३ पदे,
(४) इन्स्ट्रमेंटेशन – ९ पदे.
पात्रता – पद क्र. (१) ते (४) साठी संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदविका किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अजसाठी ४५ % गुण) सर्व पदांसाठी १ वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक.
ज्युनियर इंजिनीअर असिस्टंट (प्रोडक्शन) पदासाठी एमएस्सी (केमिस्ट्री) उमेदवारदेखील पात्र आहेत.
(इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/इन्स्ट्रमेंटेशन पदांसाठी महिला उमेदवारसुद्धा पात्र आहेत. विकलांगांसाठी प्रत्येकी २ पदे राखीव आहेत.)
वयोमर्यादा – १८ ते २६ वष्रे.
(अजा/अज – ३१ वष्रेपर्यंत, इमाव – २९ वष्रेपर्यंत, विकलांग – ३६/३९/४१ वष्रेपर्यंत)
ऑनलाइन अर्ज www.iocl.com या संकेतस्थळावर दि. ३१  ऑक्टोबर, २०१७ पर्यंत करून आवश्यक त्या स्वयंसाक्षांकित प्रमाणपत्रांच्या प्रतींसह  DGM (HR), HR Dept., Administrative Bldg., Mathura Refinery, Mathura, U.P. – 281 005′  या पत्त्यावर दि. ७ नोव्हेंबर, २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.
स्टाफ सिलेक्शन बोर्ड, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेश, (जाहिरात क्र. २)

पुढील पदांची भरती.
(१) असिस्टंट सब-इन्स्पेक्टर (डब्ल्यू/एल्) (२ पदे).
पात्रता – इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/रेडिओ टेक्नॉलॉजी इ.मधील अभियांत्रिकी पदविका किंवा वायरलेस मेकॅनिक कम ऑपरेटरचा दोन वर्ष कालावधीचा कोर्स इ.
(२) पोलीस कॉन्स्टेबल – ७२  पदे (महिलांसाठी २५ पदे राखीव).
पात्रता – १२वी उत्तीर्ण. उंची – पुरुष -१६८सें.मी., महिला -१५२ सें.मी. छाती – पुरुष -८१-८५ सें.मी.
(३) पोलीस कॉन्स्टेबल (आरटीओस/रेडिओ मेकॅनिकल/सायफर) – १७ पदे.
पात्रता – १२वी (विज्ञान) उत्तीर्ण किंवा आयटीआयचा वायरलेस ऑपरेटर/रेडिओ/टेक्निशियन/इलेक्ट्रॉनिक्स टेलि कम्युनिकेशन कोर्स पद क्र. (१) ते (३) साठी.
(४) कॉन्स्टेबल ड्रायव्हर – ६ पदे
(१ पद महिलांसाठी राखीव).
पात्रता -१० वी.
हलकी/अवजड वाहन चालक परवाना.
उंची – पुरुष – १६० सें.मी., महिला -१५२ सें.मी. छाती – पुरुष – ८१-८५सें.मी.
(५) इन्स्पेक्टर ऑफ एक्साइज -९ पदे.
पात्रता – पदवी उत्तीर्ण. उंची -१६३ सें.मी.,
छाती – ७९-८४ सें.मी. (६) एक्साइज गार्ड – ५८ पदे.
पात्रता -१० वी उत्तीर्ण. उंची – पुरुष -१६३ सें.मी.,
महिला -१५२ सें.मी. छाती – पुरुष – ७९-८४सें.मी.
वयोमर्यादा – पद क्र. (५) साठी ३० वष्रेपर्यंत, इतर पदांसाठी १८ ते २७ वष्रेपर्यंत.
परीक्षा शुल्क – रु. १००/-. ऑनलाइन अर्ज www.daman.nic.in या संकेतस्थळावर दि. ७ नोव्हेंबर, २०१७ पर्यंत भरावेत.
यूपीएस्सी (जाहिरात क्र. १९/२०१७) मार्फत पुढील पदांची भरती.
(१) डेप्युटी कंट्रोलर ऑफ एक्स्पोझिव्हज् (पेट्रोलियम अँड एक्स्प्लोझिव्हज् सेफ्टी ऑर्गनायझेशन (पीईएस्ओ) – १७ पदे.)
(नागपूर मुख्यालयासाठी)
पात्रता – बी.ई. (केमिकल इंजिनीअर)/एम्.एस्सी. (केमिस्ट्री).
अनुभव – केमिकल कामाचा/मॅन्युफॅक्चिरग आणि एक्स्प्लोझिव्हज् हाताळण्याचा तीन वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा – ३५ वष्रेपर्यंत.
वेतन – अंदाजे रु. ८०,०००/-.
सब-रिजनल एम्प्लॉयमेंट ऑफिसर – ८ पदे. (डायरेक्टोरेट जनरल ऑफ एम्प्लॉयमेंट, मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट).
पात्रता – एम. एस्सी. (फिजिक्स) किंवा बी.ई. (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलि कम्युनिकेशन इ. अनुभव. अ‍ॅडव्हान्स्ड् इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स मेझरमेंटचा १ वर्षांचा अनुभव.
वेतन – रु. ६५,०००/- अंदाजे.
ऑनलाइन रिक्रूटमेंट अ‍ॅप्लिकेशन www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर दि. २ नोव्हेंबर, २०१७ पर्यंत करावेत.
First Published on October 27, 2017 12:22 am
Web Title: job opportunities job alert job vacancy

Friday, November 17, 2017

यूपीएससीची तयारी : आंतरराष्ट्रीय संघटनांचा अभ्यास आंतरराष्ट्रीय संघटनांविषयीची माहिती संबंधित संघटनेच्या संकेतस्थळावरून मिळते.

यूपीएससीची तयारी : आंतरराष्ट्रीय संघटनांचा अभ्यास


आंतरराष्ट्रीय संघटनांविषयीची माहिती संबंधित संघटनेच्या संकेतस्थळावरून मिळते.


प्रवीण चौगुले | Updated: October 26, 2017 2:49 AM
आजच्या लेखामध्ये यूपीएससी मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर- २ मधील ‘आंतरराष्ट्रीय संघटना’ या अभ्यासघटकाविषयी जाणून घेऊ या. सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजे काय, त्याचे स्वरूप, उद्दिष्टय़े याविषयी चर्चा करणे इष्ट ठरेल. आपल्या गरजा, सामूहिक हितसंबंध व उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी लोकांचा गट एकत्र येऊन संघटना बनवतो. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले हितसंबंध व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटनेच्या रूपामध्ये राष्ट्रे संघटित होतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरील बहुतांश संघटना १९ व्या शतकामध्ये उदयास आल्या व २० व्या शतकामध्ये त्यांचा विकास झालेला दिसून येतो. २१ व्या शतकाच्या प्रारंभी राष्ट्र, राज्ये व अशासकीय घटकांबरोबरच आंतरराष्ट्रीय संघटना आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा अत्यावश्यक भाग बनल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय संघटना राष्ट्रांमधील सामाजिक, आíथक, राजकीय व सुरक्षाविषयक सहकार्य सुकर करण्याचे कार्य पार पाडतात. युद्धे टाळून शांतता व सुव्यवस्था राखण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटनांमध्ये खासगी व सार्वजनिक, वैश्विक व प्रादेशिक, बहुउद्देशीय व विशेषीकृत अशा सविस्तर संरचना दिसून येतात. सामान्य अध्ययन पेपर- २ साठी संयुक्त राष्ट्र संघ व त्याच्याशी संबंधित इतर संस्था यामध्ये युनिसेफ, युनेस्को, यूएनईपी, जागतिक आरोग्य संघटना या व या प्रकारची इतर अभिकरणे, जागतिक व्यापार संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक, आसियान, युरोपीयन संघ, ओईसीडी, ओपेक, अ‍ॅपेक, अरब लीग इ. संघटनांचे अध्ययन महत्त्वपूर्ण ठरते. त्यांचे अध्ययन करताना त्यांची संरचना, अधीदेश (Mandate) या बाबी लक्षात घेणे महत्त्वपूर्ण ठरेल. तसेच आंतरराष्ट्रीय संघटनांचा अभ्यास चालू घडामोडींच्या अनुषंगाने करणे सयुक्तिक ठरेल. बऱ्याचदा संघटनेशी संबंधित एखादी बाब चच्रेत असल्यास त्यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. उदा. २०१६ च्या मुख्य परीक्षेमध्ये युनेस्कोशी संबंधित मॅकब्राइड (Mandate) आयोगावर तसेच जागतिक व्यापार संघटनेची दोहा फेरी विकसित व विकसनशील राष्ट्रांच्या मतभेदांच्या पाश्र्वभूमीवर फोल ठरत असल्याचे दिसत आहे, यावर भारताच्या दृष्टिकोनातून चर्चा करा असे प्रश्न विचारले आहेत. याबरोबरच, संयुक्त राष्ट्र संघ सुधारणा, ब्रेक्झिट इ. समकालीन मुद्दय़ांच्या पाश्र्वभूमीवर संबंधित संघटनेचे अध्ययन करणे महत्त्वपूर्ण ठरते.

यूपीएससीने मुख्य परीक्षेमध्ये आंतरराष्ट्रीय संघटना या घटकावर विचारलेल्या प्रश्नांपकी काही प्रश्नांचा आपण ऊहापोह करू या.
२०१३ च्या मुख्य परीक्षेमध्ये ‘जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी एकत्रितपणे ब्रेटनवुड्स संस्था म्हणून ओळखल्या जातात; जे जागतिक आíथक व वित्तीय सुव्यवस्थेच्या संरचनेला साहाय्यभूत ठरणारे दोन आंतरसरकारी स्तंभ आहेत. वरकरणी जागतिक बँक आणि नाणेनिधी कित्येक समान वैशिष्टय़े दर्शवितात. तरीही त्यांची भूमिका व अधीदेश (Mandate) स्पष्टपणे वेगळे आहेत, विशद करा.’ जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मूलभूत संरचना, ते पार पाडत असलेल्या भूमिका कशा प्रकारे वेगळ्या आहेत असे या प्रश्नाचे स्वरूप आहे. या दोन्ही संस्था करारांतर्गत स्थापन करण्यात आल्या असल्या तरी उद्दिष्टे, रचना, काय्रे या बाबतीत त्यांच्यामध्ये फरक दिसून येतो.
आंतरराष्ट्रीय चलन आणि विनिमय दरात स्थिरता प्रस्थापित करणे हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख उद्दिष्ट आहे तर राष्ट्रांना आíथक विकासाकरिता निधी उपलब्ध करून देणे हे विश्व बँकेचे उद्दिष्ट आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व विश्व बँक यांची काही उद्दिष्टय़े समान असली तरी त्यांची रचना भिन्न आहे. कटा एकल संस्था असून विश्व बँक ही काही संस्था व अभिकरणांची मिळून बनली आहे, असे मुद्दे आपल्या उत्तरामध्ये असणे आवश्यक आहे.
२०१४ मध्ये जागतिक व्यापार संघटनेवर प्रश्न विचारला गेला – ‘WTO ही महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय संघटना आहे, जिथे घेतलेल्या निर्णयाचा सदस्य देशांवर दूरगामी परिणाम होतो. WTOचा अधीदेश (Mandate) काय आहे व WTO चे निर्णय बंधनकारक असतात का? अलीकडच्या अन्नसुरक्षेवरील चच्रेच्या फेरीमध्ये भारताने घेतलेल्या भूमिकेचे टीकात्मक विश्लेषण करा.’ असा हळडचा अधीदेश, कार्यपद्धती व हळड शी संबंधित समकालीन घडामोडींसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. हळडचा उद्देश आंतरराष्ट्रीय व्यापारातील अडथळे दूर करणे व मुक्त आणि उदार व्यापारासाठी आवश्यक परिस्थिती निर्माण करणे हा आहे. WTO चे निर्णय निरपेक्ष असतात, त्यामुळे निर्णय मान्य न करणाऱ्या देशावर र्निबध लावले जाऊ शकतात. भारताने अन्नसुरक्षेवरील चच्रेमध्ये व्यापार सुलभीकरण करारा (TFA) ला मान्यता देण्यास नकार दिला. भारताने गरीब जनतेला अन्नधान्याची उपलब्धता व्हावी याकरिता अन्नधान्याच्या सार्वजनिक साठय़ाच्या समस्येवर तोडगा काढावा व पीस क्लॉजला मुदतवाढ देण्याची मागणी केली. भारतातील अन्नसुरक्षा हा कळीचा मुद्दा असल्याने भारताला अन्नधान्याच्या साठय़ामध्ये कपात करण्यास बाध्य करण्यामुळे लोकांच्या अन्नसुरक्षेविषयक अधिकाराशी तडजोड आहे तसेच ही बाब संयुक्त राष्ट्र संघाच्या सहस्रक विकास लक्ष्यामधील गरिबी व भूक नष्ट करणे या तत्त्वाच्या विरोधी असल्याने भारताची मागणी रास्त ठरते. २०१४ प्रमाणेच २०१६ मध्येही, WTO च्या विकसित व विकसनशील देशांतील मतभेदांमुळे मृतप्राय बनत चाललेल्या दोहा चर्चा फेरीविषयी भारताच्या परिप्रेक्ष्यामध्ये चर्चा करा, असा प्रश्न विचारण्यात आला तसेच यूनेस्कोच्या मॅक्ब्राइड आयोगाची उद्दिष्टे काय आहेत? यामध्ये भारताची स्थिती काय आहे, हा यूनेस्कोशी संबंधित प्रश्नही विचारला गेला.
आंतरराष्ट्रीय संघटनांविषयीची माहिती संबंधित संघटनेच्या संकेतस्थळावरून मिळते. याबरोबरच या संघटनांशी संबंधित समकालीन घडामोडींचा मागोवा घेत राहिल्याने या घटकाची तयारी परिपूर्ण होईल.
ग्रामीण विकास व्यवस्थापन विषयातील विशेष अभ्यासक्रम
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रुरल डेव्0939   लपमेंट अ‍ॅण्ड पंचायतीराज, हैदराबाद येथे उपलब्ध असणाऱ्या एक वर्ष कालावधीच्या ग्रामीण विकास व्यवस्थापन विषयातील विशेष पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमात प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत अथवा ते पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत.
निवड पद्धती – अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा राष्ट्रीय स्तरावर १९ नोव्हेंबर २०१७ रोजी घेण्यात येईल व त्यामध्ये महाराष्ट्रातील पुणे या परीक्षा केंद्राचा समावेश असेल. अर्जदारांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व लेखी निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.
अर्जासह पाठवायचे शुल्क – प्रवेश अर्जासह पाठवायचे प्रवेश शुल्क म्हणून खुल्या वर्गगटातील अर्जदारांनी ४०० रु.चा (राखीव गटातील उमेदवारांनी २०० रु.चा) ‘एनआयआरडी – पीजीडीआरडीएम’ यांच्या नावे असलेला व हैदराबाद येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट प्रवेश शुल्क म्हणून पाठविणे आवश्यक आहे.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क – अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व प्रवेशासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड पंचायतीराज, हैदराबादची जाहिरात पाहावी. दूरध्वनी क्र. ०४०-२४००८४६० वर संपर्क साधावा अथवा इन्स्टिटय़ूटच्या  www.nird.org.in/pgdrdm.aspx संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख – विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील, कागदपत्र आणि तपशिलासह असणारे प्रवेश अर्ज को-ऑर्डिनेटर (अ‍ॅडमिशन्स), सेंटर फॉर पोस्ट ग्रॅज्युएट स्टडीज अ‍ॅण्ड डिस्टन्स एज्युकेशन, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड पंचायतीराज, राजेंद्रनगर, हैदराबाद ५०००३० या पत्त्यावर १० नोव्हेंबर २०१७ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.
ज्या पदवीधर विद्यार्थ्यांना ग्रामीण विकास विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासह याच क्षेत्रात पुढील करिअर करायचे असेल अशांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल.
First Published on October 26, 2017 2:49 am
Web Title: international organizations study upsc exam