Tuesday, March 17, 2015

नवनीत [Print] [Email] डॉ. कमला सोहोनी

नवनीत

डॉ. कमला सोहोनी

Published: Monday, October 13, 2014
घरी शिक्षणाचे वातावरण असलेल्या कमला भागवत मुंबई विद्यापीठातून बीएस्सी होऊन बंगलोरच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये एमएस्सी करायला गेल्या; पण संस्थेचे संचालक व नोबेल पुरस्कार विजेते डॉ. सी. व्ही. रामन त्या स्त्री आहेत म्हणून त्यांना प्रवेश देईनात. मग त्या हट्टाला पेटल्यावर त्यांच्यावर जाचक अटी घालून त्यांना तात्पुरता प्रवेश दिला. त्या अटी त्यांनी पुऱ्या केल्यावर त्यांचा तर प्रवेश नक्की झालाच, पण पुढच्या वर्षीपासून तेथे मुलींना प्रवेश मिळू लागला. बंगलोरला त्यांनी कडधान्यातील प्रथिनांवर अभ्यास केला. असा अभ्यास करणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला. नंतर त्या पीएचडी करण्यासाठी केंब्रिजला गेल्या. बटाटा व वनस्पतींच्या ऊतींवर त्यांनी काम केले. वनस्पतींच्या प्रत्येक पेशीत 'सायटोक्रोम सी' हे वितंचक (एंझाईम) असते हे त्यांनी शोधून काढले. वनस्पतींच्या ऑक्सिडीकरणात या वितंचकाचा मोठा भाग असतो. या वितंचकाचे रूप ऋतूंप्रमाणे बदलते तरीही ते सायटोक्रोम सी असेच असते.
पीएचडी झाल्यावर त्यांनी तेथे राहूनच संशोधन करावे, असा आग्रह पुढे ज्यांना नोबेल पुरस्कार मिळाला ते चंद्रशेखर रामन कमलाबाईंना करीत असतानाही देशप्रेमाखातर कमला भारतात आल्या. दिल्लीच्या लेडी हाìडग मेडिकल कॉलेजात जीव-रसायनशास्त्र शिकवू लागल्या; पण येथे संशोधनाला वाव नसल्याने त्या कुन्नूरच्या भारतीय वैद्यकीय संशोधन प्रयोगशाळेत आहारशास्त्रावर संशोधन करू लागल्या. तेथे त्यांनी 'प' (बायोफ्लॉवानॉइड्) व 'क' जीवनसत्त्व एकत्रितपणे वापरले तर त्यामुळे रक्तवाहिन्या मजबूत होतात हे संशोधनातून सिद्ध केले. नंतर त्या विवाहबद्ध होऊन कमला सोहोनी झाल्या. मुंबईला येऊन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये प्राध्यापकी व संशोधन करू लागल्या. कुपोषितांच्या अन्नात नीरेचा उपयोग केल्यास त्यांना त्याचा फायदा होतो हे त्यांनी शोधले. कडधान्ये, भाज्या व धान्यातील पोषणमूल्ये त्यांनी निश्चित केली. दूध प्रकल्पातील दुधाची गुणवत्ता त्यांनी वाढवून दिली. कंझ्युमर गायडन्स सोसायटीच्या त्या एक संस्थापिका होत्या.

No comments:

Post a Comment