Tuesday, March 17, 2015

नवनीत [Print] [Email] नैसर्गिक आणि कृत्रिम सुंगधी द्रव्य

नवनीत

नैसर्गिक आणि कृत्रिम सुंगधी द्रव्य

Published: Saturday, November 8, 2014
फुलांना सुगंध येतो म्हणून त्यांचा सहवास आपल्याला हवाहवासा वाटतो. असाच सुगंध आपल्या शरीरालाही यावा असं माणसाला वाटणं साहजिकच आहे. तसं गुलाबपाणी िशपडून सुगंध निर्माण करण्याचा प्रयत्न प्राचीन काळी होत असे.
अत्तरं आणि परफ्यूम्सच्या दुनियेत पॅरिसचा फ्रॅन्कॉईस कोटी हा पहिला श्रेष्ठ निर्माता समजला जातो. याने पॅरिसमध्येच सर्वप्रथम परफ्यूम बाजारात आणला आणि एकापेक्षा एक सरस परफ्यूम्सनी या जगात गंध भरणारा त्याचा कारखाना आजही चालू आहे. सध्या परफ्यूम्स म्हणून जी रसायनं आपण वापरतो त्यांमध्ये इसेन्स किंवा इसेन्शियल तेलं असतात. त्यांना आपण आपल्या सोयीसाठी सुवासिक द्रव्यतेलं म्हणू या.
हवेच्या संपर्कात या द्रव्यतेलाचे बाष्पीभवन म्हणजेच वाफ होते आणि त्यातले सुवासिक कण आसमंतात विखुरतात. ही द्रव्यतेलं पानं किंवा फुलांपासून मिळवतात. बऱ्याचदा परफ्यूम्स किंवा सुगंधी द्रव्य तयार करताना एकापेक्षा जास्त सुगंधी द्रव्यतेलं वापरतात. सुगंधीद्रव्य तेलांचे साधारणपणे तीन गट केले आहेत. पहिल्या गटामध्ये हलका परिणाम देणारी म्हणजे ज्यांचा वास लवकर नष्ट होतो, अशी स्रिटोनेलासारखी द्रव्यतेलं! गुलाबासारखी जरा जास्त तीव्र सुगंध देणारी आणि जास्त काळ परिणाम देणारी द्रव्यतेलं दुसऱ्या गटात मोडतात. तिसऱ्या गटातली सुगंधी द्रव्यतेलं ही वनस्पतीपासूनच मिळणाऱ्या जरा जाडसर आणि िडकासारख्या पदार्थापासून मिळतात.
िडक किंवा चिकासारखे हे पदार्थ वाळवून त्यात थोडी कोळशाची पूड मिसळून त्याच्या उदबत्त्या किंवा धूपस्टिक्स बनवल्या जातात. नसíगक सुगंधी द्रव्यांची रासायनिक रचना समजल्यामुळे आता अनेक सुगंधी द्रव्यं कृत्रिमरीत्या तयार करता येतात. उदाहरणार्थ, जिरॅनिऑल, स्रिटोनेलॉल, फिनाईल इथाईल अल्कोहोल, लिनॅलूल, ही चार रसायनं एका ठरावीक प्रमाणात मिसळली की हुबेहूब गुलाबाचा गंध देणारं परफ्युम तयार होतं. कृत्रिम परफ्यूम तयार करताना त्यात जवळजवळ ७८ ते ९५ टक्के ठरावीक अभिक्रिया केलेलं इथाईल अल्कोहोल आणि उरलेला भाग सुगंधी द्रव्यतेलं असं प्रमाण असतं. सध्याच्या काळात फळांचे वास असलेले परफ्यूम्स किंवा त्याही पुढे जाऊन मसाल्याच्या पदार्थाचा गंध लाभलेले परफ्यूम्स, साबण, शाम्पूही वापरले जाताहेत.

No comments:

Post a Comment