Tuesday, March 17, 2015

नवनीत [Print] [Email] वनस्पती आणि कार्बन

नवनीत

वनस्पती आणि कार्बन

Published: Monday, October 6, 2014
वनस्पतींना आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. शाकाहारी सजीव थेट वनस्पतींवर अवलंबून असतात, तर मांसाहारी सजीव शाकाहारी सजीवांवर अवलंबून असतात. म्हणजेच मांसाहारी सजीव अप्रत्यक्षपणे वनस्पतींवर अवलंबून असतात. इतरही अनेक फायदे वनस्पतींमुळे आपल्याला होतात. जसे ऑक्सिजनचा पुरवठा आणि कार्बन डायऑक्साइडचा वापर (शोषण), जमिनीची धूप थांबवणे, विविध पद्धतींनी इंधनाची गरज भागवणे इत्यादी. त्यामुळे वनस्पतीवाढीसाठी आपण काम केले पाहिजे, हे नक्की.
मूलत: वनस्पती सजीव आहेत; पण त्यांना इतर सजीवांसारखी एकदा दिलेली जागा सोडता येत नाही. त्यामुळे त्या जागेवर वनस्पतीवाढीच्या सर्व गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे. पहिली गरज सूर्यप्रकाशाची, तो मिळेल अशी जागा निवडली पाहिजे.  सूर्यप्रकाशातच वनस्पती अन्न निर्माण करतात. अन्न निर्माण करणे म्हणजे वनस्पतीमधील जैव रासायनिक क्रिया. ती घडायला आपण आवश्यक अशा इतर बाबींची पूर्तता करायला हवी. सूर्यप्रकाशानंतर पानातले हरितद्रव्य महत्त्वाचे ठरते. त्याच्या उपस्थितीतच प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया घडते. बी लावून वनस्पती योग्य तऱ्हेने वाढवल्यास त्याची वाटचाल अन्न निर्माण करायच्या प्रक्रियेकडे होते. याच प्रक्रियेच्या वेळी वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साइड वायू शोषून घेतात. अन्न उत्पादन प्रक्रियेत एका बाजूला मुख्य पदार्थ तयार होतो, तर त्या वेळी ऑक्सिजन हा उपपदार्थ तयार होऊन तो वनस्पतीद्वारे हवेत सोडला जातो.
 याचा दुसरा अर्थ असा की, हवेतील कार्बन डायऑक्साइड (उड2) मधील कार्बन (उ) वनस्पतीत राहतो आणि ऑक्सिजन (ड2) हवेत परत सोडला जातो. वनस्पतीतील एकूण सोळा घटकांपकी एका घटकाची- कार्बनची अंशत: पूर्तता अशी होते. शिवाय काही कार्बनचा अंश जमिनीतून घेतला जातो. म्हणूनच माती परीक्षणाच्या वेळी जी तपासणी करतात त्यामध्ये मातीमधील कार्बनचे प्रमाण प्राधान्याने लक्षात घेतले जाते. याशिवाय इतर घटकांची उपस्थिती आणि प्रमाण तपासले जाते. म्हणजेच आपल्याला नक्की समजते की, वनस्पतीवाढीसाठीचे कोणते घटक त्या मातीत आहेत आणि कोणत्या प्रमाणात आहेत. त्यानुसार कमतरता असलेल्या घटकांची पूर्तता अन्य मार्गाने आपण करू शकतो. त्याचबरोबर मातीत पुरेशा प्रमाणात असलेले घटक देण्याची गरज नाही.
दिलीप हेल्रेकर (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

No comments:

Post a Comment