Wednesday, October 14, 2015

तांत्रिक किंवा कार्योपयोगी वस्त्रे २

तांत्रिक किंवा कार्योपयोगी वस्त्रे २

तांत्रिक वस्त्रे’ अलीकडेच नव्याने देण्यात आले असले तरी उपयोग अगदी प्राचीन काळापासून चालत

मुंबई | October 13, 2015 00:31 am
कार्योपयोगी वस्त्रे
मानवाने अंगावर घालावयाची वस्त्रे व गृहपयोगी वस्त्रांशिवाय इतर क्षेत्रांत वापरल्या जाणाऱ्या वस्त्रोद्योगातील उत्पादनांना ‘तांत्रिक वस्त्रे’ असे नाव जरी अलीकडेच नव्याने देण्यात आले असले तरी वस्त्रांचे असे उपयोग अगदी प्राचीन काळापासून चालत आलेले आहेत. उदा. विविध प्रकारचे दोर व दोरखंड, कपडे शिवायचा दोरा, होडय़ांची किंवा जहाजांची शिडे, कोळ्यांची मासे पकडायची जाळी, पिशव्या, धान्य साठविण्यासाठी वापरात येणारी तागापासून बनविलेली पोती, अशा किती तरी उपयोगासाठी सूत, कापड अशा वस्त्रोद्योगातील उत्पादनांचा वापर अगदी पूर्वीपासूनच केला जात आहे. पूर्वी अशा कारणांसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्त्रांना ‘औद्योगिक वस्त्रे’ असे संबोधले जात असे. गेल्या वीस-पंचवीस वर्षांत दैनंदिन व्यवहारातील अनेक क्षेत्रात वस्त्रोद्योगातील उत्पादनांचा फार मोठय़ा प्रमाणावर वापर सुरू झाला आणि म्हणून त्यांना ‘तांत्रिक वस्त्रे’ असे संबोधण्यात येऊ लागले.  ज्या क्षेत्रामध्ये वस्त्रे वापरली जातात, त्या क्षेत्राच्या नावावरून तांत्रिक वस्त्रांचे वर्गीकरण केले जाते. यामध्ये तांत्रिक वस्त्रांची एकूण १२ वर्गामध्ये विभागणी केली जाते.
१)कृषी तंत्र वस्त्रे : कृषी क्षेत्रात वापरली जाणारी वस्त्रे
२) स्थापत्य तंत्र वस्त्रे : बांधकाम व स्थापत्य क्षेत्रात वापरण्यात येणारी वस्त्रे.
३) कपडय़ांपयोगी वस्त्रे : अंगावर घालायचे कपडे व पादत्राणे या मध्ये वापरले जाणारे तांत्रिक भाग. ४) भू तंत्र वस्त्रे : जमिनीखाली व लगत वापरण्यात येणारी वस्त्रे.
५) गृहवस्त्रे : घरामधील फíनचर, गृहपयोगी वस्त्रांतील तांत्रिक भाग व जमिनीवर अंथरावयाची वस्त्रे.   ६) औद्योगिक वस्त्रे : विविध उद्योगांमध्ये गाळणी, वाहक पट्टे, स्वच्छतेसाठी वापरली जाणारी उपकरणे आणि इतर उपयोगांसाठी वापरली जाणारी वस्त्रे. ७) वैद्यक तंत्र वस्त्रे : वैद्यक क्षेत्रात वापरण्यात येणारी वस्त्रे. ८) वाहन तंत्र वस्त्रे : मोटारगाडय़ा, जहाज, रेल्वे आणि वायुयाने यांमध्ये वापरली जाणारी वस्त्रे  ९) पर्यावरण तंत्र वस्त्रे : पर्यावरणाच्या संरक्षणासाठी वापरली जाणारी वस्त्रे  १०)   बांधणी वस्त्रे : गोष्टी बांधण्यासाठी वापरण्यात येणारी वस्त्रे.
११) संरक्षण वस्त्रे : व्यक्ती आणि संपत्ती यांच्या संरक्षणासाठी वापरली जाणारी वस्त्रे.
१२) क्रीडावस्त्रे : क्रीडा क्षेत्रात वापरली जाणारी वस्त्रे.  असा हा तांत्रिक वस्त्रांचा आवाका खूप मोठा आहे.

जंजिरा संस्थान स्थापना
कोकण किनारपट्टीतील सध्याच्या रायगड जिल्ह्य़ातील मुरुड येथील समुद्रात असलेल्या छोटय़ा बेटावर बांधलेला किल्ला आणि मुरुड, श्रीवर्धन आणि इतर काही गावे मिळून जंजिरा संस्थानाचे एकूण राज्यक्षेत्र ९८० चौ.कि.मी. होते. या भागातील दांडा आणि राजापुरी या गावांमध्ये कोळ्यांची वस्ती होती आणि त्यांचा नेता राम पाटील याचे त्यांच्यावर वर्चस्व होते. समुद्री चाचांचा त्रास होई म्हणून या कोळ्यांनी खाडीत असलेल्या छोटय़ा बेटावर, सध्या जिथे जंजिरा किल्ला आहे तिथे ओंडक्यांची तटबंदी तयार करून तिथे राहू लागले.
त्या काळात हा प्रदेश अहमदनगरच्या निजामाच्या राज्यात होता. कोळी नेता पाटील निजामाच्या अधिकाऱ्यांना जुमानत नव्हता. निजामाने त्याच्या पिरमखान या हबशी सेनाधिकाऱ्यावर कोळ्यांची वस्ती नेस्तनाबूत करून ते बेट घेण्याची कामगिरी सोपविली. पिरमखानाने पाटील आणि इतर कोळ्यांना भरपूर दारू पाजून रात्री आपले सनिक तिथे नेले आणि सर्वाची कत्तल केली. सर्व बेट ताब्यात घेतल्यावर निजामाने पिरमखानाला त्या प्रदेशाचा ठाणेदार म्हणून नियुक्त केले. पिरमखानानंतर सिद्दी बुऱ्हाखान हा जंजिऱ्याचा प्रमुख ठाणेदार झाला.
बुऱ्हाखानाने निजामाच्या परवानगीने लाकडी तटबंदी तोडून तिथे सध्या उभी असलेली भक्कम, दगडी तटबंदी बांधून आतमध्ये किल्ला बांधला. १५७१ साली बुऱ्हानाने बांधलेल्या या किल्ल्याला नाव दिले ‘किल्ले महरुष’ ऊर्फ ‘जंजिरा’. १६१७ साली अंबर हबशी सानक याची जंजिराचा मुख्य कारभारी म्हणून नियुक्ती झाली. त्याने उत्तम कारभार केल्यामुळे निजामशाहने नागोठणे खाडीपासून बाणकोट खाडीपर्यंतचा मुलुख त्याला बक्षीस दिला. अंबर सानक यास जंजिरा राज्याचा मूळ पुरुष म्हणता येईल. त्याची कारकीर्द इ.स. १६१७ ते १६२० अशी झाली.
  – सुनीत पोतनीस  (sunitpotnis@rediffmail.com)


First Published on October 13, 2015 12:31 am
Web Title: technical clothes part 2

No comments:

Post a Comment