Thursday, June 19, 2014

कुतूहल - कार्बन मोनॉक्साईड (CO)

कुतूहल - कार्बन मोनॉक्साईड (CO)

Published: Thursday, June 19, 2014
वातावरणातील कार्बन डायॉक्साईड (CO2)चा दबदबा वाढल्यामुळे की काय, आपण त्याच्या धाकटय़ा भावंडाकडे म्हणजे कार्बन मोनॉक्साईड (CO)कडे कानाडोळा केलेला आढळतो. पण हा एक अल्प प्रमाणात वावरणारा घातक वायू आहे.
एका गॅरेजमधल्या मेकॅनिकला एकदा दुपारची वामकुक्षी घ्यायची होती म्हणून गिऱ्हाईकाच्या गाडीतील वातानुकूलित यंत्रणा सुरू करून आरामात आत पहुडला. त्याला मस्त झोप लागली खरी, पण त्याच्या गाडीतल्या आतल्या वातावरणात जमा झालेला कार्बन-मोनॉक्साईड वायू वातानुकूलित यंत्रणेच्या हवेत फिरत राहिला. तो त्या मेकॅनिकच्या शरीरात गेला. तो बिचारा मेकॅनिक झोपेतून उठलाच नाही. आपल्या बेडरूममध्ये वातानुकूलित यंत्रणा (ए.सी.) सुरू असेल तर मेणबत्ती मुळीच लावू नये. मेणबत्ती अर्धवट जळत असताना आजूबाजूला कार्बन मोनॉक्साईड उत्सर्जति होतो.
कार्बन मोनॉक्साईड जेव्हा फुप्फुसात घुसतो तेव्हा तो रक्तातील हिमोग्लोबिनशी संयोग पावतो. त्यामुळे शरीरभर एरवी ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या हिमोग्लोबिनसोबत हा घातक वायू शरीरपेशीत पोहोचतो. शरीरपेशी ऑक्सिजनला वंचित होतात व माणसाला 'हायपोक्सिया' ही व्याधी जडते.
शरीरात कार्बन मोनोक्साईड असेल तर डोकेदुखी, मळमळ, थकवा ही फ्ल्यू तापासारखी लक्षणे आढळतात. जसे त्याचे प्रमाण वाढत जाते तसतशी मन:स्थितीचा गोंधळ, अशक्तपणा, चक्कर येणे, सुस्ती येणे ही लक्षणे उठून दिसतात. मेंदूला ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा झाला नाही म्हणजे माणूस बेशुद्ध पडतो, मेंदूला इजा होते, माणूस कोमात जातो आणि मृत्युमुखी पडतो. हा वायू सतत शरीरात गेला तर काही मिनिटांतच हे सारे घडते आणि आपण बळी जाऊ शकतो. हळूहळू आणि कमी प्रमाणात हा वायू शरीरात जातो तेव्हा इंद्रियांना इजा होते, विविध व्याधी माणसाचा जीव घेतात. मुले आणि पाळीव प्राण्यांना विशेषकरून या वायूची त्वरित बाधा होते.
हा वायू वाहतूक करणाऱ्या गाडय़ांतून बाहेर पडणारा धूर, आग, धूम्रपान, खराब धुरांडी, लाकडाचे जळण, नादुरुस्त गॅसवर चालणारी उपकरणे यांद्वारे आपल्या नाकातून शरीरात घुसतो. या वायूचा आजूबाजूच्या परिसरातील थांगपत्ता लागावा म्हणून 'इलेक्ट्रॉनिक अलार्म' उपलब्ध असतात. हे तपासक आपणास त्यासंबंधी सावध करतात.
जोसेफ तुस्कानो (वसई)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंब

No comments:

Post a Comment