Friday, June 27, 2014

नवनीत - कुतूहल - पॉपकॉर्नचा वास

नवनीत

कुतूहल - पॉपकॉर्नचा वास

Published: Wednesday, June 25, 2014
आजकाल साधारणपणे जेवणातल्या डिशेसमध्ये मका असतो. मक्यामध्ये काबरेहायड्रेट्स अन्न विपुल प्रमाणात असते, शिवाय त्याच्या दाण्याभोवती असलेले सेल्युलोजचे आवरण न पचणारे असते, त्यामुळे पचनमार्ग साफ ठेवायला मदत होते. मक्यापासून तयार केलेला पॉपकॉर्न हा पदार्थ तर मुलाबाळांचा नि तरुणाईचा आवडता पदार्थ होय. त्यातच लोण्यांत तयार केलेल्या पॉपकॉर्नची मजा काही वेगळीच असते, पण सावधान, बरं का!
कृत्रिम लोण्याचा थर दिलेल्या पॉपकॉर्नला खमंग वास येतो ना, त्याने 'पॉपकॉर्न लंग' ही व्याधी जडू शकते. आपल्या श्वासातून हा हवाहवासा गंध फुफ्फुसात जातो तेव्हा त्यासोबत एक रसायन आपल्या पोटात जाते. त्याचे नाव 'डायअ‍ॅसिटील' होय. वास्तविक, हे नसíगक रसायन लोण्याचा एक घटक असतो व तो दूध, लोणी, मस्का, चीज, बीअर, वाइन यांत सापडतो. या मूळ पदार्थातील त्याचे अस्तित्व मुळीच हानिकारक नसते. त्याचे रासायनिक सूत्र आहे H3COOCH3.. पण, हे रसायन वायुरूपात फुफ्फुसात घुसते तेव्हा तिथल्या लघुश्वासनलिकांना इजा पोहोचते. त्या खराब झालेल्या फुफ्फुसाच्या नळ्या कायमस्वरूपी निकामी होतात. त्याला 'ब्रोंकाओलिसीस अ‍ॅब्लिटेरंस' असे म्हणतात.
तुम्हाला पॉपकॉर्नची प्लास्टिक थली हुंगण्याची सवय असेल तर तुमच्या आरोग्याला धोका आहे, हे लक्षात घ्यावे. पॉपकॉर्न भाजणारे विक्रेते आणि पॉपकॉर्नच्या फॅक्टरीत काम करणारे कामगार यांना फुफ्फुसाच्या आजाराचा धोका असतो. दिवसातून दोन वेळा मक्यापासून तयार होणाऱ्या लोणीयुक्त पॉपकॉर्नच्या पिशव्या हजम करणाऱ्यांनी सावधानता बाळगलेली बरी. त्याचप्रमाणे, चित्रपटगृहातील विक्रेतीमुलेसुद्धा या मक्याच्या पदार्थाच्या सतत सान्निध्यात राहिल्याने आपले स्वास्थ्य बिघडवू शकतात.
घरी पॉपकॉर्न तयार करताना एक खबरदारी घेता येते ती म्हणजे ओव्हनमध्ये भाजलेल्या नि फुललेल्या मक्याच्या लाह्य़ा द्रवरूप लोणी लावून खात मजा लुटता येते. शिवाय भाजलेले मकेदेखील खायला चविष्ट असतात, त्याला पसंती दिली तर उत्तमच.
जोसेफ तुस्कानो (वसई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई office@mavipamumbai.org

No comments:

Post a Comment