Thursday, June 5, 2014

विद्यापीठाचे यंदापासून नवे सूत्र '७५:२५'!

विद्यापीठाचे यंदापासून नवे सूत्र '७५:२५'!

Published: Thursday, June 5, 2014
विद्यार्थी आणि प्राध्यापक यांचा वाढता विरोध पाहता मुंबई विद्यापीठाने यंदापासून आपल्या परीक्षांच्या निकालांबाबतचे सूत्र बदलले आहे. दोन वर्षांपासून विद्यापीठात चालू असलेले '६०:४०' हे सूत्र आता बदलण्यात आले असून आता '७५:२५' या पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखांसाठीचे हे सूत्र यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून लागू करण्याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाने बुधवारी काढले.
दोन वर्षांपूर्वी विद्यापीठाने विविध शाखांसाठी श्रेयांक आणि श्रेणी पद्धत लागू केली होती. त्यासाठी ६०:४०चे सूत्रही अवलंबण्यात आले होते. त्यानुसार ६० गूण लेखी परीक्षा आणि महाविद्यालयीन स्तरावर अंतर्गत मूल्यांकनासाठी ४० गूण, असे विभाजन करण्यात आले होते. मात्र या पद्धतीला विद्यार्थी आणि प्राध्यापक या दोन्ही स्तरांतून खूप विरोध झाला होता. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षांपासून '७५:२५' हे सूत्र लागू करण्यात येईल, असे परिपत्रक विद्यापीठाने काढले आहे. या नव्या पद्धतीनुसार ७५ गुणांची परीक्षा विद्यापीठामार्फत घेण्यात येणार आहे, तर अंतर्गत मूल्यांकनाच्या २५ गुणांपैकी २० गुण लेखी परीक्षा आणि ५ गुण विद्यार्थ्यांची उपस्थिती, असे विभाजन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment