Sunday, June 8, 2014

परदेशात जाणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व शास्त्रज्ञ करतील, मंत्री नाही!

देश-विदेश

परदेशात जाणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व शास्त्रज्ञ करतील, मंत्री नाही!

Published: Sunday, June 8, 2014
वैज्ञानिक परिषदेसाठी परदेशात जाणाऱ्या सर्व शिष्टमंडळांचे नेतृत्व यापुढे नामवंत शास्त्रज्ञ करतील, मंत्री करणार नाहीत, असे शनिवारी केंद्र सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
परदेशातील कोणत्याही परिषदेसाठी शिष्टमंडळाचे नेतृत्व यापुढे मंत्री करणार नाही, असा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी सांगितले. गेल्या ६० वर्षांत बहुधा प्रथमच असा निर्णय घेण्यात आला असावा, असेही ते म्हणाले.
अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आल्याने शास्त्रज्ञांना अधिक संधी उपलब्ध होतील आणि देशातील त्याचप्रमाणे परदेशातील शास्त्रज्ञांशी विचारांची अधिक देवाणघेवाण करता येईल आणि त्याचा लाभ देशालाच होईल, असेही जितेद्र सिंग म्हणाले.
देशात अथवा परदेशात होणाऱ्या सर्व परिषदांमध्ये शास्त्रज्ञांचा आणि तंत्रज्ञांचा योग्य सहभाग हा राजकीय नेत्यांपेक्षा अधिक हवा, अशी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची धारणा असल्याचे सिंग म्हणाले.याच महिन्यांत सॅण्टियागो आणि बोस्टन येथे दोन परिषदा होणार आहेत. यासाठी मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ जाणार असल्याचे आपल्याला सांगण्यात आले. मात्र आपण ही प्रथा आता बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या ठिकाणी पाठविण्यात येणाऱ्या शास्त्रज्ञांची लवकरच निवड केली जाणार आहे, असेही सिंग यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment