Monday, December 31, 2018

प्रादेशिक भाषेतून उच्चशिक्षण : उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद हैदराबाद संस्थानाचा सातवा निजाम नवाब उस्मान अली खान याने १९१८ मध्ये स्थापन केलेले हे विद्यापीठ त्याच्याच नावाने ओळखले जाते.

प्रादेशिक भाषेतून उच्चशिक्षण : उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद

हैदराबाद संस्थानाचा सातवा निजाम नवाब उस्मान अली खान याने १९१८ मध्ये स्थापन केलेले हे विद्यापीठ त्याच्याच नावाने ओळखले जाते.


|| योगेश बोराटे
संस्थेची ओळख
कारकीर्दीच्या शतकोत्तर वाटचालीकडे कूच करणारे हैदराबादचे उस्मानिया विद्यापीठ हे भारतातील सर्वात जुन्या विद्यापीठांमध्ये सातवे, तर त्याच बाबतीत दक्षिण भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे विद्यापीठ ठरते. हैदराबाद संस्थानाचा सातवा निजाम नवाब उस्मान अली खान याने १९१८ मध्ये स्थापन केलेले हे विद्यापीठ त्याच्याच नावाने ओळखले जाते. ब्रिटिश राजवटीत इंग्रजी शिक्षणाचा प्रभाव असताना प्रादेशिक भाषेतून उच्चशिक्षणाचा विचार पुढे नेण्यासाठीच्या प्रयत्नांचा महत्त्वाचा भाग म्हणून या विद्यापीठाच्या स्थापनेकडे पाहिले जाते. जागतिक पातळीवर पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात नवी समीकरणे उदयाला येऊ लागली होती. दरम्यानच्याच काळात देशभक्ती आणि प्रादेशिक भाषेतील शिक्षण या दोन मूलभूत प्रेरणांच्या आधाराने भारतामध्ये या विद्यापीठाच्या स्थापनेला गती मिळाली होती. त्यातूनच या संस्थेमधून उर्दू भाषेतून शिक्षणाला सुरुवात झाली. हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारताचा भाग झाल्यानंतरच्या काळात, १९४८ पासून या विद्यापीठाने शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठीचे अधिकृत माध्यम म्हणून इंग्रजी भाषेचा स्वीकार केला. तेलंगणा राज्यातील हैदराबादमध्ये तारनाका या उपनगरात हे विद्यापीठ वसले आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय तसेच जागतिक पातळीवरच्या सामाजिक-आर्थिक बदलांशी सुसंगत ठरणारे कुशल मनुष्यबळ विकसित करण्यासाठी हे विद्यापीठ प्रयत्नशील आहे. विद्यापीठाची ही ऐतिहासिक वाटचाल आणि उच्चशिक्षणाच्या प्रचार- प्रसारासाठी विद्यापीठाने केलेले प्रयत्न विचारात घेत, राष्ट्रीय पातळीवरील ‘एनआयआरएफ’च्या २०१८च्या मानांकनामध्ये या विद्यापीठाला देशामध्ये २८ वे स्थान देण्यात आले आहे.
संकुले आणि सुविधा
तारनाका हे हैदराबादचे एक प्रमुख उपनगर मानले जाते. या उपनगरात जवळपास तेराशे एकरांमध्ये या विद्यापीठाच्या मुख्य शैक्षणिक संकुलाचा विस्तार झाला आहे. त्यामध्ये ८ कँपस कॉलेज आणि ५३ विभागांचा समावेश आहे. या संकुलामध्ये विद्यार्थासाठी विविध सोयीसुविधा पुरविण्यात आल्या आहेत. नियमित शैक्षणिक सोयी- सुविधांच्या जोडीने त्यामध्ये सेंटर फॉर एज्युकेशनल डेव्हलपमेंट ऑफ मायनॉरिटीज, एम्प्लॉयमेंट इन्फॉम्रेशन अँड गाइडन्स ब्युरो, इंग्लिश लँग्वेज ट्रेिनग सेंटर, इंटरनॅशनल प्लेसमेंट सíव्हसेस, युनिव्हर्सटिी फॉरेन रिलेशन्स ऑफिस, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यासारख्या सुविधांचा समावेश होतो. विद्यापीठाच्या स्थापनेच्याच जोडीने १९१८ साली विद्यापीठाचे ग्रंथालयही सुरू झाले होते. १९६३ पासून सध्याच्या नव्या स्वतंत्र इमारतीमधून या ग्रंथालयाचे कामकाज सुरू झाले. जवळपास साडेपाच लाख पुस्तके व साडेपाच हजार दुर्मीळ हस्तलिखितांनी सुसज्ज असणारे हे मध्यवर्ती ग्रंथालय विद्यापीठाच्या विद्यार्थी आणि संशोधकांसाठी उपयुक्त ठरते. या मुख्य संकुलाशिवाय विद्यापीठाने पदव्युत्तर शिक्षणाच्या व्यापक विस्तारासाठी म्हणून पाच जिल्ह्यांमधून जिल्हा पातळीवरील पदव्युत्तर महाविद्यालये सुरू केली आहेत. स्थानिक पातळीवरील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाच्या म्हणून स्वतंत्र महाविद्यालयांमधून मिळणारी ही सुविधा अत्यंत महत्त्वाची बाब मानली जाते.
विभाग आणि अभ्यासक्रम
विद्यापीठामध्ये एकूण ११ विद्याशाखांमधून ५३ विभाग चालतात. या माध्यमातून विद्यापीठाने २७ पदवी, ६८ पदव्युत्तर पदवी, २४ पदव्युत्तर पदविका आणि १५ प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. त्याशिवाय एम. फिल आणि पीएच.डी.च्या संशोधनाची सुविधाही या विद्यापीठामध्ये उपलब्ध आहे. युनिव्हर्सटिी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सोशल सायन्सेसअंतर्गत विविध विषयांमधील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम चालतात. युनिव्हर्सटिी कॉलेज ऑफ सायन्स अंतर्गत विद्यार्थ्यांना अप्लाइड जिओकेमिस्ट्री, अ‍ॅस्ट्रोनॉमी, बायोकेमिस्ट्री, बॉटनी, केमिस्ट्री, जेनेटिक्स, जॉग्रॉफी, जिओफिजिक्स, मॅथेमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, फिजिक्स, स्टॅटेस्टिक्स, झूलॉजी या विभागांमधील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येतो. युनिव्हर्सटिी कॉलेज ऑफ लॉमध्ये वेगवेगळ्या विशेष विषयांमधील एलएलएमचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. युनिव्हर्सटिी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड बिझनेस मॅनेजमेंट अंतर्गत येणाऱ्या डिपार्टमेंट ऑफ कॉमर्समध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांना मास्टर ऑफ फायनान्स अँड कंट्रोल (एमएफसी), एम. कॉम. (फायनान्स), एम. कॉम. (इन्फम्रेशन सिस्टिम्स) या पर्यायांचा आढावा घेता येतो. तसेच याच कॉलेजमधील डिपार्टमेंट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमध्ये एमबीए टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट हा नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम चालतो. या अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘डिप्लोमा इन टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट’ (पीजीडी- टीएम) ही पदव्युत्तर पदविका दिली जाते. तर अभ्यासक्रमाची दोन्ही वर्षे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘एमबीए टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट’ ही पदव्युत्तर पदवी घेण्याची संधी विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे. युनिव्हर्सटिी कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये बी. एड., एम. एड. आणि पीएच.डी.चे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. युनिव्हर्सटिी कॉलेज ऑफ इंजिनीअिरगमध्ये इंजिनीअिरगच्या नानाविध विषयांमधील बी.ई., एम.ई. आणि ‘मास्टर ऑफ सायन्स बाय रिसर्च’ प्रकारामधील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. युनिव्हर्सटिी कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये केमिकल इंजिनीअिरग, केमिकल टेक्नॉलॉजी आणि फार्मसीशी संबंधित अभ्यासक्रम चालतात.
विद्यापीठाने १९७७ मध्ये ‘इन्स्टिटय़ूट ऑफ करस्पॉंडन्स कोस्रेस’ या नावाने दूरशिक्षणाच्या अभ्यासक्रमांना सुरुवात केली. कालानुरूप अभ्यासक्रमांची व्याप्ती वाढवत १९८९ मध्ये या केंद्राचे नावही बदलण्यात आले. सध्या ‘प्रो. जी राम रेड्डी सेंटर फॉर डिस्टन्स एज्युकेशन’ म्हणून हे केंद्र ओळखले जाते. सर्व अभ्यासक्रमांसाठीचे मिळून जवळपास ४५ हजार विद्यार्थी या केंद्राद्वारे पुरविल्या जाणाऱ्या दूरशिक्षणाच्या सुविधांचा लाभ घेत आहेत. त्यामध्ये विद्यार्थिनी आणि महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे.
borateys@gmail.com
First Published on October 23, 2018 12:14 am
Web Title: osmania university

No comments:

Post a Comment