यूपीएससीची तयारी : सामाजिक न्याय
सामाजिक क्षेत्र विकासामध्ये शिक्षण, आरोग्य, मानव संसाधन विकास इ. बाबी महत्त्वपूर्ण आहेत.
प्रवीण चौगुले
सामान्य अध्ययन पेपर-२ मध्ये समाविष्ट असणाऱ्या सामाजिक क्षेत्राचा विकास आणि व्यवस्थान यासंबंधीचे मुद्दे व गरिबी आणि विकासात्मक मुद्दे या घटकांविषयी चर्चा करूया. सामाजिक क्षेत्र विकासामध्ये शिक्षण, आरोग्य, मानव संसाधन विकास इ. बाबी महत्त्वपूर्ण आहेत. शिक्षणक्षेत्रामध्ये असणाऱ्या समस्या ज्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक व विद्यापीठीय शिक्षणाशी संबंधित समस्यांचे आकलन करून घ्यावे. शिक्षणक्षेत्रातील घडामोडी जसे संशोधन व विकासाची स्थिती, या क्षेत्राच्या विकासाकरिता शासनाकडून केली जाणारी आíथक तरतूद, शिक्षणक्षेत्राशी संबंधित योजना व कार्यक्रम उदा. सर्व शिक्षा अभियान, शिक्षण हक्क कायद्याची स्थिती व अंमलबजावणीशी संबंधित मुद्दय़ांची माहिती घेणे उचित ठरेल.
* २०१४
‘आयआयटी/आयआयएमसारख्या प्रमुख संस्थांना त्यांचा अव्वल दर्जा टिकवून ठेवणे, अभ्यासक्रम डिझाइन करणे व विद्यार्थ्यांच्या निवडीचे निकष ठरविणे यामध्ये स्वातंत्र्य दिले पाहिजे, या क्षेत्रातील वाढत्या आव्हानांच्या पाश्र्वभूमीवर चर्चा करा.
आयआयटी/आयआयएमसारख्या संस्था ज्यांना भारतामध्ये अव्वल दर्जाचे मानले जाते, पण आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांच्या प्रगतीमध्ये अडथळा ठरत असलेली बाब म्हणजे त्यांना पुरेसे स्वातंत्र्य नाही किंवा शासनाकडून मोठय़ा प्रमाणात ढवळाढवळ केली जाते. या पार्श्वभूमीवर या प्रश्नाचे उत्तर लिहिणे
आवश्यक ठरते. या संस्था शासकीय अनुदान म्हणजेच करदात्यांच्या पशातून चालवल्या जातात. परिणामी, शासन जनहित डोळ्यासमोर ठेवून प्रवेश प्रक्रिया, आरक्षण इ. बाबतीत काहीअंशी हस्तक्षेप करताना दिसते.
या पाश्र्वभूमीवर या संस्थांची स्वायत्तता टिकविणे व व्यापक जनहित लक्षात घेणे महत्त्वपूर्ण ठरते. आरोग्यक्षेत्रामध्ये सरकारची धोरणे व कार्यक्रम, आरोग्याचे सार्वत्रिकीकरण, माता व बालमृत्यू, कुपोषण आदी बाबींची माहिती ठेवावी.
* २०१७
‘पाणी, स्वच्छता व आरोग्याशी संबंधित धोरणांची परिणामकारक अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी, लाभार्थी गटाची ओळख अपेक्षित परिणामाशी समक्रमित (Synchronize) करणे आवश्यक आहे. Wash योजनेच्या संदर्भात उपरोक्त वाक्याचे परीक्षण करा.’
मानवी संसाधन विकासामध्ये सरकार कौशल्यविकासाकरिता राबवत असलेले उपक्रम जाणून घ्यावेत. उदा. सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय कौशल्यविकास कार्यक्रम, मध्यान्ह भोजन कार्यक्रम, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यांची माहिती घ्यावी. सामाजिक क्षेत्रावर शासनाकडून केला जाणारा खर्च व त्यामागील भूमिका, विविध उपक्रमांची परिणामकारकता इ. बाबी अभ्यासणे महत्त्वपूर्ण ठरते. दुर्बल घटकांच्या सबलीकरणामध्ये राष्ट्रीय महिला आयोग, मागासवर्गीय आयोग तसेच कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा, बालहक्क संरक्षण कायदा आदी संस्थात्मक व वैधानिक उपायांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. अभ्यासक्रमामध्ये गरिबी व भूक यासंबंधीचे मुद्दे हा घटकही अंतर्भूत करण्यात आला आहे. गरिबीमध्ये गरिबीचे प्रकार, गरिबी मापनाविषयीच्या समित्या, गरिबी निर्मूलनाचे उपाय उदा. सार्वजनिक वितरण व्यवस्था, समित्या, गरिबी निर्मूलनाचे उपाय उदा. परिणामकारकता, कमजोरी या बाबी पाहणे सयुक्तिक ठरते.
* २०१७
‘भूक आणि गरिबी ही सुशासनासमोरील आव्हाने आहेत. या समस्यांच्या निराकरणामध्ये लागोपाठ सर्व सरकारांनी केलेल्या प्रगतीचे मूल्यमापन करा. सुधारणांकरिता उपाय सुचवा.’
उपरोक्त प्रश्नामध्ये विविध सरकारांनी केलेल्या उपायांचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे. उदा. गरिबी निर्मूलन कार्यक्रम, फूड फॉर वर्क, अंत्योदय, मिड डे मिल योजना, सार्वजनिक वितरण प्रणाली, नॅशनल फूड सिक्युरिटी कायदा. भारताने इतक्या वर्षांमध्ये या क्षेत्रामध्ये बरीच मजल मारली असली तरी देशामध्ये वाढत्या विषमतेला आळा घालण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक ठरते.
उपरोक्त घटक परस्परव्यापी असल्याने यावर विचारण्यात येणारे प्रश्नही परस्परव्यापी स्वरूपाचेच असतात. या घटकाची तयारी करण्यासाठी सरकारी योजना व कार्यक्रम आदीविषयी जाणून घेण्यासाठी इंडिया इयर बुक, योजना व कुरुक्षेत्र यासारखी मासिके नियमितपणे पाहणे आवश्यक आहे. यासोबतच ‘दि हिंदू’ आणि इंडियन एक्स्प्रेसमध्ये येणारे विशेष लेखही पाहणे श्रेयस्कर ठरेल. पीआयबी, संबंधित मंत्रालयांची संकेत स्थळे, आíथक पाहणी इ. बाबी पाहाव्यात.
‘पाणी, स्वच्छता व आरोग्याशी संबंधित धोरणांची परिणामकारक अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी, लाभार्थी गटाची ओळख अपेक्षित परिणामाशी समक्रमित (Synchronize) करणे आवश्यक आहे. Wash योजनेच्या संदर्भात उपरोक्त वाक्याचे परीक्षण करा.’
मानवी संसाधन विकासामध्ये सरकार कौशल्यविकासाकरिता राबवत असलेले उपक्रम जाणून घ्यावेत. उदा. सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय कौशल्यविकास कार्यक्रम, मध्यान्ह भोजन कार्यक्रम, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान यांची माहिती घ्यावी. सामाजिक क्षेत्रावर शासनाकडून केला जाणारा खर्च व त्यामागील भूमिका, विविध उपक्रमांची परिणामकारकता इ. बाबी अभ्यासणे महत्त्वपूर्ण ठरते. दुर्बल घटकांच्या सबलीकरणामध्ये राष्ट्रीय महिला आयोग, मागासवर्गीय आयोग तसेच कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा, बालहक्क संरक्षण कायदा आदी संस्थात्मक व वैधानिक उपायांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. अभ्यासक्रमामध्ये गरिबी व भूक यासंबंधीचे मुद्दे हा घटकही अंतर्भूत करण्यात आला आहे. गरिबीमध्ये गरिबीचे प्रकार, गरिबी मापनाविषयीच्या समित्या, गरिबी निर्मूलनाचे उपाय उदा. सार्वजनिक वितरण व्यवस्था, समित्या, गरिबी निर्मूलनाचे उपाय उदा. परिणामकारकता, कमजोरी या बाबी पाहणे संयुक्तिक ठरते.
First Published on October 4, 2018 4:27 am
Web Title: article about social justice
No comments:
Post a Comment