भारत व जग
जागतिक गटांसोबत असणाऱ्या संबंधांविषयी जाणून घेणार आहोत.
|| प्रवीण चौगुले
आजच्या लेखामध्ये सामान्य अध्ययन पेपर – २ मध्ये अंतर्भूत भारताचे अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, जपान आदी मध्य आशिया, आग्नेय आशियायी देशांसोबतचे संबंध समजून घेणार आहोत. त्याचप्रमाणे सार्क, इब्सा, ब्रिक्स, आसियान, युरोपियन युनियन इ. प्रादेशिक गट व यूनो, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक व्यापार संघटना या जागतिक गटांसोबत असणाऱ्या संबंधांविषयी जाणून घेणार आहोत.
जगभरातील विविध देश, प्रादेशिक व जागतिक गट यांचे भारतासाठी महत्त्व, भारताच्या स्वातंत्र्यापासून परराष्ट्र धोरणामध्ये त्यांचे स्थान, भारताच्या औद्योगिक संरक्षण आणि विज्ञान क्षेत्रांच्या विकासातील संबंधित देशांचे योगदान, विविध देशांशी भारताने केलेले करार व भूतकाळामध्ये काही देशांबरोबर झालेले संघर्ष व त्याचा परिणाम या भारताचे द्विपक्षीय संबंध उपरोक्त बाबींच्या पाश्र्वभूमीवर अभ्यासणे आवश्यक आहे. यासोबतच हे देश आर्थिक, लष्करी किंवा अणुशक्तीच्या दुपटीने सामथ्र्यशाली असणे, व्यूहात्मकदृष्टय़ा उपयुक्त असणे, व्यापार, परदेशी गुंतवणूक, ऊर्जा सहकार्य, परदेशस्थ भारतीयांची उपस्थिती या बाबीही ध्यानात घेणे श्रेयस्कर ठरते.
२०१३
- अलीकडे काही वर्षांत भारत व जपान यांच्यातील आर्थिक संबंधांमध्ये वाढ होत आहे. मात्र, अजूनही ते क्षमतेपेक्षा खूप कमी आहेत. या वाढीला अवरुद्ध करणाऱ्या धोरणात्मक मर्यादा स्पष्ट करा.
- भारत व जगातील महासत्ता यांच्यातील संबंध अभ्यासताना या देशांमधील लोकशाही, विकास, बौद्धिक संपदा अधिकार, व्यापार विवाद, पर्यावरणीय वाटाघाटी, दहशतवाद, व्यापाराचा विकास आदी बाबी ध्यानात घ्याव्या लागतात. प्रस्तुत घटकाची व्याप्ती अधिक आहे. त्याचसोबत या घटकाच्या अध्ययनामध्ये चालू घडामोडींचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
- याकरिता पंतप्रधानांचे विदेश दौरे, या दौऱ्यांमध्ये झालेले करार, शिखर परिषदा इ. बाबींचा नियमितपणे मागोवा घ्यावा लागेल.
- भारताच्या अमेरिका, रशिया, आसियान हा प्रादेशिक गट, आफ्रिका, पश्चिम आशिया या प्रदेशांशी असणाऱ्या संबंधांचा थोडक्यात आढावा घेऊ या. भारत व अमेरिकेचे द्विपक्षीय संबंध जागतिक व्यूहात्मक भागीदारीमध्ये विकसित झालेले आहेत. दोन देशांमधील हितसंबंधांमध्ये एककेंद्राभिमुखता वाढत असल्याचे दिसते. अलीकडे ळाअ बौद्धिक संपदा अधिकार, यूएनएफसीसीमध्ये दोन्ही देशांच्या भूमिकांतील अंतर इ. बाबींमध्ये तणाव दिसून आला.
- भारत व रशिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारी ही परंपरेनेच संरक्षण, नागरी अणुऊर्जा, दहशतवादविरोधी सहकार्य, अंतरिक्ष विज्ञान, राजकारण या बाबींवर आधारित असल्याचे दिसते. भारताचे पश्चिम आशियायी देशांशी असणारे संबंध व्यावहारिक दिसून येतात. या संबंधांचा भारताच्या ऊर्जासुरक्षेशी घनिष्ठ संबंध आहे.
- आफ्रिकेमध्ये भारताच्या वाढत्या रुची (interest) च्या सकारात्मक व नकारात्मक बाजू आहेत. टीकात्मक परीक्षण करा.
- भारत व आसियान संघटनेदरम्यान दोन वर्षांपासून धोरणात्मक भागीदारी निर्माण झाल्याचे आढळते.
- भारत-आसियान यांदरम्यानच्या सहकार्यामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो. व्यापार आणि गुंतवणूकविषयक करार, दहशतवादविरोध, सागरी सुरक्षा. भारताने सध्या ‘अॅक्ट ईस्ट’वर भर दिल्याने आसियान राष्ट्रांच्या नेत्यांनी स्वागत केले.
- भारताच्या ऊर्जा सुरक्षेची समस्या भारताच्या आर्थिक प्रगतीचा महत्त्वपूर्ण भाग आहे. पश्चिम आशियायी देशांशी भारताच्या ऊर्जा धोरण सहकार्याचे विश्लेषण करा.
- मध्य आशिया भारताकरिता स्वारस्यपूर्ण क्षेत्र आहे, मात्र या क्षेत्रामध्ये बऱ्याच बाह्यशक्तींनी स्वत:ला स्थापित केले आहे. या संदर्भात भारत अश्गाबात करार २०१८ मध्ये सामील होण्याच्या परिणामांवर चर्चा करा.
- भारत व आफ्रिका यांच्यातील संबंधांना २००८ पासून संस्थात्मक स्वरूप प्राप्त झालेले आहे. आतापर्यंत इंडिया आफ्रिका फोरम समीट अंतर्गत ३ परिषदांचे आयोजन करण्यात आले. भारत-आफ्रिका संबंधांमध्ये चीन हासुद्धा महत्त्वाचा घटक आहे.
First Published on October 23, 2018 12:14 am
Web Title: india and the world
No comments:
Post a Comment