संशोधन संस्थायण : तंत्रज्ञान आणि सामाजिक विकास
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट स्टडीज ही भारतीय संशोधन विश्वातील एक अग्रगण्य संशोधन संस्था आहे.
प्रथमेश आडविलकर
itsprathamesh@gmail.com
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट स्टडीज, नवी दिल्ली.
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट स्टडीज ही संशोधन संस्था विज्ञान, समाज आणि राज्य यांच्यामध्ये होत असलेल्या परस्पर संवादाच्या विविध पलूंचा अभ्यास आणि संशोधन करणारी संस्था आहे. ही संशोधन संस्था भारत सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) एकूण अडतीस प्रयोगशाळांपकी एक महत्त्वाची व अग्रगण्य प्रयोगशाळा आहे. सीएसआयआरचे मुख्यालय असलेल्या नवी दिल्ली येथे ही संस्था आहे.
संशोधन संस्थेविषयी
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट स्टडीज ही भारतीय संशोधन विश्वातील एक अग्रगण्य संशोधन संस्था आहे. या संस्थेची स्थापना ३० सप्टेंबर १९८० साली झाली आणि संस्थेला तिचे सध्याचे नाव १ एप्रिल १९८१ साली देण्यात आले. सध्या संस्थेमध्ये एकूण पंधरा संशोधक – प्राध्यापक आहेत.
जे विविध शैक्षणिक विद्याशाखांमधून निवडले जातात. त्यांची बौद्धिक विविधता हीच संस्थेचा मुख्य आधार आहे, अशी संस्थेची धारणा आहे. संस्थेमध्ये नोंदणी केलेले संशोधक विद्यार्थी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित विद्यापीठांमधून पीएचडी प्राप्त करतात. दरवर्षी एनआयएसटीएडीएसच्या एका विशेष कार्यक्रमाअंतर्गत परदेशातील संशोधकांना संस्थेमध्ये विद्यार्थ्यांबरोबर वेळ व्यतीत करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. या कार्यक्रमांतर्गत देशविदेशातील तज्ज्ञ संशोधक-प्राध्यापक विद्यार्थ्यांना भेटतात, त्यांच्याशी संशोधनविषयक विषयांवर चर्चा करतात व विद्यार्थ्यांना संशोधनातील मोलाचे मार्गदर्शन करतात.
संशोधनातील योगदान
एनआयएसटीएडीएस ही संस्था विज्ञान, तंत्रज्ञान व सामाजिक विकास या विद्याशाखांमध्ये मुलभूत संशोधन करणारी संस्था आहे. संस्थेकडे संशोधनातील सर्व अद्ययावत स्रोत उपलब्ध असून संस्था उत्तम पायाभूत सुविधांसह संशोधन-अध्ययनासाठी सुसज्ज आहे. एनआयएसटीएडीएस ही वर उल्लेख केलेल्या विषयांमध्ये इंटरडिसिप्लिनरी संशोधन करणारी देशातील एक महत्त्वाची संशोधन संस्था आहे. संस्थेमध्ये जास्तीत जास्त भर मूलभूत संशोधनावरतीच दिला जातो. संस्थेचे महत्त्वाचे संशोधन प्रामुख्याने एस अँड टी अॅप्लिकेशन अॅसेसमेंट प्लॅिनग(एसटीएएपी), फ्यूचर अॅप्लिकेबल एसअँडटी, सोशिओ इकोनॉमिक्स ऑफ एसअँडटी, ग्रूप डायनेमिक्स अँड सोशल इंजिनीअिरग (जीडीएसई), फ्रंटियर इनोव्हेशन अँड रिसर्च, क्लायमेट चेंज, अॅडाप्शन, मिटिगेशन, सस्टेनिबिलिटी या विषयांवर होते. त्याबरोबरच ही संस्था मॅग्नेटिक मटेरियल्स, रॅपिडली सॉलिडिफाइड अॅलॉयज्, सरफेस कोटिंग्ज, मेटॅलिक फोम्स, मेकॅनोकेमिकल अॅक्टिव्हेशन, सेमीसॉलिड प्रोसेसिंग, थर्मोमेकॅनिकल ट्रीटमेंट, हाय टेंपरेचर सिंथेसिस, अॅडव्हान्स्ड जॉइिनग, ग्रेन बाउंड्री इंजिनीअिरग, हाय स्ट्रेन रेट फॉìमग या इतर विषयांमध्येही संशोधन करते.
विद्यार्थ्यांसाठी संधी
संस्थेने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना पीएचडी पदवीसाठी मोलाचे मार्दर्शन केलेले आहे. येथील अनेक पीएचडी पदवीधारक भारतात व परदेशातदेखील संशोधन, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत आहेत. ही संस्था आजसुद्धा देशातील व परदेशातील विविध विद्यापीठांबरोबर संलग्न होऊन अनेक शैक्षणिक व संशोधन प्रकल्प राबवत आहे. भारतातील इतर संशोधन संस्थांसारखे या संस्थेमध्येही अॅकॅडमी ऑफ सायंटिफिक अँड इनोव्हेटिव्ह रिसर्च (अूरकफ) या प्रकल्पाच्या अंतर्गत पदव्युत्तर, पीएचडी व पोस्ट डॉक्टरल संशोधन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पूर्ण करता येतात.
एनआयएसटीएडीएस देशातील व देशाबाहेरील अनेक विद्यापीठांशी पदव्युत्तर व पीएचडी अभ्यासक्रमासाठी संलग्न आहे. विद्यापीठांमध्ये पीएचडीचे संशोधन करणारे अनेक विद्यार्थी संशोधनाचा विशिष्ट भाग अथवा माहिती संकलन किंवा माहिती प्रक्रिया इत्यादीसारख्या बाबी पूर्ण करण्यासाठी इथे ठरावीक काळ व्यतीत करत असतात. तसेच दरवर्षी सीएसआयआरच्या परीक्षांमधून गुणवत्ताप्राप्त अनेक जेआरएफ व एसआरएफ विद्यार्थी इथे पीएचडीचे संशोधन करण्यासाठी प्रवेश घेतात. या संशोधक विद्यार्थ्यांना देशविदेशातील अनेक कार्यशाळांना पाठवून त्यांचे कार्य सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते.
संपर्क
सीएसआयआर – नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट स्टडीज, नवी दिल्ली.
पुसा गेट, के.एस. कृष्णन मार्ग, नवी दिल्ली – ११००१२
दूरध्वनी ०११२५८४३२२७, २५८४६०६४
ईमेल – director@nistads.res.in
संकेतस्थळ – http://www.nistads.res.in
First Published on October 11, 2018 2:34 am
Web Title: article about national institute of science
No comments:
Post a Comment