करिअर मंत्र
माझा मुलगा दहावीला आहे. इंग्रजी माध्यमात तो शिकत आहे.
माझा मुलगा दहावीला आहे. इंग्रजी माध्यमात तो शिकत आहे. अकरावीला कोणती शाखा घ्यावी, ते त्याचे ठरत नाही. त्याला सायन्सची आवड नाही. त्याला चित्रकला व पखवाजवादन जास्त आवडते. त्या दृष्टीने कोणती शाखा घ्यावी? अजून काय पर्याय आहेत? – सीताराम
कोणतीही शाखा घेऊन बारावीमध्ये किमान साठ टक्के मिळवावेत. त्यानंतर चित्रकलेद्वारे फाइन, कमर्शिअल आर्ट, डिझाइन, ग्राफिक्स, इंटिरिअर किंवा अॅनिमेशन अशा क्षेत्रांत प्रवेश परीक्षा देऊनच प्रवेश मिळेल. पखवाजवादन छंद म्हणून जरूर जोपासावे. त्यामध्ये करिअर करताना मात्र विचारपूर्वकच निर्णय घ्यावा, कारण साधना बरीच आहे आणि यशाचा मार्ग खडतर आहे. त्यातून स्वतंत्र प्रगती करणारेही विरळाच दिसतात.
- मी यंदा बारावीची परीक्षा दिली आहे. मला ऑटोमोबाइल क्षेत्रात करिअर करायचे आहे. काय करावे लागेल? – अंबु घांगले
- मी कायद्याचा अभ्यास करतो आहे. सध्या दुसऱ्या वर्षांला आहे. माझे वय २७ आहे. मी कधीपासून वकिलांकडे उमेदवारी करू शकतो? पदवीनंतर काय काय करू शकतो? कोणत्या संधी आहेत? – महेश देशमुख व नय्यूम पठाण
First Published on October 26, 2018 1:46 am
Web Title: loksatta career mantra 23
No comments:
Post a Comment