Monday, December 31, 2018

एमपीएससी मंत्र : कर सहायक (पेपर २) पाचवी ते दहावीपर्यंतच्या अंकगणित विषयाच्या पाठय़पुस्तकातील उदाहरणसंग्रह सोडवून करावा.

एमपीएससी मंत्र : कर सहायक (पेपर २)

पाचवी ते दहावीपर्यंतच्या अंकगणित विषयाच्या पाठय़पुस्तकातील उदाहरणसंग्रह सोडवून करावा.

वसुंधरा भोपळे – द.वा आंबुलकर
आज आपण कर सहायक गट क परीक्षेच्या पेपर २ बद्दल बोलणार आहोत. या पेपरसाठी परीक्षेला जाता जाता उजळणी कशी करावी आणि त्यासाठी कोणते अभ्यासस्रोत वापरावेत याचा आढावा घेऊ या.
अभ्यासक्रम व अभ्यासस्रोत
१. नागरिकशास्त्र – राज्य व्यवस्थापन (प्रशासन), नागरी व ग्रामीण व्यवस्थापन (प्रशासन)
या विभागांतर्गत ग्रामप्रशासन आणि राज्यव्यवस्थापन यामधील मूलभूत संकल्पनांचे आकलन, पंचायत राजव्यवस्था, त्यासंदर्भातील समित्या; त्यांच्या शिफारशी; सदस्य; स्थापना वर्ष; कायदे; या स्तरावर कार्यरत अधिकारी – त्यांचे अधिकार व कर्तव्ये; यासंदर्भातील राज्यघटनेतील तरतुदी या घटकांवर विशेष भर द्यावा.
अभ्यासस्रोत – महाराष्ट्र बोर्डाची इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतची नागरिकशास्त्र आणि अकरावी, बारावीची राज्यशास्त्राची पुस्तके यासाठी उपयोगी ठरतील.
२. भारतीय राज्यघटना – या विभागात घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्त्वे, घटनेची महत्त्वाची कलमे / ठळक वैशिष्टय़े, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे-शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ – अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ – विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व विधी समित्या या विभागांतर्गत भारतीय राज्यघटनेबद्दलची निरीक्षणे, केंद्र-राज्य संबंध आणि त्यासंबंधित तरतुदी, नीती आयोग आणि त्याचे महत्त्व; कार्य; संरचना, राष्ट्रपती; पंतप्रधान; मुख्यमंत्री; राज्यपाल ही पदे व या पदांची कार्ये, पात्रता, विशेषाधिकार, लोकसभा; राज्यसभा; तसेच विधानसभा; विधान परिषद यांची कार्यपद्धती, लोकलेखा समिती; तिची निर्मिती; कार्य, संविधान दुरुस्तीविषयक तरतुदी आणि त्यांचे विषय, भारताचा महाधिवक्ता; त्याची कार्ये; अधिकार व त्यासंदर्भातील तरतुदी, महाराष्ट्र राज्याची निर्मिती, त्यासंदर्भात संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि तिचे पडसाद, या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर विशेष भर द्यावा.
अभ्यासस्रोत – सहावी ते दहावीपर्यंतची नागरिकशास्त्राची महाराष्ट्र बोर्डाची पाठय़पुस्तके अकरावी व बारावीची राज्यशास्त्राची पुस्तके, एम. लक्ष्मीकांत यांचे इंडियन पॉलिटी हे पुस्तक.
३. पंचवार्षिक योजना – या विभागांतर्गत नियोजनाची प्रक्रिया, प्रकार, भारताच्या आतापर्यंतच्या पंचवार्षिक योजनांचा आढावा, मूल्यांकन, सामाजिक व आर्थिक विकासाचे निर्देशफलक, राज्य आणि स्थानिक पातळीवरील नियोजन, विकेंद्रीकरण, ७३ व ७४ वी घटनादुरुस्ती, भारतीय अर्थव्यवस्था, क्षेत्रीय विकासाचा कल व सेवा क्षेत्राची रूपरेषा, भारतीय अर्थव्यवस्थेच्या समोरील आव्हाने, गरिबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल आणि त्या संदर्भातील पंचवार्षिक योजनांमधील तरतुदी या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर विशेष भर द्यावा.
अभ्यासस्रोत – वरील घटकासाठी भारताची व महाराष्ट्राची आर्थिक पाहणी तसेच स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र भाग १ हे डॉ. किरण देसले यांचे पुस्तक अभ्यासावे.
४.  चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील 
हा घटक अभ्यासताना परीक्षेच्या अगोदर किमान एक वर्ष अगोदर घडलेल्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडी विचारात घ्याव्या लागतात. यामध्ये विज्ञान-तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था भारतीय राजकारण, सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निकाल, नवीन लागू झालेल्या करप्रणाली, जागतिक उच्चांक, राज्य सरकारचे व केंद्र सरकारचे अधिनियम, विविध योजना, चित्रपट क्षेत्रातील पुरस्कार, क्रीडा क्षेत्रातील वैशिष्टय़पूर्ण कामगिरी यांचा समावेश करावा.
अभ्यासस्रोत – योजना, लोकराज्य ही मासिके, लोकसत्ता, इंडियन एक्स्प्रेस ही दैनिके.
५. बुद्धिमापन चाचणी व मूलभूत गणितीय
कौशल्ये – ५.१) बुद्धिमत्ता चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी या घटकावर प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांमधून विद्यार्थ्यांच्या चौकस बुद्धी आणि बौद्धिक क्षमतेचाही कस पाहिला जातो. या विभागातील प्रश्न सोडविण्यासाठी जास्तीत जास्त सराव आणि उजळणीची गरज असते.
५.२) मूलभूत गणितीय कौशल्य – यामध्ये मूलभूत अंकगणितीय कौशल्ये, अंक आणि त्यांचे परस्पर संबंध, अशा दहावीच्या स्तरावरील गणितीय क्रियांवर अधिक भर देणे अपेक्षित आहे.
अभ्यासस्रोत – वा. ना. दांडेकर यांची गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांची पुस्तके, सातवी स्कॉलरशिप, आठवी व नववीची टळरची पुस्तके आणि दहावीची ठळरची पुस्तके
६. अंकगणित – गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णाक व टक्केवारी, गुणोत्तर व प्रमाण, वेळ व अंतर, नफा-तोटा, सूट, व्याज, वेळ व काम, आलेख, सरासरी, महत्त्वमापन व क्षेत्रमापन.
अभ्यासस्रोत – या घटकांचा अभ्यास पाचवी ते दहावीपर्यंतच्या अंकगणित विषयाच्या पाठय़पुस्तकातील उदाहरणसंग्रह सोडवून करावा.
७. पुस्तपालन व लेखाकर्म (Book Keeping and Accountancy)- लेखाकर्म अर्थ, लेखासंज्ञा, द्विनोंद पद्धतीची मूलभूत तत्त्वे, लेखाकर्माकरिता दस्तऐवज, रोजकीर्द, सहायक पुस्तके, खतावणी, बँक मेळजुळणी पत्रक, तेरीज पत्रक, घसारा, अंतिम लेखे, वित्तीय विवरणपत्रके तयार करणे, नफा न कामाविणाऱ्या संस्थांची खाती.
अभ्यासस्रोत – या घटकांचा अभ्यास करण्यासाठी बाजारात उपलब्ध असणारे पुस्तकपालन व लेखाकर्म या संदर्भातील उपलब्ध असणारे अभिजीत बोबडे यांचे पुस्तक वापरावे.
९. आर्थिक सुधारणा व कायदे – यामध्ये उदारीकरण, खासगीकरण, जागतिकीकरण या संकल्पना, त्यांचा अर्थ, व्याप्ती, मर्यादा, केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा, WTO तरतुदी आणि सुधारणा आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम, प्रश्न व समस्या, GST, VAT, विक्रीकर संबंधित कायदे व नियम या घटकांवर प्रश्नांचा अधिक भर असतो.
अभ्यासस्रोत – या घटकांचा अभ्यास करण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्था हे दत्त व सुंदरम यांचे पुस्तक तसेच स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र भाग १ व भाग २ ही डॉ. किरण देसले यांची पुस्तके अभ्यासावीत.
महिलांसाठी संशोधनकिरण  केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे
महिला संशोधकांसाठी असणाऱ्या ‘नॉलेज इन्व्हॉल्वमेंट इन रिसर्च अ‍ॅडव्हान्समेंट नर्चरिंग’ म्हणजे ‘किरण’ योजनेअंतर्गत २०१८-१९ या शैक्षणिक सत्रामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात खालीलप्रमाणे संशोधनपर संधी उपलब्ध आहेत.
* योजनेअंतर्गत समाविष्ट विषय – योजनेअंतर्गत समाविष्ट विषयांमध्ये कृषी व संबंधित क्षेत्र, आरोग्य व सकस आहार, विज्ञान व तंत्रज्ञान विकास यासारख्या विषयातील संशोधनपर कामाचा समावेश आहे.
* आवश्यक पात्रता – अर्जदारांनी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रासह वरील विषयातील पदव्युत्तर पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संशोधनपर कामाची रुची असायला हवी. संगणकाचे ज्ञान आवश्यक.
* पाठय़वृत्तीचा कालावधी व तपशील- ‘किरण’ योजनेअंतर्गत संशोधनपर फेलोशिपचा कालावधी तीन वर्षांपर्यंत असेल व त्यादरम्यान त्यांना खालीलप्रमाणे दरमहा संशोधनपर पाठय़वृत्ती देण्यात येईल.
एमएस्सी पात्रताधारक उमेदवारांसाठी दरमहा ३० हजार रुपये.
एमफील/ एमटेक पात्रताधारक उमेदवारांसाठी दरमहा ४० हजार रुपये. पीएचडी पात्रताधारक उमेदवारांसाठी दरमहा ५५ हजार रुपये.
*  अधिक माहिती व तपशील- वरील संदर्भात अधिक माहिती व तपशीलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाची महिला संशोधकांसाठी असणाऱ्या ‘किरण’ संशोधन योजनेची जाहिरात पाहावी अथवा विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या www.dst.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
* अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख- संपूर्णपणे भरलेले तपशीलवार अर्ज सायंटिस्ट एफ, किरण डिव्हिजन, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, टेक्नॉलॉजी भवन, न्यू मेहरोली रोड, नवी दिल्ली- ११००१६ या पत्त्यावर १६ नोव्हेंबर २०१८ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.
First Published on October 31, 2018 4:48 am
Web Title: useful tips for mpsc exam

यूपीएससीची तयारी : सामान्य अध्ययन पेपर तीन प्रस्तुत लेखामध्ये आपण सामान्य अध्ययन पेपर ३ अंतर्गत नमूद केलेला अभ्यासक्रम तसेच या पेपरचे स्वरूप आणि व्याप्ती याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.

यूपीएससीची तयारी : सामान्य अध्ययन पेपर तीन

प्रस्तुत लेखामध्ये आपण सामान्य अध्ययन पेपर ३ अंतर्गत नमूद केलेला अभ्यासक्रम तसेच या पेपरचे स्वरूप आणि व्याप्ती याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.

प्रस्तुत लेखामध्ये आपण सामान्य अध्ययन पेपर ३ अंतर्गत नमूद केलेला अभ्यासक्रम तसेच या पेपरचे स्वरूप आणि व्याप्ती याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. यूपीएससीने २०१३ मध्ये मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये बदल केलेला आहे व प्रस्तुत बदलानुसार या पेपरमध्ये तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन या घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच प्रत्येक घटकामध्ये अंतर्भूत असणारे मुद्दे याची यादीही देण्यात आलेली आहे.
आर्थिक विकास
या घटकामध्ये भारतीय अर्थव्यवस्था संबंधित मुद्दय़ांचा समावेश करण्यात आलेला आहे ज्यामध्ये अर्थव्यवस्थेशी निगडित आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास, नैसर्गिक साधनसंपत्ती व या संपत्तीच्या वापराचे नियोजन, सर्वसमावेशक वाढ साध्य करण्यासाठी सरकारमार्फत राबविले जाणारे महत्त्वाचे उपक्रम, देशातील बजेट प्रक्रिया (c), कृषी आणि कृषी संबंधित संलग्न असणारे क्षेत्रे तसेच कृषी क्षेत्राची उत्पादकता आणि स्थूल देशांतर्गत उत्पादनातील वाटा वाढविण्यासाठी सरकारद्वारे राबविल्या जाणाऱ्या विविध योजना आणि या क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्या आणि त्या सोडविण्यासाठी सरकारने आखलेली ध्येयधोरणे, औद्योगिक क्षेत्र, सेवाक्षेत्र यांसारख्या आर्थिक विकासाला आणि आर्थिक वृद्धीला अधिक गती देणाऱ्या क्षेत्रासाठी सरकारमार्फत राबविले जाणारे विविध उपक्रम, योजना, आखण्यात आलेले कायदे, भारतामध्ये परकीय गुंतवणूक वाढविण्यासाठी आखण्यात आलेली रणनीती व याचबरोबर भारताचे परकीय व्यापार धोरण व निर्यात वाढीसाठी आखलेल्या विविध उपाययोजना, दळणवळण क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी सरकारमार्फत केले जाणारे विशेष प्रयत्न, १९९१मध्ये भारताने अवलंबिलेले आर्थिक उदारीकरणाचे धोरण आणि याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम, जागतिकीकरणाचे भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम इत्यादी महत्त्वपूर्ण मुद्दय़ांचा अभ्यास या घटकाची तयारी करताना करावा लागतो.
तंत्रज्ञान – हा घटक मुखत्वे विज्ञान आणि तंत्रज्ञान या अनुषंगाने आहे. या घटकामध्ये भारत सरकारने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये विकास घडवून आणण्यासाठी कोणत्या प्रकारच्या धोरणाची आखणी केलेली आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास व व्यवहार उपयोगिता, तसेच याचा सर्वसामान्यांच्या जीवनावर होणारा परिणाम, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये भारतीयांनी केलेली कामगिरी आणि दिलेले योगदान तसेच माहिती तंत्रज्ञान, संगणक, अवकाश संशोधन, नॅनो तंत्रज्ञान, जैव-तंत्रज्ञान आणि बौद्धिक संपदा अधिकार संबंधित मुद्दे इत्यादी बाबींचा समावेश आहे आणि या संदर्भात दररोज घडामोडी घडत असतात. त्यामुळे हा घटक अभ्यासताना उपरोक्त नमूद केलेल्या प्रत्येक बाबीची मूलभूत संकल्पनेसह योग्य समाज असावी लागते. थोडक्यात विज्ञान आणि तंत्रज्ञानचा घटक अभ्यासताना विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये लावले जाणारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील नवनवीन शोध, आणि या शोधामुळे होणारे फायदे आणि तोटे, बौद्धिक संपदा अधिकार तसेच याचे होणारे परिणाम इत्यादी महत्त्वपूर्ण पलूंवर भर देण्यात येतो.
जैवविविधता, पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन – या घटकामध्ये पर्यावरण संवर्धन, पर्यावरण आणि जैवविविधतेचा होणारा ऱ्हास व या ऱ्हासासाठी जबाबदार असणारे घटक, जैवविविधतेला निर्माण झालेला धोका, पर्यावरणीय प्रदूषण, नदी प्रदूषण, हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण व या मुळे उत्पन्न झालेल्या समस्या, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जैवविविधता आणि पर्यावरण संरक्षणासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजना, भारत सरकारमार्फत जैवविविधता आणि पर्यावरण संरक्षित करण्यासाठी पारित करण्यात आलेले विविध कायदे व त्यांची उपयुक्तता याच बरोबर पर्यावरणीय आघाताचे मूल्यमापन इत्यादी
मुद्दे अभ्यासावे लागतात. आपत्ती व्यवस्थापन यामध्ये आपत्तीचे प्रकार (नसíगक आणि मानवनिर्मित), आपत्तीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या, तसेच आपत्ती निवारणासाठी सरकारमार्फत आखण्यात आलेली आपत्ती व्यवस्थापन योजना व कायदे इत्यादी मुद्दे अभ्यासावे लागणार आहेत.
सुरक्षा – सद्यस्थितीत भारताला बाह्य आणि अंतर्गत सुरक्षा अबाधित ठेवण्यासठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे व या समस्या देशाच्या सार्वभौमत्वाला आवाहन देत आहेत. सुरक्षा या घटकामध्ये भारताच्या बाह्य आणि अंतर्गत सुरक्षासंबंधी मुद्दय़ांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये डाव्या विचारसरणीचा दहशतवाद अर्थात नक्षलवाद, सीमेपलीकडून होणारी घुसखोरी, दहशतवाद, वाढता प्रादेशिकवाद, पूर्वेकडील राज्यामध्ये होणारी घुसखोरी व वांशिक चळवळी, जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद, आंतरराष्ट्रीय सीमा संबंधी असणारे वादविवाद, संघटित गुन्हेगारी, अवैध पसा हस्तांतरण, सीमेवर अवैधरीत्या होणारी नशिल्या पदार्थाची तस्करी आणि याचे असणारे संघटित स्वरूप, सततचे होणारे भाषिक वाद, राज्या-राज्यांतर्गत असणारे वाद, धार्मिक दंगे, सायबर सुरक्षा संबंधित मूलभूत माहिती, माध्यमे आणि सोशल नेटवìकग साइटस याचा  होणारा वापर, त्याद्वारे देशातील सामाजिक सलोख्याला निर्माण होणारा धोका, सुरक्षिततेला निर्माण होणारे आव्हान इत्यादी बाबी आणि या आव्हानांना सामोरे जाताना भारत सरकारने आखलेली रणनीती ज्यामध्ये सीमा सुरक्षा आणि व्यवस्थापन अधिक सक्षमरीत्या राबविणे, सीमेलगतच्या भागाचा विकास घडवून आणणे, याच बरोबर सागरी सुरक्षा अबाधित राखणे इत्यादी महत्त्वाच्या बाबींचा समावेश यात आहे. तसेच देशाची बाह्य आणि अंतर्गत सुरक्षा अबाधित राखण्यासाठी सरकारमार्फत स्थापन करण्यात आलेल्या विविध सरकारी संस्था आणि संघटना व त्यांना नेमून दिलेले कार्य याचबरोबर सरकारमार्फत वेळोवेळी केल्या जाणाऱ्या उपाययोजना व कायदे याची माहिती असणे आवश्यक आहे.
उपरोक्त चíचलेल्या जवळपास सर्व घटकांमध्ये महत्त्वाच्या संकल्पनांचाही समावेश असतो आणि या संकल्पनांचे योग्य आकलन करणे अपेक्षित आहे. या साऱ्यामुळे विषयावर प्रभुत्व निर्माण करणे सोपे होते. आपण यापुढील प्रत्येक लेखामध्ये संबंधित घटकामधील काही महत्त्वाच्या संकल्पनांवरही चर्चा करणार आहोत. उपरोक्त चíचलेले सर्व घटक अभ्यासताना या घटकासंबंधित घडणाऱ्या महत्त्वाच्या चालू घडामोडी याचीही तयारी करावी लागणार आहे. अर्थात प्रत्येक घटकाचे प्राथमिक ज्ञान असल्याशिवाय चालू घडामोडीचे योग्य आकलन करता येत नाही.
First Published on October 30, 2018 3:35 am
Web Title: article about general study paper three

विद्यापीठ विश्व : देवभूमीतील शिक्षणकेंद्र केरळ विद्यापीठ इंग्लंडमधील सर्वोत्तम विद्यापीठांच्या धर्तीवर या विद्यापीठाची रचना करण्यात आली.

विद्यापीठ विश्व : देवभूमीतील शिक्षणकेंद्र केरळ विद्यापीठ

इंग्लंडमधील सर्वोत्तम विद्यापीठांच्या धर्तीवर या विद्यापीठाची रचना करण्यात आली.

योगेश बोराटे    
संस्थेची ओळख – ‘देवभूमी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळच्या तिरुवनंतपूरम या राजधानीच्या शहारामध्ये वसलेले हे विद्यापीठ देशभरातील जुन्या विद्यापीठांपकी एक. स्वातंत्र्यपूर्व काळात त्रावणकोर संस्थानाचे महाराज श्री चिथिरा थिरूनल बलराम वर्मा यांनी १९३७ मध्ये त्रावणकोर विद्यापीठाची स्थापना केली. इंग्लंडमधील सर्वोत्तम विद्यापीठांच्या धर्तीवर या विद्यापीठाची रचना करण्यात आली. त्याची छाप आजही या विद्यापीठावर काही अंशी अनुभवायला मिळते. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये राज्य पुनर्रचनेनंतर १९५७ मध्ये हे विद्यापीठ केरळ विद्यापीठामध्ये रूपांतरित झाले. गेल्या आठ दशकांत भौगोलिकदृष्टय़ा विद्यापीठाचा विस्तार कमी होत गेला असला, तरी शैक्षणिकदृष्टय़ा मात्र विद्यापीठाने प्रगती साधली आहे. ‘नॅक’कडून वर्ष २०१५ ते २०२० या कालावधीसाठी ए- ग्रेड’ मिळालेले हे विद्यापीठ वर्ष २०१८ साठी राष्ट्रीय पातळीवरील ‘एनआयआरएफ’ मानांकनामध्ये देशामध्ये तिसाव्या क्रमांकावर आहे. विद्यापीठातर्फे चालविल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमांना मोठय़ा संख्येने प्रवेश घेणाऱ्या विद्याíथनी हे या विद्यापीठाचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ ठरते. एकूण प्रवेशित विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेमध्ये विद्यार्थिनींचे प्रमाण पाहिल्यास ते पीएच.डी. अभ्यासक्रमांसाठी साधारण ६७ टक्के, एम. फिलसाठी ७५ टक्के, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ७६ टक्के प्रमाण इतके आहे. पर्यायाने या विद्यापीठाने मुलांसाठीच्या दोन वसतीगृहांच्या जोडीने, मुलींच्या वाढत्या संख्येचा विचार करत मुलींसाठीच्या तीन वसतीगृहांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
संकुले आणि सुविधा  – सुरुवातीच्या काळामध्ये तिरुवनंतपूरम, एर्नाकुलम आणि कोझीकोडे या ठिकाणी विद्यापीठाची संकुले होती. नंतर १९६८ मध्ये कोझीकोडे केंद्राला पूर्ण विद्यापीठाचा दर्जा मिळाला. त्याचप्रमाणे कोचीन युनिव्हर्सटिी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, केरळ अ‍ॅग्रीकल्चरल युनिव्हर्सटिी, महात्मा गांधी युनिव्हर्सटिीच्या स्थापनेनंतर केरळ विद्यापीठाचे कार्यक्षेत्र तिरुवनंतपूरम, कोलम, अलप्पुझा या जिल्ह्यात तसेच पॅथनामथिट्टा या जिल्ह्याच्या काही भागापुरते मर्यादित झाले. विद्यापीठाचे मुख्य संकुल तिरुवनंतपूरम येथे आहे. मुख्य संकुलापासून दूर असलेल्या कोलम, अलप्पुझा व पँडलम येथील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) साहाय्याने विद्यापीठ अभ्यास केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. संलग्न महाविद्यालयांमध्ये असलेल्या मदत केंद्रांमधूनही विद्यार्थाना माहिती-सेवा पुरविली जाते. विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना वाव मिळतो. या विभागाने अनेक चांगले खेळाडू देशाला दिले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी विद्यापीठाचे मदान आहे. इथे जागतिक दर्जाचा सिन्थेटिक ट्रॅक पाहायला मिळतो. केरळमधील सर्वात जुने व मोठे विद्यापीठीय ग्रंथालय म्हणून तिरुवनंतपूरम येथील ग्रंथालय ओळखले जाते. या ग्रंथालयाची स्थापना १९४२ मध्ये झाली. या ग्रंथालयामध्ये साडेतीन लाखांहून अधिक पुस्तके आहेत व दरवर्षी यात भर पडत राहते. नव्या तंत्रज्ञानाची कास धरत विद्यापीठाने डिजिटल सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. हे ग्रंथालय विद्यार्थी, शिक्षक तसेच सामान्य नागरिकांसाठीही संदर्भ वाचनासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. कर्यवट्टम येथील संकुलातही एक ग्रंथालय आहे. त्याशिवाय विभागांमध्ये व महाविद्यालयांमध्ये असलेली ग्रंथालये विद्यार्थाची वाचनाची भूक भागवतात. हस्तलिखिते हे या विद्यापीठाच्या ग्रंथालयाचे महत्त्वाचे वैभव असून, या ग्रंथालयामध्ये ६५ हजारांवर हस्तलिखितांचा संग्रह आहे. त्यामध्ये बहुतांश हस्तलिखिते ही संस्कृत भाषेतील आहेत.
विभाग आणि अभ्यासक्रम – विद्यापीठामध्ये एकूण १६ विद्याशाखांमधून ४१ विभाग चालतात. विद्यापीठात मुख्यत्त्वे पदव्युत्तर अभ्यासक्रम, तसेच एम.फील, पीएच.डी. याद्वारे संशोधनावर भर देण्यात आला आहे. या विद्यापीठाने आपल्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे ४५ पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. तसेच, ३६ विषयांमधील एम. फिल. आणि ४२ विषयांमधील पीएच.डी.च्या संशोधन अभ्यासक्रमांची सुविधाही हे विद्यापीठ उपलब्ध करून देत आहे. त्याशिवाय, विद्यापीठाच्या विविध विभागांमधून १८ प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि १३ पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमही चालविले जातात. विद्यापीठामध्ये नॅनो टेक्नॉलॉजी, बायोइन्फम्रेटिक्स, विमन स्टडीज, गांधीवाद, केरळ अशा विशिष्ट विषय वा संकल्पनांना वाहिलेली खास अभ्यासकेंद्रेही चालतात. या अभ्यासकेंद्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संबंधित विषयांमधील प्रगत अध्ययन आणि संशोधन करण्याची सुविधा विद्यापीठाने निर्माण केली आहे.
विद्यापीठाच्या विभागांमधून एका वेळी दोन हजारांहून अधिक विद्यार्थी पूर्णवेळ अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित होऊ शकतात. विद्यापीठाने दहा ‘युनिव्हर्सटिी कॉलेज ऑफ टीचर एज्युकेशन’ आणि आठ ‘युनिव्हर्सटिी इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’चीही स्थापना केली आहे. कर्यवट्टम येथील ‘युनिव्हर्सटिी कॉलेज ऑफ इंजिनीअिरग’ येथे तंत्रशिक्षणातील पदवीचे अभ्यासक्रम चालविले जातात. या सर्व संस्थांमध्ये मिळून पाच हजारांहून अधिक विद्यार्थीसंख्या आहे. याशिवाय १५० हून अधिक महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्न आहेत. यांपकी ६० महाविद्यालये ही कला व शास्त्र, २ विधी महाविद्यालये, १७ अभियांत्रिकी महाविद्यालये, ९ एमबीए/ एमसीए महाविद्यालये, ३७ अध्यापक प्रशिक्षण महाविद्यालये, ४ वैद्यकीय महाविद्यालये, ४ आयुर्वेद महाविद्यालये, २ होमिओपॅथी महाविद्यालये, ३ दंतचिकित्सा महाविद्यालये, १० नìसग कॉलेज, ४ फार्मसी कॉलेज, २ फाईन आर्ट कॉलेज, संगीत महाविद्यालय आदींचा यात समावेश आहे. नॅशनल कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन हेही याच विद्यापीठांतर्गत येते. त्याशिवाय, इन्स्टिटय़ूट ऑफ डिस्टन्स एज्युकेशनच्या माध्यमातून अनेक पदवीपूर्व व पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवले जातात. देशभरातून तसेच परदेशातून ७ हजारांहून अधिक विद्यार्थी या सुविधेचा लाभ घेतात.  बी. एड. (अरेबिक स्टडिज), मृदुंगवादन- वीणावादन- व्हायोलिनवादन- नृत्य या विषयांमधील बॅचलर ऑफ परफॉìमग आर्ट्स (बीपीए), तसेच मास्टर ऑफ परफॉमिंग आर्ट्सचा (एमपीए) अभ्यासक्रम, मास्टर ऑफ प्लॅनिंग (एम. प्लॅन), मास्टर ऑफ व्हिज्युअल आर्ट्स इन आर्ट हिस्ट्री, मास्टर ऑफ व्हिज्युअल आर्ट्स इन पेंटिंग हे या विद्यापीठामध्ये उपलब्ध असणारे काही वेगळे आणि तितकेच महत्त्वाचे अभ्यासक्रम ठरतात. याशिवाय विद्यापीठाने नेहमीच्या पारंपरिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांची सुविधाही उपलब्ध करून दिलेली आहे.
First Published on October 30, 2018 3:29 am
Web Title: article about kerala university

यशाचे प्रवेशद्वार : अभिकल्प आणि उन्नती रीक्षेत मिळालेल्या एकूण गुणांवर आधारित मेरिट (गुणवत्ता) यादी तयार केली जाते.

यशाचे प्रवेशद्वार : अभिकल्प आणि उन्नती

रीक्षेत मिळालेल्या एकूण गुणांवर आधारित मेरिट (गुणवत्ता) यादी तयार केली जाते.

डिझाइन (अभिकल्प) क्षेत्र हे सध्या सर्वव्यापी झाले असल्याने या क्षेत्रातील प्रशिक्षित उमेदवारांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या विपुल संधी सध्या तंत्रज्ञान, व्यवस्थापन, निर्मिती, रिटेल, माहिती तंत्रज्ञान आधारित सेवा, शासन, नियोजन आणि धोरणे, मनोरंजन, संदेशवहन, जीवनशैली आदी क्षेत्रांत निर्माण होत आहेत. त्यामुळे, अंडर ग्रॅज्युएट कॉमन एंट्रस एक्झामिनेशन फॉर डिझाइन म्हणजे यूसीड (वउएएऊ) या परीक्षेत चांगली कामगिरी करून इंडस्ट्रियल डिझाइन सेंटर (आयआयटी), मुंबईसोबतच आयआयटी गुवाहाटी (डिपार्टमेंट ऑफ डिझाइन) आणि आयआयटीडीएम (इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फॉम्रेशन टेक्नॉलॉजी, डिझाइन अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चिरग) जबलपूर येथील पदवीस्तरीय डिझाइन अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवा.
*     गुणवत्ता यादी
यूसीड परीक्षेत मिळालेल्या एकूण गुणांवर आधारित मेरिट (गुणवत्ता) यादी तयार केली जाते. ही एकच यादी असेल. या यादीवरून विद्यार्थी त्याच्या संवर्गातील (खुला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग आणि अपंग) स्वत:चा क्रमांक जाणून घेऊ शकतो.
*     किमान गुण
प्रत्येक सेक्शनमध्ये किमान निर्धारित गुण व एकूण किमान गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनाच गुणवत्ता यादीत स्थान दिले जाईल. प्रत्येक सेक्शनमध्ये संवर्गनिहाय किमान गुण पुढीलप्रमाणे आहेत.
(१) खुला संवर्ग एकूण गुणांच्या किमान १० टक्के. एकूण किमान गुण १००. (२) ओबीसी एनसीएल
(नॉन क्रीमीलेअर) संवर्ग – एकूण गुणांच्या किमान
९ टक्के. एकूण किमान गुण ९० (३) अनुसूचित जाती, जमाती आणि अपंग संवर्ग – (प्रत्येकी) एकूण गुणांच्या किमान ५ टक्के. एकूण किमान गुण ५०
*    एकूण जागा
तिन्ही संस्थांमध्ये एकूण जागा १०५ आहेत. यापकी खुला संवर्ग – ५२ जागा, ओबीसी-एनसीएल संवर्ग – २६, अनुसूचित जाती संवर्ग – १५, अनुसूचित जमाती संवर्ग- ६, अपंग संवर्ग – ३
१) इंडस्ट्रियल डिझाइन सेंटर – आयआयटी मुंबई – एकूण जागा ३०, खुला संवर्ग- १४, ओबीसी-एनसीएल संवर्ग- ७, अनुसूचित जाती संवर्ग – ४, अनुसूचित जमाती संवर्ग- २, अपंग संवर्ग – ३
२) डिपार्टमेंट ऑफ डिझाइन- आयआयटी गुवाहाटी – एकूण जागा- ४५, खुला संवर्ग- २३, ओबीसी-एनसीएल संवर्ग -११, अनुसूचित जाती संवर्ग- ७, अनुसूचित जमाती संवर्ग – २, अपंग संवर्ग -२,
३) आयआयआयटीडीएम जबलपूर – एकूण जागा- ३०,  खुला संवर्ग – १५, ओबीसी-एनसीएल संवर्ग- ८, अनुसूचित जाती संवर्ग – ४, अनुसूचित जमाती संवर्ग – २, अपंग संवर्ग – १
*    संपर्क- चेअरमन, जेईई अ‍ॅडव्हान्स्ड, यूसीड २०१९, आयआयटी, पवई मुंबई-४०००७६,
संकेतस्थळ –  www.uceed.iitb.ac.in,
ईमेल-  uceed@iitb.ac.in,
दूरध्वनी-  ०२२ – २५७६४०६३,
फॅक्स- २५७२०३०५
*     उपयुक्त माहिती
१) या परीक्षेचा निकाला १ मार्च २०१९ रोजी संस्थेच्या संकेतस्थळावर घोषित केला जाईल.
२)आयआयटीमधील डिझाइन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जेईई मेन किंवा अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षेतील गुण ग्राह्य़ धरले जात नाहीत. यूसीड परीक्षेतील गुणांवर आधारितच प्रवेश दिला जातो.
३) बॅचलर ऑफ डिझाइन ही पदवी शासनमान्य आहे. ही पदवीप्राप्त विद्यार्थी यूपीएससीच्या परीक्षांना बसू शकतात.
४) प्रत्येक विद्यार्थ्यांला ही परीक्षा सलग दोनदाच देता येते. या परीक्षेतील गुण हे त्यावर्षीच्या शैक्षणिक सत्राच्या प्रवेशापुरतेच ग्राह्य़ धरले जातात.
*    नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन
डिझाइन विषयातील शिक्षण-प्रशिक्षण देणारी महत्त्वाची संस्था म्हणजे नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन. ही संस्था भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अ‍ॅण्ड प्रमोशन (डीआयपीपी) आणि वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी स्वायत्त संस्था आहे. या संस्थेचे अहमदाबाद, कुरुक्षेत्र आणि विजयवाडा येथे कॅम्पस आहेत. अहमदाबाद येथे बॅचलर ऑफ डिझाइन हा अभ्यासक्रम तर कुरुक्षेत्र आणि विजयवाडा येथे ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिझाइन हे अभ्यासक्रम करता येतात. या दोन्ही अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी चार वर्षांचा आहे. दोन्ही अभ्यासक्रम हे समकक्ष आहेत.
*     दोन स्तरीय चाळणी परीक्षा
या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर दोन स्तरीय चाळणी परीक्षा घेतली जाते. पहिला टप्पा हा डिझाइन अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट (डॅट) प्राथमिक परीक्षा असा आहे, तर दुसरा टप्पा डिझाइन अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट (डॅट) मुख्य परीक्षा असा आहे. प्राथमिक परीक्षेतील गुणांवर आधारित विशिष्ट संख्येत विद्यार्थ्यांची निवडसूची तयार केली जाते. या यादीतील विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी बोलावलं जातं. ही मुख्य परीक्षा अहमदाबाद येथे किंवा बेंगळूरु, गांधीनगर, कुरुक्षेत्र आणि विजयवाडा येथील कॅम्पसमध्ये घेतली जाते.
*     अर्हता – या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या खुल्या संवर्गातील उमेदवाराचे कमाल वय ३० जून २०१९ रोजी २० वर्षांपेक्षा अधिक नसावं. १ जुल १९९९ रोजी वा त्यानंतर जन्म झालेले विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात.
ओबीसी-नॉन क्रीमीलेअर, अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवाराचे कमाल वय ३० जून २०१९ रोजी २३ वर्षांपेक्षा अधिक नसावं. १ जुल १९९६ रोजी वा त्यानंतर जन्म झालेले विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात. अपंग संवर्गातील उमेदवाराचे कमाल वय ३० जून २०१९ रोजी २५ वर्षांपेक्षा अधिक नसावं. १ जुल १९९४ रोजी वा त्यानंतर जन्म झालेले विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात.
या परीक्षेला कला, वाणिज्य किंवा विज्ञान शाखेतील पास श्रेणीत बारावी उत्तीर्ण किंवा यंदा बारावीला असलेले विद्यार्थी बसू शकतात.
*    एकूण जागा- अहमदाबाद कॅम्पस- एकूण जागा (खुला संवर्ग- ५०, ओबीसी एनसीएल – २७, अनुसूचित जाती – १५, जमाती-८), विजयवाडा आणि कुरुक्षेत्र कॅम्पस एकूण जागा – ६० (खुला संवर्ग- ३०, ओबीसी एनसीएल – १६, अनुसूचित जाती – ९, जमाती – ५) सर्व संवर्गातील एकूण जागांपकी पाच टक्के जागा अपंगांसाठी राखीव ठेवण्यात येतील.
*    परीक्षा शुल्क – खुला संवर्ग आणि ओबीसी एनसीएल प्रत्येकी २ हजार रुपये आणि इतर संवर्ग प्रत्येकी एक हजार रुपये. हे शुल्क ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने भरता येते.
ऑफलाइन शुल्क भरू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित रकमेचा डिमांड ड्रॉफ्ट ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन या नावाने तयार करावा लागेल.
अर्जाची पीडीएफ आणि हा डिमांड ड्रॉफ्ट, द प्रोजेक्ट मॅनेजर – सीएमएस, ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन मॅनेजमेंट हाऊस, १४, इन्स्टिटय़ूशनल एरिया, लोधी रोड न्यू दिल्ली -११०००३, या पत्त्यावर १९ नोव्हेंबर २०१८पर्यंत पोहचेल अशा पद्धतीने पाठवावा.
First Published on October 27, 2018 2:49 am
Web Title: article about design and advancement

शब्दबोध नुकत्याच झालेल्या कोजागरीला (हो कोजागरीच. गिरी नव्हे.) अनेक घरांत हे गाणं ऐकू आलं असेल.

शब्दबोध

नुकत्याच झालेल्या कोजागरीला (हो कोजागरीच. गिरी नव्हे.) अनेक घरांत हे गाणं ऐकू आलं असेल.

डॉ. अमृता इंदुरकर
बत्ता
अडकीत जाऊ
खिडकीत जाऊ
खिडकीत होता बत्ता
भुलोजीला लेक झाला
नाव ठेवा दत्ता.
नुकत्याच झालेल्या कोजागरीला (हो कोजागरीच. गिरी नव्हे.) अनेक घरांत हे गाणं ऐकू आलं असेल. घरांमधून खिडकीत ठेवलेल्या बत्त्याला बघून भुलोजीच्या लेकाचे दत्ता हे नाव ठेवून भुलाबाईच्या गाण्यांची सांगता झाली असेल. केवळ भुलाबाईच्या गाण्यामध्येच हा बत्ता महत्त्वाची भूमिका बजावतो असे नाही तर आजही मराठी घराघरांमधील स्वयंपाकघरात मोठय़ा ऐटीत हा ‘बत्ता’ विराजमान असतो. पार स्वयंपाकघरापासून ते लोकगीतांपर्यंत स्वैर संचार करणारा हा ‘बत्ता’ शब्द कुठून आला असेल? बत्ता म्हणजे कुटण्याचे अथवा खलण्याचे असे एक दगडी, लोखंडी साधन. या शब्दाच्या मूळ उत्पत्तीबद्दल दोन मते आहेत. मराठी शब्दकोश नोंदीनुसार एक मत असे आहे की बत्ता हा मूळ प्राकृतमधून आलेला शब्द आहे. तर दुसरे मत असे आहे की बत्ता हा शब्द मूळ फारसीतून आला आहे. कारण फारसीमध्येही हाच अर्थ आहे. याला दस्ता असेही म्हणतात.
बडदास्त
‘लग्नात वरपक्षाकडील पाहुण्यांची काय बडदास्त ठेवली होती!’ लग्न समारंभात हमखास ऐकू येणारे हे वाक्य. बडदास्त म्हणजे पाहुणचार, उत्तम आदरातिथ्य हा अर्थ सर्वश्रुतच आहे. पण बडदास्त हा शब्द मूळ फारसी ‘बर्दास्त/ बर्दाश्त्’मधून तयार झाला आहे. पण बर्दाश्त म्हटले की कुणालाही हाच प्रश्न पडेल की हा शब्द तर सहन करणे यासाठी वापरतात मग बडदास्तशी काय संबंध? हिंदीत ‘कितना बर्दाश्त किया मैंने आजतक’ असे वाक्य नेहमीचेच आहे. पण फारसीमध्ये बर्दास्तचे अर्थ मेहमानी म्हणजेच पाहुणचार, व्यवस्था, शुश्रूषा करणे, सहन करणे इतके आहेत. ऐतिहासिक लेखसंग्रहात ‘तूर्त जखमांची वगैरे बर्दास्त होत आहे’ असा उल्लेख आहे, ज्याचा अर्थ शुश्रूषा करणे या अर्थछटेवर बेतलेला आहे. याच बर्दास्तवरूनच कालांतराने मराठीत त्यामधील ‘र’चा लोप झाला आणि त्याची जागा ‘ड’ ने घेतली आणि ‘बडदास्त’ हे रूप तयार झाले जे आजही वापरात आहे.
amrutaind79@gmail.com
First Published on October 27, 2018 2:47 am
Web Title: article about vocabulary word

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क – पेपर २ अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क – पेपर २

अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण

संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

|| वसुंधरा भोपळे
आज आपण दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क परीक्षेच्या पेपर २साठी काही मुद्दे अभ्यासणार आहोत. विशेषत: परीक्षेला जाता जाता उजळणी कशी करावी तसेच गेल्या वर्षीच्या पेपरमधील प्रश्नांच्या घटकांच्या चच्रेतून यावर्षीचा पेपर सोडविण्यासाठी काही सूत्रांचा परामर्शही घेऊ या.
अभ्यासक्रम व प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण
१. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील –
या घटकांतर्गत गतवर्षी सौर ऊर्जेचे पॅनेल्स बसविलेली पहिली युद्धनौका, पॉलीथिन पिशव्यांवर बंदी घातलेले राज्य, राष्ट्रीय फुटबॉल लीगच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा भारतीय फुटबॉलपटू, भारतीय अंध क्रिकेट संघाने जिंकलेला टी २० वर्ल्ड कप, ग्रॅमी पुरस्कार मिळालेला भारतीय वंशाचा संगीतकार अशा प्रश्नांचा समावेश आहे. त्यामुळे यावर्षी परीक्षेला जाता जाता क्रीडा क्षेत्रातील ठळक चालू घडामोडी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील आयोगाच्या दृष्टीने महत्त्वाच्या चालू घडामोडींवर विशेष लक्ष देणे अपरिहार्य आहे.
२. बुद्धिमापन चाचणी –
उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी या घटकावर प्रश्न विचारले जातात. गतवर्षी अपूर्णाकांचे लहान मोठेपण ओळखणे, कागदाची घडी घालून त्यास विविध आकारात कापल्यानंतर तयार होणारी आकृती, घडय़ाळामधील ठरावीक वेळी दोन काटय़ांच्या मधील कोनाचे माप, नातेसंबंध, वेग-वेळ-अंतर, विसंगत आकृती ओळखणे, वय अशा प्रश्नांचा समावेश आहे. या प्रश्नांमधून विद्यार्थ्यांच्या चौकस बुद्धी आणि बौद्धिक क्षमतेचाही कस पाहिला जातो. या विभागातील प्रश्न सोडविण्यासाठी जास्तीत जास्त सराव आणि उजळणीची गरज असते. एकच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीनी सोडविता येऊ शकत असल्यामुळे या पद्धतींचा विचार करून त्यातील खाचाखोचा लक्षात ठेऊन प्रश्न सोडविण्याचा सराव केल्यास परीक्षेच्या वेळी कमीत कमी वेळात प्रश्न सोडविता येऊ शकतात.
३. भारतीय राज्यघटना –
या विभागात घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे/ठळक वैशिष्टय़े, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे- शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ -अधिकार व कार्य, राज्य विधिमंडळ-विधानसभा, विधान परिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व विधी समित्या या प्रमुख घटकांवर प्रश्न विचारले जातात. गतवर्षी या घटकावर मुख्यमंत्र्यांचे अधिकार, भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टातील तरतुदी, राज्यपालांचे न्यायालयीन अधिकार, भारतीय संसदेचे कायदा करण्याचे अधिकार, महत्त्वाची कलमे आणि त्यांचे विषय, राज्य सूचीमधील विषय या उपघटकांचा समावेश होता.
४.  माहिती अधिकार अधिनियम – २००५ व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ –
या घटकावरील प्रश्न सामान्यत: या अधिनियमातील तरतुदी, विविध घटकांसाठी असणाऱ्या विशेष सवलती, कायद्याची अंमलबजावणी, अंमलबजावणी न झाल्यास होणारी शिक्षा या संदर्भात असतात. गतवर्षी या घटकावर मुख्य आयुक्तांच्या पदच्युतीची पध्दत, अधिनियमांतर्गत स्थापन केलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मुख्यालय अशा विषयांवर प्रश्न विचारले आहेत.
५.  संगणक व माहिती तंत्रज्ञान –
या घटकांतर्गत आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डेटा कम्युनिकेशन, नेटवìकग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नविन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम, जसे मिडीया लॅब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य अशा प्रमुख घटकांवर प्रश्न विचारले जातात. गतवर्षी या घटकावर पॅरलल प्रोसेसिंग व आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ही वैशिष्टय़े असणारी संगणक पिढी, जनसामान्यांना उपयोगी पडणारी पोर्टल्स आणि संगणक संबंधित उपकरणे यावर प्रश्न विचारले गेले होते.
६. मानवी हक्क व जबाबदाऱ्या –
संकल्पना, आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक, त्यासंदर्भातील भारतीय राज्यघटनेतील तरतूद, भारतातील मानवी हक्क व जबाबदार्या यंत्रणेची अंमलबजावणी व संरक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहण्याच्या समस्या, गरीबी, निरक्षरता, बेकारी सामाजिक सांस्कृतिक-धार्मिक प्रथा यासारख्या अडचणी, (हिंसाचार, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, संरक्षित गुन्हेगारी इत्यादी.) लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा व एकतेचा आदर करण्यासंबंधी प्रशिक्षणाची गरज व महत्त्व, नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५, मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण नियम २००५, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम १९८९, हुंडाबंदी अधिनियम १९६१, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान.  या घटकावर कायदा, कायद्यातील व्याख्या, व्याखेत समाविष्ट शब्दांचे निश्चित अर्थ, कायद्याचे उल्लंघन होण्याचे प्रकार आणि त्यासाठी शिक्षेची तरतूद, नागरिकांचे अधिकार व जबाबदाऱ्या; त्यांची उदाहरणे, भारतीय राज्यघटनेतील कलमे व त्यांचे विषय, कायद्यास मान्यता मिळालेल्या तारखा, कायद्याची अंमलबजावणी, विविध मानवी हक्क आणि त्यांच्या केलेल्या व्याख्या यांचा समावेश होतो.
७. The Bombay Prohibition Act, 1949, The Maharashtra Excise Manual, Volume-I,  The  Maharashtra Excise Manual,  Volume-III,  The  Prohibition and  Excise  Manual,  Volume-II –
गतवर्षी या घटकावर उत्पादन शुल्क नियमावलीनुसार पी.एल.एल.चे पूर्ण रूप, ताडी वर्ष, सौम्य मद्यसेवनाचे वय, अशा संबंधित उपघटकांवर प्रश्न विचारले गेले आहेत.
परीक्षेला जाता जाता शांत चित्ताने या घटकांची उजळणी केल्यास आणि अभ्यासक्रमातील घटकांचा समावेश असणाऱ्या या वर्षांतील इतर प्रश्नपत्रिकांचा आढावा घेऊन त्याप्रमाणे उजळणी केल्यास नक्कीच उपयोग होऊ शकेल.
First Published on October 26, 2018 1:46 am
Web Title: secondary supervisor state excise paper 2

करिअर मंत्र माझा मुलगा दहावीला आहे. इंग्रजी माध्यमात तो शिकत आहे.

करिअर मंत्र

माझा मुलगा दहावीला आहे.  इंग्रजी माध्यमात तो शिकत आहे.

|| डॉ. श्रीराम गीत
माझा मुलगा दहावीला आहे.  इंग्रजी माध्यमात तो शिकत आहे. अकरावीला कोणती शाखा घ्यावी, ते त्याचे ठरत नाही. त्याला सायन्सची आवड नाही. त्याला चित्रकला व पखवाजवादन जास्त आवडते. त्या दृष्टीने कोणती शाखा घ्यावी? अजून काय पर्याय आहेत?   – सीताराम
कोणतीही शाखा घेऊन बारावीमध्ये किमान साठ टक्के मिळवावेत. त्यानंतर चित्रकलेद्वारे फाइन, कमर्शिअल आर्ट, डिझाइन, ग्राफिक्स, इंटिरिअर किंवा अ‍ॅनिमेशन अशा क्षेत्रांत प्रवेश परीक्षा देऊनच प्रवेश मिळेल. पखवाजवादन छंद म्हणून जरूर जोपासावे. त्यामध्ये करिअर करताना मात्र विचारपूर्वकच निर्णय घ्यावा, कारण साधना बरीच आहे आणि यशाचा मार्ग खडतर आहे. त्यातून स्वतंत्र प्रगती करणारेही विरळाच दिसतात.
  • मी यंदा बारावीची परीक्षा दिली आहे. मला ऑटोमोबाइल क्षेत्रात करिअर करायचे आहे. काय करावे लागेल? – अंबु घांगले
आपण बारावी कोणत्या शाखेतून केली आहे, त्याचा उल्लेख नाही. शिवाय आपल्या गुणांचाही उल्लेख नाही. सीईटी दिली आहे का? त्याचाही तपशील नाही. त्यामुळे डिप्लोमा इन ऑटोमोबाइल इंजिनीअरिंगसाठी प्रवेश घ्यावा एवढेच मोघम लिहीत आहे. यासाठी अर्थातच आधी ते क्षेत्र का आवडते यावर एक पानभर निबंध लिहिण्याचा प्रयत्न तर करून पाहा ना? आवड आणि आकर्षण यात खूपच फरक असतो.
  • मी कायद्याचा अभ्यास करतो आहे. सध्या दुसऱ्या वर्षांला आहे. माझे वय २७ आहे. मी कधीपासून वकिलांकडे उमेदवारी करू शकतो? पदवीनंतर काय काय करू शकतो? कोणत्या संधी आहेत? – महेश देशमुख व नय्यूम पठाण
महेश आणि नय्यूम दोघांचे प्रश्न साधारण सारखे असल्याने एकत्र उत्तर देत आहे. जे वकील तुम्हाला मदतनीस म्हणून ये म्हणतील त्यांच्याकडे अगदी उद्यापासून सुरुवात करायला हरकत नाही. पदवीनंतरच्या संधी काम शिकताना कळत जातील. लॉचा उपयोग किमान पंधरा-वीस क्षेत्रांत काम करण्यासाठी होतो.
First Published on October 26, 2018 1:46 am
Web Title: loksatta career mantra 23

यूपीएससीची तयारी : आंतरराष्ट्रीय संघटना आंतरराष्ट्रीय संघटना या घटकाची तयारी संबंधित माहिती संघटनांच्या संकेतस्थळावर मिळते.

यूपीएससीची तयारी : आंतरराष्ट्रीय संघटना

आंतरराष्ट्रीय संघटना या घटकाची तयारी संबंधित माहिती संघटनांच्या संकेतस्थळावर मिळते.

आजच्या लेखामध्ये सामान्य अध्ययन पेपर-२ मधील आंतरराष्ट्रीय संघटना या अभ्यास घटकाविषयी चर्चा करूयात. आंतरराष्ट्रीय संघटना कुणाला म्हणायचे? त्यांचे स्वरूप, उद्दिष्टे याविषयी जाणून घेऊ. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले हितसंबंध व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटनेच्या रूपामध्ये राष्ट्रे संघटित होत असतात.
आंतरराष्ट्रीय संघटना राष्ट्रांमधील सामाजिक, आर्थिक, राजकीय व सुरक्षाविषयक सहकार्य सुलभ करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतात. युद्धे किंवा संघर्षांचे प्रसंग टाळून जागतिक शांतता व सुव्यवस्था राखण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरील बहुतांश संघटना १९व्या शतकामध्ये उदयास आल्या व २०व्या शतकामध्ये त्यांचा विकास झाला. २१व्या शतकाच्या प्रारंभी राष्ट्र, राज्ये व अशासकीय घटकांबरोबरच आंतरराष्ट्रीय संघटना आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा अत्यावश्यक भाग बनल्या.
सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटनांमध्ये खासगी व सार्वजनिक, वैश्विक व प्रादेशिक, बहुउद्देशीय व विशेषीकृत अशा सविस्तर संरचना दिसून येतात. सामान्य अध्ययन पेपर २ साठी संयुक्त राष्ट्रसंघ व त्याच्याशी संबंधित इतर संस्था यामध्ये युनिसेफ, युनेस्को, यूएनईपी, जागतिक आरोग्य संघटना या व या प्रकारची इतर अभिकरणे, जागतिक व्यापार संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक, आसियान, युरोपीयन संघ, ओईसीडी, ओपेक, अरब लीग, इ. संघटनांचे अध्ययन महत्त्वपूर्ण ठरते. उपरोक्त संघटना अभ्यासताना त्यांची संरचना अधिदेश (mandate) या बाबी लक्षात घेणे महत्त्वपूर्ण ठरेल. या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये समकालीन मुद्दय़ांच्या पाश्र्वभूमीवर प्रश्न विचारण्यात येतात.
‘ट्रेड वॉर’च्या पाश्र्वभूमीवर जागतिक व्यापार संघटनेला टिकून राहावे लागेल. विशेषत: भारताचे हितसंबंध लक्षात घेऊन सुधारणांकरिता कोणकोणती प्रमुख क्षेत्रे आहेत.
सदर प्रश्न सध्या जागतिक व्यापार संघटनेच्या व्यासपीठावर अनेक देशांमध्ये सुरू असणाऱ्या व्यापार युद्धाच्या पाश्र्वभूमीवर अभ्यासता येईल. या प्रश्नावरून आंतरराष्ट्रीय संघटना या घटकाचा अभ्यास समकालीन घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर करावा लागतो ही बाब स्पष्ट होते.
* २०१७
संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेची प्रमुख कार्ये कोणती? या परिषदेशी संबंधित विविध प्रकार्यात्मक आयोग स्पष्ट करा.
* २०१६
‘जागतिकीकरणाच्या युगात जागतिक व्यापार संघटनेची लक्ष्य व उद्दिष्टे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे व्यवस्थापन व प्रोत्साहन देणे ही आहेत. परंतु, प्रगत व प्रगतशील देशांमधील विवादांमुळे दोहा परिषदेचा अस्त झाल्याचे दिसते. भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये चर्चा करा.
युनेस्कोच्या मॅकब्राइड आयोगाची उद्दिष्टे काय आहेत? यावर भारताची भूमिका काय आहे?
* २०१४
WTO  ही महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय संघटना आहे. जिथे घेतलेल्या निर्णयाचा सदस्य देशांवर दूरगामी परिणाम होतो.  WTO चा अधिदेश (mandate) काय आहे व  WTO चे निर्णय बंधनकारक असतात का? अलीकडच्या अन्नसुरक्षेवरील चच्रेच्या फेरीमध्ये भारताने घेतलेल्या भूमिकेचे टीकात्मक विश्लेषण करा. या प्रश्नामध्ये  WTO शी संबंधित पारंपरिक घटकांबरोबरच समकालीन घडामोडीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.
* २०१३
‘जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी एकत्रितपणे ब्रेटनवुड्स संस्था म्हणून ओळखल्या जातात; जे जागतिक, आर्थिक व वित्तीय सुव्यवस्थेच्या संरचनेला साहाय्यभूत ठरणारे दोन आंतरसरकारी स्तंभ आहेत. वरकरणी जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कित्येक समान वैशिष्टय़े दर्शवतात. तरीही त्यांची भूमिका व अधिदेश (Mandate) स्पष्टपणे वेगळे आहेत, विशद करा.
या प्रश्नामध्ये या दोन संघटनांची संरचना, ते पार पडत असलेली भूमिका कशा प्रकारे वेगळी आहे, असे विचारण्यात आले. या दोन संघटनांची काही वैशिष्टय़े समान असली तरी त्यांची रचना भिन्न आहे. कटा ही एकल संस्था असून विश्व बँक ही काही संस्था व अभिकरणांची मिळून बनली आहे. हे मुद्दे उत्तरामध्ये नमूद करावे लागतील. आंतरराष्ट्रीय संघटना या घटकाची तयारी संबंधित माहिती संघटनांच्या संकेतस्थळावर मिळते. त्याचबरोबर वृत्तपत्रांचे नियमित वाचन या घटकाशी संबंधित घटनांचे आकलन करून घेण्यास उपयुक्त ठरते.
First Published on October 25, 2018 12:53 am
Web Title: upsc exam guidance upsc ias preparation tips self preparation for upsc exam

संशोधन संस्थायण : आरोग्य संशोधनासाठी मुक्तद्वार संशोधन गट म्हणून कार्यरत असलेल्या या संस्थांना सीएसआयआर रिसर्च युनिट म्हणून संबोधले जाते.

संशोधन संस्थायण : आरोग्य संशोधनासाठी मुक्तद्वार

संशोधन गट म्हणून कार्यरत असलेल्या या संस्थांना सीएसआयआर रिसर्च युनिट म्हणून संबोधले जाते.


ओपन सोर्स ड्रग डिस्कव्हरी इनिशिएटिव्ह, नवी दिल्ली
प्रथमेश आडविलकर itsprathamesh@gmail.com
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) देशभरात ठिकठिकाणी अनेक संशोधन संस्था आहेत. सीएसआयआरच्या या संस्थांबरोबरच सीएसआयआरचे काही स्वतंत्र संशोधन गटदेखील आहेत. संशोधन गट म्हणून कार्यरत असलेल्या या संस्थांना सीएसआयआर रिसर्च युनिट म्हणून संबोधले जाते. देशात विविध ठिकाणी हे संशोधन गट आहेत. त्यांपैकी एक महत्त्वाचा संशोधन गट म्हणजे ओपन सोर्स ड्रग डिस्कव्हरी इनिशिएटिव्ह. नवी दिल्लीमध्ये हा गट स्वतंत्रपणे संशोधन करीत आहे.
 संस्थेविषयी
ओपन सोर्स ड्रग डिस्कव्हरी इनिशिएटिव्ह (ओएसडीडी) हा सीएसआयआरच्या आधिपत्याखालील आरोग्य सेवांसंबंधी संशोधन करणारा देशातील एक महत्त्वाचा आणि प्रमुख संशोधन गट आहे. ही संस्था सीएसआयआरच्या अकराव्या पंचवार्षिक योजनेचा प्रकल्प म्हणून प्रा. डॉ. समीर ब्रह्मचारी यांच्या कल्पनेतून आकाराला आली. डॉ. ब्रह्मचारी म्हणजे तत्कालीन इन्स्टिटय़ूट ऑफ जिनॉमिक्स अ‍ॅण्ड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (आयजीआयबी) संस्थेचे संस्थापक संचालक आणि नंतर सीएसआयआरचे महासंचालक म्हणून नियुक्ती झालेले ज्येष्ठ संशोधक. भारत सरकारने सुमारे बारा दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मंजूर करून संस्थेच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला. अविकसित आणि विकसनशील देशांना ओएसडीडी या एका सामायिक व्यासपीठाद्वारे जागतिक मंच उपलब्ध करून देऊन स्वस्त आरोग्य पुरवणे या हेतूने संस्थेची स्थापना झालेली आहे. संस्थेने आरोग्य सेवांसंबंधित आवश्यक क्षेत्रातील सर्वोत्तम मनुष्यबळ एकत्रित करून समोर असलेल्या जटिल समस्यांचे निराकरण करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोनातून आपले संशोधन कार्य चालू ठेवलेले आहे. या समस्यांमध्ये मग टय़ूबरक्युलोसिस, मलेरिया, लीशमॅनियास इत्यादींसारख्या दुर्लक्षित उष्णकटिबंधीय आजारांवर उपचार यांसारख्या नानाविध गोष्टींचा समावेश आहे. जगभरातल्या जवळपास १३० देशांमधील संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी, तंत्रज्ञ व उद्योजक यांसारखे साडेसात हजारपेक्षा अधिक मनुष्यबळ संस्थेच्या संशोधन कार्यक्रमाशी संलग्न आहे. या संशोधन प्रकल्पाचे ब्रीदवाक्य ‘सर्वासाठी परवडणारी आरोग्य सेवा’ असे आहे. संस्था ओपन सोर्स म्हणजेच मुक्त स्रोत आणि सहकार्यातून संशोधन या संकल्पनेवर चालते. संस्थेने नावीन्याला उत्तेजन देत संशोधक समुदायाद्वारे तयार केलेली सर्व माहिती (डेटा) आणि स्रोत खुलेपणाने र८२ु१ॠ 2.0 या नावाच्या वेब पोर्टलद्वारे उपलब्ध करून दिलेले आहेत.
संशोधनातील योगदान –
ओएसडीडी ही सोर्स ड्रग डिस्कव्हरी म्हणजेच पूर्णपणे नवीन औषधांचे संशोधन करणारी संस्था आहे. या संशोधनाबरोबरच संस्थेने आंतरविद्याशाखीय संशोधनाला (Interdisciplinary research) प्राधान्य देत इतर शाखांमधील मूलभूत संशोधनाशी योग्य समन्वय साधलेला आहे. त्यामुळेच ओएसडीडीने आपल्या संशोधनाच्या माध्यमातून अनेक उत्पादने आणि प्रक्रिया (प्रोडक्ट्स अ‍ॅण्ड प्रोसेसेस) विकसित केलेल्या आहेत. त्यापैकी अनेक औषधी उत्पादनांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवले गेले आहे. संस्थेने अनेक पेटंट्स दाखल केले आहेत. ओएसडीडीच्या माध्यमातून सध्या सुमारे ११० संशोधन प्रकल्प राबवले जात आहेत. विविध विभागांतील शास्त्रज्ञांच्या सहकार्याने एम.टय़ूबरक्युलोसिससाठी साठपेक्षा जास्त संभाव्य औषधे शोधलेली आहेत. ओएसडीडीने आपला प्रथम आंतरराष्ट्रीय शोधनिबंध २००९ साली प्रकाशित केला होता. हा शोधनिबंध इंटिग्रेटिव्ह जिनॉमिक्स ऑफ एम.टय़ूबरक्युलोसिस या विषयावर होता. तेव्हापासून ओएसडीडीने याच विषयावर दीर्घ संशोधन करून बारा आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित केलेले आहेत.
ओपन सोर्स मॉडेलचे यश उदाहरणार्थ, माहिती तंत्रज्ञानामधील वेब टेक्नॉलॉजी, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम आणि बायोटेक्नॉलॉजीमधील ह्युमन जीनोम सिक्वेन्सिंग इत्यादी गोष्टी या आरोग्य सेवेमध्ये ओपन सोर्स मॉडेलसारखे एखादे मॉडेल सुरू करणे अत्यावश्यक आहे याची साक्ष देते. ओएसडीडीने आपले संशोधन सध्या टीबी आणि मलेरियासाठी नव्या औषधांच्या शोधावर केंद्रित केले आहे. ओएसडीडी वैज्ञानिकांना उपलब्ध असलेली जैविक, आनुवांशिक आणि रासायनिक माहिती एकत्रित करून संस्थेतील वैज्ञानिक, डॉक्टर, टेक्नोक्रॅट्स, विद्यार्थी आणि विविध तांत्रिक कर्मचारी यांच्या सांघिक सहकार्याने नव्या औषधाचा शोध लावला जातो.
 विद्यार्थ्यांसाठी संधी
सीएसआयआरच्या तत्त्वप्रणालीनुसार ओएसडीडी व संलग्न विविध विद्यापीठे व संशोधन संस्थांच्या साहाय्याने Academy of Scientific & Innovative Research (AcSIR) च्या अंतर्गत पदव्युत्तर, पीएचडी व पोस्ट डॉक्टरल संशोधन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पूर्ण करता येतात. संस्था सध्या ओएसडीडी केमिस्ट्री आऊटरीच प्रोग्राम (ओएसडीडीकेम) नावाचा एक अभ्यासक्रम रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी चालवते आहे. या अभ्यासक्रम प्रणालीअंतर्गत विद्यार्थ्यांना सिंथेटिक केमिस्ट्रीमध्ये संशोधन प्रशिक्षण दिले जाते. तसेच देशातील अनेक विद्यापीठे, शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालयांमधील संश्लेषित संयुगे ओएसडीडीकडे डेटाबेसला पाठविली जातात. दरवर्षी गुणवत्ता मिळवलेले अनेक जेआरएफ वा एसआरएफ विद्यार्थी ओएसडीडीमध्ये पीएचडीचे संशोधन करण्यासाठी प्रवेश घेतात.
 संपर्क 
ओपन सोर्स ड्रग डिस्कव्हरी इनिशिएटिव्ह,
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर),
अनुसंधान भवन, २ रफी मार्ग,
नवी दिल्ली – ११०००१.
ई-मेल –  info@osdd.net
दूरध्वनी – +९१-३४३-२५४६४०१.
संकेतस्थळ – http://www.osdd.net/
First Published on October 25, 2018 12:48 am
Web Title: open source drug discovery initiative reviews

एमपीएससी मंत्र : चालू घडामोडी : प्रश्नांचे विश्लेषण गट क मुख्य परीक्षा तिन्ही पदे गट कमध्ये समाविष्ट असली तरी त्यांच्या वेतनश्रेणी, जबाबदाऱ्या व कर्तव्ये वेगळ्या स्वरूपाची आहेत.

एमपीएससी मंत्र : चालू घडामोडी : प्रश्नांचे विश्लेषण गट क मुख्य परीक्षा

तिन्ही पदे गट कमध्ये समाविष्ट असली तरी त्यांच्या वेतनश्रेणी, जबाबदाऱ्या व कर्तव्ये वेगळ्या स्वरूपाची आहेत.

रोहिणी शहा
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कर सहायक आणि लिपिक टंकलेखक या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांमधील चालू घडामोडी हा महत्त्वाचा घटक आहे. तिन्ही पदे गट कमध्ये समाविष्ट असली तरी त्यांच्या वेतनश्रेणी, जबाबदाऱ्या व कर्तव्ये वेगळ्या स्वरूपाची आहेत. त्यामुळे मुख्य परीक्षेतील एक पेपर हा पदनिहाय वेगळ्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. या पेपरमधील चालू घडामोडींवरील प्रश्नांची व्याप्तीही वेगळी असणार आहे. म्हणजे लिपिक टंकलेखक पदासाठी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरच्या तर इतर दोन पदांसाठी राष्ट्रीय व जागतिक स्तरावरच्या घडामोडी अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. या पदांच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून प्रश्न पद्धती व काठीण्य पातळी यांची ओळख होऊ शकते.
त्या दृष्टीने या पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षांमधील चालू घडामोडींवरील प्रश्नांचे विश्लेषण आणि त्याबाबत चर्चा या लेखामध्ये करण्यात येत आहे.
* प्रश्न – राष्ट्रीय फुटबॉल लीग व आय लीगच्या इतिहासात नुकतेच सर्वाधिक गोल करणाऱ्या भारतीय फुटबॉलपटूचे नाव..
१) सुनील छेत्री   २) सुब्रता पाल
३) गुरप्रीत सिंह संधु     ४) संदेश झिगान
*  प्रश्न – खोया पाया वेब पोर्टलच्या बाबतीत पुढीलपकी कोणती विधाने योग्य आहेत?
अ. हे संकेतस्थळ नागरिकांसाठी विकसित करण्यात आले असून याद्वारे हरवलेल्या आणि सापडलेल्या मुलांच्या माहितीची देवाण-घेवाण करण्यात येते.
ब. या संकेतस्थळाचे एक अप्रत्यक्ष उद्दिष्ट म्हणजे मानवी व्यापार / वाहतूक नियंत्रित करणे होय.
क. हे संकेतस्थळ गृहमंत्रालयाकडून विकसित करण्यात आले आहे.
पर्यायी उत्तरे
१) फक्त अ आणि ब    २) फक्त ब आणि क
३) फक्त अ     ४) वरील सर्व
*  प्रश्न – पुढीलपकी कोणते विधान सत्य आहे?
अ. गगनयान हा भारताचा पहिला मानव अंतराळ मोहिमेचा प्रकल्प आहे.
ब. याद्वारे तीन अंतराळ यात्रींना अवकाशात महिनाभरासाठी पाठविण्यात येईल आणि त्यांचे प्रशिक्षण भारत तसेच परदेशात होईल.
क. सध्या ( सप्टें. २०१८) इसरोचे प्रमुख के. सिवन आहेत.
ड. इसरोने डॉ. व्ही. ललितांबिका यांच्याकडे अंतरीक्षाच्या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविली आहे.
पर्यायी उत्तरे
१) अ, ब, क आणि ड
२) फक्त अ, ब आणि क
३) फक्त अ, क आणि ड
४) फक्त अ आणि क
*   प्रश्न – नव्या शैक्षणिक धोरणाबाबत कोणत्या समितीने नुकताच आपला अहवाल केंद्र शासनास सादर केला आहे?
१) टी. एस. आर. सुब्रमण्यम समिती
२) अशोक दलवाई समिती
३) जे. एस. राजपूत समिती
४) सुधीर मंकड समिती
*  प्रश्न – सन २०१७ च्या ब्रिक्स शिखर परिषदेची संकल्पना ———- ही आहे.
१) शांतता आणि सुसंवाद               २) दहशतवादाविरुद्ध लढा
३) उज्ज्वल भविष्यासाठी बळकट भागीदारी         ४) शाश्वत विकास

*  प्रश्न – नोमॉडीक एलिफंट हे भारत आणि —– मधील संयुक्त वार्षकि लष्करी अभ्यासाचे नाव आहे.
१) म्यानमार    २) थायलंड
३) मंगोलिया    ४) श्रीलंका
*  प्रश्न – शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे लेखक —– आहेत.
१) नरेंद्र दाभोळकर      २) एन. एम. कलबुर्गी
३) गोविंद पानसरे       ४) गौरी लंकेश
*  प्रश्न – नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी बालकांची विक्री व लंगिक शोषण याविरुद्ध लढा देण्यासाठी कोणता उपक्रम हाती घेतला?
१) बेटी बचाव – बेटी पढाओ
२) सुरक्षित माता – सुरक्षित बालक
३) सुरक्षित बचपन – सुरक्षित भारत
४) सक्षम भारत – सुरक्षित बालक
वरील प्रातिनिधिक प्रश्नांच्या आधारे पुढील महत्त्वाचे व मूलभूत मुद्दे लक्षात येतात. यांच्या आधारे तयारीस एक दिशा मिळू शकते.
2    लिपिक टंकलेखक पदासाठीच्या पेपरमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही घडामोडींवरही प्रश्न विचारण्यात आले आहेत. मात्र त्यांना महाराष्ट्राचा संदर्भ आहे यामुळे जागतिक स्तरावरील घडामोडींकडे लक्ष असणे याही पेपरसाठी आवश्यक आहे.
2    त्या त्या पदासाठी विहित केलेल्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने चालू घडामोडींवरील प्रश्नांचाही समावेश करण्यात आला आहे. उदाहरणार्थ संगणक व माहिती तंत्रज्ञान या घटकातील चालू घडामोडी.
2    साधारणपणे परीक्षा कालावधीपूर्वीच्या आठ ते दीड महिना अशा कालावधीतील घडामोडींवर आधारित प्रश्न विचारण्यात आलेले आहेत.
2    चालू घडामोडींचा भाग असणाऱ्या बहुतांश मुद्दय़ांवर प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यामुळे शस्त्रात्रांची नावे लक्षात न राहणे किंवा पुस्तके व लेखकांच्या जोडय़ा लक्षात ठेवण्याचा कंटाळा येणे यामुळे हातातले एक-दोन गुण गमावले जाऊ शकतात. त्यामुळे शक्यतो सर्व मुद्दय़ांचा आढावा घेऊन तो लक्षात ठेवण्याचा प्रयत्न आवश्यक आहे.
2    व्यक्तिविशेष, शासकीय योजना यांबाबत नेमकेपणाने व शक्यतो बहुविधानी प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यामुळे चच्रेतील व्यक्ती, निधन, नेमणुका, आपापल्या क्षेत्रात वैशिष्टय़पूर्ण कामगिरी करणाऱ्या व्यक्ती यांच्याबाबत त्यांचे कार्य, संस्था, पुरस्कार, पुस्तके, प्रसिद्ध विधाने यांची जास्तीत जास्त माहिती करून घेणे आवश्यक आहे. तर योजनांच्या मूळ दस्तावेजाचे (शासन निर्णय किंवा राजपत्रातील सूचना) वाचन आणि तरतुदी समजून घेणे आवश्यक आहे.
2    इतर मुद्दय़ांचा टेबल स्वरूपात अभ्यास नोटस काढून शक्य आहे. त्यामुळे वृत्तपत्र वाचन हे केवळ विरंगुळ्यासाठी नाही तर नोट्स काढण्याइतकेच गांभीर्याने करणे आवश्यक आहे.
First Published on October 24, 2018 3:21 am
Web Title: article about current events analysis of questions
0
Reactions

‘प्रयोग’ शाळा : वाचा आणिक लिहा, शिका! अनिता जावळे गेली १५ र्वष जि.प.शाळेमध्ये काम करतात. मार्च २००२पासून शिक्षणसेवक म्हणून त्यांनी कामाची सुरुवात केली.

‘प्रयोग’ शाळा : वाचा आणिक लिहा, शिका!

अनिता जावळे गेली १५ र्वष जि.प.शाळेमध्ये काम करतात. मार्च २००२पासून शिक्षणसेवक म्हणून त्यांनी कामाची सुरुवात केली.


स्वाती केतकर- पंडित
विद्यार्थ्यांना भाषेचे शिक्षण द्यायचे म्हणजे केवळ धडे शिकवायचे नि कविता पाठ करून घ्यायच्या नव्हेत तर तसे काही त्यांनी लिहावे, बोलावे यासाठी त्यांना उद्युक्त करायचे. हे तत्त्व अनिता जावळे या प्रयोगशील शिक्षिकेने चांगलेच मनावर घेतले आहे. म्हणूनच त्यांच्या वर्गातले विद्यार्थी केवळ भाषा शिकत नाहीत तर लेखनातून तिचा देखणा आविष्कारही घडवतात.
अनिता जावळे गेली १५ र्वष जि.प.शाळेमध्ये काम करतात. मार्च २००२पासून शिक्षणसेवक म्हणून त्यांनी कामाची सुरुवात केली. अनिताची पहिली शाळा होती, लातूर तालुक्यातील वाडी वाघुली या गावची. ही शाळा चांगली होती, पण खासगी वाहनाशिवाय वाहतुकीची काहीही व्यवस्था नव्हती. म्हणून अनेक स्त्री कर्मचारी ही शाळा नाकारत. अनिताने मात्र हिमतीने ते आव्हान स्वीकारले आणि सात पुरुष सहकाऱ्यांसोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून उत्तम काम करून दाखवले. पालकांशी, विद्यार्थ्यांशी यशस्वी संवाद साधला. त्याचेच फळ म्हणून आज त्या धनगर वस्तीतल्या अनेक मुली दहावीपर्यंत पोहोचल्या. ज्या पूर्वी पाचवी-सहावीतच शाळा सोडत.
या शाळेनंतर अनिताची बदली झाली ती लातूर तालुक्यातीलच साखरा शाळेत. त्यानंतर पदवीधर शिक्षक म्हणून त्यांना माटेफळ या शाळेमध्ये बढतीवरील बदली देण्यात आली. अनिता सांगतात, ‘इथे आल्यावर रडूच कोसळले. कारण इथे सगळ्याच गोष्टींची कमी होती. असे वाटले, काय म्हणून ही शाळा घेतली! पाचवीच्या वर्गात नऊ मुलं होती पण उपस्थित केवळ दोन-तीनच. हेच बाकीच्या वर्गाचे.’’मग सगळ्यात आधी विद्यार्थी शाळेत यावेत म्हणून अनिताने प्रयत्न सुरू केले. निरनिराळ्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना शाळेकडे वळवले. सुरुवातीला तर दररोज, दर आठवडय़ाला नवे उपक्रम घेतले. मग विद्यार्थ्यांच्या पालकांशी ओळख होण्यासाठी पाककृतीच्या स्पर्धा घेतल्या, गृहभेटी आखल्या. त्यांनी घेतलेला ‘मन की बात’ हा उपक्रम मोठा मजेदार आणि तितकाच महत्त्वाचाही होती. या ‘मन की बात’मध्ये विद्यार्थ्यांनी आजवर कुण्णालाच न सांगितलेल्या गोष्टी सांगायच्या होत्या. मुलेही हुशार त्यांनी आधी बाईंनाच आपल्या ‘मन की बात’ करायला लावली. अनितानेही आपल्या लहानपणातल्या काही खोडय़ा सांगितल्या, ज्या त्यांनी आईलाही कळू दिल्या नव्हत्या. मग हळूहळू मुले बोलती होऊ लागली. अभिषेकने सांगितले, की त्याने त्याच्या वडिलांच्या खिशातून गुपचूप १०० रुपये घेतले होते. खरे तर ही चोरीच होती. पण त्याला तितके कळत नव्हते. परंतु कधी ना कधी वडील आपल्याला त्याबद्दल विचारणार म्हणून घाबरून तो वडिलांशी फारसा बोलायचाच बंद झाला होता. अनिताने त्याला नीट समजावलं आणि ही गोष्ट वडिलांना स्वत: सांगायला लावली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या बाबांनी ते नीट ऐकून घेतले आणि अभिषेकच्या प्रामाणिकपणाबद्दल त्याला बक्षीसही दिले. वडिलांबद्दलची अनाठायी भीती या घटनेने कुठच्या कुठे पळून गेली. शाळेतल्या एका उपक्रमाने घरातला बाप-लेकाचा संवाद वाढला होता.
इमरान नावाचा एक मुलगा दोन र्वष फक्त शाळेच्या आवाराजवळ यायचा पण कधीही वर्गात येत नसे. बोलावलं तर पळून जाई. घरचेही त्याच्यासमोर थकले होते. त्यांना तर त्याने धमकीच दिली होती, ‘साळंत पाटवलं तर फाशीच लाऊन घ्येतो.’ असा हा इमरान. अनिताने ठरवले, याला शाळेत आणायचेच. त्याची आई अंगणवाडीत येत असे. तिथे त्यालाही घेऊन यायला सांगितले. इमरान अंगणवाडीत आल्यावर अनिताने त्याच्याशी काहीही न बोलता आपला मोबाइल त्याला दाखवला. त्यावरची गाणी, कविता, चित्र दाखवल्या. शाळा म्हणजे केवळ कठोर अभ्यासच नव्हे तर अशीही गंमत असते, हे इमरानला हळूहळू पटू लागले. त्या मोबाइलच्या माध्यमातून अनिताने त्याच्या मनातली शाळेची भीती घालवली आणि इमरान शाळेत रुळला. पहिल्यांदा केवळ अनिताच्या वर्गात बसण्याचा हट्ट धरणारा इमरान हळूहळू शाळेमध्ये रमला. विद्यार्थ्यांची होणारी प्रगती पाहून पालकांनाही शाळेबद्दल आस्था वाटू लागली आणि वर्गखोल्याही व्यवस्थित नसणाऱ्या शाळेच्या इमारतीची डागडुजी झाली. मैदानाच्या बाजूला खड्डे खणून झाडे लावली. लोकसहभागातून शाळा डिजिटलही करण्यात आली. त्याचबरोबर माटेफळ शाळेमध्ये अनिताने विद्यार्थ्यांसाठी भाषादालनह्ण हा महत्त्वाचा उपक्रम घेतला. भाषा शिक्षणात अनुभव आणि अभिव्यक्ती या दोन्हीला फार महत्त्व असते. मुलांची अभिव्यक्ती सुधारावी, या प्रेरणेने अनिताने हा उपक्रम घेतला. भाषादालनामध्ये भाषा विषयावर अनेक प्रकारचे साहित्य आहे, पुस्तके आहेत, अक्षरांचे खेळ आहेत. विद्यार्थी भाषेचा तास असताना या दालनात येतात आणि शिकतात. मनसोक्त पुस्तकं वाचतात. यातूनच अनिताने विद्यार्थ्यांना लिहायला शिकवले. आपल्याला आलेला अनुभव लिहून काढणे, या एका साध्याशा स्वाध्यायातून विद्यार्थ्यांची लेखन मुशाफिरी सुरू झाली. अनेक विद्यार्थ्यांनी सुंदर कथा लिहिल्या. त्याची पुस्तकंही प्रकाशित झाली. ती पाहिल्यावर आपल्याच मुलांनी हे लिहिले आहे, यावर पालकांचा विश्वास बसेना, इतक्या सुंदर कथा होत्या त्या! शिवाय महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांनी कुणाचीच कॉपी केली नव्हती.
यानंतर त्यांची बदली झाली, जि.प. शाळा बोरगाव काळेमध्ये. या शाळेमध्येसुद्धा अनिताने विद्यार्थ्यांसाठी अनेक सुंदर उपक्रम राबवले. इथेही भाषादालनाचा उपक्रम आहेच. परंतु महत्त्वाचे म्हणजे या भाषादालनामध्ये विद्यार्थ्यांनी स्वत: रंगवलेली चित्रे आहेत. शाळेतल्या इतर भिंतींवरही विद्यार्थ्यांनी चित्रं काढलेली आहेत. परंतु या चित्रांमध्ये विद्यार्थ्यांसाठी अनिताने एक अट घातली होती ती म्हणजे प्रत्येक चित्राची काही तरी गोष्ट हवी. त्यामुळेच चित्रातली झाडे बोलतात, ढग हसतात. फुले नाचतात. पाने डोलतात.. आणि शाळेच्या भिंती बोलू लागतात. या सगळ्या अनुभवाचे विद्यार्थ्यांनी सुंदर शब्दचित्रणही केले आहे. या भाषादालनातील उपक्रमाअंतर्गत विद्यार्थी बातम्या लिहितात, लेखकांना भेटतात. वार्ताहरांना भेटतात. त्यांच्याशी गप्पा मारतात. त्यांच्या मुलाखती घेतात. भाषेच्या उपक्रमामध्येच अनिताने इथे भित्तिपत्रक म्हणून उपक्रम घेतला आहे. प्रत्येक महिन्याच्या भित्तिचित्रासाठी त्या एक विषय देतात. त्यावर कथा, कविता, संवाद, बातमी, स्फुट, चारोळी असे काहीही साहित्य विद्यार्थी देऊ शकतात. या उपक्रमालाही जोरदार प्रतिसाद लाभतोय. याचबरोबर स्वयंपाकासारखे काम फक्त बाईचे नाही, हे विद्यार्थ्यांच्या मनात ठसवण्यासाठी अनिता महिन्यातून दोन शनिवारी खाऊचा उपक्रम घेतात. या दिवशी विद्यार्थीच आपला खाऊ तयार करतात. अगदी भाज्या चिरण्यापासून ते तो पदार्थ तयार करून वाढेपर्यंत सगळे मिळून करतात. यासाठी विद्यार्थ्यांचे छोटे गट केलेले असतात. अशा उपक्रमातून स्त्री-पुरुष समानतेचे धडे नकळतच मिळतात.
आपल्या अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या अनिताचे स्वत:चेही उपक्रम सुरूच असतात. माटेफळ शाळेतील अनुभवांच्या आधारे त्यांनी ‘लखलखणारी शाळा’ हे पुस्तक लिहिले. त्याचबरोबर लहान मुलांसाठीची त्यांची आणखीही काही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. सध्या त्यांनी लातूर जिल्ह्य़ातील इतर धडपडय़ा, प्रयोगशील मैत्रिणींना हाताशी घेत, अखिल मराठवाडा बहुजन महिला साहित्य संमेलनाचा मानस केला आहे. सतत काही तरी शिकण्याचे आपले व्रत अनिताने अशा प्रकारे चालूच ठेवले आहे.
swati.pandit@expressindia.com
First Published on October 24, 2018 3:14 am
Web Title: article about experiment school

भारत व जग जागतिक गटांसोबत असणाऱ्या संबंधांविषयी जाणून घेणार आहोत.

भारत व जग

जागतिक गटांसोबत असणाऱ्या संबंधांविषयी जाणून घेणार आहोत.


|| प्रवीण चौगुले
आजच्या लेखामध्ये सामान्य अध्ययन पेपर – २ मध्ये अंतर्भूत भारताचे अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, जपान आदी मध्य आशिया, आग्नेय आशियायी देशांसोबतचे संबंध समजून घेणार आहोत. त्याचप्रमाणे सार्क, इब्सा, ब्रिक्स, आसियान, युरोपियन युनियन इ. प्रादेशिक गट व यूनो, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक व्यापार संघटना या जागतिक गटांसोबत असणाऱ्या संबंधांविषयी जाणून घेणार आहोत.
जगभरातील विविध देश, प्रादेशिक व जागतिक गट यांचे भारतासाठी महत्त्व, भारताच्या स्वातंत्र्यापासून परराष्ट्र धोरणामध्ये त्यांचे स्थान, भारताच्या औद्योगिक संरक्षण आणि विज्ञान क्षेत्रांच्या विकासातील संबंधित देशांचे योगदान, विविध देशांशी भारताने केलेले करार व भूतकाळामध्ये काही देशांबरोबर झालेले संघर्ष व त्याचा परिणाम या भारताचे द्विपक्षीय संबंध उपरोक्त बाबींच्या पाश्र्वभूमीवर अभ्यासणे आवश्यक आहे. यासोबतच हे देश आर्थिक, लष्करी किंवा अणुशक्तीच्या दुपटीने सामथ्र्यशाली असणे, व्यूहात्मकदृष्टय़ा उपयुक्त असणे, व्यापार, परदेशी गुंतवणूक, ऊर्जा सहकार्य, परदेशस्थ भारतीयांची उपस्थिती या बाबीही ध्यानात घेणे श्रेयस्कर ठरते.
२०१३
  • अलीकडे काही वर्षांत भारत व जपान यांच्यातील आर्थिक संबंधांमध्ये वाढ होत आहे. मात्र, अजूनही ते क्षमतेपेक्षा खूप कमी आहेत. या वाढीला अवरुद्ध करणाऱ्या धोरणात्मक मर्यादा स्पष्ट करा.
  • भारत व जगातील महासत्ता यांच्यातील संबंध अभ्यासताना या देशांमधील लोकशाही, विकास, बौद्धिक संपदा अधिकार, व्यापार विवाद, पर्यावरणीय वाटाघाटी, दहशतवाद, व्यापाराचा विकास आदी बाबी ध्यानात घ्याव्या लागतात. प्रस्तुत घटकाची व्याप्ती अधिक आहे. त्याचसोबत या घटकाच्या अध्ययनामध्ये चालू घडामोडींचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
  • याकरिता पंतप्रधानांचे विदेश दौरे, या दौऱ्यांमध्ये झालेले करार, शिखर परिषदा इ. बाबींचा नियमितपणे मागोवा घ्यावा लागेल.
  • भारताच्या अमेरिका, रशिया, आसियान हा प्रादेशिक गट, आफ्रिका, पश्चिम आशिया या प्रदेशांशी असणाऱ्या संबंधांचा थोडक्यात आढावा घेऊ या. भारत व अमेरिकेचे द्विपक्षीय संबंध जागतिक व्यूहात्मक भागीदारीमध्ये विकसित झालेले आहेत. दोन देशांमधील हितसंबंधांमध्ये एककेंद्राभिमुखता वाढत असल्याचे दिसते. अलीकडे ळाअ बौद्धिक संपदा अधिकार, यूएनएफसीसीमध्ये दोन्ही देशांच्या भूमिकांतील अंतर इ. बाबींमध्ये तणाव दिसून आला.
  • भारत व रशिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारी ही परंपरेनेच संरक्षण, नागरी अणुऊर्जा, दहशतवादविरोधी सहकार्य, अंतरिक्ष विज्ञान, राजकारण या बाबींवर आधारित असल्याचे दिसते. भारताचे पश्चिम आशियायी देशांशी असणारे संबंध व्यावहारिक दिसून येतात. या संबंधांचा भारताच्या ऊर्जासुरक्षेशी घनिष्ठ संबंध आहे.
२०१५
  • आफ्रिकेमध्ये भारताच्या वाढत्या रुची (interest) च्या सकारात्मक व नकारात्मक बाजू आहेत. टीकात्मक परीक्षण करा.
  • भारत व आसियान संघटनेदरम्यान दोन वर्षांपासून धोरणात्मक भागीदारी निर्माण झाल्याचे आढळते.
  • भारत-आसियान यांदरम्यानच्या सहकार्यामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो. व्यापार आणि गुंतवणूकविषयक करार, दहशतवादविरोध, सागरी सुरक्षा. भारताने सध्या ‘अ‍ॅक्ट ईस्ट’वर भर दिल्याने आसियान राष्ट्रांच्या नेत्यांनी स्वागत केले.
२०१७
  • भारताच्या ऊर्जा सुरक्षेची समस्या भारताच्या आर्थिक प्रगतीचा महत्त्वपूर्ण भाग आहे. पश्चिम आशियायी देशांशी भारताच्या ऊर्जा धोरण सहकार्याचे विश्लेषण करा.
२०१८
  • मध्य आशिया भारताकरिता स्वारस्यपूर्ण क्षेत्र आहे, मात्र या क्षेत्रामध्ये बऱ्याच बाह्यशक्तींनी स्वत:ला स्थापित केले आहे. या संदर्भात भारत अश्गाबात करार २०१८ मध्ये सामील होण्याच्या परिणामांवर चर्चा करा.
  • भारत व आफ्रिका यांच्यातील संबंधांना २००८ पासून संस्थात्मक स्वरूप प्राप्त झालेले आहे. आतापर्यंत इंडिया आफ्रिका फोरम समीट अंतर्गत ३ परिषदांचे आयोजन करण्यात आले. भारत-आफ्रिका संबंधांमध्ये चीन हासुद्धा महत्त्वाचा घटक आहे.
या घटकांच्या तयारीकरिता वृत्तपत्रातील या विषयाशी संबंधित लेख, IDSA संकेत स्थळ, वर्ल्ड फोकस हे नियतकालिक उपयुक्त ठरते.


First Published on October 23, 2018 12:14 am
Web Title: india and the world