Friday, December 16, 2016

एमपीएससी मंत्र : स्पर्धा परीक्षांची डिअर जिंदगी

एमपीएससी मंत्र : स्पर्धा परीक्षांची डिअर जिंदगी

ज्यसेवा परीक्षेच्या तयारीविषयी पुढील काही लेखांत आपण चर्चा करणार आहोत.

  

राज्यसेवा पूर्वपरीक्षा २ एप्रिल २०१७ रोजी प्रस्तावित आहे. राज्यसेवा परीक्षेच्या तयारीविषयी पुढील काही लेखांत आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांविषयी चर्चा आवश्यक आहे. बरेच उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेसोबतच एमपीएससी परीक्षांची तयारी करतात. काही जण यापकी एकाच परीक्षेवर फोकस ठेवण्याचा प्रयत्न करतात. तर काही उमेदवार एखादी छोटी-मोठी पोस्ट मिळू दे, मग यूपीएससी किंवा राज्यसेवा परीक्षेच्या तयारीबाबत विचार करू असेही नियोजन करतात. काहींचे स्वप्न मोठे, पण त्यासाठीचे प्रयत्न मात्र अत्यंत छोटे असतात. अभ्यासाच्या खोलीत आय.ए.एस./आय.पी.एस.च्या पाटय़ा किंवा चिठ्ठय़ा आणि वेळ मिळाल्यावर बँकिंग/रेल्वेच्या परीक्षांची तयारी, जनरल नॉलेजच्या पुस्तकांचा अभ्यास अशी दिशाहीन जिंदगी जगणारेही अनेक उमेदवार असतात. आपले वय, परीक्षांचे प्रयत्न, कौटुंबिक पाश्र्वभूमी, आपले ध्येय आणि त्यासाठीचे प्रयत्न याचा कसलाही मेळ करिअर नियोजनात नसतो. परिणामी प्रयत्नांचा शेवट मनासारखा नसतो.
केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांचे सध्याचे प्रारूप, वयाची मर्यादा, परीक्षांची प्रयत्न संख्या याविषयी केंद्र आणि राज्य स्तरावर बराच वैचारिक खल झाला आहे. उमेदवारांनी वयाची पस्तिशी, चाळिशी गाठेपर्यंत त्यांना अधिकारी पदाच्या रेसमध्ये ठेवून संधी उपलब्ध करून देणे कितपत व्यवहार्य आहे किंवा प्रत्येक उमेदवाराला पुरेशी संधी मिळाली पाहिजे, त्याच्या क्षमतांना सिद्ध होण्यासाठी पुरेसा म्हणजे पस्तिशी/चाळिशीपर्यंतचा वेळ लागतोच, तो मिळालाच पाहिजे या भूमिकेत एखाद्या उमेदवाराला वयाच्या पस्तिशी/चाळिशीपर्यंत प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर त्याच्यासाठी ही जिंदगी डिअर कशी राहील याचा विचार आवश्यक आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून उमेदवारांच्या वयोमर्यादेबाबत बसवान आयोगाने सादर केलेल्या शिफारशी विचाराधीन आहेत.
आयोग परीक्षा घेण्याचे आपले काम चोखपणे बजावतो. आपण परीक्षा देण्याचे आणि त्यासाठी अभ्यास करण्याचे कर्तव्य चोखपणे कसे बजावता येईल हे पाहिले पाहिजे. यशस्वी करिअर घडविण्यासाठी त्याचे नियोजन गांभीर्याने करणे तितकेच महत्त्वाचे आहे. यूपीएससी आणि एमपीएससीच्या मोजक्या एक/दोन परीक्षांशिवाय इतर स्पर्धा परीक्षांची नीटशी माहितीसुद्धा बऱ्याच उमेदवारांना नसते.
जसे नागरी सेवा परीक्षेचा विस्तृत अभ्यासक्रम व्यवस्थित अभ्यासला तर त्या अभ्यासावर इतर अनेक स्पर्धापरीक्षांना सामोरे जाणे सोपे ठरते तसेच राज्य लोकसेवा आयोगाची राज्यसेवा परीक्षा ही एमपीएससीच्या परीक्षांसाठी मदर एक्झाम असली पाहिजे, कारण या परीक्षेचा अभ्यासक्रम व्यवस्थितपणे अभ्यासल्यास, आयोगाच्या इतर परीक्षांना सामोरे जाणे अवघड ठरत नाही.
उमेदवारांसमोर विविध परीक्षांनिमित्ताने संधीची संख्या वाढते. करिअरची सुरक्षितता वाढते. म्हणून राज्यसेवा परीक्षांसह आयोगाच्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांची व्यवस्थित माहिती घेणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी राज्याच्या प्रशासकीय सेवांसाठी अधिकारी निवडीची परीक्षा घेतो. प्रशासकीय सेवांमध्ये भरती तसेच त्याबाबत शासनाला सल्ला देण्याचे काम आयोग पार पाडतो. आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध सेवांसाठीच्या स्पर्धा परीक्षा एमपीएससीची परीक्षा याच नावाने ओळखल्या जातात.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पुढील सेवांकरिता स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात येतात.
१. राज्यसेवा परीक्षा
२. महाराष्ट्र वनसेवा परीक्षा
३. महाराष्ट्र कृषिसेवा परीक्षा
४. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट-अ परीक्षा
५. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट-ब परीक्षा
६. दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व
प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी परीक्षा
७. साहाय्यक मोटारवाहन निरीक्षक
८. साहाय्यक अभियंता (विद्युत) श्रेणी-२,
महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा गट-ब
९. पोलीस उपनिरीक्षक परीक्षा
१०. विक्रीकर निरीक्षक परीक्षा
११. साहाय्यक कक्ष अधिकारी परीक्षा
१२. लिपिक टंकलेखक परीक्षा

No comments:

Post a Comment