एमपीएससी प्रश्नवेध : अर्थव्यवस्था
गट क सेवा पूर्वपरीक्षा
(संग्रहित छायाचित्र)
गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा जूनमध्ये होत आहे. या परीक्षेच्या सरावासाठी या सदरातून घटकनिहाय सराव प्रश्न देण्यात येत आहेत. या लेखामध्ये अर्थव्यवस्था घटकाचे सराव प्रश्न देण्यात येत आहेत.
* प्रश्न १- योजना खर्च व योजनेतर खर्च हे ……. खर्चाचे भाग आहेत.
१) महसुली
२) भांडवली
३) उत्पादक
४) अनुत्पादक
* प्रश्न २ – पुढीलपकी कोणते नाबार्डचे कार्य नाही?
१) सहकारी बँका व प्रादेशिक ग्रामीण बँकांचे नियोजन व पुनर्वत्तिपुरवठा.
२) प्राथमिक सहकारी बँकांची तपासणी.
३) ग्रामीण पतपुरवठा संस्था उभारणे व देखरेख.
४) ग्रामीण विकासात्मक पतपुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्थांची शिखर संस्था म्हणून कार्य.
* प्रश्न ३ – पुढीलपकी कोणते रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाचे कार्य नाही?
१) नवीन बँकांना परवाने देणे.
२) चलनवाढीच्या वेगाचे नियंत्रण करणे.
३) पतनिर्मिती करणे.
४) चलन जारी करणे.
* प्रश्न ४ – पुढीलपकी कोणते शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे कारण म्हणता येणार नाही?
१) सिंचन सुविधांचा अभाव
२) शेतीचे व्यावसायिकीकरण
३) स्वस्त शेतमालाची आयात
४) शेतीमधील कमी सार्वजनिक गुंतवणूक
* प्रश्न ५ – सन २०११च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात सर्वाधिक नागरी लोकसंख्या आहे?
१) महाराष्ट्र २) तामिळनाडू ३) गोवा ४) उत्तर प्रदेश
* प्रश्न ६ – सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांमधील व्यापारी विचारसरणीचे मोजमाप करण्यासाठी कोणता निर्देशांक विकसित करण्यात आला आहे?
१) इनोव्हेशन इंडेक्स
२) क्रिसीडेक्स
३) रेसीडेक्स
४) इझ ऑफ डुइंग बिझनेस इंडेक्स
* प्रश्न ७ – अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी बारावीनंतरच्या उच्च शिक्षणाकरिता भोजन, निवास व निर्वाह भत्ता देणारी योजना कोणती?
१) शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना
२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना.
३) दीनदयाळ उपाध्याय स्वयम् योजना.
४) सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना.
* प्रश्न ८ – बेसल नियम मुख्यत्वे कशाशी संबंधित आहेत?
१) बँकेचे भांडवल व जोखीमभारित संपत्ती यांचे गुणोत्तर
२) बँकेचे भांडवल व अकार्यकारी संपत्ती यांचे गुणोत्तर
३) बँकेची जोखीमभारित संपत्ती व अकार्यकारी संपत्ती यांचे गुणोत्तर.
४) बँकांमधील संकुचित पसा व विस्तृत पसा यांचे गुणोत्तर.
* प्रश्न ९ – सरकारी लेख्यांची रचना, प्रपत्रे तयार करण्याची जबाबदारी कोणाची आहे?
१) भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक
२) केंद्रीय वित्त मंत्रालय
३) भारताचे महालेखा नियंत्रक
४) १ व ३ दोन्ही
* प्रश्न १० – पुढीलपकी कोणती पंचवार्षकि योजना सामाजिक सेवा योजना म्हणून ओळखली जाते?
१) नववी २) दहावी
३) अकरावी ४) बारावी
* प्रश्न ११ – ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेबाबत कोणते विधान चुकीचे आहे?
१) साडेसात लाखांपर्यंत वार्षकि उत्पन्न असलेल्या सर्व कुटुंबांना लागू.
२) योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलांनी १८व्या वर्षांपर्यंत अविवाहित असणे आवश्यक.
३) मुलीने दहावी परीक्षा उत्तीर्ण होणे योजनेचा लाभ घेण्यासाठी बंधनकारक.
४) दि. १ एप्रिल २०१७ पासून राज्यामध्ये लागू.
* प्रश्न १२ – राखीव रोखता प्रमाण (cash reserve ratio) व वैधानिक रोखता प्रमाण (Statutory liquidity ratio) वाढविल्यास पतनिर्मिती ————
१) कमी होते.
२) वाढते
३) आहे तेवढीच राहते.
४) आधी घटून मग वाढते.
* प्रश्न १३ – जेव्हा करवसुली व कराघात वेगवेगळ्या व्यक्तींवर पडतो तेव्हा त्यास ——– कर म्हणतात.
१) प्रगतिशील २) प्रमाणशीर
३) अप्रत्यक्ष ४) प्रत्यक्ष
उत्तरे
प्रश्न १. योग्य उत्तर पर्याय क्रमांक (१)
प्र. २. योग्य उत्तर पर्याय क्रमांक (२) (राज्य सहकारी बँका, जिल्हा केंद्रीय सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका यांची तपासणी नाबार्ड करते. प्राथमिक सहकारी बँकांची तपासणी निबंधक, सहकारी संस्था हे करतात.)
प्र. ३. योग्य उत्तर पर्याय क्रमांक (३) (पतनिर्मिती करणे हे व्यापारी बँकांचे कार्य आहे. तर पत नियंत्रण हे रिझव्र्ह बँकेचे कार्य आहे.)
प्र. ४. योग्य उत्तर पर्याय क्रमांक (२)
प्र. ५. योग्य उत्तर पर्याय क्रमांक (१)
प्र. ६. योग्य उत्तर पर्याय क्रमांक (२)
प्र. ७. योग्य उत्तर पर्याय क्रमांक (२) (दीनदयाळ उपाध्याय स्वयम् योजना ही अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी बारावीनंतरच्या उच्च शिक्षणासाठी भोजन, निवास व निर्वाह भत्ता देणारी योजना आहे.)
प्र. ८. योग्य उत्तर पर्याय क्रमांक (१)
प्र. ९. योग्य उत्तर पर्याय क्रमांक (३) (भारताचे महालेखा नियंत्रक यांची काय्रे कलम १५० नुसार सन १९६१मध्ये विहित करण्यात आली आहेत. हे पद भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक पदासारखे घटनात्मक पद नाही.)
प्र. १०. योग्य उत्तर पर्याय क्रमांक (३)
प्र. ११. योग्य उत्तर पर्याय क्रमांक (४) (‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना राज्यामध्ये दि. १ एप्रिल २०१६ पासून लागू करण्यात आली आहे.)
प्र. १२. योग्य उत्तर पर्याय क्रमांक (१) (राखीव रोखता प्रमाण व वैधानिक रोखता प्रमाण वाढविल्यास बँकांकडील उपलब्ध चलन कमी झाल्याने कर्जपुरवठा व पर्यायाने पतनिर्मितीस मर्यादा येतात. त्यामुळे या दोन्हीत वाढ केल्यास पतनिर्मिती कमी होते.)
प्र. १३. योग्य उत्तर पर्याय क्रमांक (३) (वस्तू व सेवा कर हा अप्रत्यक्ष कर आहे.)
First Published on March 29, 2019 11:58 pm
Web Title: article on group services pre exam
No comments:
Post a Comment