एमपीएससी मंत्र : दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा सामान्य विज्ञान
लेखामध्ये संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी सामान्य विज्ञान घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
(संग्रहित छायाचित्र)
मागील लेखामध्ये दुय्यम सेवा पूर्व परीक्षेसाठी अर्थव्यवस्था या घटकाची तयारी कशा प्रकारे करावी, याबाबत चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी सामान्य विज्ञान घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
सामान्य विज्ञान घटकाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे विहित करण्यात आला आहे.
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र व आरोग्यशास्त्र या अभ्यासक्रमामध्ये स्पष्टपणे नमूद न केलेला; पण स्वतंत्रपणे विचारण्यात येणारा एक घटक आहे मानवी शरीर रचनाशास्त्र. दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेचे हे तिसरे वर्ष आहे. तयारीसाठी असणारा पहिल्या वर्षीचा संभ्रम आता दूर झालेला आहेच, शिवाय दोन वर्षांच्या प्रश्नपत्रिका विश्लेषणासाठी उपलब्ध असल्याने काही प्रमाणात अभ्यासाला दिशा देण्यासाठी त्यांचा नक्कीच उपयोग होणार आहे. मागील दोन वर्षांमध्ये या घटकाचे प्रश्नविश्लेषण पुढीलप्रमाणे
वरील सारणी तसेच प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांचे स्वरूप लक्षात घेता पुढील मुद्दे लक्षात येतात.
कोणत्याही उपघटकास इतर घटकांपेक्षा कमी किंवा जास्त महत्त्व देण्यात येत नाही. प्रश्नसंख्या बदलली तरी साधारणपणे १५ प्रश्न व सहा उपघटकांपकी प्रत्येकाला किमान एक प्रश्न बहाल करून इतर प्रश्नांची संख्या उपघटकनिहाय, शक्यतो समान ठेवण्याकडे कल दिसतो.
बहुविधानी प्रश्नांची संख्या कमी आहे आणि पारंपरिक पद्धतीचे बहुपर्यायी प्रश्न जास्त आहेत.
बहुविधानी प्रश्नांमध्येही काठिण्य पातळी ही मूलभूत अभ्यास झालेल्या उमेदवारांना कॉमन सेन्सने सोडविता येतील अशा प्रकारची आहे.
सर्व शाखांमधील शोध व शोधकत्रे वैज्ञानिक यांवरचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत.
मूलभूत संज्ञा आणि संकल्पनांवर बहुतेक प्रश्न विचारलेले आहेत. उपयोजित प्रकारचे प्रश्न भौतिकशास्त्राच्या गणितांपुरते मर्यादित असल्याचे दिसते.
वरील विश्लेषणाच्या आधारे या घटकाची पुढीलप्रमाणे तयारी करता येईल.
* विविध शास्त्रज्ञांनी मांडलेले महत्त्वाचे सिद्धांत, द्रव्य, त्यांचे स्वरूप व त्यांच्या अवस्था, मूलद्रव्ये आणि त्यांची वैशिष्टय़े, धातू, अधातू आणि त्यांची वैशिष्टय़े, आधुनिक आवर्तसारणी व तिची ठळक वैशिष्टय़े, काही महत्त्वाच्या मूलद्रव्यांच्या संज्ञा, महत्त्वाची संयुगे आणि त्यांची रासायनिक सूत्रे, आम्ल, आम्लारी व क्षार तसेच त्यांच्यामधील प्राथमिक अभिक्रिया, कार्बनी व अकार्बनी संयुगे आणि त्यांची रासायनिक सूत्रे हा रसायनशास्त्र घटकाचा अभ्यासक्रम गृहीत धरावा.
* यांवर थेट आणि जीवशास्त्र किंवा कृषी संबंधित अशा प्रकारचे पण कमी काठिण्य पातळीचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत.
* रसायनशास्त्र घटकाचा अभ्यास वस्तुनिष्ठ पद्धतीने सारणी पद्धतीत टिप्पणे काढून करता येतो. त्यासाठी वरील अभ्यासक्रम समजून घेऊन त्यावरील मागचे प्रश्न पाहून सराव करणे हा महत्त्वाचा भाग आहे.
* प्रकाश, ध्वनी, भिंग, धाराविद्युत, चुंबकत्व, गती व गतीविषयक समीकरणे यांवर मूलभूत संकल्पना आणि गणिते विचारली जाऊ शकतात.
* गणितांच्या सरावासाठी पाठय़पुस्तकामधील उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा. त्यापेक्षा जास्त वेळ यासाठी देण्याची आवश्यकता नाही.
* वर्गीकरणाच्या पद्धती व संबंधित शास्त्रज्ञ, विविध संच व विभाग व त्यातील प्राणी/वनस्पती व त्यांची वैशिष्टय़े, हा अभ्यास टेबलमध्ये वस्तुनिष्ठ पद्घतीने करावा.
* अवयवसंस्थांमधील वस्तुनिष्ठ बाबींवरच लक्ष द्यावे. प्रत्येक संस्था, अवयवसंस्था एक वेळ काळजीपूर्वक वाचून प्रत्येक संस्थेवर प्रश्न तयार केल्यास अशी तयारी जास्त प्रभावी ठरते.
* रोगांचे प्रकार- जीवाणूजन्य, विषाणूजन्य, कवकजन्य, आदिजीवजन्य, संसर्गजन्य, असंसर्गजन्य, लैंगिकदृष्टय़ा पारेषित होणारे, आनुवंशिक आजार समजून घ्यावेत. या सर्व रोगांचा त्यांची लक्षणे, कारणीभूत घटक, प्रसार, बाधित होणारे अवयव, उपचारपद्धती अशा मुद्दय़ांच्या अनुषंगाने अभ्यास करावा. यासाठीही त्याची सारणी तयार करून अभ्यास करता येईल.
* राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर एखादा रोग जास्त चच्रेमध्ये असेल तर त्याचे स्थान, प्रसार, उपचारासाठी केले जात असणारे प्रयत्न इ. चालू घडामोडींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. या घटकावर विचारले जाणारे प्रश्न थेट, वस्तुनिष्ठ, चालू घडामोडींवर आधारित असतात म्हणून या तिन्ही बाबींकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.
* आरोग्याबाबतच्या केंद्र व राज्य शासनाच्या योजना व त्यांची उद्दिष्टय़े माहीत असायला हवीत.
First Published on March 15, 2019 12:15 am
Web Title: secondary service united pre exam general science
No comments:
Post a Comment