यूपीएससी प्रश्नवेध : स्वातंत्र्योत्तर भारत
या सर्व प्रश्नांच्या चर्चेमुळे या विषयावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप लक्षात येते
(संग्रहित छायाचित्र)
प्रस्तुत लेखामध्ये आपण स्वातंत्र्योत्तर भारत या घटकावर २०१३ ते २०१८ या दरम्यान यूपीएससी मुख्य परीक्षेत विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत.
* Critically discuss the objectives of Bhoodan and Gramdan movements initiated by Acharya Vinoba Bhave and their success.
विनोबा भावे यांच्या भूदान व ग्रामदान आंदोलनाच्या उद्देशाची चिकित्सा करा आणि त्याच्या यशाची चर्चा करा. (२०१३, १० गुण आणि २०० शब्दमर्यादा)
* Write a critical note on the evolution and significance of the slogan “Jai Jawan Jai Kisan”.
‘जय जवान जय किसान’ नाऱ्याचा (घोषवाक्य) उदय आणि महत्त्व यावर चिकित्सक पद्धतीने लेख लिहा. (२०१३, १० गुण आणि २० शब्दमर्यादा).
* Analyse the circumstances that led to Tashkent Agreement in 1966. Discuss the highlights of the agreement.
कोणत्या परिस्थितीमुळे १९६६चा ताश्कंद करार करण्यात करण्यात आला, त्याचे विश्लेषण करा. करारातील प्रमुख वैशिष्टय़ांची चर्चा करा. (२०१३, १० गुण आणि २०० शब्दमर्यादा)
* Critically examine the compulsions which prompted India to play decisive roles in the emergence of Bangladesh.
कोणत्या अटळ परिस्थितीमुळे भारताला तत्परतेने बांगलादेशाच्या उदयामध्ये निर्णायक भूमिका बजावावी लागली याचे चिकित्सक पद्धतीने परीक्षण करा. (२०१३, १० गुण आणि २०० शब्दमर्यादा)
* The New Economic Policy – 1921 of Lenin had influenced the policies adopted by India soon after independence. Evaluate.
भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगोलग आखलेल्या धोरणांना लेनिनच्या १९२१ सालच्या नवीन आíथक धोरणाने प्रभावित केलेले होते. मूल्यांकन करा. (२०१४, १० गुण आणि १५० शब्दमर्यादा)
* Has the formation of linguistic states strengthened the cause of Indian unity?
भाषावार राज्यनिर्मितीमुळे भारतीय एकतेच्या उद्देशाला मजबुती मिळालेली आहे का? (२०१६, १२.५ गुण आणि २०० शब्दमर्यादा).
* What are the two major legal initiatives by the State since Independence addressing discrimination against Scheduled Tribes(STs)?
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनुसूचित जमाती (STs) विरोधात होणारे भेदभाव दूर करण्यासाठी कोणते दोन मुख्य कायदेशीर पुढाकार राज्याद्वारे घेण्यात आले? (२०१७, १० गुण आणि १५० शब्दमर्यादा)
(२०१८मध्ये या घटकावर थेट प्रश्न विचारण्यात आलेला नाही).
प्रश्नाचे योग्य आकलन करण्यासाठी लागणारा दृष्टिकोन
* उपरोक्त प्रश्नांचे योग्य आकलन केल्यास आपणाला असे दिसून येते की, यातील जवळपास सर्व प्रश्न हे भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या पुढील दोन दशकांतील महत्त्वाच्या घडामोडींशी संबंधित आहेत. म्हणून भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दोन दशकांतील घडामोडींची योग्य माहिती असणे गरजेचे आहे.
* वरील प्रश्नामध्ये भूदान व ग्रामदान चळवळीवरील प्रश्न तसेच ‘जय जवान जय किसान’ नाऱ्याशी संबंधित प्रश्न आहेत. त्याचे विश्लेषणात्मक पद्धतीने आकलन करायला हवे. तसेच तत्कालीन सामाजिक आणि आíथक विकासामध्ये त्याची नेमकी काय उपयुक्तता होती आणि यामुळे काय साध्य झाले अशा महत्त्वाच्या पलूंचा विचार करून चिकित्सक पद्धतीने उत्तराची मांडणी करणे अपेक्षित आहे.
* भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नियोजन पद्धतीने जो आíथक विकास घडवून आणण्यासाठी धोरण आखले होते त्यावर लेनिनच्या १९२१ सालच्या नवीन आíथक धोरणांचा प्रभाव कसा होता हे उदाहरणासह चर्चा करून याचे मूल्यांकन उत्तरामध्ये करणे अपेक्षित आहे.
* उपरोक्त प्रश्नामधील ‘भाषावार राज्यनिर्मितीमुळे भारतीय एकतेच्या उद्देशाला मजबुती मिळालेली आहे का?’ हा प्रश्न योग्य पद्धतीने समजून घ्यायला हवा. त्यासाठी भाषावार प्रांतरचना का करण्यात आली होती, तसेच याची नेमकी कोणती कारणे होती व नेमका इतिहास काय आहे आणि यासाठी सरकारमार्फत कोणत्या उपाययोजना आखण्यात आलेल्या होत्या हे समजून घेणे महत्त्वाचे राहील. तसेच १९६२ मध्ये स्थापन करण्यात आलेली राष्ट्रीय एकता परिषद व तिची उद्दिष्टे यासारख्या पलूंचा एकत्रित विचार करून उदाहरणासह उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. शिवाय भाषावार राज्यनिर्मितीमुळे भारतीय एकतेच्या उद्देशाला मजबुती मिळालेली आहे का, याचे संतुलित पद्धतीने विश्लेषण उत्तरामध्ये असणे अपेक्षित आहे.
* वरील प्रश्नामधील दोन प्रश्न हे भारतासोबत पाकिस्तानने केलेल्या दोन युद्धांच्या पाश्र्वभूमीला ग्राह्य़ धरून विचारण्यात आलेले आहेत. या दोन्ही प्रश्नांचे योग्य आकलन होण्यासाठी आपणाला भारताची फाळणी, फाळणीचे परिणाम, संस्थानांचे विलीनीकरण याची योग्य माहिती असणे गरजेचे आहे. त्यानंतर घडलेल्या घडामोडींचीही माहिती असणे गरजेचे आहे. तत्कालिक कारणे नेमकी कोणती होती इत्यादीची सखोल माहिती असणे गरजेचे आहे. त्याशिवाय या प्रश्नाची मुद्देसूद उत्तरे लिहिता येत नाहीत. यासोबतच ताश्कंद कराराची वैशिष्टय़े नेमकी काय होती याची संकीर्ण माहिती असणेही गरजेचे आहे. थोडक्यात हे प्रश्न विषयाची सखोल माहिती आणि संकीर्ण माहिती या दोन्ही बाबींचा एकत्रित विचार करून विचारण्यात आलेले आहेत.
* या सर्व प्रश्नांच्या चर्चेमुळे या विषयावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप लक्षात येते. आणि त्याची उत्तरे कशी लिहावी याची एक योग्य दिशा मिळते. याचबरोबर या विषयाची तयारी कशी करावी याची एक स्पष्ट आखणी करता येते.
First Published on March 22, 2019 11:58 pm
Web Title: article on post independence india
No comments:
Post a Comment